यत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे
बनेशच्या जिगरी दोस्त शरद शास्त्रीने म्हटलेली ही ओळ ह्या चित्रपटालाही तन्तोतन्त लागू पडते. मुळात फास्टर फेणेची कथा चित्रपट स्वरूपात मान्डणे हे मोठे धाडसाचे काम आहे. धाडसाचे अश्यासाठी की मध्यम वयीन आणि सत्तर ऐशीच्या दशकातील पिढीच्या डोळ्या मनात फास्टर फेणे ही व्यक्तीरेखा ठसलेली आहे त्यामुळे त्या व्यक्तीरेखेला जरा जरी धक्का लागला तरी हा प्रयोग फसण्याची भिती होती. तसेच हॅरी पॉटर च्या जमानातल्या नव्या पिढीला फास्टर फेणे ही व्यक्तीरेखा तितकीशी माहीत नाही. त्यामुळे ही व्यक्तीरेखा चित्रपटात उभी करणे हे मोठे धाडसाचे काम होते. तसेच दिवाळीच्या सुटीत येणारा ह्या चित्रपटाला बच्चे कम्पनीची हजेरी लागण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे हा चित्रपट कितपत चालेल आणि मुळात आपल्या मनातल्या फास्ट फास्टर फास्टेस्ट व्यक्तीरेखेला चित्रपट स्वरुपात कितपत बघवेल ही साशन्कता मनात होती पण लेखक दिग्दर्शक द्वयीने ही जवाबदारी यशस्वी रित्या पेलली आहे.
जुन्या काळातला फास्टर फेणे हा नविन रुपात सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये सध्याच्या तन्त्रज्ञानची जोड देण्यात आलेली आहे. गुगल मॅप, जी पी आर एस, फेसबूक एथिकल हॅकीन्ग ह्या सन्कल्पनान्चा पुरेपूर वापर या चितत्रपटात करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या चित्रपटामध्ये नविन पिढीलाही आकर्षीत करण्यात आले आहे. उदाहर्णाथ चित्रपटातील खलनायक अप्पा हा नायकाला धमकी देऊन त्याला फेसबुक वर " फीलीन्ग फ्रायटण्ड विथ वन अदर" असे स्टेटस टाक म्हणून सल्ला देतो किन्वा सहकलाकाराने नायकाला सन्कटात सापड्लेले असताना जी पी आर एस ने ट्रॅक करणे ह्या सन्कल्पना भन्नाट वाटतात.
चित्रपटात मुळ गोष्टीतल्या सुभाष, शरद जोशी ह्या महव्ताच्या व्यक्तीरेखा वगळण्यात आल्या आहेत. पण चित्रपटात स्वतः भा रा भागवत (आजोबा) व्यक्तीरेखा आणणे हा ह्या चित्रपटातला यु एस पी आहे. भा रा भागवत त्यान्च्याच पुस्तक रुपी व्यक्तीरेखेला स्वतःच अनुभवतात ही सन्कल्पनाच भन्नाट आहे. आणि ती चित्रपटाला वेगळ्याच उन्चीवर नेते. चित्रपटात अमेय वाघ ह्याने व्यक्तीरेखेसाठी विशेष मेहेनत घेतली आहे. मुळात त्याने शैलेश परुळेकरान्च्या मार्गदर्शनाखाली दहा किलो वजन कमी केले आहे जेणेकरून लहान्पणीचा तुडतुडीत किडकीडीत बनेश हा मोठा झाल्यावर अगदी असाच दिसेल असे प्रेक्षकाना वाटतेही आणि पटतेही. चित्रपटात भुषन उर्फ भु भु, अबोली, आजोबा ह्या मुळ कथेत नसलेल्या व्यक्तीरेखा आणण्यात आल्या आहेत आणि फास्टर फेणेच्या मुळ कथेतल्या काही व्यक्तीरेखा वगळण्यात आल्या आहेत पण त्याने चित्रपटाची कथा कुठेही ठीसूळ होत नाही. ह्या चित्रपटात गाणी नसल्यामूळे प्रेक्षकाला कथेतून बाहेर पडण्यासाठी अजिबात फुरसत मिळत नाही आणि त्यामुळे चित्रपटाचा वेग आणि मोमेन्टो कायम रहातो.
चित्रपटाचा हाय पॉइन्ट आहे तो चित्रपटातला खलनायक अप्पा म्हणजेच गिरीश कुलकर्णी त्यामुळे खलनायका बद्दल मुद्दाम लिहीण्या साठी एक पूर्ण परीछेद खर्च करीत आहे.गिरीश कुलकर्णीला आपण कित्येक व्यक्तीरेखेत पाहीले आणे त्याने स्वतातल्या अभिनेत्याला नटाला अनेकदा सिद्ध केले आहे(विश्वास नसेल तर त्याचे चित्रपट प्रत्यक्ष बघाच आणि प्रचिती घ्या) त्याने खलनायकाची भुमीका बहुदा प्रथमच केलेली आणि ती भुमीका अक्षरशः जगली आहे. रीयल लाईफ मधला खलनायकी छटा असलेली व्यक्तीरेखा कशी असेल हे त्याने चित्रपटात अगदी पुरेपूर उतरवले आहे. छोट्या छोट्या गोष्टीमधून त्याने ह्या व्यतीरेखेचे बारकावे अगदी सहज दर्शवले आहे. त्याचे हसणे, त्याचे बोलणे, त्याची थण्ड भेदक नजर, त्याची सन्वाद फेक सर्वच लाजवाब आहे. अतिशयोक्ती नाही पण गिरीशच्या अभिनयामुळे, पटकथेमूळे ही व्यक्तीरेखा नायकालाही डोईजड होते असे म्हणायला हरकत नाही आणि हे विधान अगदी सत्य आहे.
चित्रपटाची कथा मुद्दामच सान्गत नाही आणि त्यामुळे स्पॉईलर अॅलर्टही देत नाही. हा चित्रपट चित्रपटात जाउन स्वतः अनूभवा हेच सान्गणे. आणि हा चित्रपट खुप खुप चालावा म्हणून अनेकानेक शुभेच्छा.
फास्ट फास्टर फास्टेस्ट
केदार अनन्त साखरदाण्डे
दिनान्क ३१/१०/२०१७
प्रतिक्रिया
30 Oct 2017 - 8:43 am | चांदणे संदीप
लैच्च फाश्टर आलाय लेख! ;)
Sandy
30 Oct 2017 - 9:44 am | ज्ञानोबाचे पैजार
फनटाईम नावाच्या एका अत्यंत भिकार मल्टीप्लेक्स मधे फास्टर फेणे पाहिला.
सिनेमा मस्तच आहे, अमेय वाघचे काम आवडले. त्याची तुलना उगाच भा रा भागवतांच्या फाफे शी करण्याची गरज नाही.
गिरीश कुलकर्णीच्या आप्पाचा तर नादच करायचा नाय. (शेवटचा सीन सोडला तर ) त्याने फारच मस्त काम केले आहे.
अत्यंत वेगवान कथानक आणि अजिबात नसलेली गाणी हे ही हा सिनेमा आवडण्याचे अजून एक कारण.
चित्रपटा मधे अनेक कच्चे दूवे देखिल आहेत, पण चित्रपटाचा वेग आणि सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय या मुळे चित्रपट पहाताना त्या कडे दूर्लक्ष होते.
टिव्हीवर दाखवतात ते रितेश देशमुखचे "पकड पकड" गाणे कधी आहे? काल थेटर मधे तरी ते दाखवले नाही.
पैजारबुवा,
30 Oct 2017 - 6:51 pm | महेश हतोळकर
फन टाईमला कशाला गेलात हो साहेब?? ढेकणाचं गोदाम आहे ते. दोन पावलं पुढे अभिरूचीला जायचं ना. अर्थात तिथे खिशाला मोठी चाट लागते.(चित्रपट+पॉपकॉर्न+खालची तुळशीबाग+त्याखालचा बिग बझार=मोठ्ठा बांबू)
30 Oct 2017 - 8:42 pm | चौथा कोनाडा
नाहीचय म्हणे सिनेमात !
फक्त टीव्ही प्रोमो अन डिजिटल मार्केटिंग साठी गाणं बनवलं असणार !
30 Oct 2017 - 10:51 am | सिरुसेरि
+१ ट्टॉक.
30 Oct 2017 - 12:18 pm | आनन्दा
चित्रपर बघितलेल्या इतरांनी पण रिव्ह्यू टाका प्लीज. हे परीक्षण बघून पिक्चर बघण्यालायक नाही असे मत बनलंय
30 Oct 2017 - 3:31 pm | किसन शिंदे
:D
30 Oct 2017 - 3:50 pm | बोलघेवडा
साहेब मी प्रत्येक्ष बघितलाय !!!
चित्रपट खूप मस्त आणि जबरदस्त वेगवान आहे. अमेय आणि गिरीश कुलकर्णी साठी एकदा बघाच.
30 Oct 2017 - 4:28 pm | महेश हतोळकर
मस्त आहे हा पिक्चर. मजा आली. फाफेचा मूळ गाभा "साहस आणि डिटेक्टीव्हगीरी"याला धक्का न लावता कथेला नवीन बाज चढवणे चांगलेच जमले आहे.
जरूर पहा. मला, माझ्या मुलाला (वय १०) आणि बायकोला, सर्वांनाच आवडला.
30 Oct 2017 - 5:37 pm | सतिश गावडे
गिरीश कुलकर्णीचा या चित्रपटातील अभिनय त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट अभिनय असावा इतका अप्रतिम आहे.
30 Oct 2017 - 6:07 pm | नाखु
बात, आता कसं बघायला जरा बळ आलं
मिपावरील परिक्षणातील बेंबट्या नाखु शिनेमावाला
30 Oct 2017 - 6:11 pm | पुंबा
गिरीश कुलकर्णीने कायिक आणि वाचीक अभिनयातून, विकट हास्यातून आणि अफलातून संवादफेकीतून जी कमाल केलीये त्याला तोड नाही.
पुढच्या भागात जर गिकु नसेल व्हिलन म्हणून तर नव्या व्हिलनची वाट लागेल.
सगा म्हणताहेत तसे त्याच्या आयुष्यातील सर्वात उत्तम भुमिकांत याचा नंबर लागणारे. अर्थात तो कधी वाईट अभिनय करतो म्हणा!!
अवा कुठे कुठे फारच निष्प्रभ ठरल्यासारखा वाटतो. अर्थात त्याने प्रचंड मेहनत, तयारी केलीये हे जाणवते. त्याने अभिनयदेखिल अतिशय उत्तम केलाय. मुख्य म्हणजे संयमित, जेवढा आवश्यक तेवढाच. फालतू विनोद, अचकट विचकट गाणी आणि फुसकी लव्ह स्टोरी नाही हा आणखी एक सुखावह बदल. पटकथा लेखक क्षितिज पटवर्धन यांचे अभिनंदन की इतकी वेगवान गोष्ट आणि प्रवाही संवाद त्यांनी लिहिले आहेत.
सरते शेवटी रितेश देशमुख याचेदेखिल अभिनंदन, चेंगटपणा न करता उत्तम निर्मितीमुल्ये सांभाळली, स्वतः प्रमोशनची देखिल जबाबदारी उचलली. प्रेक्षकांनी उत्तम प्रयोग नक्की पहावा. आता कुठे चांगल्या मल्टीप्लेक्स टॉकिज मध्ये मोक्याच्या वेळा मराठी चित्रपटांना मिळत आहेत त्यांना थॉडं सावरलं तर मराठी चित्रपट म्हणजे आशयघन मनोरंजन आणि प्रेक्षकांना ते हवे आहे असे समिकरण टॉकिजवाल्यांच्या मनात देखिल पक्के होईल आणि रिवॉर्ड्सच्या ओढीने का होईना नवे निर्माते, दिग्दर्शक, कलावंट, लेखक नवे प्रयोग करू धजतील.
30 Oct 2017 - 6:15 pm | पुंबा
थोडंसं खटकलेले: भा रा भागवतांचे जे वर्णन ऐसि च्या अंकात वाचले त्यावरून ते फेणेच्या साहसाची धास्ती घेतील असे वाटत नाही. अर्थात भारांचे चित्रण काल्पनिक असणे मान्यच. आणि थोडे खटकलेले म्हणजे संकलन. उत्तरार्धात थोडी काटछाट चालली असती. इमोशनल प्रसंग वेगाला अडथळा ठरतात असे मावैम.
30 Oct 2017 - 7:22 pm | सूड
बघितला तर गिरीष कुलकर्णीच्या अभिनयासाठी बघेन.
30 Oct 2017 - 7:54 pm | रेवती
आणखी एका ठिकाणहून "सिनेमा चुकवू नका" असा मेसेज आलाय. आमची दिवाळी पार्टी आहे. ती सोडून दुपारी दोन ते चार सिनेमा पहायला जाणे शक्य नाही. शनिवारी आणखी एक शो लावला तर जमू शकेल. नाहीतर जालावर आल्यानंतर पाहीन.
30 Oct 2017 - 9:04 pm | विखि
गिरिश कुलकर्णी च्या जीवन्या आणि केशा ने येड लावलं होतं, तुम्ही कोन डायवर का? :)
31 Oct 2017 - 3:15 am | फारएन्ड
छान ओळख. पाहायचा आहेच. चांगल्याच प्रतिक्रिया ऐकल्या आहेत याबद्दल.
31 Oct 2017 - 8:43 am | मारवा
एकदा बघावा म्हणतोय हा चित्रपट.
31 Oct 2017 - 9:32 am | II श्रीमंत पेशवे II
आता तर पहावाच लागेल .......
31 Oct 2017 - 5:50 pm | पगला गजोधर
आताच कोथरुडात अर्ध्या तासाच्या आत, फा फे पाहिला...
मिशन इम्पोसीबल मध्ये एक डायलॉग आहे...
जर तुम्हाला महान हिरो हवा असेल, तर तुम्हाला आधी तितक्याच ताकदीचा व्हिलन निर्माण करणे प्राप्त आहे...
या चित्रपटात याची जाणीव होते.
गि कु यांनी छान पद्धतीने कंटेपररी गुंठामंत्री फ्लेवर मधे एक वेगळाच हटके व्हिलन पेश केलात..
त्यांची व्हीलैंगिरी प्रेक्षकांना भिडते, म्हणूनच फाफेचा स्ट्रगल प्रेक्षकांना भावतो....
१+
5 Nov 2017 - 4:13 pm | नाखु
पाहिला
गाणी-ग्गोगोड प्रेम कथा टाकल्याबद्दल विशेष कौतुक
मुलांनाही आवडलाच
नाखु शिनेमावाला
5 Nov 2017 - 4:50 pm | सतिश गावडे
नाखो, "न" नको?
5 Nov 2017 - 6:37 pm | नाखु
मुद्रा राक्षस चूक नेमका न खाल्ल्याने अनर्थ झाला
मोबाईल मधील भाषा स्वयं सुधारणा सुविधा बळी नाखु
6 Nov 2017 - 3:13 pm | सिरुसेरि
अप्पा अंधारे यांना धन्यवाद .
7 Nov 2017 - 11:55 am | सिद्धार्थ ४
ओके ओके आहे, आवर्जून बघावा असे नाही आणि बघितला तरी त्याचा पच्छाताप होणार नाही. अमेय आणि गिरीश ह्यांचा अभिनय छान आहे.