ज्याना गवार आवड्त नाही त्याना सुधा आवड्लेल्या पुर्या
लहान मुलांसाठि खास आकार पण करता येतिल.
साहित्य:
गवार पाव किलो
आल लसुण पेस्ट १ चमचा
मिरच्या ३
कोथिंबीर १/२ वाटी
तिळ १ चमचा
मीठ चविनुसार
गव्हाचे पीठ २ते ३ वट्या
कृती :
गवार कुकर मध्ये शिजवुन घ्यावी .
मिक्सर मध्ये शिजवलेली गवार, आल लसुण पेस्ट्,मिरची,कोथिंबीर वाटुन घ्यावे
तयार मिश्रणात तिळ आणि मीठ घालावे
त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालुन घट्ट मळुन घ्यावे
नंतर त्याच्या पुर्या लटुन तळाव्यात.
कुठल्याही चटणी बरोबर खायला द्याव्यात :)
प्रतिक्रिया
13 Jan 2009 - 5:40 am | रेवती
फारच वेगळी पाकृ आहे. कधी ऐकली नव्हती, आता करून बघीन.
रेवती
13 Jan 2009 - 5:45 am | पगो
मला गवार आवडत नाही तरी मला गवारिच्या पुर्या आवडल्या फारच चांगल्या व वेगळ्या
13 Jan 2009 - 8:47 am | विसोबा खेचर
गवारीच्या पुर्या? नवीनच ऐकतो आहे हा आयटम! :)
13 Jan 2009 - 8:57 am | सहज
मस्त वाटतोय हा प्रकार!
13 Jan 2009 - 8:58 am | समिधा
नविन आहे पण खुप आवड्तो सगळ्याना.
माझ्या कडे खुप वेगवेगळ्या पाकृ. आहेत. नक्की देइन
नविन पाकृ.करणे माझा आवडता छंद आहे.
13 Jan 2009 - 9:03 am | विसोबा खेचर
माझ्या कडे खुप वेगवेगळ्या पाकृ. आहेत. नक्की देइन
वाट पाहतो मॅडम!
नविन पाकृ.करणे माझा आवडता छंद आहे.
अश्या मांणसांची आज समाजाला आणि मिपाला गरज आहे! :)
तात्या.
13 Jan 2009 - 9:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गवारीच्या पुर्या प्रकार नवीन वाटला, पण ट्रायल घ्यायला हरकत नाही ! :)
-दिलीप बिरुटे
13 Jan 2009 - 9:21 am | समिधा
मी मिपा वर नविन आहे .मझ्या पाकृ. ला इतका प्रतिसाद दिल्याबद्द्ल सगळ्याना धन्यवाद :)
13 Jan 2009 - 9:36 am | प्राजु
नाहीतरी मुलाला डब्यात देण्यासाठी मी स्वतः प्रयोग करून कंटाळलेच होते. आता दुसर्यांचे यशस्वी प्रयोग करून बघेन..
खूप आवडली ही वेगळी पाकृ.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Jan 2009 - 9:39 am | समिधा
मी हि मझ्या मुलीला ड्ब्यात देते .तुला ड्ब्यात देण्यासारख्या अजुन पाकृ.नक्की देइन
13 Jan 2009 - 9:47 am | प्राजु
मुलगा पालक पुर्या, तूप साखर पोळी, कोथिंबीर पुरी, बटाटाच्या स्टफिंग केलेली पुरी.. हे प्रकार खाऊन कंटाळला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jan 2009 - 10:07 pm | चकली
गवारीची वेगळी कृती दिल्याबद्द्ल धन्यवाद
चकली
http://chakali.blogspot.com
15 Jan 2009 - 10:19 pm | शितल
हटके पाककृती सांगितल्या बद्दल समिधा तुमचे धन्यवाद ! :)
करून पहायला पाहिजे. :)
16 Jan 2009 - 11:06 am | सोनम
आजपर्यत मी गवारीची भाजी खाल्ली होती.पण आज गवारीच्या पुर्या. चांगले आहे एकदा करुन बघते. :? :? :? :? :?

अजून येऊ द्या समिधाताई आम्ही वाट पाहत आहोत तुमच्या पाककृतीची.
27 Jan 2009 - 9:27 am | शारंगरव
मस्तच फोटो.