Skip to main content

जमला मेळा संतसज्जनांचा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 30/11/2014 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
जमला मेळा संतसज्जनांचा जमला मेळा संतसज्जनांचा पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू|| हाती घेवूनीया विणा आणि टाळ भजनात विसरती काळवेळ हरपली तहानभुक हरपले देहभान जमला मेळा...||1|| नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी माऊलीच्या घरी आलो माहेराला जमला मेळा... ||2|| विठूरायाचे सावळे मुख पाहूनिया झाले सर्वसुख ओलांडला पर्वत यातनांचा जमला मेळा...||3|| - पाषाणभेद
लेखनविषय:

वाचने 2370
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आवडली. (ह्या संतसज्जनांमधला एक वारकरी) मुवि

विठ्ठल विठ्ठल!!

भक्तीरसाचा आनंदच अवर्णनीय.

मस्तच