लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in काथ्याकूट
11 Jan 2016 - 12:41 pm
गाभा: 

21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे....

बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे.

सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.

बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.

संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.

पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात.

अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.

इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात.

उपाययोजना:

कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.

मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.

स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.

स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.

तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.

थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.

प्रतिक्रिया

हेमंत लाटकर's picture

13 Jan 2016 - 10:47 am | हेमंत लाटकर

लग्न करणे हे प्रत्येकाच्या मनात असते. कोणीही मुलगी लग्न न करता राहण्यास तयार होणार नाही. जबाबदार्या, नातेवाईकांचा त्रास ह्या गोष्टी आजोबाच्या पिढीत जास्त होत्या. आता कुटुंब मर्यादित आहेत. फक्त आई-वडिल. नवर्या मुलाला एकच बहिण किंवा भाऊ. नौकरी परगावी असली तर नवरा बायको दोघेच. नातेवाईकच कमी त्यामुळे हस्तक्षेप कमी, उलट मुलीच्या आई-वडीलांचा जास्त हस्तक्षेप असतो. मुले म्हणजे प्रेमाची फलश्रुती असते. थोडी तडजोड तर कुठेही करावी लागते नौकरीतही.

मोदक's picture

13 Jan 2016 - 11:09 am | मोदक

चला.. पुढच्या १५० प्रतिसादांची सोय झाली ;)

ह.घ्या हो.

लग्न करणे हे प्रत्येकाच्या मनात असते. कोणीही मुलगी लग्न न करता राहण्यास तयार होणार नाही.

किती मुली दाखवु तुम्हाला ?
कोणी सांगितल प्रत्येक जण तुम्ही म्हणता तसच पारंपारीक लग्न करुनच जीवन व्यतीत करण्याची स्वप्न पाहतो.?
तुम्हाला सिंगल राहणारी (वाढत चाललेली ) लोक माहीत नाहीत का ? अनेक मुल मुली सिंगल राहणं अगदी आनंदाने पसंत करतात आपल्या इथे सुद्धा अमेरीकेतच नाही.
काही सिंगल आपल्या मातृत्वाच्या आस च्या तृप्तीसाठी मुल मुली दत्तक घेतात. उदा. सुश्मिता सेन . लिव्ह इन मध्ये अनेक जण राहतात. कम्युनल लिव्हींग मध्ये असतात. समलैंगिक पॅटर्न मध्ये असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत.पण मी जगतो तीच प्रकृती बाकी सब विकृती असा विचार करणे हीच मोठी गडबड आहे.
असो मला १५ शी मतलब.

चैतन्य ईन्या's picture

13 Jan 2016 - 6:49 pm | चैतन्य ईन्या

जाऊ द्या हो. हे चालायचेच. परदेशात पण जुने वृद्ध लोक ह्या एकट्या किंवा सिंगल मदर्सला नावे ठेवतात. जरा खपली काढायचा अवकाश. पण हे लोक किमान ७५च्या पुढचे असतात. ६०-६५ चे म्हणतात आवडत नसेल तर वेळीच बाजूला झालेलं चांगला. आपल्याकडे पण हे होणार किंबहुना होताच आहे. आधी आपल्याच पद्धतीत त्रुटी आहेत हे मान्य नाहीये. उलट स्त्री जन्मला अर्थ नसतो, प्रत्येकाला लग्न हवेच असते वगैरे विचार ठासून भरलेले आहेत. ते आपले नैसर्गिक प्रेरणा आणि संस्कृति ह्यात घोळ घालतात. आदिवासी ह्या बाबतीत खूप पुढारलेले असतात. त्यांच्यात इतके जास्त बलत्कार वगैरे फारसे होत नाहीत. लोकसंख्या पण बर्याच प्रमाणात मर्यादित असते. पण त्यांना अडाणी ठरवून मोकळे झालेलो आहोत. पण मुदलात बाहेर नक्की काय चालले आहे हे माहिती नसल्याने होते. लोक १५ दिवसाच्या ट्रीप मध्ये पाहून अनुभव लिहितात आणि त्यावरून मत बनवितात. फार खोलात जात नाहीत. मुदलात तशी सवयच नसते.

शरदीनी यांच्या या मिसळ्पाववरील विख्यात कवितेचा विवेक ठाकुरांच्या "परी" साठी चा पहीला गृहपाठ.

इस्पिक राजा
आणि किल्वर राणीचा
सुकुमार धूम्रतरल सहवास

बाहेर झिम्मड पाऊस
नास्पतीची गळणारी पाने
अन् मोक्याच्या क्षणी
त्याची निरभ्र माघार

न सोसणारं कदाचित
अपेक्षांचं ओझं
पण का व्हावी नेहमीच
ही थुलथुलीत प्रतारणा?

हे नातंच असं पोकळ
रंग, गंध ना चव
जणू हिंग उडालेली
पोकळ बांधानी डबी

मग फेकून द्याव्या
सार्‍या सहवासखुणा
अन् घेतले दिलेले
मनातलेच अल्लड काहीबाही-----------

----------------------काहीबाही म्हणजे हेच---
-रुसवा फुगवा रुतला चावा
विस्मय गहिरा रूदन धावा
कुंजवनी त्या भग्न दुपारी
रुजून गेला मनात पावा------

वगैरे वगैरे बाष्कळ यमकांची करपट वेलबुट्टी
प्लस हे सारं व्यापून उरणारी त्याची पुनःपुन्हा माघार
अन् नासपतीच्या खोडाशी पडलेला
फाटका पण युद्धपिपासू इस्पिक राजा

०६ ऑगस्ट २००९, पुणे

यशोधरा's picture

13 Jan 2016 - 11:12 am | यशोधरा

बास की दळण आता!!

पिलीयन रायडर's picture

13 Jan 2016 - 11:27 am | पिलीयन रायडर

काय ठरलं मग?

ठरवा काहीतरी.. लग्नाळु लोकं लेख वाचत असतील तर त्यांना काही तरी ठोस उत्तर मिळायले हवे ना..
आम्ही काय.. लग्न करुन निवांत प्रतिक्रिया टाइपतोय... ह्या ह्या ह्या!!

अती झालं आणि हसूही येईना झालं.बास करा की.ज्यांना लग्न करायचे करु दे नाही करायचं नको करु दे ,लिव्हिनायचं त्यांना ते करु दे.पण असले धागे आवरा.

असंका's picture

13 Jan 2016 - 1:52 pm | असंका

यमगर्नीकर ? कुठे आहात?

मारवा's picture

13 Jan 2016 - 2:05 pm | मारवा

काही विशीष्ट धाग्याला किमान ५ प्रतिसाद दिले तर लॉटरी लागते.
१० प्रतिसाद दिलेत तर नगरसेवकापर्यतचे पद मिळते
१५ दिलेत तर जो मांगो वो मिलेगा.
ज्यांनी धागा दुर्लक्षित केला त्यांची लग्ने ठरली.
ज्यांनी धाग्याला नावे ठेवली त्यांची छत्री ऐन पावसाळ्यात फाटली.
ज्यांनी धाग्यावर टीका केली त्यांना एटीम नंबर विसरायला झाल.
ज्यांनी धागा तगवला त्यांच
असा एक मेसेज मला आला म्हणुन मी प्रतिसाद देतोय.
तुम्ही तुमचे १५ पुर्ण करुन आता आम्हाला असा आवरायचा सल्ला देताय
अस वागण बर नाही.

आदूबाळ's picture

13 Jan 2016 - 4:51 pm | आदूबाळ

लौल! बेकार हसतोय!

अजया's picture

13 Jan 2016 - 5:05 pm | अजया

=))))))rofl

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2016 - 10:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

असा व्यनि आला होता का !!!??? =)) =)) =))

अभिजीत अवलिया's picture

13 Jan 2016 - 2:24 pm | अभिजीत अवलिया

सदाहरित धागा. एवढ्यात ह्याचे दळण दळून होणार नाही. मिपावरच्या किमान ५-५० लोकांचे घटस्फोट झाल्याशिवाय बंद होणार नाही बहुतेक. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2016 - 2:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तसं नं होवो.

यशोधरा's picture

13 Jan 2016 - 5:20 pm | यशोधरा

असे कधीच न होवो.
अभिजित, शुभ बोल रे नार्‍या, तर म्हणे मांडवाक लागली आग!

ओमायगॉड!! लोकांचे घटस्फोट कशाला हवेत. असो.

प्रसाद१९७१'s picture

13 Jan 2016 - 5:06 pm | प्रसाद१९७१

विठाकाका आणि हेलाकाका ह्यांच्या साठी "अनहिता" सारखा वेगळा कोपराच मिपावर निर्माण केला पाहिजे.

त्यांचे महान विचार वाचुन माझ्या सारख्या काही वैचारीक दृष्ट्या कीड्यामुंग्यांचे जीणं जगणार्‍यांना आयुष्य वाया घालवले असे वाटुन अख्खा दिवस निराशेत जातो.

मारवा's picture

13 Jan 2016 - 6:05 pm | मारवा

ही जेन्युइन आत्मवंचना आहे का ?
वेगळा कोपरा ?
हे काय आणि नविनच ?

सई चा शिरा
पण काय मी अभागा बघा
मला हंटरवालीच सई माहीताय
तीत शिराबिरा कुछ नही म्हणत
सरळ ....
म्हणजे दोन सई आहेत
एक शिरा सई एक हंटरवाली सई

मयुरMK's picture

13 Jan 2016 - 7:06 pm | मयुरMK

चुकून दुसरा फोटो आला क्षमा असावी

चैतन्य ईन्या's picture

13 Jan 2016 - 7:28 pm | चैतन्य ईन्या

च्या मोदी रे मोदी च्यायला जिथे तिथे उपटतो बुवा!!! हे म्हणजे आलोकनाथच्या जोक सारखे झाले.

पैसाजी
मी खरचं विचारात पडलो मिसेस मोदी कोणाला ब्लेम करत असतील ?
एक वाक्य कुठल्याशा पुस्तकात वाचलेलं तो सिद्धार्थ बर्‍याच वर्षांनी परतला होता म्हणे एकदा घरी एकदाच
तेव्हा यशोधरा का ? मिसेस गौतम म्ह्णुया तर लेखिका विचारते तिला त्यावेळी बुद्धाविषयी काय काय वाटल असेल ?
राग करुणा संताप तक्रार कींव दया प्रेम कौतुक काय काय वाटल नसेल अस काहीतरी
आता अमुक अमुक पंतप्रधान सह- येतात म्हणजे एक जोडप येतं आपले यजमान एकटेच
कायम ते दोन हे एकटे दिसायलाही चमत्कारीक वाटत नाही?
ते विचारत नसतील का ? तुमच्या मिसेस नाही आल्या ?
काय उत्तर देत असतील नरेंद्र दामोदरदास मोदी
एखादी मि मिसेस मोदी बोलतेय स्वगत आल तर कळेल येइल दुसरी बाजु कधीतरी समोर
बाकी परीत्यक्ता हे स्टेटसपण नाही त्यांच धड

पैसा's picture

13 Jan 2016 - 7:56 pm | पैसा

दिव्याखालचा अंधार. निदान उघडपणे तरी त्या काही तक्रार करताना दिसत नाहीत किंवा काही मागण्या करतानाही दिसत नाहीत. लोकांना आवडणार्‍या प्रतिमेच्या भारतीय नारीप्रमाणे मोदी जिंकावेत म्हणून तीर्थयात्रा, उपास वगैरे करत होत्या हे वाचून कमालीचे आश्चर्य वाटले होते. पण माणूस हा प्राणी आपल्याला एका जन्मात कळणे अवघड आहे असे म्हणून बरेच विषय सोडून द्यावे लागतात.

मिसेस मोदी त्यांना केव्हाच सोडून गेल्यात म्हणे?

हेमंत लाटकर's picture

13 Jan 2016 - 9:40 pm | हेमंत लाटकर

येथील काही जण लग्नाचा लाडू (पोट भरून ढेकर देऊन) खाऊन म्हणतात लग्न करण्याची काय गरज आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2016 - 10:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खालचे विषय मिपावर कधी येणार

१. तेलाच्या पडत्या किंमतीमुळे भार्तीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम
२. ओबामा हे जगाचं नेतृत्व करायला सक्षम आहेत का?
३. आयोएस आणि अँड्रॉईडचे तरुणाईवर होणार दू दू दू परिणाम
४. मेट्रिक आणि इंपेरियल सिस्टिम्पैकी भारताला कोणती परिमाण पद्धत तारुन नेउ शकेल?
५. एक शुन्य शुन्य अर्थात आर्यभट्टाच्या आधी ९ नंतरच्या संख्या मोजायच्या शास्त्रीय पद्धती
६. चुकीच्या डाएटचे फर्टिलिटीवर होणारे परिणामः एक चिंतात्मक चिंतन
७. डुआयडी चे डुरगामी परिणाम
८. साड्या खरेदीला जाणं टाळण्यासाठीचे हमखास १०१ उपाय
९. नवर्‍यास साड्या खरेदीला नेण्याच्या १०२ युक्त्या
१०. नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी आणि नरेंद्र मोदी
११. चंद्रावर ७/१२ मिळवायचे ८ सोपे उपाय

अजुन ३०१ विषय तयार आहेत. हे लिहुन चावुन झाले की उरलेले लिहु. कसं?

बोका-ए-आझम's picture

24 Nov 2016 - 12:33 am | बोका-ए-आझम

हे वाचून डुर्रर्र झालं हो चिमणाजीपंत!

कवितानागेश's picture

14 Jan 2016 - 4:28 am | कवितानागेश

भयानक बोअर धागा!

वपाडाव's picture

14 Jan 2016 - 4:28 pm | वपाडाव

व्याख्या

मन्जिरि's picture

15 Jan 2016 - 5:24 pm | मन्जिरि

छान चालली आहे चर्रचा

मारवा's picture

15 Jan 2016 - 6:02 pm | मारवा

मन्जिरीजी तुमचा प्रतिसाद वाचुन क्षणभर मनात
चर्र........... झालं.
चर्र विझलेला कावळा आठवला.
अहो चराचराला व्यापुन टाकत असलेल्या चर्र चा मिपावर सुरु आहेत
जहॉ चार यार मिल जाए वही धागा हो गुजार झालय.
चबर चबर सोडुन आता कुठे चर्र चे ला तोंड फुटलय
खरे महत्वाचे गंभीर मुद्दे येत आहेत
आणि तुम्ही....

मला सगळेच विचार पट्तात. एक खर कि मिपावर खरच खुप चांगला विचार करणारि मंडळि आहेत. म्हण्जे खुप विचार
करणारि आहेत तसेच चांगला विचार करणारि पण आहेत. निकोप चर्चा झालि तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल. आपल्या
ज्ञानात भर पडेल. प्रोब्लेम ना मार्ग मिळेल.

कंजूस's picture

16 Jan 2016 - 5:59 am | कंजूस

लग्न टिकण्याचं खरं कारण सवापटीत आहे.दीडपट,दुप्पट,अडीचपट असल्यास तोल बिघडतो.
नवरा हुशार तर बायको सवाहुशार असावी.
नवरा तिरसट तर बायको सवातिरसट.
नवरा कंजूस तर बायको सवाकंजूस.
इकडचीच उदाहरणं बघा.

इरसाल's picture

16 Jan 2016 - 1:39 pm | इरसाल

काय दंगा लावलाय रे पोरंनो काका रागाव्तील हं अश्याने. वात्रट कुठचे !

हेमंत लाटकर's picture

16 Jan 2016 - 7:02 pm | हेमंत लाटकर

इरसाल, मी धागे दंगा करण्यासाठीच मिपावर टाकत असतो.

घरचं जेवण कितीही आरोग्यदायी वगैरे असलं तरी रोज खावून कंटाळा येणारच. कधी कोपर्‍यावरची भेळ, पाणीपूरी तर कधी हॉटेलातली पावभाजी, मिसळ खावीशी वाटणार व त्याचप्रमाणे हॉटेलची मिसळ रोज खाणे योग्य नाही हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही , ते समंजसपणे स्वीकारा (स्वतःबाबत तसेच जोडीदाराबाबत)...२४-२५ च्य वयात एखाद्या व्यक्तिबद्दल वाटलेले आकर्षण पुढे ३५-४० वर्ष टिकेलच असे नाही. जबाबदारीचे भान संस्कारांनी दिले आहे ,त्याकरिता कौटुंबिक, सामजिक, धार्मिक ई दबाव आहे. ते नाकारता येणार नाहीच. पण आकर्षण निसर्गाने निर्माण केलेले आहे त्यास पुर्णपणे नाकारुनही चालणार नाही. पराकोटीच्या एकनिष्ठतेच्या भंपक कल्पना बाळगण्यात अर्थ नाही. अगदी "ओपन रिलेशनशिप" चे टोक गाठावे असे मी म्हणणार नाही. पण जबाबदारीचे भान ठेवून निसर्गाने निर्माण केलेल्या उर्मींनाही थोडा वाव दिला तर जीवन आणि विवाहबंधन दोन्हीहि सुसह्य होईल.

बाकी लग्न न टिकण्याचे एक अत्यंत महत्वाच्या कारणाचा लेखात उल्लेख नाहीच.
१)लग्न करावे की नाही २) कधी करावे ३) कुणाशी करावे हे महत्वाचे निर्णयच अनेकदा मुला-मुलींच्या मर्जीविरुद्ध त्यांच्यावर लादलेले असतात.

कारण - ती आता एक मोठी इंडस्ट्री आहे. मंगलकार्यालय, केटरर, वेडिंग प्लॅनर, कपड्यांचे डिझायनर्स, भटजी, पार्लरवाले, मेंदीवाले, वधुवरांचं वजन उतरवून किंवा वाढवून देणारे जिमवाले, सत्यनारायण पूजा सांगणारे,डीजे, फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स, हाॅटेलवाले, ट्रॅव्हलवाले, एअरलाईन्स, रेल्वे, बुकिंग एजंट्स, काउन्सेलर्स, वकील, भांड्यांचे दुकानदार, लग्न जुळवणा-या शादी.काॅम टाईप वेबसाईट्स - एक भलीमोठी अर्थव्यवस्था त्याच्यावर अवलंबून आहे. लग्न टिकलं तर उत्तम, नाहीतर दुसरं करा. शेवटी लोकांना फक्त फुकट खाण्यातच रस असतो. बाकी काही नाही पण हा बाजाराचा रेटाच लोकांना लग्न करायला भाग पाडणार आहे. जसं आपलं बाकीचं आयुष्य बाआराने आणि मागणी-पुरवठ्याच्या अदृश्य हाताने नियंत्रित केलेलं आहे, तसंच लग्न या व्यवहाराचंही.

कारण - ती आता एक मोठी इंडस्ट्री आहे. मंगलकार्यालय, केटरर, वेडिंग प्लॅनर, कपड्यांचे डिझायनर्स, भटजी, पार्लरवाले, मेंदीवाले, वधुवरांचं वजन उतरवून किंवा वाढवून देणारे जिमवाले, सत्यनारायण पूजा सांगणारे,डीजे, फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स, हाॅटेलवाले, ट्रॅव्हलवाले, एअरलाईन्स, रेल्वे, बुकिंग एजंट्स, काउन्सेलर्स, वकील, भांड्यांचे दुकानदार, लग्न जुळवणा-या शादी.काॅम टाईप वेबसाईट्स - एक भलीमोठी अर्थव्यवस्था त्याच्यावर अवलंबून आहे. लग्न टिकलं तर उत्तम, नाहीतर दुसरं करा. शेवटी लोकांना फक्त फुकट खाण्यातच रस असतो. बाकी काही नाही पण हा बाजाराचा रेटाच लोकांना लग्न करायला भाग पाडणार आहे. जसं आपलं बाकीचं आयुष्य बाजाराने आणि मागणी-पुरवठ्याच्या अदृश्य हाताने नियंत्रित केलेलं आहे, तसंच लग्न या व्यवहाराचंही.

हेमंत लाटकर's picture

18 Jan 2016 - 8:59 pm | हेमंत लाटकर

अस काही नाही, लग्न कमी खर्चात घरच्या घरी सुद्धा करता येते.

राँर्बट's picture

18 Jan 2016 - 9:04 pm | राँर्बट

लग्न न टिकण्याची कारणे -

१. बायकोला शॉर्ट्स, लुंगी, बनियनवर फिरणारा नवरा आवडतो, पण नवर्‍याला स्वत:ची संस्कृती जपायची असल्याने तो फक्तं दुटांगी धोतर, वर सदरा आणि बंडी घालूनच फिरल्यामुळे वाद निर्माण होतात.

२. बायकोला मिनी स्कर्ट, शॉर्ट्स, जीन्स, वेगवेगळ्या कट्सचे ड्रेसेस घालायला आवडते, पण नवरा जहाल संस्कृतीरक्षक असल्याने तिने नऊवारीच नेसली पाहिजे असा त्याचा दंडक आहे, त्यामुळे निर्माण होणारे वाद.

आणखीन १७३९ कारणे आहेत, ती नंतर लिहीतो.

संदीप डांगे's picture

18 Jan 2016 - 9:27 pm | संदीप डांगे

हा धागा नक्की कशावर आहे.

काही प्रतिसादांवरून तर लग्नविधी-लग्नसंस्कार बद्दल असल्यासारखा वाटत आहे. लेखावरून तर तसे काही वाटत नाही.

असो.

फस्टऑफॉल, ते 'लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन, स्वर्गातल्या गाठी' छाप रोमांटीसिझम आपल्याला काय झेपत नाही. मला हे लग्न-समारंभ-सोहळे अजिबात पटत नाहीत, हे वैयक्तिक. पैसेवाल्यांनी जरूर खर्च करावा. चार गरिबांना चार दिवस काम-पैसा मिळतो. नातेवाईकांना एकमेकांचे उणेदुणे काढायची सामुहिक संधी मिळते, अजून बरेच काही. तेही असो. लग्नाचे जे लीडींग अ‍ॅक्टर्स आहेत त्यांच्यात दुसर्‍या दिवशी काडीमोड होईल की नाही याची लग्नात उपस्थित असलेला कुणीही खात्री देऊ शकत नाही म्हणून हे सोहळे पटत नाहीत. आडंबर है सब आडंबर!

असो.

आता लग्न न टिकण्याची कारणे. लाटकरांनी सांगितलेली पुरेशी आहेत. माझे हात शिवशिवतायत म्हणून मीही लिहितो.

आजकाल फार उशिरा लग्न होत आहेत. अगदी मुली २५-२६ च्या पुढे गेल्यावर. यात पुर्वीच्या मुलींच्या आणि आताच्या मुलींच्या एकूणच आसमंतात प्रचंड फरक आहे. पुर्वी कमी-शिक्षित, कमी-वयाची, खूप भावंडांपैकी एक अशा असलेल्या मुली खूप असायच्या. त्यामुळे सोशिकपणा, पड खायची वृत्ती, पदरी पडले गोड मानले टाईप स्वभाव असायचे. मुलांना लग्नबाजारात त्यामुळेच जास्त भाव असायचा. मुले कमावती, कर्ती, निर्णयाचा सामाजिक हक्क असणारी अशी होती. पुर्वीही हा व्यवहारच होता, आजही हा व्यवहारच आहे. लोक उगाच (प्रॅक्टीकलवाल्यांसोबत) इमोशनल होतात आणि फसतात.

आज मुलं-मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. वय वाढतं आहे. २५ वर्षापर्यंत येता येता समजुती-जाणिवा-सवयी-मान्यता घट्ट झालेल्या असतात. लाइफस्टाइल सेट झालेलं असतं, दुसर्‍याला अ‍ॅडजस्ट करणे म्हणजे काय हे आजकालच्या एकल-कुटुंबीय पद्धतीमुळे माहित नसतं.

जौदे, कंटाळा आला राव! तुम्ही हे सगळं आधीही कुठेतरी वाचलं असेल. तेच ते काय परत परत चघळायचं, त्यापेक्षा स्कॉर्पियो कुठे पोचली ते बघुया....

ज्यांना करायची त्यांनी करा लग्न, टिकवायची तर टिकवा, नसेल तर मोडा, परत करा. इमोसनल बाता मारू नका म्हंजे झालं...

ओ तुम्ही कुठल्याही धाग्यावर फिरकू नका बरं!
आपापल्या शिरियला खंप्लींट करा आधी! तिकडे जाता जान्हवीला बाळही झालं पण हिकडे काही शिरियली पूर्ण व्हायचं नाव घेईनात!

हा आत्ता कस बोललात !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jan 2016 - 9:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आंतरजालीय मुर्खपणामुळे.

जे काही लेखात आहे ते सर्व खरं आहे.

जे कोणी लग्न करणार आहेत त्यांनी हा लेख जरूर वाचावा आणि पालकांनी तर खरच वाचून तो अमलात आणावा मुलीचं असो कि मुलाचे.

लग्न करू नये असं नाही म्हणणार पण लेखात दिलेलं काही जरी चुकीचं वाटत असेल तर करू नये.

खूप त्रास होतो जेव्हा संसार मोडतो एक माफी मागतो आणि दुसरा ओळखत नाही दाखवून पाठ करून निघून जातो.

टवाळ कार्टा's picture

22 Nov 2016 - 11:33 pm | टवाळ कार्टा

नक्की किती जण संसार करत होते

सामान्य वाचक's picture

23 Nov 2016 - 3:51 pm | सामान्य वाचक

नाका तोंडात कॉफी गेली

एवढ्या शिरेश विषयावर इतका वाह्यात प्रतिसाद??
हरहर, कसे होणार नवीन पिढीचे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Nov 2016 - 6:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ख्या ख्या ख्या.

Hulk the devil's picture

23 Nov 2016 - 6:34 pm | Hulk the devil

संसार तस म्हणलं तर तुमच्या सारखे माहिती तंत्रद्य्नतील (मी पण त्यातलाच ) लोकांसाठी दोनच जणांचा पण आई नी केलेलया सौसंकर नुसार दोन कुटुंबाचा असतो.

सवय सोडा नको तिथे विनोद करण्याची....!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Nov 2016 - 6:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी सहमत. ह्या टक्याला ना नको तिथे विनोदनिर्मिती करायची सवय आहे.

"टवाळा आवडे विनोद".

प्रसाद गोडबोले's picture

23 Nov 2016 - 9:27 pm | प्रसाद गोडबोले

सौसंकर

हे सौसंकर म्हणजे नक्की काय हो =))))

आहो व्याकरण आणि शुद्ध लेखन चे गुरु मिपा वर कायदा बनवा कि चुकीचे शब्द चालणार नाही.

इथे शिवाजी महाराज , महात्मा फुले , लो. टिळक, सावरकर याचं बदल विचारलं तर तुमची तंतरेल चाले रोमन इम्पायर मध्ये बसून चुका काढायला

मी मराठी टायपिंग नाही शिकलो मान्य आहे खूप मोठा अपराध केला आहे मी आणि त्यापेक्षा मोठा अपराध केला कि इथे प्रतिसाद दिला.

तुम्ही सर्व विद्वान असताना असा तुच्छपणा केला. माफ करा दंड करता का आता?

मक्तेदारी आहे ना तुमच्याकडे जो विषय आहे त्यावर बोला ना.

प्रसाद गोडबोले's picture

24 Nov 2016 - 12:03 am | प्रसाद गोडबोले

सौसंकर म्हणजे अंतरजातीय विवाह केल्यावर सौ सोबत केला जाणारा संकर असे म्हणायचे होते का तुंह्ला ?

:))))

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2016 - 9:49 am | टवाळ कार्टा

इथे शिवाजी महाराज , महात्मा फुले , लो. टिळक, सावरकर याचं बदल विचारलं तर तुमची तंतरेल चाले रोमन इम्पायर मध्ये बसून चुका काढायला

तुम्ही या विषयातले तज्ञ आहात का? गेलाबाजार पीएचडी वगैरे....नई म्हणजे रोमन एम्परर त्याच्या फावल्या वेळात व्याकरणाच्या चुका काढायचा हि आम्हाला माहीत नसलेली उपयुक्त माहिती इथे फुकट देत आहात म्हणजे तुमचा अभ्यास जोरदार असणार =))

पीएचडी नकीच नाही माझ्या कडे आणि तुमच्या सारखा महान आणि विद्वान पण नाही मी.

चुकून मराठी भाषा आणि आपले लोक म्हणून मिपा वर आलो, माहित नव्हतं कि इथे शब्द महत्वाचे आहेत भावना नाही.

अभ्यास म्हणाला तर थोडा आहे नाही म्हंटलं तरी मराठी असल्याची खाज जात नाही डोक्यातून म्हणून.

सौसंकर >> हे चुकून झाले पण अद्दल घडली आयुष्यभराची कि मत मांडू नये तुमच्या "मार्कस ऑरेलियस" आणि "टवाळ कार्टा " जिथे असतील तिथे, आणि हो जे पहिले मांडलं होते ते माझ्या आयुष्यावरून होते.

चला हा इथला शेवटचा प्रतिसाद नंतर परत चूक नाही करणार. "मार्कस ऑरेलियस" आणि "टवाळ कार्टा " तुमच्या सारखे लोक समाजात आहे म्हणजे खूप प्रगती होणार मराठी भाषा शिकनार्यांची आणि ज्यांना आवड आहे त्यांची.

http://marathi.changathi.com/ >> मराठी टायपिंग ज्यांना येत नाही त्यांनी हे वापरावे

"टवाळ कार्टा " जाम घाबरलो मी तुम्हाला IT वाले ना तुम्ही...

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2016 - 8:58 pm | टवाळ कार्टा

=))
श्या, इतक्या लवकर कोणी डाव सोसून जाते का? ते अण्णा बघा ट्रक किती पळवत होते =))

सामान्य वाचक's picture

25 Nov 2016 - 9:45 am | सामान्य वाचक

असे वाटत नाही का?
असे राहणार असाल तर मिपा च नाही, एकूणच आंतरजाल तुमच्या साठी नाही

मिपा वाचले तर तुम्हाला कळेल कि चांगल्या लेखकाना कायम च प्रोत्साहन मिळते

छोट्या गोष्टींचा बाऊ केले तर काही खरे नाही

बोका-ए-आझम's picture

23 Nov 2016 - 6:13 pm | बोका-ए-आझम

एक शंका: पण हल्क तर चांगला असतो ना?

Hulk the devil's picture

23 Nov 2016 - 6:40 pm | Hulk the devil

Hulk चांगला असो कि वाईट तो विनाशच करतो.....!!!

jp_pankaj's picture

23 Nov 2016 - 6:50 pm | jp_pankaj

HULK ...SMASH ..IT.

jp_pankaj's picture

23 Nov 2016 - 4:23 pm | jp_pankaj

लट्टुकाकांना "कारणे दाखवा" नोटुस देण्यात येत आहे.

अभिजीत अवलिया's picture

23 Nov 2016 - 4:39 pm | अभिजीत अवलिया

मिपावर 'लग्न' ह्या विषयाशी संबंधित धाग्यांसाठी एक अजून सेक्शन लवकरात लवकर करावा अशी आग्रहाची मागणी.

सामान्य वाचक's picture

24 Nov 2016 - 11:05 am | सामान्य वाचक

मधेच झोप लागली होती
आत्ताच जाग आली
कशी काय चालली आहे चर्चा?

अजून निर्णय झालाच नाही !!!!! :))