Skip to main content

भावकविता

अजुनी दूर किनारे

लेखक अर्व यांनी सोमवार, 25/05/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
उरलेत भाव काही संपलेत शब्द सारे संपला प्रवास केव्हाच अजुनी दूर किनारे जेथे मैफीली सुरांच्या होत्या कधी काळी सजली तिथे आता जखमांची मांदीयाळी भिजलेला श्रावणगंध वाहती अजूनी वारे ... संपला प्रवास केव्हाच अजूनी दूर किनारे ... वाटेतल्या फुलांनो रोखा श्वास तुमचे विपरीत अर्थ आहेत तुमच्या स्पंदनांचे क्षण शेवटाचा उशाशी तरीही गंध का रे? संपला प्रवास केव्हाच अजूनी दूर किनारे कवी :  निशांत तेंडोलकर ..
काव्यरस

रातीत लाज ओली

लेखक अर्व यांनी सोमवार, 18/05/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
रातीत लाज ओली शेजेवरी पहुडली गंधीत मोगऱ्याच्या चंद्रसवे नहाली. पावली पैंजणाचा वैरी भार होता निजल्या स्वप्न पंखी दुबळा आधार होता घरट्यातले दु:ख ते माझे मलाच माहीत भळभळत्या जखमाच नुसत्या घाव कुठेच नाहीत. माथ्यावरी विस्कटल्या रेखा संचिताच्या माझे मला कोंडले मी चंद्रात कुंकवाच्या... कवी : अर्व (निशांत तेंडोलकर)
काव्यरस

करार

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 17/05/2015 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
तिला पहिल्यांदा पाहिल तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो तिचे टपोरे डोळे, लांबसडक केस आणि त्यात माळलेला तो मोगर्‍याचा गजरा पण मला ह्यातले काहिच दिसले नव्हते कारण ती माझ्या कडे बघुन जेव्हा हसली तेव्हा तिच्या गालावर पडलेल्या खळीने मी घायाळ झालो होतो. जळी स्थळी, काष्ठी पाषाणी मला तिच दिसत होती प्रेम ही माझी गरज होती लग्न ही तिची मी तिची अडचण समजाउन घेतली आणि मग मी तिच्याशी एक करार केला परत भेटण्याचा. जस प्रेम एकतर्फि होत तसाच हा करार पण होता पण शेवटी करार हा करारच असतो मग मी प्रेम करतच राहिलो आणि ती लग्न करुन निघून गेली पण माझा स्वतःवर विश्र्वास होता आणि तिच्यावरही मी तिची वाट बघत थांबलो

गॅलरीतला पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 17/05/2015 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा? कष्टाने खुरमुडले हात यांचे, पाठीवरती मऊच कसे होतात? कानाखाली लगावल्या कधी दोन, आज त्यांचे गालगुच्चे कसे होतात? या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा? देव सारे पाण्यात बुडले, तरी यांच्या श्रद्धा, गाथेसारख्या कशा बरे तरतात? बाग सारी उजाड झाली, तरी नातीसाठी दोन फुले कुठून बरे आणतात? या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा? मुलेबाळेलेकीसुना सगळे परके झाले, तरी यांच्या गार पडवीत इतके झोपाळे कसे बरे झुलतात? घरदारगावदेश सगळे कसे मागे पडले, तरी यांच्याच एका गॅलरीसाठी पावले कशी माघारी वळतात? या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा?
काव्यरस

शामसुंदर घननिळा......

लेखक निनाद जोशी यांनी मंगळवार, 12/05/2015 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
दारि तुझ्या बैसुनी आहे होवुन दारिची शिळा का तरी ना भेटला मज तु शामसुंदर घननिळा जातोस तु लिला कराया गोपिकांच्या सोबती फोडीसी हंडे दह्याचे गोपाळ घेउन संगती जातो कधी समजेच ना तुज पाहाया मी थांबलो देउनी सर्वस्व माझे तव पायरी वरी राहीलो नाही मी अर्जुन अथवा नाही मीराबाई रे अरे मी वेडा पिसा आलो तुझीया पायी रे आज मजला भेट थोडा तुज पाहण्याची संधी दे वसुनी या नयनात मजला जन्मांतरीची शांति दे ये त्वरेने आज आता जीवज्योत संपत आहे ह्या तुझ्या भक्ताकडे बघ काळ थोडा राहीलाहे थांबलो आहे इथे मी पाहण्या तुझीया लीळा दारात ये आता तरी हे शामसुंदर घननिळा………
काव्यरस

सावधान! मगरमच्छी अश्रू

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 29/04/2015 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
सावधान मत्स्य पुत्रानों आयुष्यभर मासे मारणारा बगळा आता मगरीचे रूप घेऊन अश्रू ढाळण्यासाठी येत आहे, त्याला अचानक मत्स्य पुत्रांचा पुळका कसा आला, काही एक कळत नाही. आयुष्यभर बगळ्याने मासे सारे फस्त केले . घेऊनी वेश मगराचा. ढाळतो अश्रू आता. एका महानगरात एका मत्स्य पुत्राचा असाच जीव गेला: भुलूनी मगर अश्रुना जीव गेला मत्स्याचा. अर्पिली गांधी "चित्रफुले" ढाळूनी अश्रू मगरीने. सावधान! मत्स्य पुत्रानों घेउनी वेश साधूचा रावण हरतो सीतेला. जाणीव ठेवा इतिहासाची भुलू नका मगर अश्रुना.
काव्यरस

अजूनही तळपते आहे माझी लेखणी , माझा कुंचला !!!

लेखक Rajvardhan यांनी शुक्रवार, 24/04/2015 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी माझा कुंचला कागदावर शिंपित आहे लेखणी दवात डूबवतो आहे कागदावर लेखणीच काय कुंचलासुद्धा आज निष्प्रभ झालाय कारण तू जाताना माझी लेखणी माझा कुंचला सोबत घेऊन गेलीस ते ही कायमची ! जाताना तेवढ माझं मन मात्र विसरलीस माझं मन , माझा कुंचला , माझी लेखणी आजही तेवढीच तळपते आहे रंग भावनांचे, रंग उत्कटतेचे , रंग उसत्वाचे , रंग विरहाचे ,रंग प्रणयाचे ,रंग प्रेमाचे , रंग सदोदित संवादांचे आताशा मी कागदावर उमटवत आहे आजही तळपते आहे माझी लेखणी, माझा कुंचला !! तुझी नेत्रापालवी औस्तुक्याने फुलते आहे तुझ्या भाळी सौभाग्य नांदते आहे तुझ्या कर्ण -स्फुटिकावर मोती झळाळत आहे केसांतून निघालेली एक खट्याळ बट
काव्यरस

क्षमा नावाच्या भूमातेस

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 22/04/2015 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
अगणित अत्याचार सोसलेस तू आ‌ई आ‌ई, तुझ्या अंगावरचे मौल्यवान दागिने लुटले आमच्या चैनीसाठी आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, तुझ्या हृदयावर चालवले आम्ही असंख्य नांगरांचे फाळ तू क्षमा केलीस आ‌ई, तुझे दुधाने भरलेले स्तन बुलडोझरने कापून टाकले आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, तुझ्या दुधात हलाहल जहरिले वीष कालवले आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, आज पर्यंत आमचा प्रत्येक अपराध तू पोटात घातलास कृतघ्न उपजलो आम्ही उन्मत्त झालो आम्ही निव्वळ स्वार्थी, भ्रष्ट, नतद्रष्ट झालो आम्ही आतातर निर्लज्ज, हलकट झालोय आम्ही आ‌ई, तुझे हिरवेगार वस्त्र या पापी हातांनी फेडले आम्ही तुझ्या अंगावर असंख्य वार हसत कृरपणाने केले आम्ही
काव्यरस