माणसांच्या जातीत माणसं आहेत थोडीच ,उरलेली सर्व आहेत न उलाघाडणारी कोडीच
माणसाने कसं माणसासारख वागावं , चोऱ्या मार्या कराव्यात आणि दुसऱ्याला नागवाव
माणसांच्या वस्तीत माणूसच नसतो , चुकून जर भेटलाच तर आपणच टाळत असतो
माणसाला नेहमीच अनंताची गोडी , मिळवण्यासारखे अनंत असतं पण वेळ असते थोडी
एकटा असताना माणूस केविलवाणा होतो ,आणि माणसांच्या गर्दीत तो माणूस घाणा होतो .
माणसाचे माणसाशी नातं तसं एकाच असतं ,एकमेकां वाचून त्यांचे काहीच चालत नसतं
माणसाचे स्वताःच असं एक तत्वज्ञान असतं , बोलायचं एक नी करायचं दुसरंच असतं
माणूस हा तसा खूप विचारी असतो , अविचार करतांना ही तो विचार करतोच
माणूस हा अल्पसमाधानी आहे . दुसऱ्या कडे काय नाही , यातच त्याचे समाधान आहे .
माणूस तसा कशातही रमतो , स्वताः ची कीव करण्यातच आयुष्य जगतो
माणसाची जात तशी खूप भित्री असते , स्वताःतल्या दोषांची त्यांना पुरेपूर खात्री असते
माणसाला नेहमी विध्वंसाची ओढ असते , जुळवलेल्या गोष्टी मोडण्याची खोड असते
स्वताःची प्रतिमा उजळवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो ,कारण आरश्यातल्या प्रतिमेवर त्याचा अजिबात विश्वास नसतो .
कधी कधी मात्र माणूस अगदी वेड्यासारखा वागतो ,सोडून स्वार्थ स्वताःचा दुसऱ्या साठी धावतो
मीही एक माणूस आहे , माणसां सारखाच वागतो ,वर दिलेल्या सर्व खुबी मी ही पाळतो
प्रतिक्रिया
29 Dec 2015 - 5:44 pm | मयुरMK
छान लेख लिहिलाय :)
29 Dec 2015 - 6:58 pm | विश्वव्यापी
मयुर जी,
तुम्हाला लेख आवडल्याचे वाचुन आनंद झाला.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल खुप आभारी आहे.
विश्वव्यापी
29 Dec 2015 - 7:12 pm | मयुरMK
''जी''
मी लहान आहे तुमच्यापेक्षा मयुर अस एकेरी नावान संबोधल तरी चालेल :)