अनुवादीत
लोक अकारण निमत्त विचारतील उदासीनतेचं
विचारतील कारण तुझ्या बेचैन होण्याचं
बोटं दाखवतील सोडलेल्या तुझ्या केसांकडे
दृष्टी लावून पहातील व्यतीत झालेल्या काळाकडे
पाहून कंकणाकडे काही करतील पोटात मळमळ
पाहून थरथरत्या हाताला करतील काही खळखळ
होऊन आततायी ताने देतील अनेक
बोलण्या बोलण्यात करतील माझा उल्लेख
नको होऊस प्रभावित त्यांच्या बोलण्यावर
समजून जातील पाहूनी छ्टा तुझ्या चेहर्यावर
नको विचारू प्रश्न त्यांना काही झाले तर
नको बोलूंस त्यांच्याकडे माझ्या विषयावर
दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
प्रतिक्रिया
24 Jan 2017 - 10:47 am | वेल्लाभट
काव्य कमी वाटलं. आणि ताने, बेचैन सारखे हिंदी शब्द खटकले.
24 Jan 2017 - 3:21 pm | एस.योगी
मूळ रचना "बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी" - 'काफिल अजहर अमरोहवी' साहेबांची नज्म आहे ही.
स्व. जगजीत साहेबांनी अजरामर केलीये.