आटा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
17 Oct 2016 - 6:50 am
गाभा: 

बहुतेक गृहिणी गहु विकत आणुन गिरणीत त्याचे दळण करुन पोळ्या करत असतात...
वाहिन्यावर आशिर्वाद आदी "आटा" च्या जाहिराती झळकत असतात..
आपल्या समुहावर कुणी तयार आटा पोळ्या साठी वापतात का?
असेल तर आपला अनुभव काय आहे???

..

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

17 Oct 2016 - 8:00 am | संदीप डांगे

गहू आणून दळून घेणे उत्तम, तसेच घरघंटी असल्यास पाच पाच दिवसाचे ताजे ताजे पीठ वापरणे अति उत्तम,

तयार पिठात कोणते गहू व किती दिवस जुने पीठ याची खात्री नसते,

खफवर घरघंटीचे तोटे बद्दल उडत उडत ऐकले, संबंधितांनी मार्गदर्शन करावे ही विनंती!

चौकटराजा's picture

17 Oct 2016 - 8:04 am | चौकटराजा

मला वाटले स्क्रू चा आटा या विषयी काही चर्चा आहे ! ')

बोका-ए-आझम's picture

17 Oct 2016 - 8:16 am | बोका-ए-आझम

मला वाटलं होतं जेवण, स्ट्राॅबेरी वगैरे सारखी एखादी रोम्यांटिक कथा असेल. तिचे आट्याने भरलेले हात, बाहेर पाऊस पडतोय, तो येतो आणि.... असं काहीतरी वाटलेलं. हे फारच गद्य आहे राव! छे! पूर्वीचे अकु राहिले नाहीत!

नाखु's picture

17 Oct 2016 - 8:43 am | नाखु

नाहीतर काय वाचकांचा अपेक्षाभंग !!

संदीप डांगे's picture

17 Oct 2016 - 8:29 am | संदीप डांगे

गव्हाच्या पोळ्या वरवर साधा वाटत असला तरी गहन प्रकार आहे, सवडीने टंकतो..

अजया's picture

17 Oct 2016 - 8:53 am | अजया

=)))
विकतच्या आट्याच्या पोळ्या गरम बर्या लागतात पण गार झालं की वातड होतात!

रायनची आई's picture

17 Oct 2016 - 3:20 pm | रायनची आई

आशिर्वाद आट्याच्या चपात्या छान होतात..गार झाल्या तरी मउ /नरम राहतात..याउलट पिल्सबरी व पतन्जली आट्याचा अनुभव चान्गला नाही..पतन्जली ची फक्त किम्मत कमी आहे बाकी क्वालिटी ठीक नाही वाटली.

आशीर्वाद व्होल व्हीट आटा वापरते. पोळ्या मऊ होतात. आशीर्वाद मल्टीग्रेन बद्दल अनुभव चांगला नाही. पिल्सबरी एकदाच वापरलंय, अनुभव आठवत नाही. पतंजली बाबांचा आटा कैच्या काई वाईट्ट आहे. गिरणीत गहू दळलेल्या पिठाशी कसलीच तुलना नाही, परंतु ऑफिस आणि कंटाळ यामुळे आयतं पीठच बेस्ट वाटतं .

विवेकपटाईत's picture

17 Oct 2016 - 8:42 pm | विवेकपटाईत

माझ्या घरी चक्की आहे, खास महाराष्ट्रातून आणली होती, २० वर्षांपूर्वी, (ब्रांडचे नाव देत नाही, उगाच जाहिरात होते). घरात गहू नसले (होते कधी कधी) पतंजली आटा वापरतो, अगदी घरच्या चक्की सारखा स्वाद येतो. शिवाय बाकी ब्रांडच्या आट्यामध्ये नमी प्रमाण जास्त असल्यामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असते.

संदीप डांगे's picture

17 Oct 2016 - 8:58 pm | संदीप डांगे

धन्यवाद, =))

प्रचेतस's picture

17 Oct 2016 - 9:15 pm | प्रचेतस

=))

'आपल्या समूहावर'? म्हणजे ही कायप्पावर टाकायची पोस्ट चुकून इथे टाकली आहे का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2016 - 9:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

आयला मी घाबरलो होतो राव, स्ट्रॉबेरी हे फळच काकांनी असे मांडले होते का बस्स! आता 'आटा' वाचून मला कणिक मळण्यात काका काय डोकं चालवतील ही धास्तीच होती, पण देवकृपेने ह्यावेळी वाचलो म्हणायला हवे!

गणामास्तर's picture

18 Oct 2016 - 10:43 am | गणामास्तर

हेचं म्हणतो बापु. मला तर कणिक मळणे आणि अकुकाकांच्या कल्पना यावरून 'मस्तराम' च आठवला होता =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2016 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

'आटा'करता केवढा तो आटा-पिटा ! ;) :)