टेम्पुरा टोफू आणि नुडल

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
29 Jul 2020 - 3:07 pm

टेम्पुरा टोफू आणि नुडल
साहित्य:
टोफू ( पनीर सारखा दिसणारा परंतु दुधाचा नाही , यात अगदी लिबलिबीत पासून ते घट्ट कोरडा असे प्रकार मिळतात , या पाकृ साठी मध्यम किंवा कोरडा वापरावा)
टेम्पुरा पिठी ( जपानी भज्यांचे आवरण , हे मैदा आणि मक्याच्या पिठी पासून बनवलेले असते त्यामुळे उपलब्ध नसल्यास हि दोन पीठे + मीठ + थोडी कालि मिरी घालूं घरी करता येते , भज्यांचे असे म्हणले परंतु याऐवजी नेहमीचे चण्याच्या डाळीचे पीठ वापरू नये )
कांदा, लसूण, हिरवी किंवा तांबडी ढोबळी मिरची, गाजर , लेटस , टोमॅटो , पातीचा कांदा
तयार झटपट नुडल व त्याचे मसाले ( मी इनोडोनेशियन पद्धतीचे वापरले आहेत त्यात मसाल्यात स्वतःचे तेल, तांबडय मिरची चे सॉस आणि केचप मनीस नावाचे गोडसर आणि घट्ट सोया सॉस असते )
क्रुति
- टोफू चे तुकडे करून त्या चे जे पाणी असते ते थोडे ठेवावे व हे टेम्पुरा पिठी मध्ये घोळवावे.. भज्यासारखे नाही तर तसे कोरडेच ठेवावे
- टोफू तेलात सोनेरी होईपर्यंत तळावे आणि कोमट असताना त्यावर नुडल च्या पाकिटातील मसाले थोडे भुरभुरावे , चवीस मीठ
- तेलात लसूण कांदा परतून इतर भाज्या ( टोमॅटो आणि लेटस सोडून ) परतून घेणे थोडे सोय सॉस घालावे
- नुडल पाकिटातील कृती प्रमाणे करून घेणे
( पाहिजे असल्यास त्यावर एक तळलेले अंडे घालावे )
वाढणे :
सर्व एकत्र करावं किंवा वेगवेगळे वाढावे
सोबत एखादी मस्त शिराझ
https://flic.kr/p/2jqVnSH
https://flic.kr/p/2jqVpto
https://flic.kr/p/2jqZweU
https://flic.kr/p/2jqZt1e
https://flic.kr/p/2jqZudj
https://flic.kr/p/2jqZuMf
https://flic.kr/p/2jqYb7F
https://flic.kr/p/2jqZvMb

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

29 Jul 2020 - 7:29 pm | शेखरमोघे

छान, छान. पा. कृ. मधील शेवटची ओळ महत्वाची !!