पाककृती
Food - Kitchen Affairs - १. चहा
किचन मध्ये पुन्हा थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न आता करावा म्हणतो आहे. कधीकाळी रुम वरती थोडाफार स्वयपाक केल्याचा अनुभव होता.. पण त्या नंतर कित्येक वर्ष मात्र किचन मध्ये काहीच केले नाही..
बेसिक गरज : किचन हे स्वच्छ असावे .., फोटो देताना पण किमान निदान स्वच्छता दिसलीच पाहिजे.
अननसाचा शिरा
माझी पहिलीच पाककृती लिहीत असल्याने गोडाने सुरुवात करावी म्हणलं .. आणि आमच्यासारखे गोड घाशे मंडळी असतीलच इथेही .
तर आमच्या लहानपणी लग्न सोहळ्यामध्ये 2-3 दिवसाच्या समारंभात एकदा तरी अननसाचा शिरा हा उत्तम आणि बनविताना त्याच्या घमघमाटाने कधी एकदा ताव मारतो आहे अशी इच्छा निर्माण करणारा गोडाचा पदार्थ असायचा .
ढोकळा पीठ
ढोकळ्याचे पीठ बनवण्यासाठी साहित्य: एक किलो हरभरा डाळ, अर्धा किलो तांदूळ एकत्र दळून आणणे. 50 ग्रॅम खाता सोडा, 50 ग्रॅम लिंबू सत्व, 100 ग्रॅम पिठीसाखर मिक्सरवर बारीक करून पिठामध्ये मिक्स करणे. ढोकळा पीठ तयार.ढोकळा करताना पीठ भिजवताना त्यात चवीनुसार मीठ आणि हळद टाकावी.कुकरला शिटी न लावता वाफवून घ्यावा.
सुगंधित तांदूळपीठीचे हळदीच्या पानातले मोदक- टीपांसह
गणपतीचे आगमन होणारच आहे, तेव्हा बर्याच पाककलाप्रेमी ह्यांना मोदक करून पहायची उबळ असेलच.
पण होतं काय, हजार पाककृती मध्ये, पारंपारीक पद्धतीने कृती करायची तरी कशी हि अडचण असते, खास करून जे पहिलटकर असतात आणि त्यांना स्वःतच करून बघायचे असते.
तांदूळ कुठला घ्यावा? पीठी कशी करावी? नक्की पीठी कशाने कोरडी वा चिकट होते? मोदक कसे वळावे?
ह्याचे सविस्तर चित्रण खालील लिंक मध्ये आहे.
केरळ कढीलिंब झिंगे
केरळ कढीलिंब झिंगे
खुलासा: मी यात आळस केला आहे , तयार मदर्स रेसिपी ( देसाई बंधू पुणे किंवा "परंपरा ") या नावाचा "केरळ झिन्गा फ्राय" हा तयार मसाला वापरला आहे त्यामुळे १० पैकी मला २ च गुण.
बुंदीचे लाडू ....
बुंदीचे लाडू हा आमचा आवडीचा लहानपणापासूनचा सवंगडी :)
सध्या कोरोनामुळे बाहेरच खाण टाळत रक्षाबंधनासाठी घरीच लाडू केले . लहानपणी जवळ जवळ बऱ्याच लग्नात बुंदी किंवा बुंदीचे लाडू सगळ्यांच्याच खाण्यात आले असतीलच, आताशी लग्ना मध्ये वेगवेगळ्या मेनुच्या गर्दीत बुंदी न बुंदीचे लाडू जणू हद्दपारच झालेत असो .
टेम्पुरा टोफू आणि नुडल
टेम्पुरा टोफू आणि नुडल
साहित्य:
टोफू ( पनीर सारखा दिसणारा परंतु दुधाचा नाही , यात अगदी लिबलिबीत पासून ते घट्ट कोरडा असे प्रकार मिळतात , या पाकृ साठी मध्यम किंवा कोरडा वापरावा)
तरबूज / खरबूज ज्यूस musk melon juice
लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
टरबूजे , लिम्बु, संतरे गर
साखर
मीठ
चाट मसाला
आले किसुन
पाणी
दाक्षिणात्य पदार्थ : बिस्कीट अंबाडे
मध्यंतरी माझ्या मंगलोरी बन च्या पाककृतीमध्ये कंजूसकाकांनी बिस्कीट अंबाडेची पाककृती विचारली होती. त्याला त्या धाग्यावर प्रतिसाद देण्यापेक्षा इथेच पाककृती लिहीतेय. जेणेकरुन सर्वांना एक नवी पाककृती कळेल. बिस्कीट अंबाडे म्हणजेे आपल्या सोप्या भाषेत उडीद डाळीची भजी. याला बिस्कीट अंबाडे नाव का ?
पनीर टि(तिख्खा)क्का मसाला
तर त्याचं झालं काय मंडळी, मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं तसं , सगळ्या पनीर रेसिपी करायला घ्यायच्या असं मनाने ठरवलं होतं. त्यामुळे ही पण रेसिपी पनीरची करायची असं ठरवलं. आता होममिनिस्ट्रीला आवडणारी दुसरी रेसिपी करावी म्हणून तिचा फेव्हरिट पनीर टिक्का मसाला युट्युब वर बघितला.पण त्यातही पुन्हा झालं तेच! आम्हाला पोथीनिष्ठा अशी मुळी मानवतच नाही ,याचा प्रत्यय घ्यायचा तो आलाच.
कांद्याचे वाटप/ वाटण ..योग्य कृती ?
मिपावरील समस्त पाककृतीत रमणाऱ्या बल्लवांना आणि बल्लवीनीना ( असा शब्द आहे का?) एक सामान्य प्रश्न
कांद्याचे वाटप /वाटण ..योग्य कृती ?
खाली पैकी कोणती कृती जास्त चविष्ट होऊ शते
१) सोललेला कांदा कच्चा आधी वाटून ( बहुतेकदा मिक्सर मधून ) गेहेने आणि मग तेलात परतणे
२) सोललेला कांदा मोठा किंवा मध्यम चिरून घेणे आणि तेलावर परतणे आणि मग वाटणे
पनीर चिलिमिली
लॉकडाऊन झाले तेंव्हा आपल्या अनेकांच्या मनीही नसेल की आपण पुढे पुढे काय काय करू? आमचेही तसेच जाहले. आधी महिन्यातून एखादवेळा आवडत्या हाटीलात सकुटुंब खादाडीला जाणे. पंजाबि डिश,नन्तर आईस्क्रीम पानबीन यथासांग करून घरी येणे हे अनुष्ठान असायचे. कधीमधी मटकीभेळ ,चायनीज,वडापाव असे अनंत चराळ खाद्य खाणे. हे ही होतेच.
मंगलोरी बन व दाक्षिणात्य पद्धतीच्या चटण्या
नमस्कार मंडळी! खूप दिवसांनी लिहिते आहे. माझ्या एका दाक्षिणात्य मैत्रिणीच्या आईकडून कळलेली रेसिपी घरी करून पाहिली आणि वाटलं येथेही लिहावी. मंगलोरी बन म्हणजे कोणताही ब्रेडचा पदार्थ नसून आपल्या सोप्या भाषेत पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या आहेत. फक्त या पुऱ्या जरा जाडसर असतात इतकंच . हा कर्नाटकातील मंगलोर भागातील प्रसिद्ध पदार्थ आहे असं कळालं.
बिन स्प्राऊट कोंबडी
साहित्य:
- बिन स्प्राऊट
- कोंबडी ( लांबट काप करावे )
- कोरडी तांबडी मिरची
- ताजी मोठी तांबडी मिरची ( शक्यतो तिखट नसावी ...)
- पातीचा कांदा
- लसूण काप
- लांबट कापलेला कांदा
- काजू
- शेंगदाण्याचे तेल
- सोया सॉस
कोंबडी लसूण आणि थोडे सोया सॉस मध्ये भिजवूं १-२ तास ठेवावे
मिश्रफलमधु अर्थात मिक्सफ्रुट जॅम
साहित्य :- जी मिळतील ती सर्व फळे , साखर , टिकवण्यासाठी सायट्रिक ऍसिड(पावडर) पाव चमचा, रंग व इसेन्स हवे असल्यास.
सगळी फळे स्वच्छ धुऊन लोणच्याला कैरीच्या करतो त्या आकारात फोडी करून घ्यावी. (मी 3चिक्कू, 3सफरचंद,4केळी,अर्धे टरबूज,पाव अननस,1पपई,2आंबे अशी फळे घेतली.)
सिम्पल (पा)फाइन ऍपल केक!
नाम माहात्म्य..केकामध्ये पाइन एपलला फाइन करून म्हंजे रस करून वापरला आहे.. म्हणून अशे णाव दिले!
साहित्य:-मैदा 300 ग्रॅम, पिठीसाखर दीड वाटी(कडक गोड हवे असल्यास अडीच वाटी),बेकिंग पावडर व बेकिंग सोडा 1चहाचा चमचा, 1चिमूट मीठ, अर्धी वाटी सनफ्लॉवर किंवा सोयाबीन तेल,अननस रस अर्धी वाटी, अननस इसेन्स 1चमचा, दूध अर्धी वाटी, आंबट दही 1ते 2चमचे.
- ‹ previous
- 6 of 122
- next ›