शेफिल्ड खाद्यसोहळा

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:19 pm

शेफिल्ड ही जरी "स्टील सिटी" म्हणून किंवा इथे असलेल्या "युनीव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड" आणि "शेफिल्ड हलाम युनीव्हर्सिटी" अशा दोन प्रसिद्ध विद्यापिठांमुळे किंवा "शेफिल्ड युनायटेड" आणि "शेफिल्ड Wednesday" मुळे किंवा "मिडॉहॉल", "पीक डिस्ट्रिक्ट", "ट्राम्स" मुळे ओळखले जाणारे शहर असले तरी शेफिल्डर्स हे तितकेच अस्सल खवैय्ये आहेत आणि त्यांची खवैय्येगिरी, अन्नपदार्थांचा मनापासून आस्वाद घेणं हे इथे भरण्यार्‍या खाद्यसोहळा, फार्मर्स मार्केट, ख्रिस्मस मार्केट मधे चांगलेच दिसून येते :)

ह्या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या लाँग वीकांताला "शेफिल्ड फुड फेस्टिवल" चे आयोजन केले गेले. शेफिल्ड फूड फेस्टिवलचे हे पाचवे वर्ष आहे आणि यंदा हे सप्टेंबरऐवजी मे महिन्यात करायचे असे इथल्या कौंसिलने ठरवले. सलग तीन दिवस होणारा हा खाद्य सोहळा सगळ्या खवैय्येंसाठी मेजवानीच ठरणार होती. देशो-देशीच्या पदर्थांचे स्टॉल्स, स्थानिक नामांकित फुड जॉईंट्सचे स्टॉल्स, फार्मर्स-फ्रुट-व्हेज स्टॉल, आर्टिसन स्टॉल्स, बीयर-मेकिंग स्टॉल्स, लहान मुलांसाठी कुकिंग इव्हेंट शिवाय त्यांच्यासाठी एक फार्मयार्ड तयार केले होते आणि बर्‍याच अॅक्टिव्हीटीज ठेवल्या होत्या. शेफिल्डचे बेस्ट शेफ्स आणि बीबीसी रेडियो फ्रेझेंटर्स सोबत कुकिंग डेमोंस्ट्रेशन्स होणार होते. फुड फेस्टला येणार्‍या प्रत्येकाला पदार्थांचा आस्वाद घेता येणार होता, खरेदी करता येणार होती. शेफिल्ड पीस गार्डन, विंटर गार्डन - मिलेनियम गॅलरी अशा ठिकाणी विविध स्टॉल्स उभे केले होते. अगदी दोन महिन्यापासुन ह्या सोहळ्याची सोशल नेटवर्क साईट्सवर जोरदार जाहिरात सुरु होती आणि ह्याही वर्षी आपण ह्या फुड फेस्टला जायचे असे पक्के ठरवले होते. तीन दिवसातले दोन दिवस जायला जमणार होते त्यामुळे आम्ही खुष होतो. २३ मे च्या सकाळी ११ पासून फेस्टिवल सुरु होणार होता, विविध स्टॉल मालकांचे ट्विट्स, स्टेटस अपडेट्स येत होते मग काय भरभर आवरून आमची स्वारी निघाली फुड फेस्टला :)

.

* छायाचित्र आंजावरुन साभार

पहिला स्टॉल लागला यॉर्कशायर रेपसीड ऑईल चा. ह्या ब्रँडला "होम ऑफ अवॉर्ड व्हिनिंग ऑईल्स" म्हटले जाते. रेपसीड तेल आणि विविध फ्लेवर्स घालून सॅलॅड ड्रेसींगसाठी तेल बनवले जाते. चिली, लेमन, डिजॉन-ब्लॅक पेपर, ओक स्मोक्ड, एक्सट्रा व्हर्जिन रेपसीड ऑईल, कोल्ड प्रेस्ड ऑईल असे प्रकार उपल्ब्ध आहेत.

.

तिथून पुढे गेलो तर केकलिशियसचा स्टॉल लागला. केकलिशियस शेफिल्डमध्ये पोर्तुगीज कस्टर्डसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारचे केक, पेस्ट्री आणि पोर्तुगीज कस्टर्ड मिळते, सर्व पदार्थ रोज ताजे बनवले जातात.

.

हा स्टॉल आहे पायटॅस्टिक - केविन्स पाय म्हणून . इथे सगळे हँडमेड टार्ट्स, पाय, पेस्टीज, रोल्स, quiches असे मिळते. ह्यांचे फ्रीजर पॅक पाईज सुद्धा बाजारात उपल्ब्ध आहेत.

.

पुढचा स्टॉल हा जस्ट प्रीझर्व्ह्स चा होता. इथे विविध प्रकाराचे जॅम्स, चटण्या, मार्मलेड मिळतं. हे प्रीझर्व्ह्स मेड इन शेफिल्ड आहेत. चिली जॅम, प्लम अँड डेट चटणी, टोमॅटो-चिली पिकल, लेमन कर्ड, ऑरेंज अँड ब्रँडी मार्मलेड, स्पाईस्ड अॅपल चटणी आणि बरेच प्रकार विक्रीसाठी ठेवले होते.

.

हा स्टॉल आहे व्ही लव्ह ब्राऊनीज चा. शेफिल्डस्थित हीथरने स्वतःच्या ब्राऊनीज बनवण्याच्या आवडीला व्यवसायत बदलायचे ठरवले आणि २०१३ पासून तिने शेफिल्डच्या अनेक फार्मर्स मार्केट, फेयर्समध्ये स्वतःचे स्टॉल लावले. ती स्वतः ह्या ब्राऊनीज घरी बेक करते , ह्या घरगुती ब्राऊनीजची चव अप्रतिम आहे. डबल चॉकलेट, चॉकलेट चीझकेक, ब्लाँडी, लेमन चीझकेक, पीनट-बटर स्व्हर्ल अशा विविध प्रकारच्या ब्राऊनीज विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

.

व्ही लव्ह ब्राऊनीजच्या शेजारी मिस अडुस किचन होतं, येथे अनेक प्रकारचे ग्लुटन फ्री फ्रेश क्रीम-केक्स, बिस्कोट्टी, होममेड रॉ, ऑर्गॅनिक चॉकलेट्स मिळतात.

.

हा स्टॉल आहे Lymn बँक फार्म चा आणि माझा आवडता :) इथे एकूण अठरा प्रकाराचे चीझ मिळतं, अगदी गार्लिक ते चिली, टोमॅटो, लेमन, क्रॅनबेरी, मँगो, अॅप्रिकॉट अँड चिली, स्मोक्ड चेडार, स्पेशल आर्टिसन चीझ. आम्ही हॉट गार्लिक, टोमॅटो बेझिल, हॉट अँड स्पायसी असे तीन प्रकारचे चीझ घेतले. ह्याच स्टॉलवर त्यांच्या चटण्या, एव्हियेटर अॅपल चटणी, टोमॅटो अँड कॅरेमलाईज्ड अनियन चटणी, स्विट टोमॅटो अँड चिली चटणीसुद्धा विकायला होते. Lymn बँक फार्मला ब्रिटिश चीझ अवॉर्ड पण मिळाले आहे.

.

.

दी शेफिल्ड हनी कंपनी उच्च प्रतिचे मध व मेणाची विक्री करतात. ब्लॉसम हनी, सॉफ्ट सेट हनी, हीथर हनी असे प्रकार उपब्ध आहेत.

.

हेज-रो प्रीझर्व्हिंग कंपानी चा स्टॉल, इथे सुद्धा अनेक प्रकारचे जॅम्स, चटण्या, जेलीज, मार्मलेड्स, पिकल्स मिळत होते. मेडर्ल जेली, क्रॅब-अॅपल जेली, स्पाईस्ड एल्डरबेरी जेली, कॅरेमलाईज्ड कॅरट चट्णी, हार्टी एल चटणी, मँगो चटणी, करीड बनाना, बीटरुट-हॉर्सरॅडिश चटणी, लेमन-लाईम मार्मलेड, ऑरेंज मार्मलेड, थ्री फ्रुट मार्मलेड, डॅम्सन जॅम, प्ल्म जॅम, Rhubarb -जिंजर जॅम, अॅप्रिकॉट जॅम, पिकल्ड अनियन्स, पिकल्ड रेड कॅबेज, ब्रेड-बटर पिकल असे साठवणीचे पदार्थ ह्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

.

पुढचा स्टॉल वॉव नट्स चा होता. ह्या स्टॉलवर पिस्त्याची विक्री केली जाते. हे पिस्ते ग्रीसच्या एका बेटा वरुन म्हणजे आयलंड ऑफ एजेना वरुन येतात. पौष्टिक असे हे नट्स खाण्यास ही चविष्ट होते, अगदी फ्रेश, क्रंची :)

.

डायरेक्ट बीयर खास बीयरप्रेमींसाठी हा स्टॉल होता. ह्यांच्या बीयर बॉटल्सवर मजेशीर नावे होती. त्यांची टॅग लाईनच गमंतीशीर आहे, गिव्हिंग गुड बीयर अ बॅड नेम.

.

पुढचा स्टॉल होता दी किंग ऑलिव्ह - येथे ऑलिव्ह्सचे विविध प्रकार, गार्लिक स्ट्फ्ड ऑलिव्ह्स, चिली स्टफ्ड ऑलिव्ह्स, लेमन स्टफ्ड ऑलिव्ह्स, कॅलामॅटा ऑलिव्ह्स, अॅरोमटाईज्ड पिटेड ऑलिव्ह्स, तर काही जीरे, मिरची, लसुण एकत्र भरलेले ऑलिव्ह्स होते. पिकल्ड ऑलिव्ह्स, टर्किश डिलाईट, टर्किश मिठाया जसे बकलावांचे विविध प्रकार, कतैफी, कॅरेमलाईज्ड नट्स, सॉल्ट अँड सेव्हरी नट्स, स्ट्फड वाईन लिव्ह्स असे विक्रीसाठी ठेवले होते.

.

हा स्टॉल होता होप हाईड - आऊट चा, हे बीयर आणि साईडर स्पेशलिस्ट आहेत. बार्ली वाईन, ब्राऊन एल, गोल्डन एल, लागर, पोर्टर, व्हिट बीयर, स्टाऊट, बीटर असे विविध प्रकार ह्यांच्याकडे मिळतात.

.

हा स्टॉल होता चाँप ऑन कर्क्ली चा म्हणजेच आपल्या चकलीचा. कुमार कोलार नामक डेंटिस्टने चकलीचा व्यवसाय सुरु केला आणि विविध फुड फेस्ट, फार्मर्स मार्केटमधे हा आपला स्टॉल लावून कर्क्ली विकतो. तो ह्या चकल्यांना गंमतीत सेव्हरी, स्पायसी कॅटरपिलर म्हणत होता. ह्यात तो चकलीचे तीन प्रकार ठेवतो फायरी घोस्ट नागा चिली, कोरिएंडर आणि क्लासिक.

.

.

.

हा स्टॉल माझा अत्यंत आवडता स्टॉल आहे, बर्डहाऊस टी-कंपनी. इथे टी कलेक्शन, लूज टी -लिफ, विविध हर्ब्स, स्पायसेस मिश्रीत चहापत्ती असे मिळतात. ह्याची सुरुवात जापनीज टी हाऊस , लंडन मध्ये २००१ साली झाली आणि मग तेथून रेबेका इंग्लिश आणि तिच्या आईने स्वतंत्रपणे हा व्यवसाय शेफिल्डमध्ये सुरु केला. बर्डहाऊस टी-कंपनीला बेस्ट नॉन-अल्कोहॉलिक बेव्हरेज अवार्ड मिळाले आहे, बेस्ट ओव्हर-ऑल ड्रिंक - डिलिशियसली यॉर्कशायर अवार्ड मिळाले आहे.

क्लासिकमध्ये इथे चाय, डचेस ग्रे, अर्ल ग्रे, इंग्लिश ब्रेकफास्ट, रुबी-ऑरेंज, रुबी- व्हॅनिला, ओलाँग - Tie Guan Yin Fancy, ओलाँग - मंकी पिक्ड, व्हाईट - व्हाईट पिओनी, व्हाईट- जस्मिन नीडल, ग्रीन - जेड रींग, ग्रीन - Jasmine Yin Hao Lotus असे बरेच ब्रँड्स मिळतात.

कलेक्शन - यॉर्कशायरमध्ये - डेल्स, ब्रु, कोस्ट, रोझ, Rhubarb.

फ्युझनमध्ये - Tangerine Sky, Pomegranate Pearl, चेरी ब्लॉसम, व्हॅनिला बीन, डचेस ऑफ बेडफर्ड. प्रिंसेस पीच, कोकोनट स्काय, Aztec Chai असे मिळतात.

स्वीट शॉपमध्ये - अॅटॉमिक सिनेम्मन, Lemon Bon Bon, ब्लॅक-जॅक, Parma Violet, Strawberry Lace.

वेलबिंगमध्ये - सनसेट, Breathe, डीटॉक्स, सीअॅट्टल, डीफेंड, बॅलंस, सनराईझ.

पीक- डिस्ट्रिक्टमध्ये - Moorlands, व्हाईटपीक्स, Duchess Georgiana, दी ट्रेल, सीक्रेट रेसीपी, मडी बुट्स.

शेफिल्डमध्ये - Botanical Gardens, विंटर गार्डन, पीस गार्डन, सेव्हन हिल्स, कोल्स कॉर्नर, केल्हम आयलंड, फुल माँटी असे वेग-वेगळे टी-ब्रँड्स मिळतात.

.

ह्या शिवाय त्यांच्याकडे टी अॅक्सेसरीज ही उपलभ्ध आहे जसे टी स्ट्रेनर बास्केट, टी-लिफ टुल , स्पून्स, स्टंप टी-पॉट, इंफ्युझर मग.

.

न रहावून इथून मी टी स्ट्रेनर बास्केट घेतलेच :)

.

पुढचा स्टॉल सेव्हन हिल्स बेकरी चा होता. शेफेइल्डमधली प्रसिद्ध आर्टिसन बेकरी, येथे वेग-वेगळ्या प्रकाराचे फोकाचिया ब्रेड्स, व्हाईट सावर डो ब्रेड, पम्पकिन सावर डो ब्रेड, ऑलिव्ह चिबाटा, Croissants, ब्रियोश, ब्राऊनीज, शॉर्टब्रेड, गुल्टन फ्री ब्रेड, स्कोन्स, होलमील ब्रेड, कस्टर्ड टार्ट्स, बन्स, Rye लोफ असे ना ना प्रकार मिळतात.

.

हुमसिजा ह्या ऑर्गॅनिक हुमसच्या स्टॉलवर हुमसचे वेगळे प्रकार मिळतात, क्लासिक, लेमन-कोरिएंडर, बीटरूट. हे सगळे रोज ताजे, बनवले जाते.

.

.

हा बीयर टेंट आहे. इथे बीयर कशी बनवली जाते ह्याचे छोटे प्रात्यक्षिक दाखवले होते शिवाय काही बीयर ही विक्रीसाठी ठेवल्या होत्या. बीयर-मेकिंग किटसुद्ध उपल्ब्ध होते. आम्ही ह्या टेंट मध्ये नाही गेलो ;)

.

पुढे व्हर्लो हॉल फारं ट्रस्ट चे सेट-अप होते जिथे एक फार्मयार्ड तयार केले होते लहानमुलांसाठी. त्यात कोंबड्या, रूस्टर, बदकं ठेवले होते. जवळचं एक भला-मोठा ट्रॅक्टर उभा केला होता. इथे लहान मुलांसाठी बर्‍याच अॅक्टिव्हिटीज होत्या, शेतातून खाण्याच्या काट्यापर्यंत अन्न कसे तयार होते ह्याबद्दल माहिती दिली जात होती.

पुढे मॅडम झुकिनी होत्या, इथे मॅडम एक व्हेजिटेबल एंटरटेनर म्हणून लाईव्ह शो पर्फॉर्म करत होत्या.

.

कंट्री-फ्रेश फुड्सवाले ताज्या भाज्यांची विक्री करत होते.

.

हा स्टॉल पुन्हा आमचा आवडता स्टॉल, दी डोनट गाय. आपल्या समोर ताजे डोनट तळून विविध प्रकारचे सॉस आणि टॉपिंग्ज घालून सर्व्ह करत होते. आम्ही गरमा-गरम डोनट्स आणि त्यावर कॅरेमल सॉस वुईथ पेकन नट्स घेतले, कसले अप्रतिम लागत होते, यम्मी!!

.

.

.

.

हा स्टॉल हँडमेड बटाट्यांच्या चिप्सचा होता, यॉर्क्शायर हँडमेड क्रिस्प्स. यॉर्कशायर क्रिस्प्स हे २००५ साला पासून पार्ट-टाईम शेतकरी अॅशली टर्नरने सुरु केले. ह्या क्रिस्प्समध्ये कुठल्याच प्रकारचे प्रेझर्व्हेटिव्ह्ज, एमएसजी, कलरींग्ज, आर्टिफिशियल फ्लेव्हरींग्ज घातलेले नाही. ह्या क्रिस्प्सचे दहा प्रकारचे फ्लेव्हर्स आहेत जसे नॅचरल सी-सॉल्टेड, चेडार अँड कॅरेमलाईज्ड अनियन, स्वीट चिली अँड लाईम, टोमॅटो + बेझिल + मॉझ्झरेला, ब्लॅक पेपर, रोस्ट लँब अँड मींट, हेंडरसन्स यॉर्कशायर सॉस, स्वीट क्युअर्ड हॅम अँड पिकल, Chardonnay वाईन, व्हिनेगर अँड अनियन.

.

.

हा मेक्सिकन पेयपानाचा स्टॉल, चिनमपास मेक्सिकन ड्रिंक्स. इथे अॅग्वा फ्रेस्का म्हणजेच फ्रेश वॉटर, ताजे फळांचे ज्युस मिळतात जसे, मँगो, स्ट्रॉबेरी, हिबिसकस, कोकोनट, लाईम. हे ज्युस एका छोट्या पिशवीत भरून त्यात स्ट्रॉ घालून सर्व्ह केले जात होते, ह्या पिशव्यांना बोलास असे म्हणतात.

.

* छायाचित्र आंजावरुन साभार

.

ह्या स्टॉलवर फ्रेडिज फ्रुट लागर मिळत होतं. ह्यात दोन फ्लेव्हर्स होते मँगो आणि वाईल्ड बेरीज. मेनस्ट्रीम लागर आणि साईडरच्या मधली अशी चविष्ट फ्रुट फ्लेव्हर बीयर आहे.

.

.

हा स्टॉल होता कॅरीबियन फ्युजन चा. ह्या स्टॉलवर जर्क चिकन खाण्यासाठी भली-मोठी रांग होती. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही ह्या रांगेत उभे होतो तेव्हा आमचा नंबर लागायच्या आतचं ह्या स्टॉलवरचे पदार्थ संपून गेले होते. दुसर्‍या दिवशी लवकरचं रांगेत उभे राहिलो, धाक-धूक होती आजतरी पदार्थ खायला मिळणार का पण नंबर लागला आणि झकास जर्क चिकन रॅपवर ताव मारण्यात आला. कॅरीबियन फ्युजन ह्यांच्याकडे जर्क चिकन रॅप, फ्राईड डंप्लिंग, करीड चिकन, करीड मटण, राईस अँड पीज, व्हेज / बीफ पॅटिज असे पदार्थ मिळतात.

.

.

.

बीबीसी रेडिओ शेफिल्ड -रेडी-स्टेडी, कूक !

बीबीसी रेडिओ शेफिल्ड ने तीन दिवस फेस्टिवल किचन, रेडी-स्टेडी, कूक !! ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. पिस गार्डनमध्ये मोठा गझिबो उभारण्यात आला होता व प्रेक्षकांना बसण्याची सोय केली होती. येथे शेफिल्डच्या मोठ्या रेस्तराँचे शेफ्स आणि बीबीसी रेडिओ प्रेझेंटर्स ह्यांच्यात कुक-ऑफ चॅलेंज होणार होते , तसेच व्यवसायिक स्थानिक शेफ पाककलेचे प्रात्यक्षिक दाखवणार होते. आम्ही दुसर्‍या दिवशी कुकिंग डेमो व कुक-ऑफ चॅलेंज बघायला गेलो. सुरुवात कुकिंग डेमोने झाली, अलिगढ रेस्तराँचे एक्झेक्युटिव्ह शेफ, मिस्टर.अली ह्यांनी बाल्टी चिकन, पिलाव राईस (पुलाव) व चना-मसाला बनवून दाखवले. लाईव्ह शो बघून पाककृती शिकण्याचा अनुभव वेगळाच होता. शेफ अली ही प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची छान उत्तरे देत होते.

.

.

त्यानंतर बीबीसी कुक ऑफ साठी बीबीसी रेडिओ प्रेझेंटर्स अँडी क्रेन विरुद्ध डायाना ल्युक अशी स्पर्धा होणार होती. ह्या प्रेझेंटर्सचे पेयरींग शेफिल्डच्या दोन नामांकित रेस्तराँच्या शेफ्ससोबत होते. अँडी क्रेन आणि डेव्हनशायर आर्म्स चे शेफ रसेल काएन्स अशी एक टीम आणि दुसरी डायाना ल्युक आणि वेस्ट टेन चे शेफ जेम्स मेलर.

.

ह्यांना एक मिस्ट्री बॅग दिली आणि एका तासात त्यात असलेल्या सामग्रीतून पदार्थ बनवायला सांगितला. खूप मज्जा आली लाईव्ह बघताना. अँडी क्रेनचा विनोदी स्वभाव, त्यांचा खेळकरपणा लोकांना मधेच हसवून जात होता तर जेम्स मेलरचे मल्टीटास्किंग बघून अगदी कौतुक वाटत होते. अँडीच्या टीमला फिश, बटाटा आणि चॉकलेट मुख्य जिन्न्स मिळाले होते. गझिबोत, किचनमधे इतर ही साहित्य पदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध करुन दिले होते त्यामुळे शेफ रसेलनी बेक्ड फिश, त्यासोबत सॅलॅड आणि मॅश्ड पटेटो असे तयार केले, चॉकलेट मुस बनवले तर डायानाच्या टीमला कोकोनट मिल्क, अॅस्पारॅगस, स्ट्रॉबेरीज असे मिळाले होते. त्यांनी अॅस्पारॅगसचे सॅलॅड आणि कोकोनट मिल्क वापरुन पॅनकेक बनवले व त्यात स्ट्रॉबेरी आणि क्रीमचे फीलिंग भरले. एक तास सगळी मजाच सुरु होती. बीबीसी प्रेझेंटर पॉलेट एडवर्ड ह्या कार्यक्रमाचे निवेदन करत होत्या. प्रेक्षकांना ही प्रश्न विचारण्याची संधी दिली गेली. चॅलेंज पूर्ण झाल्यानंतर दोन उपस्थित परिक्षकांनी पदार्थांची चव चाखून विजेते घोषीत केले.

कोकोनट मिल्क पॅनकेक बनवताना शेफ जेम्स मेलर

.

डायाना आणि अँडी

.

पॉलेट एडवर्ड आणि परिक्षक

.

ह्या कुक-ऑफचे विजेते अर्थातच डायाना आणि जेम्स ठरले. त्यानंतर सर्वांसाठी पदार्थ टेस्ट करण्यासाठी ठेवण्यात आले. डायाना ल्युककडून शेफिल्ड कुक बुकवर स्वाक्षरी घेतली आणि एक फोटो काढून आम्ही पुढे निघालो.

.

गेल्या वर्षापासून शेफिल्ड फुड फेस्टिवल आयोजीत करणार्‍यांनी शेफिल्ड कुक बुक प्रकाशीत केले. ह्या पुस्तकात शेफिल्डच्या प्रसिद्ध हॉटेल्स, रेस्तराँच्या शेफ्सनी दिलेल्या पाककृती आहेत, इतकेच नव्हे तर टेक-अव्हे जॉईंट्स, पब्स, हनी-कंपनी, जस्ट प्रिझर्व्ह्स, सिनेमागृहात असणार्‍या फुड-कोर्टवाल्यांनी पाककृती दिल्या आहे. ह्या सोबतचं शेफिल्ड फुड कल्चरची माहिती, शेफिल्डचा सुप्रसिद्ध सॉस हेंडोबद्दल माहिती, शेफिल्ड बिझनेस स्कूल, शेफिल्ड फुड फेस्टीवल, मुर मार्केट, वाईन मर्चंंट्स, कॅफे व असेच अनेक फुड जॉईंट्स बद्दल माहिती दिली आहे.

.

हेंडरसन रेलिश / स्पायसी यॉर्कशायर सॉस ह्याबद्दल युकेत सर्वांना माहिती नसेल कदाचित पण आमच्या शेफिल्डचे हे सांस्कृतिक व कलिनरी आयकन आहे आणि त्याबद्दल माहिती दिली नाही असे कसे होईल ;) ह्याची निर्मीती १८८५ मध्ये औषधविक्रेता हेन्री हेंडर्सन ह्याने केली. त्याकाळी त्याच्या दुकानात ह्या रेलिशची विक्री खुप मोठ्या प्रमाणात होत. ह्या सॉसला हेंडीज किंवा हेंडो सॉस असे ही म्हटले जाते. १९१० साली हे दुकान हेन्री हेंडर्सनने शॉज ऑफ ह्डर्सफिल्डला विकले. काही वर्ष हेंडोचा म्हणावा तितका खप झाला नाही, पण १९४० मधे चार्ल्स हिंक्मनने हे दुकान शॉज ऑफ ह्डर्सफिल्ड कडून विकत घेतले आणि तेव्हापासून ह्या सॉसची शेफिल्डमध्ये जोरदार विक्री सुरु आहे.

.

.

* दोन्ही छायाचित्रे आंजावरुन साभार

तसेच शेफिल्डचे जुने कासल मार्केट दोन वर्षांपूर्वी सिटी सेंटरमध्ये बांधण्यात आले दी मूर मार्केट ह्या नावाने. शेफिल्डचे सर्वात मोठे मार्केट आहे हे जिथे अगदी फुलं, पुस्तकं, लोकर, चपला, बॅग्ज, मच्छी, मटण, चिकन, फळं, भाज्या, बेकरीचे पदार्थ, पडदे, रग्ज, ईलेक्ट्रॉनिक्स, युनीसेक्स सलोन, नेल स्टुडियो, एशियन, ब्रिटिश, इटालियन, Cossac, चायनीज, अफ्रिकन फुड ग्रोसर्स आहेत. ह्याशिवाय इथे ऑल-डे ब्रेकफास्ट, टेस्टी स्टेक आणि एल पाय, सँडविच, हॉट -फूड, कॅफे, स्टॉल्स आहेत. ह्याला दी बराह मार्केट ऑफ दी नॉर्थ असे ओळखले जाते.

.

.

* दोन्ही छायाचित्रे आंजावरुन साभार

ह्या व्यतिरिक्त आमच्या शेफिल्डचे केल्हम आयलंड ब्र्युअरी, टी-रुम्स, दी स्ट्रीट फूड शेफ, फनाऊश, ब्लु ८८, क्युबाना, कटलर्स स्पाईस, मिशेल्स वाईन मर्चंट, पेपरकॉर्न, Yee Kwan आईस्क्रीम, नॉनाज, समर-हाऊस, व्हॅगन अँड होर्सेस असे अनेक रेस्तराँ, डेली प्रसिद्ध आहेत. वेस्ट स्ट्रीट, लंडन रोड व Ecclesall / एक्की रोड खास खवैय्येंसाठी असणारा खादाडी कट्टा आहे.

ह्या खाद्य सोहळ्यात, तीनही दिवस खाण्या-पिण्याची अगदी रेल-चेल होती, खरेदी तर झालीच पण खादाडीमुळे मन, पोट अगदी तृप्त झाले होते. शेवटी लोकं म्हणतात ते खरं आहे, दी स्टील सिटी ट्रुअली ऑफर्स दी फुल माँटी व्हेन इट कम्स टु फीलींग युअर बेली :)

प्रतिक्रिया

अमृत's picture

16 Oct 2015 - 10:13 am | अमृत

आणि मस्त वृत्तांत.

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 10:33 am | प्रीत-मोहर

जबर्‍यादस्त वृत्तात ओफ फूड फेस्ट. सान तुझ्याकडे हे सगळ खाउ घालायला कधी बोलावतेय्स? :P

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 2:35 pm | कविता१९७८

वाह फोटो मस्तच, वृतांत घरी गेल्यावर वाचते, हापिसात लईच काम हाय..

वेल्लाभट's picture

16 Oct 2015 - 3:06 pm | वेल्लाभट

जबरा.....ट !
वेडच लागेल चायला इथे येऊन!
हॅ!
फारच टेम्प्टिंग.

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 9:37 pm | कविता१९७८

जबरा माहीती

पदार्थांची अफाट व्हरायटी देणारा फेस्ट होता असे म्हणावे लागेल. माहिती वाचून व फोटू बघून डोळ्यांचे पारणे फिटले. या अशा जत्रांचा तेथील लोकांना अभिमानही वाटत असतो व तो एकूणच सादरीकरणातून दिसून येतो. खूपच छान.

पैसा's picture

16 Oct 2015 - 11:10 pm | पैसा

किती प्रकार ते! फोटो नेहमीप्रमाणे खास आलेत!

पद्मावति's picture

17 Oct 2015 - 9:22 am | पद्मावति

खूपच मस्तं खाद्यसोहळा. नाना प्रकारचे स्टॉल्स सुंदर फोटो. लेख आवडला खूप.

खूप छान माहिती सानिका.भरपुर फोटो टाकल्याने आणि ओघवत्या वर्णनाने तिथेच फिरत असल्यासारखे वाटले.आवडली खाद्यजत्रा.

भावना कल्लोळ's picture

17 Oct 2015 - 5:01 pm | भावना कल्लोळ

खरोखर कधी या तुमच्या देशात यायला मिळेल कि नाही ठाऊक नाही पण साने तुझ्यामुळे बसल्याबसल्या मस्त भ्रमण झाले माझे.

के.पी.'s picture

17 Oct 2015 - 6:55 pm | के.पी.

सोहळाच हो अगदी.
मस्त वाटलं वाचून,फोटो तर खासच!

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 9:42 pm | नूतन सावंत

सानिका,तुझ्या ओघवत्या शैलीने आणि झकास प्रकाशचित्रांनी तिथेच फिरत सगळ्याचा आस्वाद घेतल्यासारखे वाटले.

आदूबाळ's picture

18 Oct 2015 - 3:08 am | आदूबाळ

खतरनाक आहे. मलाही बरा मार्केटचीच आठवण झाली.

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 4:10 am | मधुरा देशपांडे

मस्त लिहिले आहेस. अगदी सविस्तर. फोटोबद्दल तर बोलतच नाही.
हे असे स्ट्रीट फेस्टिव्हल्स खरंच फार आवडतात. फक्त इथे त्यात बरेचदा मांसाहारी पदार्थच जास्त असल्याने सगळ्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. आता लवकरच ख्रिसमस मार्केट्स सुरु होतील.

वाचून एकदा तरी अनुभवण्याच्या यादीत हा फेस्टिव्हल जाऊन बसलाय.खाद्यपदार्थांचे वर्णन आणि फोटो असले की तुझ्या लेखणीत अन्नपूर्णा प्रवेश करते! नक्कीच!

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 3:45 pm | मांत्रिक

छान आहे लेख. बाकी बीयरची नावे काय खतरा आहेत!

उमा @ मिपा's picture

18 Oct 2015 - 8:42 pm | उमा @ मिपा

सानिका, शेफिल्ड आणि तू असा खरंच खूप छान योग जुळून आलेला आहे. किती हौसेने, आनंदाने साजरा केलाय खाद्यसोहळा! ऑलीव्जचे इतके प्रकार असतात, बनू शकतात? मानलं पाहिजे त्या लोकांना. छान लिहिलंयस सानिका, तुझ्यामुळे आम्हाला ही एवढी माहिती मिळाली, फोटोतून का होईना बघता आलं. त्याबद्दल तुझं कौतुक!
डोनट्सचा फोटो पाहून प्रचंड भूक लागलेली आहे.

इडली डोसा's picture

19 Oct 2015 - 8:38 pm | इडली डोसा

छान आहे शेफिल्ड फुड फेस्टीवल. फोटो अगदी टेम्प्टिंग आहेत.
ही सगळी माहिती आणि फोटो गोळा करण्यासाठी बरेच कष्ट घेतलेले दिसत आहेत. अंकाच काम करुन एवढे छान छान लेख लिहिल्याबद्दल तुझे खुप खुप कौतुक वाटते.

स्वाती दिनेश's picture

19 Oct 2015 - 11:13 pm | स्वाती दिनेश

शेफिल्डचा खाद्यसोहळा आकर्षक आहे.. कधीतरी ह्या सोहळ्यासह युके जमवायलाच हवे, :)
स्वाती

खूप व्हरायटी आहेत खाद्यपदार्थांचे. फोटो ही आकर्षक. मूर मार्केटची इमारत कल्पक आहे.

मितान's picture

20 Oct 2015 - 8:14 am | मितान

असू द्या असू द्या !
एवढं जळवायची गरजच नैये !
आमची पण पवनाथडी यील आता ! आमी पण टाकू असे फोटू ;)

बाकी, सुंदर फोटो अन लेख.
चीज चा स्टॉल बघून मी मेकेलीन खूप मिस केलं :(

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2015 - 1:48 pm | पिलीयन रायडर

बापरे!!! कित्ती कित्ती प्रकार आहेत हे!
सानिका.. खुपच माहितीपुर्ण लेख!

मला प्रत्येक लेखागणिक फ्रस्ट्रेशन येत चाललं आहे.. अरे लोक्स काय काय मस्त पदार्थ खातात राव!

बॅटमॅन's picture

20 Oct 2015 - 3:25 pm | बॅटमॅन

अगागागागा....अता निव्वळ चर्फद्ने अले.

वा मस्त. फोटो तर आधी बघितलेच होते पण सगळी माहिती आत्ता वाचली. मजा आली वाचायला. ते फ्लेवर्ड चीज, स्ट्रेनर भारीच..

चविष्ट लेख !! अतिशय आवडला ...

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2015 - 8:02 pm | बोका-ए-आझम

कुठाय इनो? धागा मस्तच.त्या जर्क चिकन रॅपची रेसिपी काही दिवसांतच मिपावर येईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही ना?

जर्क चिकन आणि चकल्या आवडल्या. बाकीच्यापैकी गोडगोड पदार्थ आवडत नसल्यामुळे पास.

त्रिवेणी's picture

24 Oct 2015 - 1:23 pm | त्रिवेणी

मस्त लिहिल आहेस सानिका.चीज आणि भाज्यांचे फोटो मस्त एकदम.
आमची भीमथडी नाही आली अजुन.

शेफिल्डचा खाद्यंमेळा खुप्पच आवाडला कीती व्हरायटीज आहेत, शिवाय भरपुर शाकाहारी ऑप्शन दिसल्यामुळे कस बर बर वाटतय ;)

टक्कू's picture

27 Oct 2015 - 4:50 pm | टक्कू

सविस्तर व्रुत्तान्त वाचून मजा आली. शिवाय शाकाहारी पदार्थ बघून अजूनच बरे वाटले.
धन्स!