नीरव मोदी व पी.एन.बी. घोटाळा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture
माईसाहेब कुरसूंदीकर in काथ्याकूट
18 Feb 2018 - 2:10 pm
गाभा: 

गेल्या २५-३० वर्षात बँकांचे बर्याच प्रमाणात संगणकीकरण झाले. त्याने अनेक फायदे झाले. मात्र आर्थिक घोटाळ्याना काही आळा बसतोय असे दिसत नाही. नुकताच उघडकीस आलेला नीरव मोदी-पी.एन.बी. घोटाळा. हिरे/हार दागिने बनवून विकणार्या नीरव मोदी व त्याच्या कंपनीने २०११ पासून एकूण ११,००० कोटी काढले. ह्या बँकेच्या अधिकार्यानी अनेक 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'(LoU) नि.मो. कंपनीला दिली. त्यानुसार नि.मो.कंपनीने पी.एन.बी. व ईतर काही बँकातून तो पैसा काढला. परतफेड होत नाही हे दिसल्यावर घोटाळा उघडकीस आला. काही पडलेले प्रश्नः
१) LoU चा रेकॉर्ड बँकेच्या सेंट्रल डेटाबेसमध्ये नाही असे बँकेने म्हंटले आहे. हे कसे शक्य झाले ?
२)swift मेसेजिंग सिस्टिम व नॉस्ट्रो खाते हा काय प्रकार आहे ?

सध्यातरी काही अधिकार्याना अटक झाली आहे. पी.एन.बी. चे संचालक सुनिल मेहता ह्यांनी आमची बँक चोख व्य्वहार ठेवते..आम्ही ह्या प्रकरणातून बाहे येवू असे सांगितले आहे. वरकरणी ते म्हणत असले तरी शेकडो कोटींचे कर्ज काढले जाते पण बँकेच्या सर्वोच्च अधिकार्याना ह्याची कल्पना नसते ह्यावर कसा विश्वास ठेवायचा?
ED(सक्तवसूली सण्चलनालय) व सी.बी.आय. वगैरे वरातीमागून घोडे असा प्रकार असतो. विजय मल्ल्यासारखाच नीरव आधी पळाला(म्हणजे पळायला लावले) व यथावकाश सी.बी.आय. ने एफ.आय.आर. नोंदवला. आता अपेक्षेप्रमाणे धाडसत्र चालू आहे व 'आम्हाला नाय बुवा माहीत हा नीरव मोदी' असे सांगण्याचा भाजपा व कॉंग्रेसचा प्रयत्न चालू आहे.
राहता राहिला शेवटचा प्रश्न- अतिधनाढ्यांच्या यादीत नाव पटकावणार्या नीरव मोदीला एवढे कर्ज काढायची( व तेही अशा मार्गाने) गरज काय?(https://retail.franchiseindia.com/interview/retail-people/profiles/Over-... ) ह्या दोन महिन्यापुवीच्या मुलाखतीत तो जगातील विविध शहरात शाखा उघडण्याबद्दल बोलतोय. मग असे दोन महिन्यात काय झाले ?

प्रतिक्रिया

खुप उत्सुक आहे प्रतिक्रिया वाचायला.

अनुप ढेरे's picture

18 Feb 2018 - 5:50 pm | अनुप ढेरे

हा लेख वाचा. उत्तम आहे.यात स्विफ्तबद्दल सांगितलं आहे.

https://capitalmind.in/2018/02/pnb-scam-nirav-modi/

आजच वाचलं की बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे स्विफ्ट अकाउंट निरव मोदींची माणसं ऑपरेट करायची. :)

तुषार काळभोर's picture

18 Feb 2018 - 10:58 pm | तुषार काळभोर

वरील लेखात बँकेच्या कंपनी सेक्रेटरीने सेबीला लिहिलेले पत्र आहे. ज्यात घोटाळ्याची रक्कम USD 1771.69 Mio अशी आहे.
शंका - एका भारतीय (आणि भारत सरकारच्या नियंत्रणातील) कंपनीचा (सेबीच्या दृष्टिकोनातून पीएनबी ही कंपनी) भारतीय कंपनी सेक्रेटरी भारत सरकारद्वारा स्थापित नियामक मंडळाशी पत्रव्यवहार करताना अमेरिकन डॉलर मध्ये रकमेचा उल्लेख का करतात? ही सामान्य प्रथा आहे का? नसल्यास कितपत योग्य आहे? हे आक्षेपार्ह आहे का?

घोट्याळ्याची रक्कम डॉलरमधेच आहे, म्हणून.

प्राची अश्विनी's picture

18 Feb 2018 - 7:23 pm | प्राची अश्विनी

हेही वाचलं की मुकेश अनिल अंबानींची बहिण दिप्ती ही गोव्याचे खाण उद्योजक दत्तराज साळगावकर यांची पत्नी आणि त्यांची मुलगी इशिता निरव मोदीच्या भावाची , निशाल मोदीची पत्नी.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Feb 2018 - 6:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चार्ज-शीट व केस दाखल करताना अंबांनींकडून्/खाणमालकांकडून मिळणारा निधी व २०१९ च्या निवडणूकांचाही विचार करावा लागणार आहे.

दुर्गविहारी's picture

18 Feb 2018 - 7:27 pm | दुर्गविहारी

माईसाहेब बँक ईन अँक्शन. बाकी आगामी धुळवडीच्या प्रतिक्षेत.

बाकीच्या प्रतिसादांची वाट पाहतो....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बुम्मा अधिरिंदी... धिम्म्मे तिरिगिंदी... ;) :- Jawaan

आला आला माईंचा एकमेव "द्वितीय" धागा आला.

तुम्ही नेहेमी इतरांच्या धाग्यावर प्रतिसाद देता तेव्हा आता जाणकार इतरेजन देखील तुमच्या धाग्यावर हजेरी लावतीलच.

तुझ्या धागा माझ्या धागा गुंफू पिंकांच्या माळा.

बाकी माई तुमचे बोअरींग प्रतिक्रियेमध्येच चांगले जमते हो, धाग्यात नाही.

एकुलता एक डॉन's picture

18 Feb 2018 - 10:03 pm | एकुलता एक डॉन

सध्या सहकारी संस्थान मध्ये घोटाळे कसे चालतात ? कोणत्या पातळीचे ?

सदरहू प्रतिसाद एका अभ्यासू (जेष्ठ मिपाकर) यांच्या प्रतिसाद मधून जशाच्या तसा

*PNB स्कॅम : कसा झाला 11,360 कोटींचा घोटाळा?*

(हा घोटाळा नेमका कसा घडला हे समजून घेण्यासाठीबीबीसी प्रतिनिधी मोहनलाल शर्मा यांनी बँक ऑफ बडोदाचे निवृत्त कार्यकारी संचालक आर.के. बक्षी यांच्याशी बातचीत केली)

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत 11, 360 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचं बुधवारी स्पष्ट केलं. भारतातील सार्वजनिक बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने या प्रकरणात अडकलेल्यांची नावं जाहीर केलेली नाहीत.

मात्र या गैरव्यवहारात बँक कर्मचारी आणि आरोपी खातेधारक यांची हातमिळवणी असल्याची कबुली बँकेने दिली आहे. बँकेचे कार्यकारी संचालक सुनील मेहता यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, "2011पासून हा घोटाळा सुरू होता. मात्र यंदा 3 जानेवारीला हे सगळं प्रकरण बाहेर आलं. संबंधित चौकशी यंत्रणांना याची माहिती देण्यात आली".

2011 ते 2018 अशी सात वर्षं या घोटाळ्यादरम्यान कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. याप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी यांचं नाव पुढे येत आहे.

काँग्रेसनेही सरकार आणि पंतप्रधानांना टीकेचं लक्ष्य केलं. 'ऑडिटर तसंच बँकेच्या कारभाराची सूक्ष्म तपासणी करणाऱ्या यंत्रणांना कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याबद्दल कसं कळलं नाही? एखाद्या मोठ्या माणसाकडून अभय असल्याशिवाय हे शक्य होऊ शकतं का?' असा सवाल विरोधकांनी केला.

*आर.के.बक्षी यांचा दृष्टिकोन*

PNB घोटाळ्यात 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'चा (LOU) गैरवापर मूलभूत आहे. बँकांच्या कारभारात LOU प्रचलित संकल्पना असून, कामकाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे.

भारतात कार्यरत असणारे उद्योजक देशाबाहेरून वस्तूंची आयात करतात. आयात वस्तू तसंच सेवेची किंमत म्हणून देशाबाहेर असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला पैसे द्यावे लागतात.

आयातकर्त्याकडे पैसे नसतील किंवा क्रेडिट कालावधी किंवा उसन्या वेळेचा त्याला फायदा घ्यायचा असेल तर बँक आयातकर्त्या माणसाला विदेशातील एका बँकेला LOU देतं.

विशिष्ट कामासाठी आयातकर्ता निर्यात केलेल्या वस्तू किंवा सेवेसाठी निर्यातदाराला पैसे देणं लागतो. हे पैसे आयातकर्त्याला पुरवावेत असं या पत्रात नमूद असतं.

एक वर्षानंतर विशिष्ट दिवशी आयातकर्ता व्याजासकट पैसे चुकते करेल अशी ग्वाही बँक आयातकर्त्याच्या वतीने देते.

यात अनोखं किंवा नवीन काहीच नाही. बँकेच्या कामकाजाचा हा नियमित भाग आहे. याच आधारावर बँकांचं बायर्स क्रेडिट काम करतं. हे बँकांसाठी महत्त्वपूर्ण असतं.

PNBकडून विदेशातील बँकेला एलओयू देण्यात आलं असेल तर आयातकर्ती व्यक्ती निर्यातकर्त्या व्यक्तीला जेवढी रक्कम देणं लागते तेवढी रक्कम विदेशी बँकेकडून PNBने दिलेल्या हमीनुसार देते.

एका वर्षानंतर आयातकर्ता PNB कडे पैसे जमा करेल. यानंतर PNB कडून विदेशी बँकेला व्याजासकट पैसे परत करण्यात येतील, असं या LOUचं काम चालतं.

*या प्रकरणी काय झालं?*

बुधवारी उघड झालेल्या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँकेतर्फे अधिकृत LOU देण्यात आलं नाही. मात्र बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी छुप्या पद्धतीने नकली LOU तयार करून आयातकर्त्याला पुरवलं.

PNBच्या काही कर्मचाऱ्यांकडे स्विफ्ट सिस्टीमचं नियंत्रण असतं. बँकांना आपापसात व्यवहार करता यावेत यासाठी त्यांना तांत्रिकदृष्ट्या एकत्र जोडणारी ही प्रणाली आहे. जगभरातील सगळ्या बँका या प्रणालीद्वारे एकमेकांशी संलग्न असतात.

स्विफ्ट सिस्टीमद्वारे पाठवले जाणारे संदेश अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एका सांकेतिक फॉरमॅटमध्ये पाठवले जातात. LOU पाठवणं, उघडणं आणि त्यात सुधारणा करण्याचं काम याच स्विफ्ट सिस्टीमद्वारे केलं जातं.

म्हणूनच स्विफ्ट सिस्टीमद्वारे पाठवण्यात आलेला संदेश गोपनीय आणि सुरक्षित मानला जातो. एका बँकेकडून या सिस्टीमद्वारे आलेला संदेश दुसऱ्या बँकेत अधिकृत मानला जातो. म्हणून कोणीही त्याबाबत संशय घेत नाही.

मात्र ही प्रणाली हाताळण्याचं काम शेवटी माणूसच करतो. PNBच्या या विशिष्ट शाखेत या प्रणालीचं काम दोन व्यक्तींकडे होतं. यातला एक म्हणजे या प्रणालीला माहिती पुरवण्याचं काम करणारा क्लार्क आणि या माहितीची सत्यासत्यता तपासण्याचं काम असलेला अधिकारी.

हे दोघंच हे काम गेली 5- 6 वर्षं करत असल्यासारखं वाटतं आहे. सर्वसामान्य परिस्थितीत असं व्हायला नको. बँकेत विविध कामं वेगवेगळ्या व्यक्तींकडे आलटून पालटून दिली जातात.

नीरव मोदी यांनी वैयक्तिक किंवा त्यांच्या कंपनीने दाखवलेली आमीशाला बळी पडून किंवा दिलेल्या आश्वासनांना भुलून या दोन कर्मचाऱ्यांनी नकली LOU तयार करण्यात आलं असू शकतं.

PNBकडून स्विफ्ट सिस्टमद्वारे हे LOU पाठवण्यात आलं. स्विफ्ट सिस्टमद्वारे आल्यानं या LOUच्या वैधतेबाबत विदेशातील बँकेने कोणताही संशय घेतला नाही. मात्र प्रत्यक्षात PNBचं हे अधिकृत LOU नव्हतं.

बँकेने व्यापाऱ्याला किती पैसे द्यावेत यावर कोणतीही मर्यादा निश्चित केली नाही. बँकेच्या महाव्यवस्थापकांनी LOU पाठवणाऱ्या कर्मचाऱ्याला मान्यतेसाठी हस्ताक्षर असलेलं कोणतंही पत्र दिलं नाही. कर्मचाऱ्याने गुप्तपणे LOU पाठवलं.

*आणखी एक त्रुटी*

PNBतर्फे पाठवण्यात आलेला संदेश अधिकृत वाटत नाही. स्विफ्ट सिस्टम कोअर बँकिंगशी हा संदेश संलग्न वाटत नाही.

कोअर बँकिंगनुसार सुरुवातीला LOU तयार होतं आणि स्विफ्ट सिस्टीमद्वारे पाठवण्यात येतं. याच कारणामुळे कोअर बँकिंगमध्ये एक काँट्रा एंट्री होते. यानुसार किती संदेश पाठवण्यात आले याची नोंद स्वतंत्रपणे ठेवली जाते. अमुक दिवशी अमुक कर्ज देण्याची मंजुरी दिली गेली अशा या नोंदींचा अहवालही तयार करण्यात येतो.

PNBच्या सिस्टीममध्ये बहुधा काहीतरी गडबड असावी. स्विफ्ट सिस्टीम कोअर बँकिंगशी संलग्न नव्हतं. दुसरं म्हणजं दिवसभराचं कामकाज आटोपल्यानंतर सगळ्या व्यवहारांचं परीक्षण करण्याची जबाबदारी बँकेच्या मॅनेजरची असते. अधिकृतपणे या व्यवहारांना मान्यता मिळाली आहे की नाही याकडेही लक्ष देणं अपेक्षित आहे. बहुतेक याप्रकरणी असं परीक्षण झालेलं नाही.

*...तर घोटाळा झाला नसता*

स्विफ्ट सिस्टीम कोअर बँकिंगशी संलग्न नाही हाही अडचणीचा मुद्दा नाही. दररोजच्या स्विफ्ट व्यवहारांची शहानिशी केली असती तरी घोटाळा उघड होऊ शकला असता.

PNBकडून स्विफ्ट संदेश मिळालेला असल्याने समोरची बॅंक संशय व्यक्त करण्याचा मुद्दा येत नाही. भारतीय बँकेच्या हमीनुसार विदेशातील बँक ग्राहकाला पैसे देते. पैसे परत मिळण्यासाठीची तारीख निश्चित होते. ठरलेल्या दिवशी रक्कम परत मिळाली तर प्रकरण पुढे जात नाही. मात्र तसं झालं नाही तर विदेशातील बँक तात्काळ भारतीय बँकेशी संपर्क साधते.

याचा अर्थ याप्रकरणात पैसे परत देण्याची तारीख निश्चित करण्यात आल्यानंतर त्यादिवशी किंवा त्याच्या एक-दोन दिवस आधी पैसे चुकते करण्यात येत असावेत. त्यामुळे घोटाळा बाहेर येण्याची आणि पर्यायाने घोटाळ्यासाठी जबाबदार लोकांना पकडण्याचा प्रश्नच उद्भभवला नाही. दर वेळी कर्जासाठी वेगवेगळ्या बँकांकडे अर्ज केले गेले. ही अशी देवाण घेवाण अनेक महिने चालली असावी. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढत गेली.

*PNBवर काय परिणाम?*

हे तर स्पष्ट आहे की, या झालेल्या व्यवहारांसाठी PNBकडे सुरक्षेची हमी नाही. कारण यात PNBचा समावेश नव्हता. बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी ज्यांच्याकडे सर्वांत संवेदनशील सिस्टीमची सूत्र आहेत, त्यांनी अनधिकृतपणे हे सगळं केलं.

घोटाळा केलेल्या कंपनीची मालमत्ता तपास यंत्रणा जप्त करू शकल्या तर घोटाळा नक्की कसा घडला याची उकल होऊ शकेल. PNBला याचीच प्रतीक्षा आहे.

नीरव मोदींनी याप्रकरणासंदर्भात पत्र लिहिलं असून, पाच ते सहा हजार कोटी रुपये चुकते करण्याची तयारी दर्शवली आहे, असं सांगण्यात येत आहे. मात्र एवढा प्रामाणिकपणा असता तर नीरव मोदींनी असं कृत्य केलंच नसतं. सामान्य प्रक्रियेद्वारे ते आपलं काम करू शकत होते.

मोदी बडे उद्योगपती आहेत आणि ग्लोबल सिटीझन आहेत. त्यांच्या संपत्तीचं जाळं जगभर पसरलं आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचा शोध घेऊन जप्त करणं आणि त्याद्वारे पैसे वसूल करणं अतिशय अवघड प्रक्रिया आहे.

काही वसूल झालं तर ठीक. जे वसूल होऊ शकणार नाही त्याची नोंद एनपीए अर्थात नॉन परफॉर्मिंग अॅसेट म्हणून केली जाईल. सोप्या शब्दांत सांगायचं तर ते बँकेचं नुकसान असेल

अर्धवटराव's picture

19 Feb 2018 - 9:24 pm | अर्धवटराव

याचा अर्थ याप्रकरणात पैसे परत देण्याची तारीख निश्चित करण्यात आल्यानंतर त्यादिवशी किंवा त्याच्या एक-दोन दिवस आधी पैसे चुकते करण्यात येत असावेत.

असं असेल तर घोटाळा नक्की काय झाला? पॉरेन बँकेने पीएन्बीच्या हमीवर नीरवला पैसे दिले. निरवने ते पैसे दरवेळी परत केले. मग साडेअकर हजार करोड घोटाळ्याची रक्कर नक्की काय दर्शवते ? इतकं टोटल कर्ज नीरवने उचललं पण पीएन्बीला परत केलं नाहि? कि परत केलं पण त्यावरची बेंकेची फी भरली नाहि? कि काहि ठेवी/हमी न ठेवता केवळ बँकेच्या कर्मचार्‍यांना हाताशी धरुन परस्पर व्यवहार केला हा खरा गुन्हा?
च्यायला, आम्हि बसलोय कळफलक बडवत भविष्याची तरतूद करण्यात आयुष्य घालवत. काय तर म्हणे आपलं ज्ञान अद्ययावत ठेवा, पर्फॉर्मन्स एक्सलन्सी नि काय काय. इथे पब्लीक दोन चार कळीच्या लोकांना हाताशी धरुन हजारो करोड कमवते आणि आरामात अमेरीकेत चैन करते :प

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2018 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

निरवने ते पैसे दरवेळी परत केले. नाही.

त्याने आपली कर्जे एकतर ...
(अ)"रोल ओव्हर" केली : म्हणजे "जुने कर्ज + त्यावरचे व्याज" इतके किंवा त्यापेक्षा जास्त नवीन कर्जाचे एलओयु घेतले, आणि/किंवा
(आ) जुनी कर्जे "रिस्ट्रक्चर केली" : म्हणजे कर्जे व त्यावरचे व्याज प्रत करण्याच्या अटी बदलून त्याला सोईच्या करून घेतल्या.
या कारवायांचा परिणाम, कर्जे परत करण्यात झाला नसून, "निरव मोदी व नेहूल चोकशीच्या कंपन्यांचे आजचे मरण उद्यावर ढकलण्यात आणि तसे करताना दर कृतीने कर्जाची रक्कम फुगत जाण्यात" झाला आहे.

हे सगळे करण्यातही फार मोठी समस्या नाही. पण, मुख्य दोन समस्या अश्या आहेत की :

(अ) मूळ कर्जे, देताना, रोल ओव्हर करताना आणि रिस्ट्रक्चरिंग करताना बँकेने निरवकडून कायद्याने आवश्यक तेवढे (दर वेळेच्या एकूण कर्जाच्या ११०% किंवा जादा) तारण घेतले नाही. त्यामुळे निरवने हात वर केल्यास (जे होणे जवळ जवळ नक्की दिसत आहे) बँकेला कर्ज वसूल करण्याचा कोणताच कायदेशीर मार्ग उरणार नाही.

(आ) निरवने सर्व कर्जे (सद्या जवळ जवळ शून्य किंमत असलेल्या) खोका कंपन्यांच्या नावावर घेतली आहेत, स्वतःच्या वैयक्तीक नावावर/तारणावर नाही. त्यातल्या बर्‍याच कंपन्यांत त्याचे १% इतके क्षुल्लक समभाग आहेत. कायद्याने कर्जे परत करायची जबाबदारी कंपन्यांवर आहे, निरव मोदी या व्यक्तीवर नाही. निरवची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून, त्यांच्याद्वारे बँकेचे पैसे परत घेण्याला, हा मुद्दा अडसर ठरेल.

(इ) एका बॅकेतून दुसर्‍या बँकेत आंतरराष्ट्रिय स्तरावर पैसे/क्रेडिट हस्तांतरण करताना (एलोयु देताना) वापरल्या जाणार्‍या "स्विफ्ट" या संगणकिय प्रणालीचा पासवर्ड निरवच्या गोटातल्या कोण्या अनधिकृत माणसाला दिला होता, असेही बोलले जात आहे. बँकेच्या अधिकृत स्विफ्ट प्रणालीवरून झालेले व्यवहार बँक नाकारू शकत नाही, ते तिला पुरे करावेच लागतील. कारण... "परदेशी बँकेने निरवला दिलेली रक्कम, पंनॅबॅकेच्या एलोयुच्या (कर्जाची रक्कम पंनॅबँक परत करेल या वचनावर) हमीवर दिलेली रक्कम म्हणजेच, तत्वतः व वस्तूतः पंनॅबॅकेला दिलेले कर्ज आहे; ते कर्ज निरवकडून वसूल करायची जबाबदारी पंनॅबँकेची आहे"... असा एलोयुचा साधासोपा अर्थ असतो.

(ई) अलाहाबाद बँकेवरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये युपिए सरकारने नियुक्त केलेल्या एका एक्टर्नल डायरेक्टरने निरवमोदी आणि/किंवा गितांजली ब्रँड्जना दिल्या जाणार्‍या कर्जांबद्दल, "चुकीच्या पद्धतीने दिलेली आणि एनपीए ठरतील अशी कर्जे" असे आक्षेप अनेकदा घेतले होते. त्यासंबधी कंपन्यांची चौकशी होण्याऐवजी त्या डायरेक्टरला दिल्लीत वित्त मंत्रालयात बोलवून त्याची कानउघाडणी केली गेली आणि त्याला राजिनामादेण्याची सक्ती केली गेली. हा दावा त्या डायरेक्टरने रष्टीय टीव्ही वाहिनीवर केला आहे.

(उ) गंभीर अवैध कृती केल्यामुळे निरव मोदी आणि गितांजली ब्रँडच्या कंपन्यांवर/अधिकार्‍यांवर सेबीने मार्केट्मध्ये खरेदी-विक्री करण्यास बंदी घातली होती. या कंपन्याच्या अनेक फ्रँचाइजनी फसवणूकीचे अनेक दावे कोर्टात दाखल केले होते/आहेत. तरीही, त्यांची दखल न घेता, अनेक बँका त्या कंपन्यांना निर्वेधपणे सतत सातएक वर्षे कर्जे, रोलओव्हर, रिस्ट्रक्चर आणि एलओयुज देत राहिल्या.

वरच्या सर्व गोष्टींत बँकांच्याच्या अक्षम्य चूका झालेल्या आहेत, यात संशय नाही. अश्या व इतक्या चुका उपनिरिक्षक स्तराचा कनिष्ठ अधिकारी करू शकेल असे समजणे कठीण आहे. त्याच बरोबर, पंनॅबँकेचे अंतर्गत ऑडीट, वरिष्ठ अधिकारी, त्रयस्थ ऑडीट आणि आरबीआयचे ऑडीट यामधून या चुका अनेक वर्षे निर्वेधपणे दुर्लक्षित राहिल्या. या सगळ्या गोष्टींमुळे, या प्रकरणात फार वरिष्ठ (कदाचित् अत्युच्च) स्तरापर्यंतचा हस्तक्षेप झाला असावा असे म्हणायला फार मोठा वाव आहे.

पैसा's picture

20 Feb 2018 - 11:06 am | पैसा

मोदीला सँक्शन्ड लिमिट नाही. म्हणजेच पीएनबीने त्याला एल.ओ.यु. प्रत्यक्षात दिले नाही. बँकेच्या बॅलन्स शीटमधे हे कर्ज आलेले नाही. त्यामुळे बँक म्हणून पीएनबीची थेट जबाबदारी रहात नाही. भ्रष्टाचार व्यक्तिगत पातळीवर कर्मचार्‍यांतर्फे झाला आहे. मात्र पीएनबीवर किती आर्थिक भार येऊ शकतो हे सांगणे अवघड आहे. कारण पीएनबीची स्विफ्ट सिस्टीम वापरली गेली मात्र अ‍ॅसेट प्रत्यक्षात नव्हतीच. गुंतागुंतीच्या रिकव्हरी केसेस होणार आहेत. ज्या बँकानी एल.ओ.यु. च्या आधारे कर्जे दिली त्यांना नक्कीच फटका बसणार आहे.

PNB says that on 16 January the accused firms presented a set of import documents to the Mumbai branch and requested buyers’ credit to pay overseas suppliers. Since they had no pre-arranged credit limit, the branch official asked the companies to put down the full amount as collateral so the bank could issue LoUs to authorize the credit.

When the firms argued that they had used such facilities in the past without keeping any money on margin, PNB scanned through records and found no trace of any transactions, according to the bank’s account.

It then found that two junior employees had issued LoUs on the SWIFT interbank messaging system without entering the transactions on the bank’s own system. Such transactions went on for years without detection, PNB said.

Banking sources have said in some banks the SWIFT system, which is used for international transactions, and the core banking system work independently of each other. In PNB’s case, it said the outstanding LoUs were not available on its core banking system run on Infosys’s Finacle software, thus the LoUs issued went undetected.

****

PNB has said the transactions are “contingent” in nature, and it will decide on the liability based on the law and the genuineness of underlying transactions.

Banking sources have said several other banks who have extended loans based on the PNB LoUs that were later found to be fraudulent are at risk of losing money.

Some of the banks say PNB is liable to pay since it issued the LoUs, although PNB, in a 12 February “caution notice” addressed to chief executives of 30 banks, including two foreign banks, said the other banks also have a share in the blame as they “overlooked” certain Indian central bank rules.

It also said none of the overseas branches of India-based banks had shared with PNB any documents or information at the time of extending buyers’ credit to the companies.

****

पीएनबीचे नक्की किती कर्मचारी भ्रष्टाचारात सामील होते सांगणे कठीण आहे. अनेकदा चीफ मॅनेजर तोंडी आदेश देतो आणि पेपर्स नंतर तयार होत आहेत असे सांगतो. पकडले गेलेले हे दोघे जर फक्त दिवसभर स्विफ्ट मेसेज द्यायचे काम करत असतील तर लोन्स डिपार्टमेंटने प्रत्यक्ष सँक्शन दिले आहे का हे त्याना माहीत असेलचच असे नव्हे. त्याचवेळी स्विफ्टचा पासवर्ड मोदीच्या माणासाकडे होते असेही वाचले. हा पासवर्ड वरच्या लेव्हलच्या कोणा ऑफिसरने किंवा बँकेच्या आयटी डिपार्टमेंटने दिलेला असू शकतो. अजून एक महत्त्वाचा लॅप्स म्हणजे बँकेत एक ऑफिसर कन्करंट ऑडिटर म्हणून काम करत असतो. त्याने रोजची व्हाउचर्स तपासणे, स्विफ्ट मेसेज इ. रोज चेक करणे अपेक्षित असते. उत्तम व्हिजिलंट ऑफिसर असा तो असायला हवा. प्रत्यक्षात रोजच्या कामात निरुपयोगी, टाळाटाळ करणार्‍याच्या गळ्यात हे कॉन्करंट ऑडिटरचे काम घालण्यात येते. एक तर तिथला कॉन्करंट ऑडिटर घोटाळ्यात सामील असेल किंवा अगदीच कुचकामी असेल.

बँकेच्या बॅलन्स शीटमधे सँक्शन्ड लिमिट नसल्याने पीएनबीवर फार मोठी जबाबदारी येणार नाही असे माझे मत.

अनुप ढेरे's picture

20 Feb 2018 - 11:14 am | अनुप ढेरे

जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला नकार दिला तर पिएन्बीची विश्वासार्हता किती राहील?

आणि बाहेरचा ऑडिटर हे स्विफ्ट संदेश तपासत नाही का? आणि त्याने तपासणं अपेक्षित असेल तर ऑडिटरवर देखील कारवाई होऊ शकते राईट?

पैसा's picture

20 Feb 2018 - 11:24 am | पैसा

जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला नकार दिला तर पिएन्बीची विश्वासार्हता किती राहील?

ते रिकव्हरी केसे, त्यांचा निकाल यावर अवलंबून राहील. कायद्याने प्रथमदर्शनी तरी 'निग्लिजन्स' शिवाय पीएनबीची काही जबाबदारी दिसत नाही.

आणि बाहेरचा ऑडिटर हे स्विफ्ट संदेश तपासत नाही का? आणि त्याने तपासणं अपेक्षित असेल तर ऑडिटरवर देखील कारवाई होऊ शकते राईट?

इंटर्नल आणि एक्सटर्नल दोन्ही ऑडिटर्स जबाबदार आहेतच. त्यांनी संपूर्ण परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यांच्यावर कारवाई होणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2018 - 12:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्विफ्ट प्रणाली आंतरराष्ट्रिय कायद्यांवर चालते. स्विफ्टची मेंबर असलेल्या पीएनबीच्या अधिकृत सर्वरवरून गेलेल्या स्विफ्ट मेसेजमधले वचन पीएनबीला पाळावेच लागेल. तिच्या गलथानपणाबद्दल इतर बँकांना जबाबदार धरता येणार नाही. मात्र, यातही अजून एक गोची असल्याचे वाचले आहे. दर स्विफ्ट डिसबर्समेंटबरोबर अजून एक स्वतंत्र ऑथॉरायझेशन लागते. काही व्यवहारांत हे ऑथॉरायझेशन न मिळूनही परदेशी बँकेने केवळ स्विफ्ट मेसेजच्या आधारावर निरवला पैसे दिले आहेत. अश्या केसेसमध्ये पंनॅबॅक हात वर करू शकेल... मात्र यामुळे पंनॅबँकेला आणि एकंदर भारतिय बँकिंगला आंतरराष्ट्रिय स्तरावर मोठी नामुष्की पत्करावी लागेल. शिवाय मुख्य गोची अशी आहे की ऑथॉरायझेशनशिवाय निरवला पैसे देणार्‍यात बहुतेक (किंवा सर्वच) परदेशी बँका म्हणजे वास्तवात भारतिय राष्ट्रियिकृत बँकांच्या परदेशी शाखा आहेत ! म्हणजे असा म्हणा किंवा तसा म्हणा, तोटा शेवटी भारताचाच आहे !

पंनॅबँकेचे (आणि बहुतेक सर्व भारतिय बँकांचे) स्विफ्ट बँकिंग व्यवहार कोअर बँकिंग सॉफ्ट्वेअरशी संलग्न (इंटिग्रेटेड) नाहीत हा अत्यंत दुष्ट विनोद (ब्लॅक ह्युमर) आहे... त्यामुळे मानवी चुका/बदमाषी पकडणे हे केवळ मानवी ऑडीटरवर अवलंबून ठेवले आहे. याचाच फायदा घेऊन हा गैरव्यवहार झाला आहे. स्विफ्ट व्यवहारातून बँकांना बरीच नॉन-फंडेड व्यवहारांची फी परकिय चलनात मिळते. तरीही (की म्हणूनच ?) ही महत्वाची अकाऊंटिंग तृटी* ठेवण्यामागे, स्विफ्ट व्यवहार (किंवा त्या व्यवहारांतले गैरव्यवहार) गुप्त ठेवण्यापेक्षा वेगळा उद्येश असू शकत नाही ! विशेषतः, आरबीआयने हे सर्व बँकाना, अनेक बिलियन डॉलर्सचे स्विफ्ट व्यवहार, अनेक दशके कोअर बँकिंगच्या बाहेर करण्याची मुभा दिली हे अनाकलनिय आहे... कोणत्यही संस्थेचा कोणताही आर्थिक व्यवहार कोअर बँकिंगमध्ये न येणे ही लपवालपविची संधी आणि "बॅड अकाउंटिंग प्रॅक्टिस" समजली जाते. आता पंनॅबँकेने स्विफ्ट आणि कोअर बँकिंग इंटिग्रेट करायला घेतले आहे... इतर बँकांचे अजून माहीत नाही. बँकिंग एक्सलंस अ‍ॅवॉर्ड आणि व्हिजिलन्स एक्सलंस अ‍ॅवॉर्ड मिळालेल्या पंनॅबँकेची ही अवस्था, मग इतरांचे काय असेल !?

* : अश्याच आरबीआयमान्य अकाउंटिंग तृटी ठेऊन कर्जांच्या थकबाक्या अनेक छुप्या नावां(हेड)खाली लपविल्या गेल्या/जात आहेत व त्यामुळे एनपीए कमी दाखवून बँकेचा आर्थिक परफॉर्मन्स फुगवून दाखवणे सहज शक्य होत आहे... त्यामुळेच, दरवर्षी / दर कडक ऑडीट/रिव्ह्युनंतर एनपिएचे आकडे भरमसाठ वाढत चालले आहेत... अजून किती हाडे कपाटातून घरंगळणार आहेत याचा अंदाज आरबीआयच्या गव्हर्नरलाही नसावा !

प्रदीप's picture

20 Feb 2018 - 6:00 pm | प्रदीप

सदर बँकेची स्विफ्ट्वरील ट्रॅन्झॅक्शन्स जरी त्यांच्या सीबीएसमधे प्रतिबिंबीत झाली नसतील, तरी त्यांच्या नॉस्त्रो अकाउंटमधे आलेले पैसे दिसले पाहिजेत, कारण तो अकाउंट सीबीसशी संलग्न आहे, असे वाचनात आले होते.

पैसा's picture

21 Feb 2018 - 8:51 am | पैसा

पैशात व्यवहार पी एन बी मध्ये झाला नाही असे दिसते. फक्त फेक एल ओ यु चे मेसेज गेले.

पैसा's picture

21 Feb 2018 - 9:03 am | पैसा

पी एन बी ला बांधून घालणारे कोणतेही कॉन्ट्रॅक्ट नाही. इथे एखादा अकाउंट हॅक करून त्यातून पैसे काढण्यासारखे प्रकार झाले आहे. त्याच्या मागे valid कॉन्ट्रॅक्ट नसल्याने नसलेले कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्युट करा म्हणून पी एन बी वर सक्ती करता येणार नाही. प्रत्यक्ष कर्ज फेक एल ओ यू च्यां आधारे देणाऱ्या बँकांनीही असे कर्ज दिल्याची माहिती पी एन बी ला दिलेली नाही याचा अर्थ त्यांच्याकडून अधिक बेपर्वाई दाखवली गेली आहे. कारण त्यांनी proper authorisation ची शहानिशा न करता कर्ज वितरित केले आहे. त्यामुळे घोटाळ्याची जबाबदारी कोणत्या बँकेच्या डोक्यावर जास्त प्रमाणात येते हे सांगणे कठीण आहे. कोर्टात केसेस चालून सगळ्या बाबी उघड होतील तेव्हाच ते कळेल.

प्रसाद_१९८२'s picture

20 Feb 2018 - 11:48 am | प्रसाद_१९८२

जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला नकार दिला तर पिएन्बीची विश्वासार्हता किती राहील?

आताच हि बातमी पाहीली.
एक छदामही देणार नाही; नीरव मोदीची मग्रुरी

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pnb-closed-all-option...

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2018 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही नीरव मोदीची मग्रूरी कायद्यावर आधारीत आहे, त्याची कारणे या प्रतिसादतील परिच्छेद (अ) व (आ) मध्ये दिली आहेत.

हम्म , माईंची वराती आणि घोडे ही उपमा उत्तमच आहे.

सत्यम ने सॉफ्टवेअर कसे फेल करावे याचा आदर्श घालून दिला होता . एकुण मुखवटा गळून पडे पर्यंत वरातीचा देखावा उत्तम वठवला जातो. ऑडीट फर्म , इनकम टॅक्स डिपार्टमेंट यांची या वरातीत नेमक्या काय भूमिका असतात ? हे मात्र गुलदस्तात टिकू शकते.

आकडे किती मोठे आहेत त्याचे काही वाटेनासे झाले आहे.

बाकी आमच्या कडचे हे बुद्धीमान लोक चीन पाकीस्तान सारख्या शत्रु रास्।ट्रास लुटण्यासाठी बुद्धी वापरायचे सोडून आपल्याच देश बांधवांना का लूटत असावेत ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2018 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावून करोडो रुपये निरव मोदीच्या कंपन्यांनी लुटले. च्यायला, आमच्या खात्यात मिनिमम बॅलेन्स नै म्हणून दररोज किरकोळ रुपये वसूल करणार्‍यां बँकाचं सालं आपल्याला लै नवल वाटतं. बँकेत पैसे जमा करा, ते यासाठी का ? आभार.

माई, भाजपच्या सरकारात भ्रष्टाचार थांबला नव्हे तर भ्रष्टाचाराचे नव नवे दालन आदरणीय नरेंदरजी मोदी यांनी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सवासो करोड देशवासियो तर्फे आपलं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. आभार.

-दिलीप बिरुटे

बिटाकाका's picture

19 Feb 2018 - 9:30 am | बिटाकाका

मला वाटतं निरव मोदीने जर सेविंग अकाउंट ओपन केलं तर त्याला पण मिनिमम बॅलन्स असेल.
*******************************
मोदींनी भ्रष्टाचाराची नवी दालने कशी आणि कोणती ओपन केली याबद्दलही लिहा, हिट अँड रन वाले अजूनही बरेच आहेत. बाकी मोदींनी दालने ओपन केली म्हणून माईंचे आभार, हाहाहा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2018 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंतप्रधान कार्यालयाला याबाबत २०१६ मध्ये कळवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने नीरव मोदी देशाला फसवून पळून जाण्यात यशस्वी ठरलाय. हे मान्य होणार नाही.

१) चलन घोटाळा. २) महाराष्ट्रातील चिक्की घोटाळा ३) खाण घोटाळा ४) विजय मल्ल्या. ५) पीएनबी. ६).... अजून खूप काही सीर्फ़ देखते रहो.

-दिलीप बिरुटे

बिटाकाका's picture

19 Feb 2018 - 10:32 am | बिटाकाका

परत तेच हिट अँड रन करण्यापेक्षा माहिती द्या, वरील पैकी कोणता घोटाळा कसा झालाय ह्याची माहिती द्या. स्वतःची राजकीय आवड कुरवाळायची असेल तर असे अजून आधीच्या सरकारांनी केलेले घोटाळेही या लिस्ट मध्ये ऍड करायला हरकत नसावी.
***************************
२०१६ ला काय कळवलं होतं याची माहिती असेल तर इथे टाका, नसेल तर दुसऱ्या धाग्यावर एका सन्माननीय सदस्यांनी लिंक टाकली आहे. त्यात हरिप्रसाद नामक व्यक्तीने २०१६ मध्ये कोणत्या प्रकरणाशी निगडीत काय तक्रार केली होती ते वाचा. आणि हो ते त्याच्याच तोंडून आलेले शब्द वाचा.
***************************
२०१६ चं पिल्लू सोडण्यामागचा उद्देश सफल होतोय, ज्यांना मोदींचा विरोध करायचाय त्यांना वापरण्यासाठीच तो मुद्दा टाकला गेला, फक्त एवढंच सिद्ध करण्यासाठी की २०१४ नंतर काहीतरी झालं. तरी बरं बँकेने सगळं व्यवस्थित पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2018 - 11:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाच हजार कोटीचा व्यवहार तुमच्या आवडत्या पंतप्रधानांच्या काळात सूरु झाला. सर्व घोटाळे अ‍ॅड करा, पण बोल्ड करुन मा.आदरणीय, सवासो करोडचे प्रतिनिधीत्व करणारे या देशाचे पंतप्रधान यांच्या काळात काय काय लफडी सुरु आहेत त्यावर चर्चा करु. गेला काळ उकरुन काढण्यापेक्षा आता चालु वर्तमानकाळात आपण ज्या नव नव भ्रष्टाचाराला सामोरे जात आहोत त्याची आपल्या आवडी निवडी न जोपासता व्यवस्थित चर्चा व्हायला पाहिजे, त्यामुळे विनाआगीशीवाय धुर निघत नै यावर विश्वास ठेवला पाहिजे.

-दिलीप बिरुटे

बिटाकाका's picture

19 Feb 2018 - 12:38 pm | बिटाकाका

हिट अँड रन! आरोपांची राळ उठवायची आणि मग चला सांगा बरं डिटेल्स म्हणालं की मग तूम्हीच लिस्ट करा म्हणायचं! नवनवे भ्रष्टाचार ह्या गोंडस नावाखाली नेमकं काय दडलंय तेवढं तरी येऊ द्या. माझं असं मत बनत चाललं आहे की ही टिपिकल अंधविरोधकांची विचारपद्धतीच बनत चाललेली आहे.
**********************************
सरकारचे घोटाळे, म्हणजे ज्यात सरकारी आणि सद्य सरकारशी संबंधित लोक/नेते संबंधित आहेत आणि बँकांनी लोन दिले आणि नंतर तो माणूस पळून गेला हा घोटाळा यातील फरक तरी नक्कीच समजत असावा. बाकी आधी देऊन ठेवलेल्या LoUज वर ह्या सरकारच्या काळात ५००० गेले ना मग आधीचे ६५०० बद्दल सोडून देऊ, जुने कशाला काढायचे, ते ५००० वसूल झाले नाहीत तर ६५०० घालवलेल्याना निवडून आणू आम्ही! अंधविरोधाची सुद्धा सिमा असावी. हाच नियम लावून जप्त केलेल्या ५५०० कोटींनी त्यांनी त्यांच्या काळातील भ्रष्टाचार निपटलेला आहे असे म्हणता येईल का? आता राहिलेले सहा कोटी मागच्या सरकारकडून वसूल करून घ्यावेत नाही का?
***********************************
बँकांवर ठेवलेला विश्वास हेच खरेतर या सरकारचे अपयश आहे, नोटाबंदीतही तेच झाले. आधी लोन देऊन ठेवले आहेत, मग आता अंतरराष्ट्रीय ऑडिटर्स आणून ऑडिट करण्याशिवाय पर्याय नसावा करण इथल्या ऑडिटर्स चा काही उपयोग होताना दिसत नाही. शिवाय ज्यांनी मोठे कर्ज घेतले आहेत त्यांना भारताबाहेर जाऊच न देणे हाच एकमेव पर्याय असावा. नाही कुणास ठाऊक कोण भारताबाहेर जाऊन तिथून सांगेल की आता मी कर्ज देऊ शकणार नाही. म्हणजे मग अजून एक सरकारचा "घोटाळा".

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2018 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला मुख्य मुद्दा आहे की आदरणीय, सतत थापा मारणारे आपल्या देशाचे नेतृत्त्व करणारी जी मंडळी आहे, त्यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे नवनवे फंडे येत आहेत त्यावर चर्चा करु या. भूतकाळातील प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारचा अनागोंदी कारभार, अमुक धमुकांचे मतदानासाठी विविध योजनांची खैरात वाटणे, यावरील निघालेला मार्ग म्हणजे सवासो करोड भाई और बहनोने निवडून दिलेलं हे नवं सरकार.

नवीन सरकार किती भूलथापा मारतं या पेक्शा लोकांच्या किती पसंतीला उतरतं ? किती भ्रष्टाचार कमी होतो ? परदेशात गेलेल्या किती लोकांना पकडून आणून त्यांच्याकडून पैसा वसूल केला वगैरे यावर चर्चा मनमोकळी चर्चा करुया. बाकी, प्रतिसादातील शेवटच्या दोनचार ओळी खरंच पटणार्‍या आहेत.

-दिलीप बिरुटे

विशुमित's picture

19 Feb 2018 - 1:00 pm | विशुमित

<<< बाकी आधी देऊन ठेवलेल्या LoUज वर ह्या सरकारच्या काळात ५००० गेले ना मग आधीचे ६५०० बद्दल सोडून देऊ, जुने कशाला काढायचे, ते ५००० वसूल झाले नाहीत तर ६५०० घालवलेल्याना निवडून आणू आम्ही!>>
==>> '६५०० घालवलेल्याना निवडून आणू आम्ही' असे कोणी म्हणताना दिसत नसताना देखील एवढी का भीती लागून राहिली आहे ?

हाहाहा, मला ताकाला जाऊन भांडे लपवायची आवश्यकता वाटत नाही. मुख्य मुद्दाच तो आहे. बाकी सगळं बिन महत्वाचं आहे.
*****************************
मागच्या सरकारशी तुलना करता हे सरकार त्यापेक्षा बरं आहे हे कसं सिद्ध करतात? मुळात अंध विरोधकांना पहिल्या सरकारच्या पापाचा पाढा कोणी वाचला तर घाम का फुटतो काय माहीत! असेच लोक अडीच तासांचं भाषण न ऐकताच, फक्त काँग्रेसवर टीका केली वगैरे बोलत असतात.

अंध भक्तांना २०१९ च्या निवडणुकी व्यतिरिक्त काही दिसतच नाही. निवडणूक जिंकणे हेच त्यांच्या कामाचे मूल्यमापन म्हंटल्यावर बाकी चर्चा करणे म्हणजे व्यर्थच आहे.
आपला पास बुवा...!! तुमचा चालू द्यात चोर पोलीसच डाव.

बिटाकाका's picture

20 Feb 2018 - 7:49 am | बिटाकाका

उपहास सुद्धा कळंना व्हय? मंग बरुबाराय! २०१९ कडे डोळे कुणाचे आहेत ते काय लपून नाय बगा! काही लोकांनी पंतप्रधान होण्यासाठी (अजून एकदा) प्रयत्न सुरू केले पण!

जर पूर्ण बहुमत असलेले नरेंद्र मोदी या सगळ्या भानगडी थांबवु शकले नाहित तर इतर कोणिही असले प्रकार थांबवु शकत नाहि. राहुल गांधी वा इतर पक्षाचे अग्रणी तर अजीबात नाहि. फार फार तर आपण स्वतः आणि मंत्रीमंडळातले सहकारी घफला करणार नाहि, किंवा प्रत्यक्ष्य कुठल्या घफल्यात सापडणार नाहि इतकच आहे सध्या राजकाण्यंच्या हातात.

माहितगार's picture

19 Feb 2018 - 10:44 am | माहितगार

पॉलीटीकल स्कोअर सेटलींग ठिकच आहे. ते करताना खोलवर रुतलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष हो श्रेयस्कर नसावे. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत २०१६ मध्ये कळवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्या बद्दल तसेच आधी एका बॅम्केच्या इंडिपेन्डट डायरेक्टर ने राजीनामा दिला वगैरे वाचण्यात आले त्या त्या वेळी चौकशी का झाली नाही याची चौकशी व्हावयास हवी हे खरे.

भोपाळ वायू दुर्घटना असो, बोफोर्स असो ,दुबई मार्गे पाकीस्तानात फरार होणारे गुन्हेगार असोत की, फरार होणारे आर्थीक गुन्हेगार असोत सत्तेत राजकीय पक्ष कोणतेही असोत फरारी फार व्यवस्थीत चालू आहे परदेशी जाऊ देण्याच्या सुविधांची चौकशी करुन असे होणे थांबावे अभ्यासपूर्ण फेरमांडणी साठी लोक आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज असावी.

सोबतच खोलवर रुतलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष हो श्रेयस्कर नसावे. सत्यम असो अथवा पंजाब नॅशनल बँक वेगवेगळ्या लेव्हलवर ऑडीट फेल्यूअर्सची करणार्‍ञा ऑडीटींग कम्यूनीटीला भारतात फार लाईटली सोडले जात असावे ऑडीट कम्यूनिटीची जबाबदारी अधिक सक्षमपणे निश्चित करण्याबद्दलही लोक आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज असावी.

त्या शिवाय धर्म , जाती आधारीत वोट बँक मतदान टाळण्याबद्दल , राजकारणातील घराणेशाही टाळण्याबद्दल, एकाच व्यक्तीस दोनच्या वर वेळा निवडून न देण्याबद्दल मतदात्याने अधिक सजग असावयस हवे. राजकीय प्रचाराचे खर्च कमी राहण्यासाठी इलेक्ट्रॉनीक आणि डिजीटल माध्यमांचा कमी खर्चातील वापर कसा वाढेल ते पाहीले जावयास हवे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2018 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामान्य माणसांचे प्रश्नांकदे लक्ष द्या, असे माझे कितीतरी या सव्वाशे कोटीचं नेतृत्व करणार्‍या प्रतिनिधींना आणि त्यांच्या पाठीराख्यांना सांगणे आहे. अहो, पूणे मुंबई प्रवास वीस मिनिटात नव्या रेल्वे प्रवासमार्गाने होणार आहे. आम्ही पाच पाच तासाचे प्रवास सहन केले आहेत. प्राथमिकता ती आहे का ? अहो, पेट्रोल डिझेल, घरगुती गॅसचे वाढते दर, वाढती महागाई यावर नियंत्रण ठेवा ना म्हणा. सालं इनकम टॅक्सचा स्लॅब सामान्य माणसाच्या डोक्यावर जशाच तसा. उगा आकडेवारी द्यायची आणि म्हणायचे महागाईचा दर खाली आला आहे, असं नाय चालबो आता. लै दिवस लोकांना उल्लू बनवता येणार नाही.

-दिलीप बिरुटे

विशुमित's picture

19 Feb 2018 - 12:23 pm | विशुमित

<<< लेव्हलवर ऑडीट फेल्यूअर्सची करणार्‍ञा ऑडीटींग कम्यूनीटीला भारतात फार लाईटली सोडले जात असावे ऑडीट कम्यूनिटीची जबाबदारी अधिक सक्षमपणे निश्चित करण्याबद्दलही लोक आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज असावी.>>>
==>> प्रचंड सहमत..
यातील नामांकित लोकं गजाआड घातल्या खेरीज सिस्टिम सुरळीत होणार नाही.

राही's picture

19 Feb 2018 - 10:20 pm | राही

ग्राहकसंघटनेच्या वर्षा राउत आणि अनेक सहकारी यांनी तूर डाळ घोटाळा हा जवळ जवळ २७ हजार कोटींचा असल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. 'लोकप्रभा' या साप्ताहिकाने यावर मुख्य बातमी करून एक दीर्घ लेख प्रसिद्ध केला होता. (२०१५-१६)

अमोल मेंढे's picture

19 Feb 2018 - 8:48 pm | अमोल मेंढे

सवासो करोड देशवासियो तर्फे

नाही ६०० करोड

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2018 - 11:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>नाही ६०० करोड

हाहाहा. तो तर फार मोठा विनोद आहे. बरं थापा इतक्या सराइतपणे मारतो माणूस की आपल्याला ते बोलणे सर्व खरं वाटतं, आपण त्यावर विश्वास ठेवतो. आणि बाकी प्रवचनाला आलेली भक्त मंडळी माना डोलावतात. (कपाळ झोडुन घेणारी स्मायली)

-दिलीप बिरुटे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 Feb 2018 - 11:08 am | माईसाहेब कुरसूंदीकर

प्रतिसाद देणार्यांचे धन्यवाद. (आम्ही भाजपा विरोधक असलो) तरी येथे राजकीय चर्चा करण्यापे़क्षा मुख्य मुद्द्यांवर् -म्हणजे घोटाळा का/कसा झाला ह्यावर चर्चा करूया. वरील प्रतिसादात एक चांगली लिंक आहे(दीपक शेनॉय ह्यांचा लेख-https://capitalmind.in/2018/02/pnb-scam-nirav-modi/) - त्यातील एक महत्वाचा मुद्दा-
most public sector banks do not keep much collateral against non-fund-based limits given to importing customers
हे खूप धक्कादायक आहे. आयात-निर्यातीच्या व्यापारात हे सर्रस होते असे म्हंटले जाते.बँकांना ह्यापूर्वी अनेकवेळा नुकसान झाले आहे व आर.बी.आय.ने दण्डही आकारला आहे. पण तरीहीबँका ह्याबाबतीत (जाणीवपूर्वक) गाफील राहिल्या व आर.बी.आय.ने पाठपुरावा केला नाही असे दिसते आहे.
नीरव मोदी जवाहिर्यांच्या कुटुंबातला- त्याची ही तिसरी पिढी.अल्पावधीत चंदेरी दुनियेत एक मोठा कल्पक जवाहिर्या म्हणून त्याने जगभर नाव मिळ्वले. दोन महिन्यांपूर्वी तो अनेक दुकाने उघण्याविषयी बोलत होता. म्हणजे तेव्हा त्याच्या कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली असावी असे मानायला जागा आहे. की हा सगळा हिर्यांचा चमचमाट कर्जावरच उभा होता? पण अशी वेळ येवू शकते हे तर सामान्य माणसालाही कळेल.. मग कुठे चुकले?

manguu@mail.com's picture

19 Feb 2018 - 12:01 pm | manguu@mail.com

२ महिन्यापुर्वी अनेक शाखा खोलण्याचे बोलले , हे नाटक होते. म्हणजे सरकार , ब्यान्क इ सर्वांचा ' कात्रज केला' त्याने.

अनुप ढेरे's picture

19 Feb 2018 - 12:13 pm | अनुप ढेरे

अनेक ठिकाणी हेही वाचायला मिळाले की अजून भरपूर सापळे असणारेत कपाटात.

===
यावर एकच उपाय आहे. सरकारी बँका विकून टाकणे. पण एवढी हिंमत कोणाही राजकारण्यात नाही.

माहितगार's picture

19 Feb 2018 - 12:18 pm | माहितगार

इकॉनॉमिक टाइम्सच्या पत्रकार विजया राठोड यांचा निरव मोदी सोबतच्य भेटी बद्दलचा अनुभव सांगणारा लेख (तो आणि इतर व्यावसायिक) अर्थ जगतातील स्वतः स प्रतिष्ठा मिळवून घेण्यास पत्रकारांना कसे वापरून घेतले जाते ते समजून घेण्यास उपयुक्त ठरू शकतो.

अर्थ पुरवठ्याच्या व्यवस्थेतच एक मानसशास्त्रीय गोम असते . प्रकल्प अहवालासहित तारणांसहित सर्व व्यवस्थित असूनही वित्तपुरवठा मिळण्याची गेरंटी नसते. वित्त पुरवठा करणारा स्वतः:स सुऱक्षित करण्यासाठी बऱ्याच दा अवाजवी अटी लावतो तेच परताव्याचे आकडे फुलवून दाखवले कि विश्वासार्ह वाटतात त्यातून फायनायन्स उभा करणाऱयांचा कल हाइप करण्याकडे जातो आणि हाइप केले तेवढे मार्केट अस्तित्वात नसते त्यामुळे व्यवसाय कोसळतात . पण वित्त पुरवठा वेळेवर ना होणे परवडणारे नसते व्यावसायिकांना या धोक्याची कल्पना नसते असे नसावे. त्यातून गैर मार्गांचे समर्थन सुरु होण्यास मानसिक स्तरावर सुरवात होत असावी

विश्वासार्हतेसाठी आपल्याकडे सामुदायांचेही वर्गीकरण मानसिक स्तरावर केले जात असावे.

वास्तूत: इतर भारतीय व्यापारी समुदाय जसे सिंधी , राजस्थानी , पंजाबी यांच्या मानाने गुजराथी व्यावसायिक अधिक विश्वासार्ह मानला जातो . सहसा राजस्थानी व्यापार्याच्या मानाने गुजराथी कमी रिस्कवर काम करतात दुसऱ्यांचे पैसे उशिरा दिले जातील बुडवण्याची शक्यता सहसा कमी असते . इतरांच्या बाबतीत ताकही फुंकून पिणारे वित्त पुरवठादार गुजराथी व्यापाऱयांवर अधिक विस्वास करत असावेत. कदाचित या विश्वासार्हतेचा गैर फायदा त्यांच्यातले काही अपवाद घेत असावेत . त्याता मुळे असेल कदाचित मोठ्या घोटाळ्यांमध्ये गुजराथी नावे चटकन दिसतात का अशी साशंकता वाटते

पैसा's picture

20 Feb 2018 - 11:18 am | पैसा

non-fund-based limits

हे नाव त्याचसाठी आहे. फंड बेस्ड लिमिट हे प्रत्यक्षात दिलेले कर्ज असते. लेटर ऑ क्रेडिट किंवा बँक गॅरेंटी हे प्रत्यक्षात दिलेले कर्ज नसते. अमूक माणसाची पत अमूक आहे किंवा उद्या अमूक तारखेला याने पैसे भरले नाहीत तर बँक ते पैसे भरील (आणि नंतर त्या माणासाकडून ते वसूल करील) अशा प्रकारचे 'जर-तर' सिच्युएशनचे हे 'कर्ज' असते. त्यातून बँकेच्या दृष्टीने कोणतीही अ‍ॅसेट प्रत्यक्षात तयार होत नाही. त्यामुळे त्यावर बँकेच्या दृष्टीने रिस्क मामुली असते. साहजिकच मोठ्या प्रत्यक्ष तारणाची गरज नसते. अर्थात रस्त्यावरच्या कोणालाही असे लेटर ऑफ क्रेडिट्/अंडरस्टँडिंग किंवा बँक गॅरेंटी दिली जात नाही. सहसा इतर प्रत्यक्ष मोठी कर्जे असणार्‍याला कंपनी व्यक्तीला असे non-fund-based limits इतर लिमिट्स बरोबर सँक्शन होते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 Feb 2018 - 12:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी योग्य लिहिले आहेस रे माहितगारा. पूर्वी 'घरात साप व सिंधी शिरले तर आधी सिंध्याला ठेचावे' असे म्हणायचे. गुजराती, विशेष करून कच्छी व्यापारी अजूनही विश्वासार्ह म्हणून गणले जातात.

"२ महिन्यापुर्वी अनेक शाखा खोलण्याचे बोलले , हे नाटक होते. म्हणजे सरकार , ब्यान्क इ सर्वांचा ' कात्रज केला' त्याने."
मान्य. पण हे केव्हातरी हे प्रकरण बाहेर पडणार ह्याची तर त्याला कल्पना असणारच ना? मुद्दा हा की तुमचा धंदा बर्यापैकी(वा तेजीत) चालला असताना अशा मार्गाने जायची काय गरज?

माहितगार's picture

19 Feb 2018 - 12:55 pm | माहितगार

Nirav Modi's escape puts limelight on Western Europe, North America, Gulf again

NEW DELHI: The Nirav Modi case has once again highlighted how ‘fraudsters, scamsters and terrorists’ often find it convenient to take refuge in Western Europe, North America and the Gulf due to easy residency laws, liberal tax structures and political asylum rules.

हेच युरोमेरीकन देश एखाद्या देशातील एखादी राजावट नकोशी वाटली की भ्रस्।टाचार , महागाई विरोधीच्या आंदोलनांना सोईस्कर हवाही घालतात आणि भ्र।स्टाचारी लोकांना पाठीशी घालण्याचा दुटप्पीपणाही युरोमेरीका करत रहाते.

माहितगार's picture

19 Feb 2018 - 1:16 pm | माहितगार

भारतात अध्यक्षीय पद्धती एवजी संसदीय पद्धत आहे . आमेरीकन पद्धतीत मुठभर विषय सोडले तर संसद सदस्य कोणत्याही पक्षाचे असोत अधिक स्वतंत्रपणे आणि कमी गोंधळात पॉलीसी आणि नियंत्रण विषयावर वेळ देऊ शकतात .

या उलट भारतीय संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्षाच्या संसद / विधीमंडळ सदस्यांना प्रत्येक विषयात सरकारची बाजू घ्यावी लागते सरकारवर अवलंबून रहावे लागते त्यात जो काही वेळ उपलब्ध होतो त्यात बहुतांश राजकीय गोन्धळात वाया घालवला जातो त्यामुळे संसदीय समित्या आणि कायदे बनवण्याची कामे पुरेशा स्वतंत्रपने आणि कुशलतेने होउ शकत नाहीत. संसदे पुढे विवीध आर्थीक अहवाल येतात खरे पण जे काही सरकार सत्तेवर असेल त्याच्या प्रभावात गोस्।टींची संसदेकडून निष्पक्ष चौकशी होण्यापेक्षा सरकार पक्षास सोईस्कर असे दाबण्याचे प्रयास होतात, शिवाय सरकार पक्ष आणि विरोधी पक्षाची पडद्यामागे हात मिळवणी होण्याची शक्यतेचे वास्तव नगर सेवक , आमदार खासदार वर्षानूवर्स्।ए विरोधी पक्षात राहूनही (राजकीय पक्ष कोणतेही असू द्यात) आर्थीक दृष्ट्या कसे गब्बर होत जातात त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास होण्याची गरज असावी .

मी अध्यक्षीय पेक्षा संसदीय पद्धतीचे तात्वीक समर्थन राजकीय समतोलाच्या दृष्टीने करतो पण संसदीय नियण्त्रणास संसदीय पद्धत कुठे कुठ कुचकामी ठरते याचा अभ्यास करुन सुधारणाण्ची आवश्यकता असावी.

पुंबा's picture

19 Feb 2018 - 2:17 pm | पुंबा

उत्तम चर्चा चालूये.
या विषयासंदर्भात एक भयाण बातमी

http://indianexpress.com/article/india/nirav-modi-fraud-case-the-irony-i...

गामा पैलवान's picture

19 Feb 2018 - 6:51 pm | गामा पैलवान

अहो माईसाहेब,

नीरव मोदींनी घोटाळा केलेला नाहीच्चे मुळी. त्यांनी फक्त चालू तरतुदींचा यथायोग्य वापर केला. हां, थोडा पैसा जरासा इकडेतिकडे झाला असेल, पण नीमोंनी नुकसान भरून द्यायचं कबूल केलंय. ११५०० कोटी रुपयांचा घोटाळा असला तरी प्रत्यक्ष नुकसान कमी असेल. ते नीमो चुटकीसरशी भरून देऊ शकेल.

आता मी हे असं का म्हणतोय माहितीये? कारण की सांप्रत बँकिंग हाच एक मोठ्ठा झोल आहे. कसं ते इथे थोडक्यात लिहिलंय. तिथनंच डकवतो :

समजा तुमच्या खिशात ३००० रुपये किमतीचं सोनं आहे. तुम्ही सोनाराकडे गेलात आणि सोनं मोडलंत. सोनार ५० रुपये मोडणावळ कापून २९५० रुपयांच्या नोटा तुमच्या हातावर टेकवेल. तुम्ही त्या नोटा बाजारात किराणा, मीठमिरची वगैरेसाठी खर्च करू शकता. आता समजा तुम्ही बँकर आहात. तुमच्या खिशात ३००० रुपयांचं सोनं आणि सोबत बँकिंग लायसन्स आहे. तर ते सोनं तुम्ही स्वत:च्याच तिजोरीत ठेवून ९७००० रुपयांच्या नोटा छापू शकता. किंवा ९७००० रुपयांच्या ठेवी गोळा करू शकता. या ९७००० रुपयांपैकी सुमारे ५००० रुपये राखीव ठेवून उरलेले ९२००० रुपये कर्जाऊ देऊ शकता. बसल्याजागी पैसे मिळवायचा याहून सोपा उपाय अस्तित्वात नाही.

समजा या ठेवीदारांना तुम्ही ५% व्याजाचा परतावा कबूल केलाय. म्हणून तुम्ही ९२००० रुपये ३०% व्याजाने उद्योजकांना कर्जाऊ देणार. ठीक आहे. बसल्या जागी साधारण २३.४५% फायदा (९७००० रुपये पायाभूत धरून). काय मस्तं धंदा आहे, नाहीका? पण एक अडचण आहे. बघा, जर सगळ्या ठेवीदारांनी एकाच वेळेस तुमच्या बँकेसमोर देणगी परत करायचा तगादा लावला, तर तुमची माईबँक कोलमडलीच, बरोबर?

तर हा अनावस्था प्रसंग उद्भवण्यासाठी सगळे ठेवीदार एकाच वेळेस एकत्र येणं जरुरी आहे. मात्र तसं होत नाही म्हणून बँक चालू राहते. आता समजा तुमच्या माईबँकेचं यश बघून गुपचूप पैसा कमावण्यासाठी नीरव मोदी नावाच्या माणसाने नीरव बँक स्थापन केली. तिने फायरस्टार, गीतांजली ज्युलर्स, सोलर एक्स्पोर्ट्स, स्टेलर डायमंड्स वगैरे उद्योजकांना व्याजावर कर्ज दिलं. पण ही बँक नीरव असल्याने तिच्याकडे बँकिंग लायसन्स नव्हतं. म्हणून तिने फक्त एकाच ठेवीदाराकडून ठेवी स्वीकारल्या. त्या ठेवीदाराचं नाव पंजाब न्याशनल ब्यांक अर्थात पन्याब्या.

बघा, आता माईबँकेच्या अनावस्था प्रसंगासाठी सगळे ठेवीदार एकाच वेळी एकत्र येऊन ठेवींसाठी धरणं धरायला हवेत. हे जवळजवळ अशक्य आहे. पण नीरवबँकेच्या अपघातासाठी एकमेव ठेवीदार पुरेसा आहे. नेमकं तेच झालं.

माईबँकेच्या बाबतीत जरी अनावस्था प्रसंग ओढवला तरी माईसाहेबांनी ठेवीदारांना वचनं देऊन फुटवलं असतं. कारण त्यांच्याकडे बँकिंग लायसन्स आहे. माईसाहेब अधिक ठेवी स्वीकारून अधिक विश्वासार्ह उद्योजकांना कर्जं देऊन, व ती व्यवस्थितपणे वसूल करवून भविष्यकाळात ठेवीदारांच्या ठेवी सव्याज परत करू शकतात. परंतु नीरवबँकेकडे लायसन्स नाही. साहजिकंच पन्याब्यास फुटवणं अवघड झालंय.

शेवटी नीरव मोदींवर गुन्हा दाखल होईल तो अनधिकृत व्यवहारांचा असेल. हे व्यवहार ११००० कोटी रुपयांचे व गेले ७ वर्षं चालू असले तरी नीरव मोदींचं प्रत्यक्ष देणं खूपंच कमी असेल. त्याचा बराच मोठा भाग भरून द्यायची तयारी त्यांनी दाखवली आहेच.

सांगण्याचा मुद्दा काये की, नीरवने खाल्लं तर शेण आणि पन्याब्यानं खाल्लं तर श्रीखंड.

'हर्षद मेहताने घोटाळा केलेलाच नाही' या १९९२ च्या वेळच्या युक्तिवादाची आठवण झाली. मी काही यांतला तत्ज्ञ नाही. पण म्हंटलं त्याच धर्तीवर हा घोटाळा जमेल तितका तपासून बघूया. म्हणून हा संदेशप्रपंच.

आ.न.,
-गा.पै.

विख्यात पत्रकार शेखर गुप्ता यांनी बँकांचे राष्ट्रयीकरण रद्द करावे असे मत व्यक्त केले आहे. हे राष्ट्रीयीकरण इंदिरा गांधी यांनी केले होते. मी, बँकेचा अकाउंट होल्डर या नात्याने मिळणाऱ्या अनुभवा वरून, यांच मताचा झालो आहे. राष्ट्रीयीकरण झालेल्या बॅँकांचे कर्मचारी हे खातेदारांशी सरकारी कर्मचाऱयांच्या सारखे वागतात.त्यांना नोकरीची सुरक्षा आहे आणि काम केले नाही तर जाब विचारणारा कोणी नाही. फोन केला तर उचलत नाहीत आणि उचललाच तर धड उत्तर देत नाहीत. अधून मधून हरताळ करून पगार वाढ ही करुन घेत असतात. या उलट खासगी बॅँकांतील कर्मचारी यांची वागणूक खूप मदत करणारी असते.
आपल्या पैकी ज्या कोणाचा आय सी आय सी आय , एच डी एफ सी , कोटक किंवा इतर खाजगी बॅँकांशी सम्पर्क असेल ते माझ्याशी सहमत असतील.
बॅँकेच्या कर्मचार्यानी गैर व्यवहार करायचे आणि ते उघडकीस आल्यावर त्या बद्दल सरकारला जबाबदार ठरवायचे, हे बंद झाले पाहिजे.

अनुप ढेरे's picture

19 Feb 2018 - 11:23 pm | अनुप ढेरे

विख्यात पत्रकार शेखर गुप्ता यांनी बँकांचे राष्ट्रयीकरण रद्द करावे असे मत व्यक्त केले आहे. हे राष्ट्रीयीकरण इंदिरा गांधी यांनी केले होते.

पूर्ण सहमत आहे. ते राष्ट्रीयीकरण राजकारण्यांना पैसा लुटता यावा म्हणूनच केले गेले होते. गरीबांचे कल्याण वगैरे मुलामा देऊन. पण हे करणे कोणत्याही राजकारण्याला शक्य नाही. मोदींनाही नाही.

manguu@mail.com's picture

20 Feb 2018 - 12:20 am | manguu@mail.com

सुखाची नोक्री , वाढता पगार , फिक्स टाइमवर ये जा , ए सी , घरकर्ज स्वस्तात , घराजवळ ट्रान्सफर .....

लोकाना जलसी वाटते हो ....

पेशंट जास्त आहेत , पगार मात्र दोन वर्षे वाढला नाय , दीड वाजला , जेवायचे कधी इ इ म्हणून आमचे लोक माझ्याबरोबर हुज्जत घालत बसले , तर सरळ हे सोडून ॲक्सिस बॅंकेत नोकरीला जावा , म्हणून सांगतो. वाद समाप्त!

राही's picture

19 Feb 2018 - 10:27 pm | राही

नोटबंदीच्या काळात अशी कुजबूज होती की मोठमोठे सिनेतारे-तारका आणि अन्य वलयांकित व्यक्ती यांनी जुन्या नोटांच्या बदल्यात फार मोठ्या रकमेचे दागदागिने खरेदी केले होते आणि जवाहिर्‍यांकडून त्यांना मागील तारखांच्या पावत्या मिळाल्या होत्या. या कुजबुजीने सध्या पुन्हा डोके वर काढले आहे.

manguu@mail.com's picture

19 Feb 2018 - 10:40 pm | manguu@mail.com

PNB घोटाळा: बेचु तिवारी, यशवंत जोशी आणि प्रफुल्ल सावंत या तीन अधिकाऱ्यांना सीबीआयने मुंबईतील ब्रॅडी हाऊसमधून केली अटक.

ट्रेड मार्क's picture

20 Feb 2018 - 12:36 am | ट्रेड मार्क

या प्रतिसादात डॉक्टरसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या LOUs रोलओव्हर होत गेल्या आणि एकूण कर्जाची रक्कम फुगत गेली. ही प्रथा सर्वसाधारणपणे सर्वच ब्यांकांत पूर्वापार चालत आलेली आहे. ज्यांनी बँकेत काम केलेले आहे अथवा अश्या प्रकारची कर्जे घेतलेली आहेत (यात कोणी मिपाकर नसावेत) ते याला दुजोरा देऊ शकतील.

१५-२० वर्षांपूर्वी मी एका "प्रतिष्ठित" सहकारी बँकेत काम करत असताना एका इलेकट्रोनिक्स वस्तूंचा व्यापार करणाऱ्याला जवळपास १ कोटीचं कर्ज दिलं होतं. पुण्याच्या उल्हासनगरातला व्यापारी असल्याने त्याच्या "दुकानात" ग्राहक जर म्हणलं की सोनीचा टीव्ही पाहिजे तर जे टीव्हीचे डबे ठेवलेले असतील त्याला तो सोनीचा स्टिकर लावून द्यायचा. याचे मॉडगेज आणि कॅश क्रेडिट कर्ज अश्याच पद्धतीने रोलओव्हर केले गेले. इतकेच नव्हे तर त्याने ज्वेलरचे दुकान टाकण्यासाठी अजून कर्ज मागितले तर तेही त्याला दिले गेले. हा माणूसच फ्रॉड होता हे आम्हाला सगळ्यांना माहित होते पण वरून आज्ञा झाल्यावर काय करणार. पुढे ही सर्व खाती एनपीए झाली तेव्हा व्याज धरून रक्कम ५ कोटींच्या वर गेली होती. वसुलीला जेव्हा गेलो तेव्हा कळले की हा माणूस पत्र्याच्या घरात राहत होता आणि त्याच्याकडे जप्त करण्यासारखे पण काही नव्हते. असे अनेक खातेदार मी स्वतः बघितलेले आहेत. ब्रँच मॅनेजर स्वतः खातेदाराला सांगताना ऐकलेलं आहे की इथे तुमचं कर्ज मूळ रक्कम ५० लाख आणि व्याज धरून ६० लाख गेलंय ना मग आमच्याच दुसऱ्या ब्रँच मध्ये ७५ लाख कर्जासाठी अर्ज करा. मी मंजुरीची शिफारस करतो. ते मंजूर झाले की माझ्या ब्रँचमधले ६० लाख भरून टाका.

वरील घटना एका सहकारी बँकेच्या एका शाखेतील आहेत, ज्याची उलाढाल १०० कोटीच्या आसपास होती. तर मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये काय चालत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

ऑडिटरला कसं सापडलं नाही म्हणताय? तर आमच्याकडे ऑडिटर यायचे, त्याआधी वर्दी यायची की ते येणार आहेत आणि त्याबरोबर त्यांच्या प्रोग्रॅमची आणि मागण्यांची यादी पण यायची. मस्त डुलत डुलत ऑडिटर लोक यायचे, एका मीटिंग रूम मध्ये बसायचे. त्यांची सरबराई सकाळी सुकामेवा पासून ते पंचतारांकित जेवण इथपासून सुरु होऊन, रात्री एखाद्या फार्म हाऊसवर मदिरा आणि मदिराक्षी इथपर्यंत व्हायची. नंतर बिदाई म्हणून त्यांनी मागितलेल्या वस्तू पण दिल्या जायच्या. हे असले लोक कसलं ऑडिट करणार आणि त्यांना काय सापडणार?

जाऊ दे. अश्या अंतर्गत घपल्यांच्या बऱ्याच गोष्टी मी सांगू शकेन ज्याची सर्वसाधारण ग्राहकांना कल्पनाच नसते. माझ्याकडे आमच्या बँकेच्या सर्वरचा unrestricted access होता पण कधी एक पैसा चोरावा असं मनात आलं नाही. Back-end ने काय वाट्टेल ते करू शकलो असतो आणि कोणाला कळलं पण नसतं. कारण काही अंतर्गत खाती अशी असतात की त्याचं ऑडिट कधीच होत नाही. त्यामुळे ज्यांना फ्रॉड करायचे असतात ते कसेही करून ते करतातच. जे सापडतात ते चोर ठरतात पण तोपर्यंत ते प्रतिष्ठित म्हणवतात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Feb 2018 - 9:12 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद.
कायदे, गाईडलाईन्स, ऑडिट्स,code of conduct दाखवायला एक असते पण प्रत्य्क्षात परिस्थिती वेगळी असते. 'इंपोर्ट-एक्स्पोर्ट'चा 'धंदा' करणारे व्यावसायिक अचाट श्रीमंत का असतात ते ही येथे कळते. खूप पगार नसूनही सरकारी बेंकांचे अधिकारी परदेशवार्या,२०-३० लाख भरून मुलांना परदेशी शिकायला पाठ्वणे.. हे कसे होते तेही कळते. ओडिट करणार्या बहुतांशी C.A. लोकांकडे बक्कळ पैसा असतो. ह्यात नवल नाही.

manguu@mail.com's picture

20 Feb 2018 - 9:17 am | manguu@mail.com

तळे राखील तो पाणी चाखील , ही म्हण जुनी आहे माईमैय्या !

manguu@mail.com's picture

20 Feb 2018 - 9:19 am | manguu@mail.com

सैय्या भये कोतवाल , अब काहेका डर

अशीही म्हण आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Feb 2018 - 11:37 am | माईसाहेब कुरसूंदीकर

'तमे मेरा व्यवसाय नाश कर्यो' म्हणत निरवने पीएन्बी ला पत्र लिहिले आहे.
https://economictimes.indiatimes.com/industry/miscellaneous/letter-that-...
कर्जवसुलीसाठी अतीघाई केलीत- आता पैसा मिलण्याची शक्यता कमी.. असे पत्रात लिहिलेय. एवढाच प्रामाणिक आहे तर भारताबाहेर पळायची काय गरज होती? घोटाळा बराचसा लक्षात आला पण एक प्रश्न अजूनही पडलाय-९०० कोटींची मालमत्ता असनार्या/त्या व्यवसायात नाव कमावून असणार्या नीरव मोदीला अशा मार्गाने जायची काय गरज होती?
आयात निर्यात एवढ्या ठिसूळ आर्थिक पायावर चालू असते ?

बिटाकाका's picture

20 Feb 2018 - 11:40 am | बिटाकाका

उलटा चोर कोतवालको डाटे

अशीही एक म्हण आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2018 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

या LOUs रोलओव्हर होत गेल्या आणि एकूण कर्जाची रक्कम फुगत गेली.

कर्जे व रोलओव्हर यात मोठी समस्या नाही असे वर लिहिले आहेच... समस्या ही आहे की मूळ, कर्जे देताना आणि त्यांचे रोलओव्हर करताना, योग्य ते तारण घेतले नाही. पुरेसे तारण घेतले असते तर ते वापरून बँकेने आपले पैसे वसूल केले असते आणि बँक गोत्यात आली नसती.

गामा पैलवान's picture

20 Feb 2018 - 2:39 pm | गामा पैलवान

डॉ. सुहास म्हात्रे,

ही नीरव मोदीची मग्रूरी कायद्यावर आधारीत आहे, त्याची कारणे या प्रतिसादतील परिच्छेद (अ) व (आ) मध्ये दिली आहेत.

एकदम चोक्कस ! घोटाळा नीरव मोदीने केलेला नसून पन्याब्याने केलेला आहे. मोदीकडनं तारण घायची जबाबदारी बँकेची आहे. ती तिने पाळली नाही. यांत मोदीचा काय दोष?

आ.न.,
-गा.पै.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Feb 2018 - 2:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

असे आहे तर तो मग पळाला कशाला? भारतात येत का नाही? "मी तुझ्या घरात चोरी केली.. तू घरी नव्हतास, त्यात माझा काय दोष?.. दोष असलाच तर तो वॉचमनचा.." असे ?

गामा पैलवान's picture

20 Feb 2018 - 7:09 pm | गामा पैलवान

अहो माईसाहेब,

कोण पळालंय? नीरव तर धंद्याच्या कामासाठी अमेरिकेत गेलाय. पण त्याच्या मागे कोणीतरी काहीतरी राळ उडवली आणि प्राप्तीकराच्या धाडी पडल्या. आता त्या बिचाऱ्याला परत यायचं झालं तर बदनामीपायी अडचणी येणारंच ना?

आ.न.,
-गा.पै.

वि.सू. : परकायाप्रवेश कसा वाटला?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Feb 2018 - 3:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हे मात्र धक्कादायक आहे रे चिर्कुटा. नीरव्/चोक्सी जेलमध्ये जात नाहीत, त्यांच्या मालमत्तेचा लिलाव होत नाही तोपर्यंत ह्या सरकारचे(अगदी
नरेंद्र मोदी ह्यांचेदेखील) काही खरे नाही. आता कदाचित,'कॉन्ग्रेस नेत्यांनी मदत केली म्हणून सांग अन्यथा वेगळ्या मार्गाने प्रकरण हाताळू' असे कदाचित अजित दोवल नीरवला सांगतील असा ह्यांचा अंदाज.

बिटाकाका's picture

20 Feb 2018 - 4:58 pm | बिटाकाका

हे अंधविरोधक दिवसेंदिवस हास्यास्पद होत चालले आहेत. २०१५ ला हे मोदीमहाशय आणि त्यांचा मामा हे फरारी आणि घोटाळेबाज होते का? भारतातल्या प्रतिष्ठित व्यवसायिकांपैकी एक नव्हते का? पंतप्रधान त्यांना बोलले, भेटले, गळाभेट केली तरी काय प्रॉब्लेम आहे?
=======================
मोदींच्या इतर व्यवसायिंकाच्या भेटी गाठी, संबंध कधीच चर्चेत नसतात पण जर तो व्यावसायिक गुजराती निघाला कि अंधविरोधकांना उकळ्या फुटतात हे एक निरीक्षण आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Feb 2018 - 5:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चोक्सी महाशय २०१२ पासून वेगळ्या प्रकरणात गुंतले होतेच-
http://www.freepressjournal.in/india/pnb-scam-mehul-choksi-imported-750-...
सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांना अशा लोकांशी हातमिळवणी करावीच लागते ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा चोक्सी महाशयांनी वाजपेयी/मनमोहनांच्या कार्यक्रमात हजेरी लावलीही असेल. पण चोक्सी-नीरव सारखे लोकांवर अशी वेळ येत असेल तर ते एका अर्थाने बरेच आहे.

चिर्कुट's picture

21 Feb 2018 - 9:56 am | चिर्कुट

कुणालाही अंधविरोधक, हास्यास्पद असली विशेषणं लावून परिस्थिती नाही बदलत. विनाकारण पर्सनल होऊ नका. सगळे मोदीविरोधक काँग्रेसी, आपवाले, डावे वगैरे नसतात.

>> २०१५ ला हे मोदीमहाशय आणि त्यांचा मामा हे फरारी आणि घोटाळेबाज होते का? भारतातल्या प्रतिष्ठित व्यवसायिकांपैकी एक नव्हते का? पंतप्रधान त्यांना बोलले, भेटले, गळाभेट केली तरी काय प्रॉब्लेम आहे?

हे एक असं बोलणार आणि दुसरे अंडभक्त २०१३ मध्ये रावल्या आणि बाकी काँग्रेसी कसे नीरवला सामील होते ते सांगत फिरणार.
ह्याला डबल ढोलकी म्हणतात बरं का..

>> मोदींच्या इतर व्यवसायिंकाच्या भेटी गाठी, संबंध कधीच चर्चेत नसतात पण जर तो गुजराती निघाला कि अंधविरोधकांना उकळ्या फुटतात हे एक निरीक्षण आहे.

काय निऱक्षण आहे.. २०१४ पासून काही विशेष गुज्जू व्यावसायिकांचीच संपत्ती ७०-८०-१६०००० टक्क्यांनी वाढली आहे हे कसं काय नजरेतून सुटलं बरं? :)

बिटाकाका's picture

21 Feb 2018 - 10:50 am | बिटाकाका

कुणालाही अंधविरोधक, हास्यास्पद असली विशेषणं लावून परिस्थिती नाही बदलत. विनाकारण पर्सनल होऊ नका. सगळे मोदीविरोधक काँग्रेसी, आपवाले, डावे वगैरे नसतात.

सगळे भक्त नसतात हे का कळत नसावे बरे मग?
=====================

हे एक असं बोलणार आणि दुसरे अंडभक्त २०१३....

कुणालाही अंधभक्त म्हणाल्याने परिस्थिती बदलते काय? हि डबल कि ट्रिपल ढोलकी आहे? २०१३ ला भेटल्याचे रेफेरंन्सेस देणार्याला हे जाऊन सांगा, मला सांगण्याचा काय उद्देश आहे? आणि २०१३ च्या संदर्भात टिका करायची असेल तर ती मी पर्सनल इव्हेंट्स मध्ये सामील असण्यावर करेन, सार्वजनिक व्यावसायिक इव्हेंटमध्ये भेट झाली म्हणून गळा काढणारे खरे डबल ढोलकीवाले असतात असे माझे मत आहे.
=====================

काय निऱक्षण आहे.. २०१४ पासून काही विशेष गुज्जू व्यावसायिकांचीच संपत्ती..

भारतात २०१४ पासून कोणाकोणाची संपत्ती किती किती वाढली, तुलनेसाठी २०१०-१४ मध्ये किती वाढली याचे संदर्भ द्या, मग ठरवू त्यातले किती गुजराती होते आणि किती बाकीचे. नाहीतर अशा वक्तव्यानं जनरली फेकणे असे संबोधित करतात.

चिर्कुट's picture

21 Feb 2018 - 2:03 pm | चिर्कुट

आलाय आता वाद/ चर्चा करत बसायचा. उपयोग होत नाही हे चांगलंच समजलंय. सो, मी काही प्रतिवाद करणार नाही. चील.

रच्याकने एक प्रश्न माईसाहेबांच्या ह्यांना -

काय ओ 'हे', पूर्वी आम्ही काँग्रेसला याच सगळ्या गोष्टींसाठी (नोक-या, भ्रष्टाचार, इ.) मनसोक्त शिव्या घालायचो, तेंव्हा कुणी आम्हाला संघी, भाजपेयी, भक्त वगैरे म्हणत नसायचं शिवाय भरघोस समर्थन मिळायचं. थोडक्यात सरकारचं समर्थन करणारं कुणी नसायचं. पब्लीकनं सरकारचं समर्थन करण्याची पद्धत ही कधी आणि कशामुळे सुरु झाली असेल बरं? तुमच्या काळी कसं होतं?

बिटाकाका's picture

21 Feb 2018 - 2:22 pm | बिटाकाका

सोप्पं उत्तर, चिल्लो!

खुदा ना खास्ता जर पुढील सरकार काँग्रेस (UPA) केंद्रात आणि आघाडीचे महाराष्ट्रात आले तरी मी शोधून शोधून त्या सरकारांविषयी विरोधी/न पटणारी मते लिहणार हा संकल्प अंध विरोधक या बिनबुडाच्या टिपण्णीवर राग व्यक्त करत आताच सोडला.

मार्मिक गोडसे's picture

21 Feb 2018 - 4:14 pm | मार्मिक गोडसे

खुदा ना खास्ता जर पुढील सरकार काँग्रेस (UPA) केंद्रात आणि आघाडीचे महाराष्ट्रात आले तरी मी शोधून शोधून त्या सरकारांविषयी विरोधी/न पटणारी मते लिहणार

अगदी मनातलं बोललात. फालतू लाड परवडत नाही.

ट्रेड मार्क's picture

22 Feb 2018 - 5:43 am | ट्रेड मार्क

खुदा ना खास्ता कशाला पुढील सरकार फक्त काँग्रेसचेच यावे आणि त्यापुढील सर्व सरकारे सुद्धा काँग्रेसचीच यावीत. आणि तुम्ही त्यांची ओढून ताणून निंदा करायची पण गरज नाही. उगाच दुसऱ्यांना दाखवण्यासाठी कशाला काही करावं? मुख्य म्हणजे ते काही चुका करणारच नाहीत.

लोकांना दुसरे कुठले सरकार पचत नाही. आता लोक म्हणतात की वाजपेयींचे सरकार चांगले होते, पण जेव्हा दुसऱ्यांदा निवडून द्यायची वेळ आली तेव्हा काय झालं? आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट की पंतप्रधानपदाची पुढची टर्म मिळाली नाही म्हणून वाजपेयींचे काय नुकसान झाले? त्यांना ना बायको ना कुटुंब ना त्यांची कोणा नातेवाईकांच्या बिझनेस मध्ये काही गुंतवणूक होती.

हेच लॉजिक आत्ता लावले तर नामोंनाही कुटुंबाचा पाश नाही. स्वतःच्या भावाबहिणीच्या नावे त्यांनी काही बिझनेस उभा केला नाही किंवा जमिनी घेऊन ठेवल्या नाहीत. त्यामुळे जरी त्यांना पंतप्रधानपदाची दुसरी टर्म मिळाली नाही तरी वैयक्तिकरित्या त्यांना काय फरक पडणार आहे? कदाचित गुजराथच्या मुख्यमंत्रीपदी ते परत जाऊ शकतील.

त्यामुळे प्रत्येकाने आपापला फायदा तोटा बघावा... बाकी देश तर काय, चालतोच आहे.

हे 'सरकारने चांगले काही केले तर, कौतूक कराल तरच तुमची वाईट गोष्टींवर केलेली टिका ग्राह्य धरली जाईल' हा भक्तांचा युक्तिवाद, विरोधाचा स्वर चांगलाच टिपेला गेलेला आहे हे दिसल्याने केला जातोय. त्यांचं निराळंय हो, त्यांना बेंबीत बोट घातलंय, विंचू चावला तरी गार लागतयंच म्हणावं लागत आहे, आता पुर्वी समर्थनात असणारे टिका करायला लागले हे बघता पिसाळले.
आता माझे मतः सरकार ही व्यवस्था आपणच आपल्याच आयुष्याचे संचालन व्यवस्थित व्हावे याकरीता केलेली व्यवस्था आहे. आपलेच प्रतिनिधी ती व्यवस्था आपल्या वतीने चालवतात. तिच्यावर आपले संपूर्ण रेग्युलेशन हवे. व्यवस्थेने आपल्याला उत्तरदायी असलेच पाहिजे. जिथे जिथे चुकीचे काही घडेल तुथे तिथे ते माप सद्य कालीन सरकारच्या माथ्यावर टाकलेच पाहिजे. झालेल्या चुकांवर पांघरून घालणे समर्थकांचे काम असू शकते, निष्पक्ष, सामान्य नागरीकाला पक्षाशी आणि कुठल्या विचारसरणीपेक्षा निष्ठा देश आणि सम्विधानावर हवी. जे वादे करून सरकार सत्तेवर आले होते ते पूर्ण होत नसतील तर बोललेच पाहिजे. उगा कौतूक- फिउतुकाची नाटके गरजेची मुळीच नाहीत. टिका महत्वाची. सतत त्यांना अकाऊंटेबल ठेवत गेलो तर चुका कमी होतील. आपल्याला व्यवस्था अधिकाधिक सुधारायला हवी आहे, त्यासाठी सतत सतर्कता गरजेची आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Feb 2018 - 8:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य लिहिले आहेस. चांगल्या कामाचे कौतुक करा.. हा हट्ट भाजपा-शिवसेना समर्थकांकडून अनेक वेळा होताना दिसतो. मात्र विरोधकांच्या कामाचे कौतुक झाले की "त्यात काय एवढे.. तसे करणे काळाची गरज होती.. वगैरे" असो.
विपुल अंबानी व तत्सम लोकांना ताब्यात घेऊन चौकशा चालू आहेत.. नीरवच्या/चोक्सीच्या संपत्ती ताब्यात घेणे चालू आहे. सी.बी.आय./ई.डी. हे काम चोख करताना दिसत आहेत. तेव्हा राजकीय दबाव येथे नाही असे नक्कीच म्हणता येईल.

.

म्हणे निष्पक्ष सामान्य माणूस...काहीच्या काही! उगाच सामान्य माणसाच्या खांद्यावर कशाला बंदूक? सामान्य माणूस चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हणणारा का नको? जिथे भक्त वगैरे शब्द येतात तिथेच मुळात स्पष्ट असते की विरोधी विचारसरणीच्या दावणीला स्वतःला बांधून घेण्यात आलेले आहे. बाकी चुकीच्या गोष्टींवर टिका वगैरे फार्स असतो.
****************************
एक बाजूला ज्या गोष्टींवर दुसऱ्यावर टिका करणे, दुसऱ्या बाजूला तीच गोष्ट स्वतः करणे याला साधारणपणे दुटप्पीपणा म्हणतात.
****************************
विरोधकांचा सूर टिपेला वगैरे काही नाही, निवडणुका जवळ आल्यासारखा वाटत असल्याने चालू झालेली झटापट आहे असे मला वाटते. आता परत ५ वर्षे नावडते सरकार नको म्हणून तथ्य न मांडता ठराविक नकारात्मक चर्चा करून वातावरण आवडत्या सरकारच्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न आहे असे मला वाटते(आमचे आवडते सरकार दुसरे नाही वगैरे मुद्दे असतील तर स्पष्ट सांगावे की मग म्हणणे काय आहे, कुणाला निवडून आणायचे आहे. उगाच ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा अर्थ नसतो).

विशुमित's picture

23 Feb 2018 - 11:57 am | विशुमित

<<<टिका महत्वाची. सतत त्यांना अकाऊंटेबल ठेवत गेलो तर चुका कमी होतील. आपल्याला व्यवस्था अधिकाधिक सुधारायला हवी आहे, त्यासाठी सतत सतर्कता गरजेची आहे.>>>
==>> अगदी मनातील बोललात. SHARPEN THE SAW
जनतेने डोळे झाकून काँग्रेस सरकारला जवळ पास ६० वर्ष सत्ता उपभोगायला दिली. त्यामुळे काही चांगल्या गोष्टीं बरोबर इतर अनेक समस्या देखील निर्माण झाल्या. सामान्य लोकांनी कधी एवढे खोलात जाऊन राजकारणाकडे पाहिले नाही.
त्यात विरोधकांना प्रशासनामध्ये कसे काम चालते आणि त्यातील खाचखळगे याचे चांगले ज्ञान असणार यात वाद नाही. वरून ६० वर्ष अनुभव असल्यामुळे भ्रष्टाचार कोणकोणत्या प्रकारे करता येऊ शकतो याचे सर्व मार्ग त्यांना ठाऊक असणार. याच जोरावर तर सध्य सरकारला कमी पट संख्या असताना देखील छोट्या छोट्या प्रकरणामध्ये कैचीत पकडता येत आहे. चालू सरकारला उ का चू करायला जागा नाही आहे. त्यामुळे ते कसे इमानदार आहेत दाखवू शकतात.
काही प्रकारांमध्ये सुजाण नागरिकांनी उठवलेल्या आवाजामुळे सरकारला स्वतःचे निर्णय मनमानी पद्धतीने रेटने शक्य झाले नाहीत.
काही उदाहरणे :
१) जमीन अधिग्रहण कायदा
२) नोटबंदी- लोकांनी आवाज उठवला म्हणून तर ४०-४२ वेळा वेगवेगळे निर्णय बदलावे लागले.
३) जी एस टी- रोज नवनवीन नियम बदलत आहेत, जेणे करून लवचिकता येण्यात मदत होत आहे.
४) कथित हिंदुत्ववादी आणि गोरक्षकांचा धुमाकूळ- विरोध केला नसता तर अशा संघटनांचे इतके पेव सुटले असते की यामध्ये गुंडापुंडांनी देखील हात धुवून घेतले असते. बातम्या येणे बंद झाले आहे आता. विशेष म्हणजे यावेळेस च्या वॅलेंटिन डे ला चुट्पुटच प्रकार घडले.
५) स्वच्छ भारत योजना- वारेमाप प्रसिद्धीवर खर्च करण्यापेक्षा विधायक कामावर सरकार लक्ष देण्यास भाग पडत आहे.
६) काही घोटाळे- माल्या, निरव मोदी, (आणखी आता आठवत नाहीत ) --- आवाज उठवला म्हणून तर चाप बसला. सरकारचे विशेष कौतुक की मुकेश अंबानींच्या पुतण्याला देखील सरकारने अटक केली. सरकार अदानी-अंबानींसाठी काम करत नाहीत हा संदेश गेला.
....
ह्या गोष्टी जर डोळे झाकून मान्य करत लोक गेले असते तर ५ वर्षांनी देशाचे चित्र काही वेगळे पाहायला मिळाले असते.
खाली बिताकाका म्हणतात तसे हे निवडणुकीपुरते विरोध असतो याबद्दल बराच अंशी असहमत आहे. निवडणूक फक्त सामान्य माणूस जिंकून देत नसतो, जो तो स्टेकहोल्डर आपल्याला सरकार कडून काय मिळाले यानुसार सरकार कोणाचे आणायचे हे ठरवत असतो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Feb 2018 - 10:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य बोललास रे चिर्कुटा. नीरव्/चोक्सीवरचे ट्वीटरी,वॉट्सअ‍ॅपी विनोद तरी अजून फिरत नाही आहेत..भक्त मंडळी गांगरून गेल्याचे लक्षण असे ह्यांचे मत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2018 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे भारतात करायला हवे...

वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँकेत महाघोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात लपला असला तरी अमेरिकेने मात्र या प्रकरणात भारताला सहकार्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 'नीरव मोदी अमेरिकेत लपल्याचं आम्हीही मीडियातूनच ऐकलं आहे. मात्र त्याबाबत आम्ही अधिकृत दुजोरा देऊ शकत नाही,' असं म्हणत अमेरिकेने हातवर केले आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलं. अमेरिकेत लपून बसलेल्या नीरव मोदीला शोधून काढण्यासाठी अमेरिकेचं परराष्ट्र मंत्रालय भारताला मदत करणार आहे का? असा सवाल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याला विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. 'मात्र मोदीला पकडायचेच असेल आणि त्यासाठी कायदेशीर सल्ला हवा असेल तर भारताने अमेरिकेच्या विधी विभागाशी संपर्क साधावा,' असा सल्लाही या प्रवक्त्याने दिला. तर अमेरिकेच्या विधी विभागाने मोदीप्रकरणावर बोलण्यास नकार दिला.

.....
https://m.maharashtratimes.com/international/international-news/us-says-...

....

अमेरिकेत जाऊन प्रधानसेवक जेवून आले.

त्यांच्या मुलीलाही इथे पार्टी दिली.

इतके रोटीबेटी करूनही हेच फल काय या तपाला ?

बिटाकाका's picture

3 Mar 2018 - 10:52 am | बिटाकाका

तुम्हाला साधारण जाणीव देखील नाहीये की तुम्ही काय बोलत आहात. रोटीबेटी? तुम्ही मोदींचा द्वेष करत असाल इथेपर्यंत ठीक आहे, पण त्यापलीकडे जाऊन जेव्हा हे असले तद्दन फालतू विधाने केली जातात तेव्हा द्वेषाची पातळी कुठेपर्यंत पोहोचली आहे ते कळते.
*******************************
जनता सुज्ञ आहे, ती मतपेटीतून असल्या द्वेषयुक्त नकारात्मक प्रचाराला उतर देत आहे.

manguu@mail.com's picture

3 Mar 2018 - 12:57 pm | manguu@mail.com

रोटी - बेटी हा शब्दप्रयोग कोटी म्हणून केला होता.

( विनोद करण्याची परवानगी काही विशेष लोकानाच असल्याचे अनवधानाने विसरले गेले , त्याबद्दल क्षमस्व )

विशुमित's picture

3 Mar 2018 - 1:57 pm | विशुमित

अर्रारा जबरा सोलीड हाणले

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2018 - 2:24 pm | श्रीगुरुजी

उष्ट्रानां विवाहेशु गीतो गायंति गार्धभानि
परस्परं प्रशंसयंते , अहो रूपं अहो ध्वनि|

अरेरेरे, फ्रस्ट्रेशन लपता लपत नाहीये.

बिटाकाका's picture

3 Mar 2018 - 2:42 pm | बिटाकाका

कोटी करायला अत्यंत सामान्य विनोदबुद्धी प्रेसि असते, द्वेषयुक्त बुद्धीने केलेल्या कोट्या अशाच वायफळ जातात. अत्यंत सामान्य माणसाला देखील रोटीबेटीचा अर्थ कळतो.
****************************
तुमच्या द्वेषयुक्त मतांनीच विश्लेषण करून सांगाल का वरील प्रकरणात नेमका रोटीबेटी कशी काय कामाला यायला पाहिजे होती?

ज्या मनमोहन सिंग यांना उद्देशून सुषमा स्वराज 'निकम्मा' म्हणाल्या होत्या त्यांनी देवयानी खोब्रागडे प्रकरणात घेतलेली कणखर भूमिका. त्या वेळेस त्यांनी अमेरिकन वकिलातीच्या बाहेर असलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. तसेच वकिलातील भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना देणाऱ्या विशेष सुविधा बंद केल्या. तसेच राजनैतिक अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या विशेष वागणुकीबद्दल तेथील कोर्टात इतकी जोरदार बाजू मांडली कि कोर्टाने प्रीत भरारा याला बेदरकार वागण्यास प्रतिबंध केला.

आर्थिक घोटाळे अन त्यातून होणाऱ्या गुन्हेगारी याची अमेरिकेला सर्वात जास्त झळ बसलेली आहे आणि त्यामुळे अमेरिका अशा गोष्टींच्या बाबतीत जास्त कडक भूमिका इतर देशांच्या बाबतीत घेत असते. असे असताना निरव मोदींच्या बाबतीत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेला ठणकावून सांगण्याची हि चांगली संधी होती. प्रधान सेवक अशा महत्वाच्या वेळेस भलत्याच गोष्टी करीत असतात (उदा. मामुली गोष्टींवर ट्विट करणे). आताही त्यांचे वागणे त्यांच्या पूर्वपीठिकेला अनुसरूनच आहे.

manguu@mail.com's picture

3 Mar 2018 - 7:33 pm | manguu@mail.com

हेच म्हणायचे होते.

जो गरजते है वो बरसते नही , हे वारंवार दाखवणे सुरु आहे.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2018 - 8:17 pm | श्रीगुरुजी

>>> देवयानी खोब्रागडे प्रकरणात घेतलेली कणखर भूमिका.

- हे प्रकरण घडले त्याच्या जेमतेम काही दिवस आधी दिल्ली, राजस्थान, म. प्र. व छत्तीसगड या ४ राज्यात खांग्रेसचा दणकून पराभव झाला होता.

- लोकसभा निवडणुक फक्त ४ महिन्यांनी होती.

- खोब्रागडे दलित होत्या.

त्यामुळे काहीतरी केल्यासारखे दाखविणे आवश्यक होते. म्हणूनच सोनिया गांधींची ही तथाकथित, दिखाऊ "कणखर भूमिका".

मी प्रत्युत्तर देत नाही, भलेही माझा मुद्दा कमकुवत होता असा त्यातून अर्थ निघाला तरी चालेल. परंत्तू त्या वेळेसचे पंतप्रधान-इन-वेटिंग यांनी देखील त्या प्रकारची दखल घेतली होती. त्यामुळे देवयानी या दलित असण्याच्या मुद्द्यात तथ्य असावे असे वाटत नाही. आणि भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल तुम्ही त्यांची जात पाहून त्यांना मिळणारी वागणूक योग्य आहे कि नाही ते ठरविता का?

प्रदीप's picture

3 Mar 2018 - 8:41 pm | प्रदीप

ह्या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत.

खोब्रागडे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी होत्या. त्यामुळे त्यांना तुरूंगात टाकल्याने, आपल्या सरकारने खंबीर भूमिका घेणे आवश्यक होते.

नीरव मोदी हा आपल्या देशात तथाकथित अफरातफर करून परागंदा झालेली एक व्यक्ति आहे. अशा प्रकारे परदेशात गेलेल्या कुठल्याही व्यक्तिस, देशात परत आणणे इतके सोपे नाही. त्यासाठी दोन देशांच्या संबंधित खात्यांत बराच संवाद व्हावा लागतो. त्या देशांतील अंतर्गत कायद्याच्या सर्व तरतूदी पूर्ण व्हाव्या लागतात.आता ह्या केसमधेही दोन सरकारांमधे काही देवाणघेवाण होत असेल, व ती प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागेल.

चीनसारख्या बलाढ्य देशासही, त्याच्या एका अशाच नागरीकास परत आणण्यासाठी, कॅनडाशी प्रदीर्घ संवाद करावा लागला होता, ती प्रक्रिया बरेच वर्षे सुरू होती.आपणासही, मल्याच्या बाबतीत सध्या असेच लढावे लागत आहेच.

ह्या केसमधे, अमेरीकेच्या परराष्ट्रखात्याकडून दिल्या गेलेल्या तथाकथित उत्तरावरून, नक्की आपल्या सरकारने काय जाहीर आदळाअपट करणे अपेक्षित होते?

बिटाकाका's picture

3 Mar 2018 - 10:00 pm | बिटाकाका

तर, त्यांना हा फरक कळत नाही असा आपला गैरसमज झाला आहे असे मला वाटते. त्यांचा मुद्दा तो नाही, हे भारतात न राहणारे पंतप्रधान एवढं रोटीबेटी वगैरे करून निरव मोदीला आणत कसे काय नाहीत? हा त्यांचा मुद्दा आहे. वास्तविक ट्रम्प तात्यांनी रोटीबेटीला जागून त्या मोदीला अधिक वाणाच्या रुपात आपल्या हवाली करायला हवे होते अशी त्यांची अपेक्षा दिसते. असे न होणे हे मोदींच्या परदेश दौऱ्याचे अपयशच म्हणायचे दुसरे काय?

ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर ने त्यांचे काम व्यवस्थित करावे अशी मागणी आपण नक्कीच करू शकतो. या बाबतीत अमेरिकन कायदे तरी आपल्या बाजूने आहेत आणि फिरंग्यांनी कितीही शाब्दिक कोलांटया उड्या मारल्या तरी तसे करण्याला मर्यादा आहेत. दुसरे म्हणजे त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून खडसावता येते. हा एक प्रतीकात्मक अपमान असतो परंतु जगात सगळीकडेच वाहवा करून घेण्याची सवय असल्यामुळे असा प्रकार अमेरिकेच्या जिव्हारी लागू शकतो.

प्रदीप's picture

4 Mar 2018 - 3:05 pm | प्रदीप

ह्या घटनेसाठी त्यांच्या राजनैतिक अधिकार्‍यास बोलावून खडसावे, हे थोडे अतिशोयक्त व हास्यास्पद वाटते. मला वाटते, राजनैतिक संबंधात इतक्या स्तरावर जाण्यापूर्वी बरेच संकेत असतात, व त्यातही अनेक स्तर असतात. घटनेचे गांभिर्य ध्यानात घेऊन ते स्तर पार करणे जरूरीचे असते. आता, माझी समज चूक असण्याची शक्यता आहेच!

सुबोध खरे's picture

5 Mar 2018 - 12:28 pm | सुबोध खरे

ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर ने त्यांचे काम व्यवस्थित करावे अशी मागणी आपण नक्कीच करू शकतो.
म्हणजे नक्की काय काय आणि कसे कसे करावे?
समजा ते तसे केले असेल तर ते त्यांनी मिपावर जाहीर करावे का ?

या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाहीये कारण ज्ञान लालसेपेक्षा त्यात खोडसाळपणाचं आहे. आपण सेवार्थी म्हणून अनेक गोष्टींचा लाभ घेतो पण त्यावर मत व्यक्त करताना आपण त्यातील निष्णात असण्याची गरज नसते. नाही का?

आणि ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर ने काय केले हे सांगण्याची सध्याच्या सरकारचीच जास्त गरज आहे जशी सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस होती.

या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाहीये कारण ज्ञान लालसेपेक्षा त्यात खोडसाळपणाचं आहे. आपण सेवार्थी म्हणून अनेक गोष्टींचा लाभ घेतो पण त्यावर मत व्यक्त करताना आपण त्यातील निष्णात असण्याची गरज नसते. नाही का?

आणि ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर ने काय केले हे सांगण्याची सध्याच्या सरकारचीच जास्त गरज आहे जशी सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस होती.

सुबोध खरे's picture

6 Mar 2018 - 9:56 am | सुबोध खरे

असे असताना निरव मोदींच्या बाबतीत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेला ठणकावून सांगण्याची हि चांगली संधी होती. प्रधान सेवक अशा महत्वाच्या वेळेस भलत्याच गोष्टी करीत असतात (उदा. मामुली गोष्टींवर ट्विट करणे).
अमेरिकेला ठणकावून सांगायचं म्हणजे नक्की काय आणि कसं करायचं?
का झाडगाव बद्रुकमधील धुंदुभी वर्तमानपत्रातील उप सह संपादक लिहितात तसं "आम्ही अमेरिकेला सज्जड इशारा देतो कि त्यांनी आपली वागणूक सुधारावी नाही तर आमच्याशी गाठ आहे" असं ट्विट करायचं

manguu@mail.com's picture

6 Mar 2018 - 10:31 am | manguu@mail.com

खांग्रेस सत्तेवर असताना भाजपे सारखे ओरडत होते की किती मुळूमुळू परराष्ट्र धोरण आहे म्हणून. अगदी कणखर धोरण हवे म्हणून.

आता इतराना का विचारत बसले ?

सुबोध खरे's picture

6 Mar 2018 - 11:12 am | सुबोध खरे

तुम्ही नका लोड घेऊ.
तुम्हाला विचारलं का? काय काय करायचं आणि कसं कसं करायचं?

इरसाल's picture

3 Mar 2018 - 9:21 pm | इरसाल

नीरव मोदीचे लफडे कळुनही त्रिपुरा आणी नागालँडवाल्यांना काय अक्कल आली नाही म्हणाय्ची.
सालं शेवटी इव्हीएमच जिंकल ;), :))

जेव्हा जेव्हा विरोधकांच्या हातात काही झुन्झुणा मिळतो, पब्लिक परत काय तरी कांड करुन टाकते. :))
मिपावरच्या काही सन्माननीय सदस्यांच्या संतुलित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत (नरेंद्र मोदी हे बिलकुलच चांगल करत नाहीएत म्हणुन)

साला मला तर मानसिक आदळापट पण इमॅजिन नाय होत त्यांची.

पैसा's picture

4 Mar 2018 - 10:09 am | पैसा

माईच्या कवतिकाच्या धाग्याची शंभरी झाली. त्याबद्दल माईचा खणानारळाने ओटी भरून, हळदीकुंकू लावून लकडी पुलावर झाईर सत्कार करणेत येत आहे. माईंच्या ह्यांना शालजोडीतले श्रीफळ देऊन त्यांचाही याटिकानी सत्कार करण्यात येत आहे.

नाखु's picture

4 Mar 2018 - 4:18 pm | नाखु

इथेच तपासून घेणे,
कारण नवरा मुलगा आणि नारळ नंतर कसा निघेल याची खात्री देता येत नाही (सौजन्य पु पा)
हंगामी बदली सचिव मिपा सत्कार समिती सदस्य

https://sanatanprabhat.org/marathi/132097.html

दैनिक सनातन प्रभात Menu
दैनिक सनातन प्रभात > Post Type > बातम्या > अांतरराष्ट्रीय बातम्या > नीरव मोदी यांच्या ‘फायरस्टार डायमंड कंपनी’कडून कर्जवसुली करण्यास मनाई – न्यूयॉर्क न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती
नीरव मोदी यांच्या ‘फायरस्टार डायमंड कंपनी’कडून कर्जवसुली करण्यास मनाई – न्यूयॉर्क न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती
March 3, 2018
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचे प्रकरण

वॉशिंग्टन – पंजाब नॅशनल बँकेत महाघोटाळा करणारे हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या ‘फायरस्टार डायमंड कंपनी’कडून देणेकर्‍यांना कर्जवसुली करण्यास न्यूयॉर्कमधील न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. नीरव मोदी यांच्या वरील आस्थापनाने अनेकांकडून कर्ज घेतले होते; मात्र भारतात त्यांचा घोटाळा उघड झाल्यानंतर देणेकर्‍यांनी हे पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावून न्यायालयात धाव घेतली होती, तर अमेरिकेतील ‘नादारी कायद्यां’तर्गत संरक्षण मिळावे; म्हणून कंपनीने न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील आदेश दिले.

.....................................
वरची बातमी ही अमेरिकेतील कर्जदारांबद्दल असावी , असे वाटते.

----------------------------------

अ हा माणूस बॅंकेत चोरी करून पळाला.

तो ब कडे गेला. ब ने त्याच्याकडून १००० रु घेतले आणि किराणा माल दिला.

नंतर पोलिस जर ब ला म्हणाले की रिकव्हरीला मदत करा आणि ते हजार रुपये आम्हाला परत करा. तर ब ची नेमकी भूमिका काय असावी ?

महेश हतोळकर's picture

5 Mar 2018 - 9:15 am | महेश हतोळकर

पोलिस जर ब ला म्हणाले की रिकव्हरीला मदत करा

पोलिसांना मदत मागायची गरज नाही. कायद्याने त्यांना "तेच" हजार रुपये काढून घेण्याचा अधिकार आहे.

manguu@mail.com's picture

5 Mar 2018 - 11:52 am | manguu@mail.com

असे कसे ?

सुबोध खरे's picture

5 Mar 2018 - 12:31 pm | सुबोध खरे

पण कायदा भारत आणि अमेरिकेत वेगळा आहे आणि त्याची भूमिमर्यादा(jurisdiction) सुद्धा वेगळे आहे.
"इकडच्या" न्यायालयाचा वटहुकूम "तिकडे" लागू होत नाही.
आणि प्रत्येक देश स्वतःचा स्वार्थ "प्राधान्याने" पाहतो.

महेश हतोळकर's picture

5 Mar 2018 - 12:41 pm | महेश हतोळकर

मी फक्त अ आणि ब च्या बाबतीत बोललो होतो. प्रत्येक देश स्वतःचा स्वार्थ प्राधान्याने पहातो आणि पहायलाच पाहिजे.

गामा पैलवान's picture

5 Mar 2018 - 1:22 pm | गामा पैलवान

महेश हतोळकर,

पोलिसांना मदत मागायची गरज नाही. कायद्याने त्यांना "तेच" हजार रुपये काढून घेण्याचा अधिकार आहे.

हे पैसे रोख रक्कमेच्या स्वरूपात दिलेले असणार हे गृहीत धरतो. अशा प्रसंगी पोलिसांना ते वसूल करता येणार नाहीत असं माझं मत. कारण की रोख पैशाच्या नोटा हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नराने दिलेलं वचन असतं. त्या नोटा धारकाकडून (=बेअररकडून) विना परवाना कोणालाही हस्तगत करता येत नाहीत. शिवाय त्या नोटा त्या दुकानदाराने इतरत्र व्यवहारासाठी वापरलेल्या असू शकतात. त्यामुळे त्या पांगलेल्या नोटा गोळा करायची जबाबदारी पोलिसांची आहे. त्याच्या बदल्यात दुकानदारास दंड अभिप्रेत नाही.

लाचप्रतिबंधक अधिकाऱ्यांना देखील काढून घ्यायच्या झाल्या तर ताबडतोब काढून घ्याव्या लागतात. शिवाय त्यावर खास खुणाही असतात.

आ.न.,
-गा.पै.

manguu@mail.com's picture

5 Mar 2018 - 1:45 pm | manguu@mail.com

सहमत .

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या गीतांजली ग्रुपला ३१ बँकांनी ५,२८० कोटी रुपयांची वर्किंग कॅपिटल फॅसिलिटी दिली होती. याआधी एसएफआयओनं पंजाब नॅशनल बँकेला नोटीस बजावली होती. त्यानंतर आता इतर बँकांनाही यासंदर्भात नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. आयसीआयसीआयनं गीतांजली ग्रुपला ४०५ कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. अॅक्सिस बँकेनंही या समूहाला मोठ्या रकमेचं कर्ज दिलं होतं. या प्रकरणात कोचर आणि शर्मा यांची चौकशी होऊ शकते, असंही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं गीतांजली समूहाचा उपसंचालक विपुल चितालिया याला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

........

गल्लीबोळातल्या लहानसहान ब्यान्का भ्रष्टाचार करतात असे कारण दाखवून त्यांचे व्यवहार ठप्प केले.

जनता नाईलजास्तव मोठ्या ब्यान्कांच्या दारात गेली अन पैसे भरले.

ह्यांचे वर्किंग कॅपिटल वाढवणे हे मोठ्या चोरांच्या फायद्याचे ठरले.

बिटाकाका's picture

6 Mar 2018 - 4:56 pm | बिटाकाका

अचं जालं व्हय! चॅन चॅन! कर्जे वाटली कधी, नोटबंदी झाली कधी, एनपीए झाले कधी कशाचा कशाला संबंध नाही. पण एकूणच अंधविरोधकांच्या लॉजिकला तोड नसते.

जनता नाईलजास्तव मोठ्या ब्यान्कांच्या दारात गेली अन पैसे भरले.

ना बूड ना शेंडा! काहींच्या काही फेकायचं! कोणती जनता कोणत्या मोठ्या बँकांच्या दारात गेली होती? याला काही संदर्भ आहेत का? कि नेहमीप्रमाणेच आपलं अंधविरोधासाठी?

manguu@mail.com's picture

6 Mar 2018 - 5:28 pm | manguu@mail.com

कर्जे कधी का असेनात , ब्यान्कांना हार्ड कॅश मिळाली ना ?

बिटाकाका's picture

6 Mar 2018 - 5:41 pm | बिटाकाका

छान, कर्जे कधीची का असेनात हे सांगण्यातच सगळं सार आहे! ती कधीची आहेत याच्याशी मुळात घेणेदेणेच नाही. नाहीतर रिकाम्याच पडल्या होत्या बँका, वाटच बघत होत्या कधी एकदा नोटबंदी होते आणि कधी एकदा हार्ड कॅश येते. नसती झाली नोटबंदी तर बँका दिवाळखोरीच घोषित करणार होत्या.
*********************************************
नोटबंदीचा आणि एनपीए करून पळून जाणार्यांचा काय संबंध?