मराठी ऑडियोबुक्स, इ.

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
27 Jan 2017 - 7:42 am
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,

सध्या जमाना ऑडियो-विडियोज म्हणजे दृकश्राव्य माध्यमाचा असला तरी कथाकथनाला काही मरण आलेलं दिसत नाही. एखादी गोष्ट नुसती ऐकण्यातही एक वेगळी मजा आहे. वपु-पुलं यांनी केलेलं कथाकथन आपण अजूनही ऐकत असतोच. पॉडकास्ट हा प्रकार बराच गाजतोय पण मला माहित नाही नक्की काय असतं ते, म्हणजे रेडियो कार्यक्रमासारखं की आणखी काही....

मराठीत लघुकथा, दिर्घकथा, कादंबरी, मालिका यांचे दर्जेदार असे ऑडियो कुठे मिळतील, आपल्यापैकी कोणी ऐकले आहे काय? मराठीत असा कोणी प्रयोग करत आहे काय?

दुसरं असं सहज मनात आलं की, एक पोल (निवडचाचणी) घेऊया. तुम्हाला व्यक्तिशः तीन पद्धतीपैकी कोणती पद्धत आवडते? म्हणजे जव्हेरगंज यांची एखादी जबरदस्त कथा आहे, ती इथे लिहून प्रकाशित केली आहे, कोणीतरी आवाजात रेकॉर्ड करुन प्रकाशित केली आहे, तर कोणी त्याच्या कथाकथनाच्या सादरीकरणाचा विडियो बनवलाय तर तुमची प्राथमिकता कोणत्या माध्यमाला असेल?

आपल्या मिसळपावच्या कथांचेही ऑडिओ मध्ये रुपांतर करण्याचे बहुतेक एक-दोन चांगले प्रयत्न झाले आहेत. त्याबद्दल काही पुढे करता येईल काय?

धन्यवाद!

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

27 Jan 2017 - 9:23 am | सामान्य वाचक

ऑडिओ ला

उत्तम कल्पना आहे. आमच्या एका पुस्तकवाल्यांच्या ग्रुपवर सध्या हीच चर्चा सुरू आहे.

तुम्हाला व्यक्तिशः तीन पद्धतीपैकी कोणती पद्धत आवडते?
१) लिहून प्रकाशित केली आहे,
२) कोणीतरी आवाजात रेकॉर्ड करुन प्रकाशित केली आहे,
३) कथाकथनाच्या सादरीकरणाचा विडियो बनवलाय

कथाकथनाच्या सादरीकरणाचा व्हिडीओ करणे किचकट आणि व्यापाचे काम असेल असे वाटते. तुलनेने ऑडिओ / अभिवाचन सोपे असेल. त्यामुळे, व्हिडीओ कितीही आवडणार असला तरी सद्यस्थितीत ऑडिओच आवडेल.

अभिवाचनाला मदत लागणार असली तर सांगा हो.

प्रदीप's picture

27 Jan 2017 - 10:51 am | प्रदीप

आयडिया चांगली आहे. दोन मुद्दे लक्षात घ्यावेतः

पहिला आणि अतिशय महत्वाचा कॉपीराईटचा. दुसरा, मिडीयम ऑफ डिस्ट्रिब्युशनचा. फाईल वगैरे डाऊनलोड करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आजकाल बहुतांश लोक स्ट्रीमींग करून ऐकणे जास्त पसंत करतील असे वाटते. इथेही कॉपीराईटचा मुद्दा आहेच, अर्थात.

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jan 2017 - 12:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

छान कल्पना! कुठल्यावेळी ऐकतोय त्यावर कुठली पद्धत ते ठरत असलं तरी पडल्यावर डोळे बंद करून ऑडिओ कथाकथन ऐकणे म्हणजे व्वा! गेली कित्येक वर्षे सहजासहजी झोप येत नसेल तर झोपण्याचा नाद सोडून, सरळ पु. ल., व. पु., शंकर पाटील, द. मा. यांचे कथाकथन ऐकतो.

गीता उपासनी यांनी इथे बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे वाचन केले आहे ते अपलोड केले आहे. २०१६ मध्ये त्या व्हॉट्सअ‍ॅपवर दररोज एक भाग पाठवत असत. त्यांनी या सगळ्या ऑडीओ फाईल्स गुगल ड्राईव्ह वर इथे अपलोडही केल्या आहेत. ३ फेब्रुवारीपासून त्या सावरकरांचे साहित्य असेच व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविणार आहेत. सुरवात होणार आहे मोपल्यांचे बंड पासून.

त्यांच्या या उपक्रमाला बाबासाहेब पुरंदर्‍यांनी स्वतः आशीवार्द दिला आहे या अर्थाचे बाबासाहेबांनी लिहिलेले पत्र त्यांनी फेसबुकवर शेअर केले होते. बहुदा राजा शिवछत्रपती पुस्तकालाही ५० वर्षे होऊन गेली आहेत. त्यामुळे प्रताधिकार भंगाचा प्रश्न उद्भवू नये. आणि त्यातच स्वतः लेखकाने त्याला परवानगी दिली असेल तर काहीच प्रश्न नाही. सावरकरांचे साहित्य तर नक्कीच ५० वर्षांपेक्षा जुने आहे.

संदीप डांगे's picture

27 Jan 2017 - 12:42 pm | संदीप डांगे

दुव्यांसहित माहितीसाठी खूप खूप धन्यवाद!

फेदरवेट साहेब's picture

27 Jan 2017 - 3:30 pm | फेदरवेट साहेब

लिहून, मोबाईल/लॅपटॉपवर लिहलेला मराठी फॉन्ट अतिशय सुरेख् वाटतो डोळ्यांना.

मला वाचायला आणि उत्तम आवाजात आणि स्टाईलमध्ये अभिवाचन केलेले साहीत्य वाचायला आवडते. डिजीटल दिवाळीच्या २०१५ च्या अंकासाठी जितेंद्र जोशीने दि. बा. मोकाशींची आता आमोद सुनासी आले ही कथा वाचली होती. अत्यंत सुरेख, भावगर्भ, चोख वाचन. कथेचा गाभा श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकणारा कलाकार असेल तर ऐकण्याने कथेची उंची वाढू शकते, अन्यथा निव्वळ निबंध वाचल्यासारखे वाचलेली कथा रसभंग करते. पु.ल., व.पु., शंकर पाटील ही तीनही नावे या संदर्भात आदर्श ठरावी. शिवाय साहीत्याच्या माध्यमांतराबद्दल(जसे सिनेमा, नाटक, मालिका) काही लोकांची जी तक्रार असते की, दुसर्‍याने केलेले व्हिज्युवलायझेशन आयते पहायला मिळाल्याने तितकी मजा मिळत नाही, त्याचेही निराकरण अभिवाचन नाने होऊ शकेलसे वाटते.

*मला वाचायला आणि उत्तम आवाजात आणि स्टाईलमध्ये अभिवाचन केलेले साहीत्य ऐकायला आवडते.

आदूबाळ's picture

27 Jan 2017 - 5:09 pm | आदूबाळ

लिहून. सवालच नाय.

- लिहिलेलं वाचताना वाचकाची त्यात 'गुंतवणूक' होत असते. चांगलं लेखन वाचत असताना देहभान हरपतं - आपण कुठे आहोत, भूक लागली आहे का, मोबाईल कोकलतोय का - काहीही लक्षात येत नाही. तेवढी गुंतवणूक ऐकताना होत नाही.

- डोळे हे लक्ष विचलित करणारं मोठं हत्यार आहे. वाचताना डोळे लेखनावर खिळून राहतात. त्यामुळे लक्ष इकडेतिकडे भरकटत नाही. (इतर संवेदनांचं 'विचलन मूल्य' कमी असतं.) ऐकताना डोळे मोकळे असतात - त्यामुळे विचलित होण्याची शक्यता जास्त असते.

- पुस्तकात काही पूर्वीचे संदर्भ बघण्यासाठी मागे जाता येतं. काही विचार करण्यासाठी मध्येच पुस्तक मिटून ठेवता येतं. ते ऑडियोबुक्सच्या बाबत जमत नाही. शंभर वेळेला पॉज-बॅक-फॉर्वर्ड-रिझ्यूम कोण करणार?

- लेखन हे लेखनस्वरूपात होतं, तेव्हा ते बर्‍याचदा वाचण्यासाठी बनवलेलं असतं. ते 'ऐकून' एवढं परिणामकारक वाटत नाही. उदा० खानोलकरांच्या कोंडुरा कादंबरीची सुरुवात पहा. वाचणं हा कमाल अनुभव होता. ऐकणं तितका कमाल असेल का याबद्दल शंका आहे.

- वरच्याच मुद्द्याला जोडून: आपण वाचतो तेव्हा लेखक --> पुस्तक --> वाचक अशी साखळी आहे. ऑडियोबुक ऐकताना लेखक --> पुस्तक --> ऑडियोबुक --> श्रोता अशी आहे. म्हणजे लेखकाला जे सांगायचंय ते आपल्यापर्यंत पोचवणारी साखळी ३३% मोठी झाली. यात मग ऑडियो खराब असू शकतो, पार्श्वसंगीत / ऑडियो इफेक्ट डोक्यात जाऊ शकतात, वाचणार्‍याला वाचिक अभिनय जमत नाही, किंवा अगदी साधं म्हणजे 'याचा आवाज मला आवडत नाही' (उदा० राजा शिवछत्रपती शक्ती कपूरच्या आवाजात कल्पून बघा.) There are 33% more things which can go wrong. ही रिक्स घ्यायची इच्छा मला सहसा नसते.

तुषार काळभोर's picture

28 Jan 2017 - 1:44 pm | तुषार काळभोर

तुमचा प्रतिसाद चोप्य-पस्ते!

यशोधरा's picture

29 Jan 2017 - 11:45 am | यशोधरा

माझ्याकडूनही चोप्य पस्ते. पुस्तक वाचनेकूच मंगता.

फेदरवेट साहेब's picture

28 Jan 2017 - 1:59 pm | फेदरवेट साहेब

ऑडियो खराब असू शकतो, पार्श्वसंगीत / ऑडियो इफेक्ट डोक्यात जाऊ शकतात

मी मागे अलेक्झेंडर ड्युमाची 'काऊंट ऑफ मॉंटेक्रिस्तो' ऑडिओ बुक उतरवली होती. त्यात सुरुवातीलाच वातावरण निर्मितीने डोके उठवले.(एडमंड डांटे बोटीतून सफर करून खाली उतरतो बंदरात तेव्हाचा सीन, त्यात बंदर म्हणून लाटांचा अन सीगल्सचा आवाज इतका जॅमपॅक भरला होता की मेन डांटेचा आवाजच गायब होत होता)

तेव्हापासून आजतागायत परत ऑडिओबुक्सना नो नाय नेव्हरच म्हणत आलोय.

निशाचर's picture

29 Jan 2017 - 4:06 am | निशाचर

शब्दाशब्दाशी सहमत!

संजय क्षीरसागर's picture

30 Jan 2017 - 10:52 am | संजय क्षीरसागर

विडिओचा प्रश्नच नाही . ऑडिओ डोळे बंद करुन ऐकला तरच डायवर्शनची शक्यता कमी. शिवाय त्यात हवं तसं हवं, तेव्हा वाचता येत नाही. सो ऑडिओ बुक झीरो मार्क्स.

संग्राह्य आणि आयुष्य बदलू शकेल असं वाचायला प्रिंट मेडिआ बेस्ट आणि टिपी वाचायला (उदा. मराठी संकेतस्थळं) डिजिटल प्रिंट मोस्ट कनविनीयंट.

संजय क्षीरसागर's picture

30 Jan 2017 - 10:55 am | संजय क्षीरसागर

विडिओचा प्रश्नच नाही . ऑडिओ डोळे बंद करुन ऐकला तरच डायवर्शनची शक्यता कमी. शिवाय त्यात हवं तसं हवं, तेव्हा वाचता येत नाही. सो ऑडिओ बुक झीरो मार्क्स.

संग्राह्य आणि आयुष्य बदलू शकेल असं वाचायला प्रिंट मेडिआ बेस्ट आणि टिपी वाचायला (उदा. मराठी संकेतस्थळं) डिजिटल प्रिंट मोस्ट कनविनीयंट.

रातराणी's picture

28 Jan 2017 - 1:05 am | रातराणी

लिहलेलं वाचायला पहिलं प्राधान्य. दुसरं अभिवाचनाला. विडीयोला सगळ्यात शेवटची.

आनंदयात्री's picture

28 Jan 2017 - 1:35 am | आनंदयात्री

हा धागा पहिल्या बरोबर बोलती पुस्तकं या प्रकल्पाची आठवण झाली. आता जाऊन बघितले तर मागच्या काही वर्षात विशेष काही प्रगती दिसत नाही.

पराग देशमुख's picture

28 Jan 2017 - 11:07 am | पराग देशमुख

सावर्कारंवर प्रीती असेल तर इथे त्यंची भाषणे ऐकावयास मिळतील. वाचक आणि प्रेक्षक यांनाही पुरेसे खाद्य आसपास उपलब्ध आहे मोफत
http://www.savarkar.org/en/ऑडिओ

पद्मावति's picture

29 Jan 2017 - 12:33 am | पद्मावति

वाचायला पहिली पसंती माझी. पण ऑडियो सुध्धा आवडतो आवाज स्पष्ट असेल आणि बॅकग्राउंड म्यूज़िक नसेल तर.

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 1:01 am | संदीप डांगे

अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय धाग्याला, सर्वांचे आभार!

आबासाहेबांशी कचकून सहमत, काय लिहिलंय, कोणी लिहिलंय, कोणी वाचलंय हा सर्व गोष्टीचे एकमेकांशी संधान नीट साधले नाही की बिघडलं!
-------
मिपाकर मित्रांनो,

आपण इकडेच एक काम करूयात का? मिपावरच्या ज्या कथा तुम्हाला अवडल्यात त्याचे तुमच्या आवाजात अभिवाचन करून टाकूया का? म्हणजे ज्याला वाटेल त्याने करून बघावे, मोबाईल मध्येही चांगले रेकॉर्डिंग होतं आजकाल.

पद्माक्का, ग्लोब थिएटर मध्ये तुमचा आवाज ऐकलाय, तेव्हा तुमच्याकडून एक कथा पाहिजेच! :-)

हौशी कारभार करून बघूयात! क्या बोलते तुम लोगा?

पहिली पसंता वाचनालाच.. वेळ मिळेत तसे चार ओळी किंवा चाळीस पाने एका बैठकीत वाचता येतात.

आधी जमत होते तेव्हा, कार चालवताना बोटावर मोजण्याइतकेच ऑडिओ बूक्स ऐकलेत. त्यातले "सेल्फ-हेल्प" टाइपचे बूक्स एका विशिष्ट डोक्यात जाणार्‍याच आवाजात का असायचे काही कळले नाही. "चीपर बाय द डझन" हे मात्र ऑडिओ बूक म्हणूनही खूप आवडले. Dana Ivey चे नॅरेशन मला तरी खूप आवडले होते. माझा अनुभव फार मर्यादित आहे पण याबाबतीत.

आता मुलांचा चिवचिवाट सतत चालू असतो, त्यामुळे ऑडिओ, व्हिडिओ जवळपास बंदच. पण मुलांसाठीच्या गाण्यांचे "बेअरफूट बूक्स"ने बनवलेले व्हिडिओज अगदी "आदर्श" म्हणावे असे आहेत. साधे अ‍ॅनिमेशन, बटबटीतपणा नाही, उगीच संगीताचा भडिमार नाही.. अगदी त्यांवर एखादा लेख लिहिता येईल इतके सुंदर व्हिडिओज असतात.

आदूबाळ यांच्या विचलित होण्याच्या मुद्द्याशी फार सहमत.

१) वाचणे
२) ऐकणे
३) बघणे

साधा मुलगा's picture

30 Jan 2017 - 7:01 pm | साधा मुलगा

" मोकलाया दाहि दिशा"
याचा ऑडिओ ऐकायला आवडेल,एकही काना, मात्रा,वेलांटी न चुकता! ;)

खी खी खी, अगदी अगदी. एखाद्या ललनेच्या मोहक आवाजात ऐकायला मजा येईल. कवी सुरेश्चन्द्रा जोशि आणि ललना या दोहोंचे ऑडिओ कंपेअर करायचे. =))

साहेब..'s picture

31 Jan 2017 - 12:05 pm | साहेब..

१) ऐकणे
२) वाचणे
३) बघणे

मला स्वतःला "अंतू बरवा" वाचून आवडलं त्याहीपेक्षा पुलंच्या आडिओमध्ये जास्त आवडलं.
अर्थात त्याचा अभिवाचनही पुलंनी तितकेच दर्जेदार केलं होतं. वाचताना मला तेव्हढं गुंगून जायला होत नाही.

पैसा's picture

31 Jan 2017 - 5:48 pm | पैसा

पुस्तक पुस्तक पुस्तक

ऑडिओ चांगले अभिवाचन असेल तर आवडेल. जसे की संदीपने मित्रहो यांच्या कथेचे केलेले अभिवाचन, किंवा जयंत कुलकर्णी यांच्या कथेचे अभिवाचन त्यानी मिपावर दिले होते ते.

व्हिडिओ हा एकूण टीव्ही चा भावबंद असल्याने फारसा आवडीचा प्रकार नाही. शिवाय त्याला चांगले नेटवर्क वगैरे हजार गोष्टी पाहिजेत.

अभिजीत अवलिया's picture

5 Feb 2017 - 5:09 pm | अभिजीत अवलिया

पहिला आणी एकमेव आवडता पर्याय म्हणजे लेखनाचाच. पुस्तके वाचताना जी मजा येते ती काही औरच.

फक्त आणि फक्त प्रिंट पुस्तके किंवा लिखित मजकूर. ई बुक पण नाही.
स्वतः ऑडिओ व्हिडीओ तयार करण्यातला अन क्षेत्रातला अनुभव असला तरी पर्सनल व्हिज्युलायझेशनसाठी लिखित मजकूरच लागतो.
ऐकण्याच्या बाबतीत थोडा तारे जमीपर असल्याने ऑडिओ समजत नाही. व्हिडीओ पाहताना लक्ष दुसर्‍याच गोष्टींवर (फ्रेम, कलर्स, कॅरेक्टर्स, स्टोरीबोर्ड) केंद्रीत होत असल्याने मेंदूला कनेक्टच होत नाही. अगदी टीव्ही पिक्चरमधले संवादही मला निम्मे समजत नाहीत.

पुस्तकाचे मात्र अगदी डोळ्यासमोर चित्र उभे करत थांबत , विचार करत , स्वत:शीच बोलत एखाद्या संहितेप्रमाणे मनसोक्त वाचतो.
तेच सगळ्यात जास्त आवडते.

चौकटराजा's picture

5 Feb 2017 - 8:58 pm | चौकटराजा

लोळत पडून वाचणे अर्थात मुद्रित मजकूर. त्यात बाजूला खारेदाणे, फुटाणे असे चरायला काही असेल तर अधिकच मजा. मग कथा धारपांची असो की शन्नाची.
त्यानंतर कथेचे नाट्यरूपांतर.
त्यानंतर श्रवण.

आदूबाळसाहेबांचा प्रतिसाद अगदी तंतोतंत पटला. सेम टु सेम मत.