ह्युमन क्लोनिंग

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in काथ्याकूट
16 Sep 2016 - 9:06 pm
गाभा: 

काही दिवसापूर्वी क्लोजर टू गॉड हा हॉलीवूडपट पाहिला . आणि मनात विचारशॄन्खला सुरू झाली ...
http://www.imdb.com/title/tt3457486/

क्लोनिंग मुळे कॅन्सर / अल्झायमर / एड्स सारख्या असंख्य रोगाना प्रतिबन्ध करता येवू शकेल. अधिक आयक्यू असणारी / सशक्त / रोगप्रतिबन्धक गुणधर्म जन्मजात असलेली बालके जन्मास घालता येवू शकेल . मानवी उत्क्रान्तीचा वेग अनेक पटीनी वाढून मानवी आयुर्मर्यादा देखील वाढवता येइल . असे अनेक क्रान्तिकारी बदल आणि फायदे मानवी जीवनास होतील ....याबाबत डोक्टर मिशियो काकू या अमेरिकन जापनीझ सायन्टिस्ट चे मत अवश्य ऐकण्यासारखे आहे. https://www.youtube.com/watch?v=6GooNhOIMY0 .

परंतु ह्यूमन क्लोनिंग / जीन्स डेव्हलपमेन्ट ट्रायल्स ला गेल्या अनेक वर्षे पाश्चिमात्य देशातून आणि विषेशतः कट्टर ख्रिश्चन आणि इस्लामिक समुदायांकडून प्रचंड विरोध होत आहे . आजतागायत या बिनडोक धर्मवाद्यांच्या दबावाला बळी पडून असो किंवा ह्यूमन क्लोनिंग कितपत नैतिक /अनैतिक आहे असल्या फुटकळ मुद्द्यात अडकून असो, ह्यूमन क्लोनिंगला आजतागायत कायद्याने मान्यता नाही...

कोणत्याही वैज्ञानिक शोधाचे फायदे तोटे असतातच ! पण अ‍ॅबॉर्शन ला सुद्धा आन्धळा विरोध बिनडोक विरोध करणार्या अशा बावळट धर्मसंस्था अन त्यांचे ऐकून कायदे राबवणार्या आयर्लन्ड सारख्या देशात सविता हलपनवार चे काय झाले ? हे सुज्ञ वाचक अजून विसरले नसतील अशी अपेक्षा ! यास्तव अशा बुरसटलेल्या बाण्डगुळाना त्वरित दूर सारून ह्यूमन क्लोनिंग खरोखरीच जर मानवजातीस उपयुक्त असेल तर त्वरित त्यास परवानगी देवून संशोधन खुले करावे , असे मला वाटते !

आपणास काय वाटते?

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

16 Sep 2016 - 9:16 pm | मंदार कात्रे

बहुशतकी धाग्याबद्दल शुभेच्छा!

मीदेखील आजच हा सिनेमा बघितला

अमोल मेंढे's picture

16 Sep 2016 - 10:03 pm | अमोल मेंढे

१ प्रतिसाद

सौन्दर्य's picture

16 Sep 2016 - 10:23 pm | सौन्दर्य

प्रत्येक तंत्रज्ञानाचे फायदे तोटे हे असतातच, त्यामुळे जर हे तंत्रज्ञान चांगल्या(जे अखंड मानवजातीच्या कल्याणाचाच विचार करतात) लोकांच्या हाती राहीलं तर उत्तम पण जर ते इतर लोकांच्या हाती लागून त्याचा दुरुपयोग झाला तर त्यातून फार मोठ्या समस्या उद्भवू शकतात.

रेवती's picture

16 Sep 2016 - 11:00 pm | रेवती

आपणास काय वाटते?
मला अजून तरी काही वाटत नाहीये.
माझी क्लोन असलेले नवर्‍यास समजले (की माझ्यासारखीच अजून एक बया या जगात आहे), तर तो सन्यास घेईल एवढे नक्की!

संजय पाटिल's picture

17 Sep 2016 - 5:22 pm | संजय पाटिल

=))

बोका-ए-आझम's picture

18 Sep 2016 - 12:54 pm | बोका-ए-आझम

पण तिच्याकडे तुमच्यासारखी विनोदबुद्धी असली तरच!
(रेवाक्कांच्या विनोदबुध्दीचा फ्यान) बोका-ए-आझम

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 Sep 2016 - 11:36 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

क्लोनिंगवर व मानवी आयुर्मर्यादा वाढवणार्या संशोधनावर बंदी हवी.याने अत्यंत जटील प्रश्न तयार होतील

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

18 Sep 2016 - 3:41 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

काहीच प्रश्न निर्माण होत नाहीयेत . शान्तताप्रिय समाजाचा अपवाद वगळता इतर समाजाची घटती प्रजोत्पादनक्षमता हे येणार्या काळात एक आव्हान ठरेल असे लोकसंख्यातज्ज्ञ सान्गतात . यास्तव मानवप्राण्याचे आयुर्मान वाढल्यास क्ष समाज वगळता इतरांची भाउगर्दी वाढण्याचा धोका नाहीये प्रुथ्वीतलावर !@

कवितानागेश's picture

17 Sep 2016 - 1:14 am | कवितानागेश

माणसांचे क्लोन बनवण्यापेक्षा रजनिकांतचे क्लोन्स बनवा! बहार येईल!:)

खटपट्या's picture

17 Sep 2016 - 2:10 am | खटपट्या

रजनिकांत माणूसच हाये ना...

तो क्लोन आहे, माणसे तयार करतो.

भिंगरी's picture

17 Sep 2016 - 4:31 pm | भिंगरी

+++१११

श्रीगुरुजी's picture

17 Sep 2016 - 1:09 pm | श्रीगुरुजी

झफी,

आजतगायत तुमचे अनेक क्लोन मिपावर येऊन धुमाकूळ घालून गेले आहेत (टफी, टॉफी, ग्रेटथिंकर, ग्रेटथिन्कर, नाने, माकु, काकें, सचीन, कुमठेकर ...). काही अजूनही जिवंत आहेत.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

17 Sep 2016 - 5:54 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

काय गुरुजी आज बरेच दिवसांनी दिसलात? येत चला .गोंदवल्याला जाउन आलात की नाही ,गोंदवले जवळचे फलटण हेच माझे गाव.आम्ही शिंगणापुर ,गोंदावले व सज्जनगड एकत्र करतो,तेही एका दिवसात बाईकवर.
जय जय रघुवीर समर्थ.

श्रीगुरुजी's picture

18 Sep 2016 - 2:55 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब,

गोंदवल्याला जायला आवडेल. पण त्यासाठी आपल्या दोघांसाठी जानव्याची व्यवस्था करा. मागे एकदा तुमच्या काकासाहेब केंजळे नावाच्या क्लोनने लिहिले होते की गोंदवल्याला सदरा, बनियन काढून जेवायला बसायला सांगतात कारण त्यांना तुम्ही जानवेधारी आहात की नाही बघायचे असते. गळ्यात जानवे नसेल तर उपाशी रहावे लागेल.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

18 Sep 2016 - 3:37 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

आदरणीय गुरुजी ,सादर प्रणाम
आपणास कळविण्यास अतिशय आनन्द वाटतो की झफि आणि टफि हे दोन ध्रुवावरचे प्रवासी असून त्यांचा एकमेकांशी काहीच सम्बन्ध नाही

महोदयांस विदित व्हावे
धन्यवाद

झेन's picture

17 Sep 2016 - 4:29 pm | झेन

जर आयडीचे डुआयडी फक्त काड्या सारण्यासाठी म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह वापरासाठी होतो तर माणसांचे क्लोन किती संहारक गोष्टींसाठी वापरले जातील हे फक्त डुआयडी नसलेले आयडीच समजू शकतील.

चौकटराजा's picture

17 Sep 2016 - 6:08 pm | चौकटराजा

माझ्या लहानपणचे काही आदरणीय गुरूजी, तरूण पणी आवडलेल्या काही बायका, मुली व आजचे सन्माननीय अभ्या चित्रगुप्त व डॉ म्हात्रे याम्चे क्लोन मला हवे आहेत. सबब हे संशोधन पुढे गेलेच पाहिजे !

नावातकायआहे's picture

17 Sep 2016 - 6:45 pm | नावातकायआहे

:-)) दंडवत....

गामा पैलवान's picture

17 Sep 2016 - 8:25 pm | गामा पैलवान

चौकटराजा,

हे काय वाचतोय मी ! ज्या तरुणपणीच्या तुम्हाला बाया, मुली आवडंत होत्या त्याच तुम्हाला वार्धक्यात अभ्या, चित्रगुप्त आणि म्हात्रेडॉक्टर आवडू लागले होय !! शांतम् पापम् !!!

आ.न.,
-गा.पै.

जव्हेरगंज's picture

17 Sep 2016 - 10:08 pm | जव्हेरगंज

c

चौकटराजा's picture

18 Sep 2016 - 8:04 am | चौकटराजा

यात मजबुरी ,पाप ? ह्या ! काय बी नाही...... वयाचा परिणाम ... वयाने गरजेचे स्वरूपही बदलते...... तरूणपणात नजरेने टिपावा नजारा..... म्हातारपणात बुद्धीवंताचा घ्यावा सहारा .. काय ....?

बुढ्ढा होगा उसका बाप!

अभ्या..'s picture

18 Sep 2016 - 6:04 pm | अभ्या..

अहो चौराकाका, अभ्या.. हाच क्लोन आहे. वरिजिनल पीस येगळाच आहे. ;)