लंगरवाली दाल..

प्राजु's picture
प्राजु in पाककृती
5 Feb 2008 - 1:21 am

खास तात्या आणि स्वातीच्या आग्रहासाठी...

वेळ : २० मिनिटे.
संख्या : २-३ लोकांसाठी.

साहित्य :
१. १/२ वाटि राजमा
२. १/२ अख्खा मूग
३. मूठ भर अख्खा उडिद
४. मूठ भर चणा डाळ
५. २ पाकळ्या लसूण
६. थोडं आलं
७. बारिक चिरलेला कांदा १/२ वाटी
८. बारिक चिरलेला टोमॅटो १/२ वाटी
९. २-३ हिरव्या मिरच्या
१०. तूप, जिरे, हळद,हिंग, बडिशेप.
११. मिठ चवीनुसार

कृती :
१. साधारण ३० मिनिटे आधी वरील सर्व धान्ये गरम पाण्यात भिजत घालावित.
२. कुकरमध्ये ही सगळी धान्ये आणि लसूण बारीक चिरून घालावी, मीठ आणि थोडे तूप घालून, धान्ये शिजतील अशा बेताने पाणी घालून शिजवून घ्यावे.
३. आता थोडे तूप कढईत घेऊन त्यात जिरे, हींग, हळद, बडिशेप याचि फोडणी करून घ्यावी.
४. त्यात कांदा घालावा, चांगला परतावा, तो ट्रान्सपरंट झाला की, आलं बारिक चिरून घालावं.
५. लगेचच टोमॅटॉ घालावा आणि त्याची शिजून पेस्ट होईपर्यंत परतत रहावे.
६. कुकर मध्ये शिजलेली डाळ घोटू नये.. आता हि तयार झालेली फोडणी (कांदा-टोमॅटॉ वाली) , त्यावर घालावी.
७. ठिकसे पाणी घालावे. खूप पातळ करू नये. ही आमटी नाहिये हे लक्षात घ्यावे.
८. चवीनुसार मीठ घलावे. कोथिंबीर घालावी.

अधिक माहिती :
डाळ शिजताना मिठ घातले आहे हे लक्षात ठेऊन नंतर मीठ घालावे.
फोडणी शक्यतो तूपाचीच करावी. डाळीवर फोडणी घालण्या ऐवजी, कांदा-टोमॅटो परतून झाल्यावर त्यात डाळ घातली तरी चालेल.
कधितरी भा़जीला पर्याय म्हणून उत्तम आहे. शिवाय बरीच कडधान्ये एकाच वेळी आल्यामुळे पौष्टीकही आहे. मी तर यात कधी कधी मटकी आणि अख्खा मसूरही घालते.

माहितीचा स्त्रोत
माझ्या मानस मातोश्री (पंजाबी आंटी)

पाकक्रियाआस्वादपंजाबीशाकाहारीग्रेव्हीडाळीचे पदार्थ

प्रतिक्रिया

प्राजु's picture

5 Feb 2008 - 1:23 am | प्राजु

२. १/२ अख्खा मूग

इथे १/२ वाटी अख्खा मूग..

- प्राजु

चतुरंग's picture

5 Feb 2008 - 2:03 am | चतुरंग

नवीन प्रयोगाची तयारी झाली!
प्राजु, छान पौष्टिक कृती बद्दल धन्यवाद!

चतुरंग

स्वाती राजेश's picture

5 Feb 2008 - 2:19 am | स्वाती राजेश

व्वा काय मस्त रेसिपी आहे.
लवकरच करेन आणि तुला कळवेन कशी झाली ती....
तुपाच्य फोडणी मुळे खमंग लागत असेल नाही?

गौरी's picture

5 Feb 2008 - 9:02 am | गौरी

प्राजू,
मस्तच रेसिपी आहे गं..उद्याच करुन बघते!!!

संजय अभ्यंकर's picture

5 Feb 2008 - 11:27 pm | संजय अभ्यंकर

वाह! क्या बात हैं!

मुंबईत थंडी चिकार पडलीय. आणी त्यात ही दाल, अगदी दिल्लीतल्या नाहीतर पंजाबातल्या एखाद्या ढाब्यावर बसलो आहे आणी ह्या डाळीबरोबर चुपडी रोटी (तुपात लडबडलेली तंदुरी रोटी) खातोय असा भास होतोय. तोंडी लावायला हिरव्या मिरच्या आणि चाट मसाला पेरलेले सॅलेड.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

5 Feb 2008 - 11:34 pm | विसोबा खेचर

प्राजू, तुझी पाककृती सहीच वाटते आहे!
जरा निवांतपणे एखाद्या रविवारी करून पाहिली पाहिजे...!

खास तात्या आणि स्वातीच्या आग्रहासाठी...

थँक्यू मॅडम!

आपला,
(आभारी) तात्या.

वरदा's picture

6 Feb 2008 - 12:44 am | वरदा

माझा नवरा बरेच वर्ष दिल्लीत होता त्याला ही रेसिपि दाखवल्यावर ह्या विकेन्ड्ला झालीच पाहीजे म्हणुन सांगितलय्..आणि प्राजुला थँक्स पण्....मी कधीच नाहि खाल्ली पण खमंग दिसतेय्...आता करुन झाली की सांगते...बरं आहे तुम्ही माझा विकेन्ड्ला काय करायचं हा प्रश्न सोडवता गं प्राजु आणि स्वाती...अशाच टाकत रहा खमंग रेसिपिज...

प्राजु's picture

6 Feb 2008 - 12:45 am | प्राजु

अगं आमचाहि प्रश्न सोडव गं तू ही.. :))

- प्राजु

वरदा's picture

6 Feb 2008 - 12:51 am | वरदा

ह्म्म प्रयत्न करीन....आठवून ठेवेन थोड्याच दिवसात....