पाककृती
बाप्पाचा नैवेद्यः दलिया खीर
मी काही फार सुगरण नाही आणि बाप्पासाठी छान छान खाऊ करायला सुगरण असायची खरंतर गरजच नाही. दलियाची खीर आहेच अशी सहज सोपी आणि पटकन होणारी. शिवाय कोणालाही करता येईल अशी. बाप्पापण खूश आपण पण खूश.
बाप्पाचा नैवेद्यः केळ्याच्या पुर्या
साहित्यः
चांगली पिकलेली ३ केळी,
अर्धी वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता),
यात मावेल एवढी कणीक,
तळण्यासाठी तेल.
कृती:
बाप्पाचा नैवेद्यः स्ट्रॉबेरी कलाकंद
स्ट्रॉबेरी कलाकंद
साहित्य:
स्ट्रॉबेरी क्रश १०० ग्रॅम,
पनीर १०० ग्रॅम,
साखर १०० ग्रॅम,
खवा १०० ग्रॅम,
वेलची पावडर,
बदाम काप
कृती:
बाप्पाचा नैवेद्य : आमरसाच्या सांजोर्या
सर्वांना गेणेशोत्सावाचा हार्दिका शुभेच्छा!!
घरोघरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले आहे आणि त्यांच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ बनवले जात आहेत. मीसुद्धा अशीच एक पारंपारीक पाककृती बाप्पांसाठी येथे देत आहे.
साहित्यः
कडबू
कडबू हा पदार्थ आमच्याकडे पुराणपोळ्यांसह गौरीच्या जेवणाला करतात. म्हणजे साधारण पणे पश्चिम महाराष्ट्रातला नेहमीचा मेनू.. पुपो, कटाची आमटी, वरणभात , लोणकढं तूप, काकडीची गोडसर कोशिंबीर, बटाटा भाजी, मटकीची उसळ, कुरडया सांडगे वगैरे..
यात पुपो करायचा कुणा गृहिणी ला कंटाळा आल्याने कडबू चा शोध लागला असावा असं माझं लॉजिक!!
पाकृ येणेप्रमाणे -
बाप्पाचा नैवेद्यः मणगणं
माझं माहेर म्हणजे " नारळाचं खाणार त्याला देव देणार " वालं. त्यामुळे सगळ्या पदार्थात नारळ असतोच. तर गणपतीसाठी अशीच नारळात आकंठ बुडालेली रेसिपी. मणगणं
साहित्य-
पौष्टिक चटणी
पडवळाच्या बिया आणि शिराळ्याच्या सालींची चटणी : प्रकार १
पडवळाची भाजी केली तेव्हा पडवळच्या बिया व गर काढून फ्रीज मध्ये ठेवला. दोन दिवसांनी चटणी केली.
शिराळ्याची आमटी करणार होते. त्यासाठी शिराळ्याची साले (दोडका) किसणीवर किसून घेतली व ती साले वेगळी ठेवून दिली.
आधी कढई मध्ये पांढरे बिन पॉलिशचे तीळ पाव वाटी किंवा एक मोठा चमचा भाजून घेतले. ते वेगळे काढून ठेवले.
बाप्पाचा नैवेद्यः गवसणीच्या पोळ्या आणि शेवयांची खीर
गौरीचा नैवेद्य: गवसणीच्या पोळ्या आणि शेवयांची खीर
माझ्या आईच्या माहेरी...सांगलीतील वाळवा गाव तिचं ... गौरी जेवणाला गवसणीच्या पोळ्या आणि खीर करतात. तिच्यामुळे आमच्याकडेही या पोळ्या होतात. आमरस आणि ही पोळी पण खूप छान लागते. मला तर वाटतं गणपतीत मोदकाची उकड उरली की काय करायचं यातूनच याचा शोध लागला असावा.
बाप्पाचा नैवेद्यः बटाट्याचे कानवले
नमस्कार मंडळी!गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा! गणपतीचे घरोघर आगमन झालेच असेल. दरवर्षी दहा दिवस येणारा बाप्पा यावर्षी दोन दिवस जास्तच मुक्कामाला आहे तर रोज नविन काय नैवेद्य करायचा हा गहन प्रश्न असतोच. आज केलेत बटाटा्याचे कानवले/करंजी.
साहित्य:
बाप्पाचा नैवेद्यः गुरवळी
बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले की लगेच यावेळी आणखी कोणता पदार्थ नैवेद्य म्हणून करता येईल याचा विचार मला वाटतं सगळ्याच घराघरांमधून चालू होतो. निरनिराळे मोदक, लाडू, यांबरोबरच अनेक प्रकारच्या पक्वांन्नांची यादीच मनात उमटत असते. यावेळी मिपासाठी काही नवीन पदार्थ देता येतो का याचा विचार करता करता अचानक लख्ख प्रकाश पडला की माझ्या मनात.
बाप्पाचा नैवेद्यः काजू मोदक आणि काजूकतली
काजू मोदक
गणपतीसाठी खास सोपी आवडती झटपट आणि घरी केल्यामुळे खूपच स्वस्त अशी रेसिपी!
साहित्य:
एक वाटी काजूगर,
अर्धी वाटी साखर,
पाव वाटी पाणी,
वेलची पावडर,
अर्धा चमचा तूप,
मोदक साचा
कृती:
बाप्पाचा नैवेद्यः ऋषिपंचमीची भाजी (ऋषीची भाजी)
गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस भाद्रपद शु. पंचमि म्हणजे ऋषिपंचमी. या दिवशी करण्यात येणारी मिक्स भाजी किंवा मिसळीची भाजी म्हणजेच ऋषीची भाजी.
बाप्पाचा नैवेद्यः बेसनाच्या वड्या
साहित्य-
दोन मेजरिंग कप्स बेसन,
एक मेजरिंग कप साखर,
साखरेच्या अर्धे पाणी,
पाऊण मेजरिंग कप साजूक तूप,
अर्धा मेजरिंग कप दूध,
आवडीप्रमाणे बदामकाप,
काजूचे काप,
वेलचीपूड एक टीस्पून.
कृती-
बाप्पाचा नैवेद्यः प्रकाशची बर्फी
प्रकाशची बर्फी
दादरच्या प्रकाशमध्ये पूर्वी ही पांढरी शुभ्र ,वर फक्त चारोळी घातलेली बर्फी मिळत असे .आता दूर राहायला गेल्यापासून प्रकाशमध्ये वारंवार जाणे जमत नाही, आणि गेलो, तरी आता ती बर्फी मिळत नाही, एकतर थोडीशी काळपट दिसते, शिवाय वर पिस्ता कप लावलेले असतात.
बाप्पाचा नैवेद्यः खजूर शेंगदाणा लाडू
गणपतीबाप्पाचा नैवेद्य म्हणजे विविध प्रकारचे लाडू आलेच. गणेश चतुर्थीला उपास करणारी मंडळी भरपूर आहेत. त्या सर्वांना चालेल असे लाडू म्हणजे खजुराचे लाडू. मी खजूर आणि शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू केले. मात्र शेंगदाण्याऐवजी तुम्ही सुका मेवा, बदाम, काजूगर या गोष्टी वापरूनही असेच लाडू तयार करू शकता. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तसेच पांढरी साखर न वापरता खजूर वापरल्याने शरीराला काही प्रमाणात लोह मिळते.
पुणे मान्सुन फेस्ट मिसळपाव
पुणे मान्सुन फेस्ट मिसळपाव - ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट
स्थळ - Occasions Lawn, Next to Regent Plaza, Baner-Pashan Link Road, from 12pm onwards.
प्रवेश फी : ५० रुपये
अधिक माहितीसाठी इथे पहा: https://lbb.in/pune/pune-monsoon-fest-misalpav-edition/
- ‹ previous
- 15 of 122
- next ›