लावणी

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
28 Dec 2017 - 11:57 am

लावणी

पदर ढळला खांद्यावरुनी लाजेने झाले मी चूर
नका रोखून पाहू मला धडधडे माझा ऊर ||१ ||

रात्र चढली पुनवेची आजि जवळ कोणी नसे
इश्कामध्ये या तुमच्या दाजी झाले मन वेडेपिसे ||२ ||

पान खाऊन आले दाजीबा ओठाला रंगली लाली
सुगंधी गजरा शृंगार करुनि मी वाट पहाते रंगमहाली ||३ ||

स्पर्श होता तुमचा माझे अंगअंग शहारले
श्वास होती एकरूप आपले दुसरे विश्व न उरले |||४ ||

सहवासामध्ये तुमच्या राया स्वत्व माझे हरवले
शृंगारक्रीडा करता करता तन मन भान हरपले ||५ ||

वर्षू दे तुमची प्रीती मजवरी सचैल आज मी न्हाले
रात्र सरली पहाट झाली आकंठ तृप्त मी झाले ||६ ||

--शब्दांकित (वैभव दातार)

लावणीकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

28 Dec 2017 - 12:09 pm | चांदणे संदीप

झटका नाही तुमच्या लावणीत.... ठसका आला पाहिजे कसा...

असा ....

वर्ण सावळा, मध्यम बांधा
नार दिसे तू नख-याची
मनात ठसे रूप तुझे ग
रती भासे तू मदनाची

लढण्याआधी पडती सारे
असा तुझ्या नजरेचा वार
तुझ्यापुढे ग गुलाम सारे
राणी तू ग हुकुमाची

भरदिवसा ना दिसते तू
चंद्र जसा तो नभी नसे
तुला पहाण्या रात्र पुरेना
लाली खुणावते पूर्वेची

Sandy

पुंबा's picture

28 Dec 2017 - 12:35 pm | पुंबा

आहा!!
जब्रा..
शेमले, फेटे उडवले गेले आहेत.

टॅन, वाट पहाटे सारखे शब्द काळजाला भिडले.

बाकी "आड वाटनं जाता जाता तोल माझा सुटला, माझ्या गोर्‍या टाचंत काटा रुतला" या ओळींमध्ये जी मजा आहे ती नाही आली.

लावणी म्हणजे मामलेदारच्या, मूनमूनच्या गेला बाजार काटाकिर्र्च्या मिसळीसारखी हवी. तुमची ही मिसळच झालीय, पण तुळशीबागेतल्या श्रीकृष्ण मिसळ मधली!!

पगला गजोधर's picture

28 Dec 2017 - 12:33 pm | पगला गजोधर

असू द्या हो वैभवजी, छान आहे लावणी १+ .... बाकीच्या लोकांकडे दुर्लक्ष करा .....

गरिबंकी बस्ती अभी बसी नही के आये दुष्ट लुटेरे, उसे उजाडने केलीये ...
हे म्हणजे एखाद्याने समुद्रकिनारी वाळूचा सुंदर किल्ला करावा, आणि निरागसता दाखवत व्रात्य मुलाने त्यावर नाचावं...
:)

वैभवदातार's picture

28 Dec 2017 - 3:04 pm | वैभवदातार

तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. आज मी पोस्ट केलेली माझी ही शेवटची कविता आहे. यापुढे मी मिसळपाव वर कविता पोस्ट करणार नाही. ह्या ग्रुपवर माझ्या कवितांच्या त्रुटी दाखविल्या गेल्या ह्यात मला आनंद आहे.
चूक दाखविल्याशिवाय ती सुधारणार कशी त्यामुळे मला सुधारणा करण्यास खूप मदत झाली. परंतु बऱ्याच वेळा हेटाळणीच्या सुरात किंवा टिंगल करण्याच्या स्वरूपात माझ्या कवितेवर प्रतिक्रिया देण्यात आल्या. त्यामुळे मला खूप वाईट वाटले. मी काही दिनविशेषांवर कविता लिहिल्यावर माझ्याकडे काही महत्वाच्या नसलेल्या दिनविशेषांवर कविता लिहिण्याची मागणी ह्या ग्रुप वर करण्यात आली.
असो . मला कोणावरही दोषारोप करायचे नाहीत.

सर्वाना नवीन वर्षासाठी शुभेछया देऊन मी आपलाही कायमची राजा घेतो !

आटा पर्यंत माझ्या कवितांना सहन केल्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो .

लिहीत चला हो, आमचं फार मनावर घेऊ नका. आम्ही अधून मधून टवाळक्या करतच असतो इथे.

पाषाणभेद's picture

29 Dec 2017 - 1:27 am | पाषाणभेद

हळव्या मनाचे नका राहू हो. चालायचंच मिपावर. म्हणून तर मजा आहे येथे. लिहीत रहा.

पगला गजोधर's picture

14 Jan 2018 - 6:21 pm | पगला गजोधर

वैभवजी यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा,
आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी .. ..

लावणी आवडली. शृंगाराचे वर्णन भडकपणे न करताही परिणामकारक होऊ शकते हे दिसले.

यातल्या टंकनचुका दुरुस्त करून देतो थोड्या वेळात. मिपावर लिहीत रहा.

पाषाणभेद's picture

29 Dec 2017 - 1:28 am | पाषाणभेद

टंचनिका नाही का तिकडे?

चामुंडराय's picture

29 Dec 2017 - 1:39 am | चामुंडराय

वैभवदा,

तुम्ही लिहा, सोडू नका.

तुम्हाला त्रास देणाऱ्या मिपाकरांना मिपाच्या भाषेत फाट्यावर कि काय ते मारा.

अजून लिहा ना गडे :)

पाषाणभेद's picture

29 Dec 2017 - 2:13 am | पाषाणभेद

|| चामुंडराय बोलीले...पाषाणभेद करविले ||

ह्या इथे मिपावर तुम्ही फाकडे
नका जावू अजुनही लिहा ना गडे ||

कॅलेंडर असूनी समोर
तीथीमध्ये नाही घोळ
मिपा वाचकांना
मीच का सापडे? ||

मी असा सधा सरळ
का उडवावी त्यांनी गरळ
वाचकांच्या कल्पनेचे
विमान मग का उडे? ||

कालचीच रात सरे
गतकाळाची वाट नुरे
नित्य नव्या रविसहीत
काव्य माझे उजाड||

पाषाणभेद's picture

29 Dec 2017 - 2:17 am | पाषाणभेद

*.....उजाडे

चामुंडराय's picture

29 Dec 2017 - 7:21 am | चामुंडराय

=)) =))

काव्य माझे उजा

कधी कधी अजाणतेपणी सत्य बाहेर पडते ते असे.

पुंबा's picture

29 Dec 2017 - 1:13 pm | पुंबा

हळवं राहिलं, सतत वाहवाच मिलायला पाहिजे असा धोशा धरून बसलं की निष्कारण कुचंबणा होते. त्यापेक्षा येत रहावं, दुसर्‍यांच्याही कवितांना प्रतिसाद द्यावा, जरा टवाळकी करावी, टवाळकी सहन करावी.
तेव्हा, हा निर्धार सोडा आणि कविता टाकत देखिल रहा. तुमच्या चांगल्या कवितांना इथे दाद मिळाली आहे हेदेखिल पहा.

चांदणे संदीप's picture

29 Dec 2017 - 1:32 pm | चांदणे संदीप

जरा टवाळकी करावी, टवाळकी सहन करावी.

दुसरी "करावी" जमलीये... पहिली "करावी"त आता करियर करावं म्हणतोय... ;)

Sandy

पुंबा's picture

29 Dec 2017 - 1:16 pm | पुंबा

आणखी एक.
ही चांगली शृंगारकविता आहे. लावणी म्हणता एय्णार नाही ना याला? कारण पारंपरीक धृवपद असणारी रचना नाहीये ना ही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2017 - 1:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ वैभवदातार

लिहित रहा हो तुम्ही. मिपासारख्या मोकळ्याढाकळ्या मुक्त संस्थाळावर, मित्रमंडळींच्या कट्ट्यावर होते तशी, जराशी टिंगलटवाळी आणि मस्ती होणारच... किंबहुना, ती गोष्ट मिपाचे शक्तीस्थळ आहे व तिच्याकरिताच बरेच मिपाकर इथे दीर्घकाळ टिकून आहेत. तुम्हीही मोकळ्या मनाने त्या मजेचा अनुभव घ्यावा असे वाटते. मनमोकळी टी़आ होते तशी एखाद्या उत्तम लेखनाची तारीफही इथे हातचे न राखता केली जाते, हे ध्यानात आले असेलच.

महत्वाचे म्हणजे, जेथे केवळ तोंडदेखली स्तुती केली जाते, तेथे आपल्या लेखनाचा खरा कस कसा समजू शकेल ?... आणि ते नाही झाले तर आपल्या लेखनात सुधारणा करायला कशी मदत होईल ?

तेव्हा, मिपाचा हा मित्रकट्टा सोडण्याचा विचारही मनात न आणता, इथल्या मजेचा आस्वाद घ्यावा आणि बरोबरीने योग्य असलेली सकारात्मक टीका स्विकारून आपले लेखन विकसित करत रहावे. नाही का ?

तुमच्या पुढच्या लेखनाच्या प्रतिक्षेत.

अभिजीत अवलिया's picture

29 Dec 2017 - 4:22 pm | अभिजीत अवलिया

सहमत आहे. किंबहुना केवळ छान छान अशा टाईपच्या प्रतिक्रियांपेक्षा वाचकांनी केलेली सकारात्मक टीका ही स्व:त मध्ये सुधारणा करण्यास जास्त उपयुक्त ठरते. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे म्हटले जाते ते काही उगाच नाही.

श्रीगुरुजी's picture

29 Dec 2017 - 2:28 pm | श्रीगुरुजी

रात्र चढली पुनवेची आजि जवळ कोणी नसे

म्हणजे सगळे रात्री "आजी"ला एकटे सोडून गेलेले दिसताहेत.

इश्कामध्ये या तुमच्या दाजी झाले मन वेडेपिसे ||२ ||
पान खाऊन आले दाजीबा ओठाला रंगली लाली

म्हणजे धाकट्या बहिणीची आणि दाजीची भानगड दिसतीये.

(हलकेच घ्या)

नाखु's picture

29 Dec 2017 - 2:55 pm | नाखु

दातार जी

तुम्ही कधी तुमच्या शाळेत स्नेहसंमेलन, सोसायटीच्या स्नेहसंमेलन यात भाग घेतला होता ना, तेंव्हा कसं आपल्या कार्यक्रमास लोकांनी पहावं असं वाटतं, आपणही इतरांच्या सादरीकरणाला दाद देतो तसं आहे मिपा.

तुम्ही फक्त तुमच्याच लिखाणासाठी मिपावर वावरत असायला काय विधीज्ञ उंबरकर नाहीत की भाषेत डॉ मिळालेले देवरे नाहीत , तेंव्हा बिनधास्त लिहा आणि वाचा

दुसर्‍याच्या घाग्यावर न फिरकणारी बरीच मंडळी आहेत. यांचा अंजेडा फक्त लिखाण आणून मि.पा.वर ओतायचे आणि गायब व्हायचे ते थेट पुढच्या घाग्याच्या वेळीच प्रगट. मी या लोकांना प्रतिसाद देणे थांबवलय.

समाधान राऊत's picture

31 Dec 2017 - 1:05 am | समाधान राऊत

मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी खाजव असं काही धोरण आहे का?? कि शिवाजी सावंत वा इतर कुणी माझी पुस्तके वाचली नाहीत म्हणून मी का त्यांची वाचू असं काही.. सरधोपटपने वाचक आणि लेखक असे दोन गट पडतात, आपण कुठल्या पंक्तीत बसायचे ते आपण ठरवतो, तसेही हि काही पिंक वैगरे म्हणावे इतके खराब म्हणावे असे काही वाटले नाही..