अवांतर प्रतिसादांवर उपाय -अपडेटेड

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
17 Dec 2008 - 3:04 pm
गाभा: 

डिस्क्लेमर : सर्व संपादक मंडळ , तात्या आणि माण्यवरांची आधीच माफी मागत आहे,

णमस्कार्स लोक्स,

आज आम्ही फार चिंतीत आहोत, कितीही काहीही झालं तरी हल्ली मिपावर हे अवांतर प्रतिसादांचा लोंढा काही थांबतच नाहीये ... कोणी बोंबलाची प्रतिकृती मागतो ... त्यावर कोणी "कच्चे बोंबील" ही पाकृ देतो ( कोण चावट आहे रे तो ... म्हणजे दिसायला तर रिलेव्हंट .. पण मायंदळ अवांतर )
आणि कोणती तरी गैंग मधीच येउन " टोटल अवांतर " चा गेम सुरू करते .... अरेच्च्या .... मला काळजी वाटायला लागली ...
म्हणून आम्ही हा धागा काढत आहोत ... यात मी लेखाला केवळ रिलेव्हंट प्रतिक्रियां बरोबर ज्या प्रतिक्रिया लेखकाचे ही मनोबळ वाढवतील ... अशा प्रतिक्रियांचा समावेश करत आहे . ... हे केवळ टेंप्लेट आहे ... यात आपण आपल्या रिलेव्हंट प्रतिक्रिया जरूर टाकाव्यात ... (अवांतर पणा केल्यास लेखकाला आवडेल)

विभाग १ : काथ्याकुट
संकल्पना : या सदरात हल्ली एक ओळ किंवा एक लिंक देउन चर्चा करा असे म्हणणार्‍यांची संख्या अंमळ वाढली आहे ... (मिसळपाव नवनिर्माण सेना त्यांना फाट्यावर मारते ही गोष्ट वेगळी) पण कधी कधी चांगले विषयही निघतात ... तर अशा वेळी लेखकाला निराष करून चालत नाही ... खालिल प्रतिसाद विचारात घ्यावेत
१. फार विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केलाय
२. चांगला विषय चर्चेत आणल्याबद्दल लेखकाचे अभिणंदण
३. काथ्याकुट आवडला
४. अप्रतिम काथ्याकुट
५. मागच्या काथ्याकुटापेक्षा चांगला काथ्याकुट जमला आहे ...
६. जर माहित असेल तर विषयावर एखादी टिपण्णी अवांतर या सदरात केली तर हरकत नाही.
७. ह्या काथ्याकुटांत आम्हाला धनंजय दिसले
८. फारच मार्मिक , ज्वलंत , किंवा कैच्याकै काथ्याकुट आहे

विभाग २ : जनातलं मनातलं
संकल्पना : हल्ली इथं पोत्याने ओतल्यासाखे लेख येत आहेत .. असे निदर्शनात आले आहे की आम्ही मिसळपाव जॉइन केल्यापासून जेवढे लेख लिहीले नाहीत .. तेवढे लेख काही महान लेखकांनी २ दिवसात प्रसवले ... त्यामुळे वाचायला मिळणार्‍या लेखांचा दर्जा कमी झाला आणि पब्लिक बोर होऊन तिथं अवांतरपणा करून बदला घेऊ लागलं ! पण काही लेख खरंच उत्तम असतात... त्यावेळी मात्र लेखकाची निराशा नको म्हणून आपण खालिल पैकी प्रतिसाद विचारात घ्यावेत.
१. वा, काय छान लिहीलंय !
२. छान भट्टी जमली आहे , अजुन येउन द्या
३. पु.ले.शु.
४.(जर लेखमाला असेल तर) मागिल भागांपेक्षा हा भाग उत्तम जमला आहे
५.(जर लेखमाला असेल तर) मागील भागांच्या तुलनेत अपेक्षाभंग झाला आहे
६. आज हात आवरता घेतलात का भौ/तै ?
७. मला आपल्या लेखात पु.ल. दिसले.
८. फारच मार्मिक लिहीलंय
९. हृदय हेलकाऊन टाकणारा लेख .. डोक्यात मुंग्या, पायात कुत्रु, खांद्यावर मुंगळे आले वगैरे वगैरे
१०. पुढचा भाग लवकर येउ द्या ... उशीर करू नका ... पटकन टाका..
११. कसं काय सुचतं बुवा आपल्याला एवढं चांगलं लिहायला ? आम्हाला आपला जाम हेवा वाटतो ( हा प्रतिसाद लेखकाला अंमळ गुदगुल्या करून जाईल याची ग्वाही देतो.. आणि आपणासही त्याच्या कडून चांगले प्रतिसाद पडतील .. )
१२. जिंकलंस मित्रा ... तोडलंस .. पार चेंदामेंदा केलास ...
१३. शेवटचा आणि तिसरा पॅरा एक नंबर .. आपल्या लेखणशैलीने प्रभावित झालो
१४. वा !

विभाग ३: कलादालन
हा विभाग आम्हाला खास आवडतो , कारण यात लेखकाची कमी आणि कैमेर्‍याचीच जास्त करामत असते (पण तरीही लेखकाचे कौतूक करणे गरजेचे असते) ... कोण कुठे फिरून आला हे कळून आम्हाला आणंद होतो .. आणि पब्लिकलाही प्रतिक्रियेने फिरून आल्याचे पैसे वसूल झाल्यासारखे वाटते. यासाठी खालील प्रतिक्रिया विचारात घ्याव्याय
१. फो टू के व ळ अ प्र ति म ............... ( आज वर आम्हाला सर्वांत जास्त आवडलेली प्रतिक्रीया)
२. तिसरा, पाचवा, पंचविसावा, त्रेपन्नावा आणी ९२वा फोटू झकास आला आहे ... (हल्ली एवढे फोटू असतात , तरी पब्लिक फोटू चा लंबर कसा लक्षात ठेवतं हे न कळलेलं कोडं आहे .. मात्र प्रतिसाद देताना तो विचार करू नये, लेखकाला मात्र कोणताही फोटू आवडल्याचं समाधान भेटतं )
३. कॅमेर्‍याच्या सेटींग्ज काय केल्यात हो ? कोणता कॅमेरा आहे , इत्यादी टेक्निकल गोष्टी रिलेव्हंट आहेत
४. आमच्या आठवणी जाग्या केल्या ह्या फोटूंनी (आम्ही ऑलरेडी जाऊन आलोय हो . भाव नका खाऊ .. हे स्वगत)
५. वा... आपल्या निरिक्षण शक्तीला दाद द्यावीशी वाटते

विभाग ४ : जो ना देखे रवी
ह्या विभागात चार ओळींपासून ते ४ पानांपर्यंत काहीही पडू शकते. आम्हाला कविता/विडंबणातलं काही कळत नाही .. शक्यतो आम्ही तिकडे जात पण नाही , पण काही प्रतिसाद खालील प्रमाणे
१. कविता के व ळ अ प्र ति म
२. पहिलं आणि पाचवं कडवं भयंकर आवडलं
३. सुंदर आहे कविता , फारच भावनिक
४. कविता एखाद्या बैठकीत लिहीलीये वाटतं
५. मनतरंग निर्माण झाले
६. क्ष क्ष ओळींत वृत्तात मार खाल्लाय ( हे आपले हुशार व्याकरण तज्ञ कवि लोक्स ,, कवितेचं कठोर परिक्षण करतात, काना मात्रा वेलांटीने वृत्त चुकलं की आपण कसा पकडला, या आनंदात प्रतिक्रीया देतात)
७. आपल्या कवितेत मला नारायण सुर्वे दिसले

विभाग ५ : कौल
आहाहा !! आम्ही गरिब काय बोलणार ? इथं तर स्पेशॅलिटी वाली लोकं आहेत .. पण मद देण्याबरोबर प्रतिक्रिया पण द्याव्या लागतात ना ! मग द्यायचा ... कौल कशावरही असु शकतो , हैबतरावांच्या गाई ला यंदा काय होईल ? अ) वासरू ब) करडू क) शिंगरू ड) अन्य सविस्तार लिहा असे कौल येऊ शकतात हसू नका ! रिलेव्हंट प्रतिक्रिया द्या !
१. कौल केवळ अप्रतिम आहे
२. विचार करायला लावणारा कौल
३. आपल्या कौलात मला स.ग. दिसले.
४. फार उपयोगी कौल आहे.

विभाग ६ : पाककृती
हा विभाग एक चांगला विभाग आहे, बर्‍याच लोकांना त्याचा फायदा(की तोटा ?) झाला असण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. बर्‍याच उत्तम पाककृती पहायला मिळतात ... आमच्या भेळकच्चे बोंबील ह्या पाकृ चा प्रयत्न त्यामुळेच झाला . रिलेव्हंट प्रतिक्रीया.
१. पाकृ के व ळ अ प्र ति म
२. पाककृतीचे फोटू पाहून भुक लागली
३. पाकृ पाहून चमचाभर, फुलपात्र/वाटी, ताटलीभर किंवा बादलीभर (आपापल्या कुवतीप्रमाणे द्यावे) लाळ गळाली.
४. छान आहे पाकृ, आजच करून पहाते(तो)
५. हे ह्यात जी अंडी वापरलीत ... ती कुठून आणलीस ? अंडी कुठे सर्वांत चांगली भेटतात (पदार्थ पाकृ प्रमाणे बदला, नाही तर अवांतर होईल)
६. आम्ही ह्या ह्या पद्धतीने करतो .. पण आता ह्याही पद्धतीने करून पाहीन... (त्यावर आम्ही हमकास म्हणतो ,.. पाहून झालं की इकडं पाठवून द्या)
७. किती जळवशील गं/रे ... तिकडे आलो की हक्काने खाईन

विभाग ७ : संपादकीय
संकल्पना : ह्यात प्रतिक्रिया देताना जरा संभाळून विचारपुर्वक द्यायला हव्या, संपादकिय साठीच्या प्रतिक्रीया ह्या वेगळ्याच साच्यातल्या असतात. ओळीमर्यादा किमान १० असावी. आपल्याला विषयाची माहिती नसेल तर गुलला अन्यथा विकीगिरी करा .. माहीती शोधा आणि मोठ्या प्रतिक्रिया लिहा. लेखकाच्या संपादकिय लेखण कौशल्याचे टिळकांच्या उंचीवरून परिक्षण करून मत द्या. पण हे सर्व लिहायला (ऍक्चुअली वाचायलाच) एवढा कंटाळा असेल तर एक करा ... आपण संपादकिय वाचतो, मोठ्या गंभीर चर्चांमधे तेवढ्यास सक्रियतेने भाग घेतो हे दाखवायचं असेल तर खालील पैकी काही प्रतिक्रीया.(ह्यात आपण संपादकीय वाचलाच पाहिजे असं नाही... आमच्या सारखे चाणाक्ष असाल (हे बळंच) तर एक दोन प्रतिक्रीया वाचून त्यावरून तर्क लाऊन एक प्रतिक्रिया फेकू शकता.
१. अत्यंत मार्मिक विचार करायला लावणारा संपादकीय
२. वा मित्रा तोडलंस , जिंकलंस ,, पार चेंदामेंदा केलास .. आता पार भुगा झाला, (स्वगत : निम्म्यात वाचायचं सोडलं नाय तर माझाच भुगा झाला असता)
३. आज पर्यंतचा सर्वांत भारी संपादकीय.
४. ह्या संपादकीय मधे मला थोडी कमी वाटली, संपादकीय साठी जो दृष्टीकोण लागतो तो नाही दिसला ( हे निगेटीव्ह प्रतिक्रीया देणारांसाठी, ह्यांना आपला प्रेझेंस दाखवावा वाटतो , स्वतःला मात्र एकदाही संपादकीय लिहायचं आमंत्रण आलेलं नसतं आणि आल्यावरही काही काशी केलेली नसते)
५. चांगली चर्चा चालू आहे ,,, वाचतोय ... येउन द्या अजून.
६. लेखकमोहोदय , आज आपण एक उच्च प्रतिचे लेखक आहाते हे मान्य करावे लागेल (स्वगत म्हणावे : आधी पण शिव्याच देत होतो आणि नंतर पण शिव्याच देत राहिल बेट्या .. घाबरू नको .. चढ झाडावर)

तर मी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत .. पण मिपाचं ट्राफिक पहाता , ह्या प्रतिक्रिया रिपीट होऊन होउन बोर नको व्हायला .. म्हणून आपण यात भर टाकावी जेणे करून आपल्या लेखक लोकांना स्तुती मधे नाविन्याचा अनुभव होईल .. आणि सगळं सुरळीत चालेल.

ता.क. लेख प्रक्षोभक , अश्लिल , व्यक्तिगत टिका करणारा किंवा अवांतर वाटल्यास उडवला तरी चालेल.आमचा हेतू अवांतरपणा कमी करण्यासाठी रिलेव्हंट प्रतिक्रीया गोळा करणे हा आहे

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

17 Dec 2008 - 3:18 pm | सखाराम_गटणे™

८. फारच ज्वलंत काथ्याकुट आहे

----
सखाराम गटणे

अघळ पघळ's picture

21 Dec 2008 - 3:39 am | अघळ पघळ

टार्‍या ह्या टेंप्लेटमध्ये एक प्रतिसाद खास क्रांतीकारक फॅन क्लब साठी ऍड कर

'मला तुमची कीव वाटते' :D

अघळ पघळ

अवलिया's picture

17 Dec 2008 - 3:12 pm | अवलिया

या धाग्याचे लेखकांनी माझ्या मनातील भावनांनाच शब्द रुप दिले आहे.

(हा पण वरच्या यादीत वाढव रे)

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

मनस्वी's picture

17 Dec 2008 - 3:25 pm | मनस्वी

५. मनतरंग निर्माण झाले

मिपा कट्ट्याच्या खाद्यपदार्थांच्या फोटोंचे आणि इतर पाककृतींच्या प्रतिक्रिया??
१. जळवा, जळवा आम्हाला.
२. बादलीभर लाळ गळली.
३. आता पुढच्या रविवारी हाच बेत.
४. चला विकांताचा बेत पक्का झाला.

टारझन's picture

17 Dec 2008 - 3:30 pm | टारझन

पाककृती विभाग विभाग सटकलाच की ... च्यायला ह्या बॉस(बौस) च्या फोन मुळे ना ... वाट लागली

मनस्वी's picture

17 Dec 2008 - 6:26 pm | मनस्वी

कुठेही चालणारा -
येउ द्या अजून!
------------------------------------------
प्रतिसादावर प्रतिक्रिया -
यावर एक झक्कास पैकी लेख येऊ द्यात!
------------------------------------------
इतर :

१. जे ठ्या: करुन कॉफी उडवलीये, पार नाकातोंडातून कॉफीचे नळ वाहिले राव!!!!!
२. 'अबक पदार्थ' एकदा खाऊन पाहिला पाहिजे बर्रका!
३. एका छानश्या पाककृतीबद्दल आभारी आहे.
४. आधी मस्त कृती देता आणि नंतर त्याहूनही मस्त फोटो!
५. पाककृतीतले बारकावे आणि फोटो के व ळ अ प्र ति म!
६. असे फोटो देऊन लई लई अन्याय करता बॉ आमच्यासारख्यांवर
७. अगदी मनातलं बोललात
८. लगे रहो! कविता फारच आवडली !!!
९. विडंबनाच्या अंगाने जात आहे, अशी पुसटशी शंका येतीये..
१०. तुम्ही तर कमालच केलीत!
११. छप्परफाड....
१२. डोळ्यासमोर अगदि प्रसंग उभा रहिला! अतिशय सुंदर!
१३. आपल्या प्रतिभेला दंडवत.
------------------------------------------

मनस्वी's picture

17 Dec 2008 - 6:32 pm | मनस्वी

स्वगत : निम्म्यात वाचायचं सोडलं नाय तर माझाच भुगा झाला असता
लेखकमोहोदय , आज आपण एक उच्च प्रतिचे लेखक आहाते हे मान्य करावे लागेल

मिंटी's picture

17 Dec 2008 - 3:23 pm | मिंटी

:))

>>५. मनतरंग निर्माण झाले

:))

अनिल हटेला's picture

17 Dec 2008 - 3:26 pm | अनिल हटेला

भावना पोचल्या ...

(कोण ही भावना आणी कुठे पोचली ,ते विचारू नये...) :-D

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मृगनयनी's picture

17 Dec 2008 - 5:18 pm | मृगनयनी

मस्तच रे टार्‍या....

तू फारच मणावर घेतलय.. बॉ...... हे जाणवते.....
:)

बाकी मला "विभाग ४ "चे टायटल अंमळ जास्त आवडले / आवडते / आवडेल..

;)
२. पहिलं आणि पाचवं कडवं भयंकर आवडलं
३. सुंदर आहे कविता , फारच भावनिक
४. कविता एखाद्या बैठकीत लिहीलीये वाटतं
५. मनतरंग निर्माण झाले

बाकी ... हैबतरावाचं ... अयमीन त्याच्या म्हशीचे काय होतंय... ते व्य नि ने कळव बरं.....

अर्थात च ज्या पर्यायाला सर्वांत जास्त वोट्स... तेच होणार....नै का :-?

:)

मृगनयनी's picture

17 Dec 2008 - 5:14 pm | मृगनयनी

९. हृदय हेलकाऊन टाकणारा लेख .. डोक्यात मुंग्या, पायात कुत्रु, खांद्यावर मुंगळे आले वगैरे वगैरे

=))

२. तिसरा, पाचवा, पंचविसावा, त्रेपन्नावा आणी ९२वा फोटू झकास आला आहे ... (हल्ली एवढे फोटू असतात , तरी पब्लिक फोटू चा लंबर कसा लक्षात ठेवतं हे न कळलेलं कोडं आहे .. मात्र प्रतिसाद देताना तो विचार करू नये, लेखकाला मात्र कोणताही फोटू आवडल्याचं समाधान भेटतं )

सिम्पल लॉजिक! व्हेरी नाईस!!

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2008 - 3:37 pm | परिकथेतील राजकुमार

१) आपला लेख वाचला आणी सुन्न झालो / ले
२) आपले विचार वाचले आणी फलना फलाना गुर्जी / आजोबा / तात्या /आत्या ची आठवण झाली
३) अशाच प्रकारे आपल्या बरोबर घडलेला किस्सा प्रतिसाद म्हणुन लिहिणे
४) सुचना देणे :- १) ह्या लेखाची / कौलाची खरच गरज होती का ? २) हे जे अशा अशा पद्धतिने लिहिले आहे ते तशा तशा पद्धतीने अजुन प्रभावी झाले असते.
५) भावना पोचल्या
६) तुम्ही काय लिहिले आहे ते तुम्हाला तरी कळाले आहे का ?
७) हा विषयच मुळात अवांतर आहे
आत्ता येव्हडयाच सुचल्या आहेत !

अवांतरद्वेष्टा

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

17 Dec 2008 - 3:45 pm | भडकमकर मास्तर

१)हा धागा अत्यंत "तम्मा तम्मा लोगे" आहे असं माझं मत आहे " मी खूप एन्जॉय केला.
२) हे जे अशा अशा पद्धतिने लिहिले आहे ते तशा तशा पद्धतीने अजुन प्रभावी झाले असते.
मलाही असेच वाटते.
+१
मी आपणाशी सहमत आहे.
३.अगदी चित्रदर्शी लेखन. आता स्क्रीनप्ले लिहायला घ्या तुम्ही.

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज's picture

17 Dec 2008 - 4:06 pm | सहज

लेख छानच आहे. प्रत्येक उपाय एका मोठ्या प्रतिसादाचा धनी

मला भिती वाटतीय की श्री छोटा डॉन याला प्रतिसाद देताना मिपाची बँडविड्थ बोंबलणार. ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Dec 2008 - 4:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला भिती वाटतीय की श्री छोटा डॉन याला प्रतिसाद देताना मिपाची बँडविड्थ बोंबलणार.
माझे परममित्र आणि स्नेही श्री छोटा डॉण यांचा व्यक्तिगत उल्लेख करून आणि त्यांच्याविषयी चार शब्द आत्मीयतेने बोलल्यामुळे मला अगदी भरून का काय ते आलं!

मूळ "लेखा"ला प्रतिक्रिया (आणि त्यात भर रे टारू)

... (नि:शब्द)

छोटा डॉन's picture

17 Dec 2008 - 4:23 pm | छोटा डॉन

लेख उत्तम जमला आहे.
पुलेशु ...

>>मला भिती वाटतीय की श्री छोटा डॉन याला प्रतिसाद देताना मिपाची बँडविड्थ बोंबलणार.
च्यामारी, आम्हालाच टोला का ?
बरं बरं, आज दाखवुन देतो की मोठ्ठा प्रतिसाद काय असतो ते ...

सध्या जरा गडाबडीत आहे, एकदा मॅनेजर कटला की मग आम्ही आहोतच.
तुर्तास एवढेच.

------
( अतिच अवांतर ) छोटा डॉन

विनायक प्रभू's picture

17 Dec 2008 - 4:14 pm | विनायक प्रभू

क्रिप्टीक. कळला नाही. तुमच्या खानदानात सर्व जण क्रिप्टीक का?
बरचसा कळला नाही.
क्षयझ विषयाबद्दल व्यंनि मधुन बोलुया.
विदा द्या.
अमुक एक साल टरनींग पॉइंट होते लेखकाच्या मते. खुलासा व्हावा.

टारझन's picture

17 Dec 2008 - 6:00 pm | टारझन

प्रभुजी,
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार,

"टार्‍या उगाच्च "

अवांतर : वरिल प्रतिक्रीयांसाठी एक नविन विभाग पाडायला हवा "क्रिप्टोग्राम" म्हणून ...
तिथे आपण सांगितलेल्या प्रतिक्रीयांचा पाऊस पडेल ~!~

-टारायक महाप्रभू
क्रिप्ट अफ्रिकाना

विनायक प्रभू's picture

17 Dec 2008 - 6:04 pm | विनायक प्रभू

क्रिप्टोगाव रे

लिखाळ's picture

17 Dec 2008 - 6:16 pm | लिखाळ

तुमचा प्रतिसाद वाचून डोके सुन्न झाले. काय अवांतर प्रतिसाद लिहावा तेच कळत नाही.
-- लिखाळ.

मनस्वी's picture

17 Dec 2008 - 4:42 pm | मनस्वी

> तुला सगल्याणची छान Wicket घेता येते हे नकी !

+ १

पण वुकेट पेक्षा 'त्रिफळा उडवतोस' कसे वाटेल?

सखाराम_गटणे™'s picture

17 Dec 2008 - 4:43 pm | सखाराम_गटणे™

+१
वाह वाह, छानच आहे,
आवडले

पुप्र शु

----
सखाराम गटणे

घाटावरचे भट's picture

18 Dec 2008 - 2:51 am | घाटावरचे भट

टार्‍या, जास्त त्रिफळा इकडे तिकडे उडवू नकोस रे...सगळ्यांनाच त्याची गरज नसते.

--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

सुनील's picture

17 Dec 2008 - 5:10 pm | सुनील

लै भारी.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ's picture

17 Dec 2008 - 5:30 pm | लिखाळ

पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख आणि तितक्याच वाचनीय प्रतिक्रिया.
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Dec 2008 - 5:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाचनखूण साठवलेली आहे!

आजानुकर्ण's picture

17 Dec 2008 - 5:35 pm | आजानुकर्ण

काय टारझन, सभ्य सुसंस्कृत वाचकांना हा लेख(/चर्चाविषय/कविता/पाककृती) आवडलेली दिसत नाही. सुतकबितक आहे वाटतं. या लेखाला इतरत्र आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या की मिपाकरांच्या जिंदादिलीचा अभिमान वाटतो.

आपला,
(अभिमानी) आजानुकर्ण

लिखाळ's picture

17 Dec 2008 - 6:13 pm | लिखाळ

ह्म्म ! म्हणजे तुम्ही इतरत्र जाता तर !
-- (बाणेदार)लिखाळ.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2008 - 6:00 pm | परिकथेतील राजकुमार

आम्ही फक्त आमच्या लेखांवर प्रतिक्रिया देणार्‍यांच्या लेखालाच प्रतिक्रिया देतो. क्षमस्व !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Dec 2008 - 6:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सभासद अमुकतमुक यांस,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. किंबहुना आपल्या अनेक विषयावरील शोधपुर्ण लिखाणामुळे मी या साईटवर पुरावा देण्याच्यासाठी उद्युक्त झालो(/ले).अन्यथा तेच तेच लिहून मला कंटाळा आला आहे. अशा शोधकार्यासाठी प्रसिद्ध संशोधिला डॉ. कु. चंद्रिका कोपरखळे यांनी नेहमीच तयारी दर्शवली आहे. त्यांचे तसे एक लेखी इमेलचे पत्रही श्री. उजेड पाडणारे यांचेकडे आहे. असो. आज इतकेच.
तरीही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
-- टदिटी टटकर

(अवांतरः या प्रतिक्रियेसाठी मिपाचा थोडा अभ्यास करावा लागला.)

टारझन's picture

17 Dec 2008 - 6:31 pm | टारझन

के व ळ अ प्र ति म ! शब्द संपले !!!!
=)) =)) =))

धनंजय's picture

17 Dec 2008 - 9:17 pm | धनंजय

७. ह्या प्रतिसादात आम्हाला धनंजय दिसले

लिखाळ's picture

17 Dec 2008 - 6:17 pm | लिखाळ

का कोण जाणे टचकन डोळ्यात पाणी आले.
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Dec 2008 - 6:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

का कोण जाणे टचकन डोळ्यात पाणी आले.
रुमाल हवाय का बादली? (अजिबात ह.घेऊ नका, बजावून ठेवते)

लिखाळ's picture

17 Dec 2008 - 6:48 pm | लिखाळ

> रुमाल हवाय का बादली? (अजिबात ह.घेऊ नका, बजावून ठेवते) <
तुम्ही माझ्या भावना दुखवत आहात. मला हे अजीबात आवडले नाही.
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Dec 2008 - 7:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

> रुमाल हवाय का बादली? (अजिबात ह.घेऊ नका, बजावून ठेवते) <
तुम्ही माझ्या भावना दुखवत आहात. मला हे अजीबात आवडले नाही.

१. अहो, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, तुम्ही टीपं कसली गाळताय?
२. पुन्हा २६ जुलै होऊ नये म्हणून आधीच सोय करुन ठेवते.
३. ऑफिस-प्लँटला पाणी घालायचंच आहे, त्यासाठी उठायला नको म्हणून विचारलं.
४. भावना कशा असतात, त्या दुखतात तर डॉक्टरला विचार ने!

लिखाळ's picture

17 Dec 2008 - 7:35 pm | लिखाळ

पुन्हा तेच.
लोकांना पाणी मिळायचा आणि माझ्या डोळ्यात लेख वाचून पाणी यायचा काय संबंध ते स्पष्ट करा.
२६ जुलैला असाच लेख प्रकाशित झाला होता का?
मराठी संकेतस्थळावर ऑफिस-प्लँट असे इंग्रजी शब्द चांगले वाटत नाहीत.
डॉक्टरकडे जायचे की नाही ते माझे मी पाहून घेईन.
-- लिखाळ.

लिखाळ's picture

17 Dec 2008 - 6:51 pm | लिखाळ

कलादालनातील प्रतिक्रियांबद्दल अधिक माहितीसाठी वाचा कॉफिचा कप


-- लिखाळ.

ब्रिटिश's picture

17 Dec 2008 - 7:50 pm | ब्रिटिश

दादुस ,

झोडलस सगल्याना
तोडलस सगल्याना
फोडलस सगल्याना
मोडलस सगल्याना

साला हिकर आलास त लगनाचा बार उडवुन टाक. बरा होशील,

(हलूहलु झे)

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

पुढिल प्रतिसादासाठी शुभेच्छा!!!

आमचे (अवांतर ) परममित्र टारुसाहेब ह्यांनी एका चांगल्या विषयाला तोंड फोडले आहे.
बर्‍याच दिवसापासुन मी "लंबेचौडे, दिर्घ म्हणजे थोडक्यात सहजरावांच्या भाषेत मिपाच्या बँडविड्थचा बँड वाजवणारे प्रतिसाद कसे लिहावेत" ह्यासंबंधीच्या मार्गदर्शनपर लेखाची तयारी करत होतो पण आता त्यातले बहुसंख्य मुद्दे याच लेखात संक्षेपाने आल्याने आता तो लेख टाकण्यातली हवा निघुन गेली आहे.
त्याबद्दल टारुसाहेबांचे ( अवांतर ) हाबिणंदण व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ...!
असो.

आधीच मी मान्य करतो की मी टारुशी " +१, सहमत आहे" , त्याबाबतीत शंका नसावी.
असो.

तर आता मिपावरचा यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ह्यासाठी काही टिप्स ...(मी टिप्स देऊ शकतो ह्याचाच अर्थ मी मिपवारचा यशस्वी प्रतिसादकर्ता आहे हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल, ज्यांना हे मान्य नाही ते हे विधान त्यांना झालेल्या "जळजळीतुन" आले आहे हे आम्ही इथे स्पष्टपणे नमुद करु इच्छितो. )

१. काथ्याकुट :
आजकाल ह्या विभागाला फार चलती आहे, सगळ्यात जास्त प्रतिसाद खेचणार्‍या विभागामधला हा एक विभाग, ह्या साहित्यला प्रतिसाद न देण्याची घोडचुक करणे म्हणजे "दैव आलेय द्यायला आणि कर्म नाही घ्यायला" असा प्रकार आहे. तेव्हा ह्याला जरुर प्रतिसाद द्यावा.
ह्याचे पण २ प्रकार पडतात, पहिला प्रकार म्हणजे उगाच १-२ ओळीत काहीतरी खरडुन मग कोंबड्या झुंझवण्याची मजा पहात बसणारा प्रकार. मग विषय काहीही असला तरी तो मात्र ज्वलंत, धगधगता, व्यवस्थीत चिरफाड करता येईल असे असला म्हणजे आपले काम सोपे होते. आपण पहिल्या ५-६ प्रतिसादांची वाट पहायची, आपोआपच त्यात आरामत २ विरोधी सुर नक्की निघतात, मग १०-२०-३० / छापा-काटा करुन आपण कोणत्या बाजुला आहेत हे ठरवावे, एकदा का हा निर्णय झाला मग कसली भिती नाही. मात्र बाजु निवडताना आप्ले विरोधक जास्त असतील ही काळजी घ्यायला हवी. सुरवात करतानाच एखाद्या आधीच पडलेल्या आपल्या विरोधी प्रतिसादातले एखादे वाक्य निवडुन त्याला लगेच "स्पष्ट असहमत, हे वास्तवीक असे पाहिजे " ह्या अर्थाचा प्रतिसाद द्यावा.
उदा : जर चर्चा "निवासी /अनिवासी " असेल तर तत्काळ "आम्हाला आमचा देश प्यारा, भाकरीसाठी परकीयांपुढे शेपटी हलवणे आम्हाला मान्य नाही" ह्या अर्थाचे वाक्य ठोकुन द्यावे, मात्र हे करत असताना आपण हा प्रतिसाद "अमेरिका, युरोप, युके" इथे ऑफीसात बसुन लिहीत नाही ना ह्याची मात्र खात्री करुन घ्यावी, उगाच ४ लोकात शोभा होते ना. एकदा का हे जमले की आपोआपच "विरोधी प्रतिसादांचे आग्यामोहळ" अंगावर धावुन येते, तुम्ही जास्त काही करु नका, ओच तोच मुद्दा वेगवेगळ्या शब्दात मांडत रहा, म्हणजे असे की " आम्ही भारतातच राहुन मीठ भाकरी खाऊ, तुमचा पिझ्झा / पाश्ता तुम्हाला लखलाभ होवो किंवा म्हातार्‍या आईवडीलांची काळजी घेणे हे मला हिरव्या नोटांपेक्षा जास्त महत्वाचे वाटते किंवा तुमच्या प्रासादापेक्षा माझी झोपडीच मला प्रिय वगैरे वगैरे " असे प्रतिसाद टाकावेत. लोक अजुन खवळुन उठुन पानपानभर प्रतिसाद खरडतात, मग हळुच कुणाच्यातरी "ग्रीनकार्डावर टिका " करणारे पिल्लु सोडु द्यावे, चर्चा अजुन भडकते व लोक पुढे तुम्ही अजुन काय खरडतात / दिवे लावताय ह्याची वाट पाहतात ...
खुप कंटाळा आला की मग शेवटी " छ्या, काहीपण म्हणा पण आपल्या देशातच चिंग होऊस्तोवर बिअर पिऊन मग गाड्यावरची भुर्जी खाण्याची मजा काही औरच.... " असा प्रतिसाद टाकुन द्यावा, अजुन ज्वाळा भडकतात ...
लोक जर वैतागुन वैयक्तीक खरडी / व्यनी टाकु लागले तर शेवटी " माझ्याकडुन मी थांबतो, ह्यापुढे कसल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही " असा समारोप करावा. पण ह्या समारोपातच " जय हिंद, जय महाराष्ट्र " सारखी घोषणा टाकुन आपले देशप्रेम पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी दवडु नये.
हा हा म्हणता तुम्ही "वाद विवादातले प्रसिद्ध प्रतिसादकर्ते" होऊन जाल ...

आता दुसरा प्रकार म्हणजे "नमनालाच २ पाने भरतील एवढे लिखाण टाकुन काथ्याकुट", ह्यात जरा मुद्दे स्पष्ट असल्याने आपल्याला वाव कमी मिळतो पण यासाठी हार मानायची गरज नाही. शक्यतो लेख पुर्ण वाचु नये, वाचुन त्यातले जास्त काही कळेल असेही नाही. फक्त गाठीला असावेत म्हणुन २-४ मुद्दे नजरेखालुन घालुन ठेवावेत.
जर चर्चा "राजकारण" ह्यावर असेल तर त्वरेने "छ्या, राजकारण म्हणजे गटार" असे जाहीर करुन मोकळे व्हावे. मग सर्वात प्रथम ( जीव तोडुन २ पानं लेख खरडलेला ) लेखक भडकतो व मग बाकीचे, त्यांना व्यवस्थीत अंगावर येऊ द्यावे, मग पुन्हा एकदा "राजकारण्यांची औकाद, पक्षाचा इतिहास, नेतृत्व " ह्याविषयी एखादे आक्षेपार्ह्य वाक्य सोडुन द्यावे. म्हणजे " राहुल गांधीची अजुन पात्रता नाही / काँग्रेसमध्ये घराणेशाही सोडुन अजुन काय आहे दुसरे / बीजेपीने हिंदुत्व मुद्दा सोडुन द्यावा / राज ठाकरेने परतुनी घरट्याकडे जावे " असा सुर काढावा म्हणजे ह्याचा बाजुचे व विरोधकांचे पुन्हा ह्यावर जुंपते. तुम्ही मात्र शांत रहा, जमल्यास गुगलुन काही मिळाल्यास अजुन काही "जळजळीत सापडल्यास " ते "चु.भु.द्या.घ्या." ह्या टीपेसकट टाकुन द्यावे. चर्चा रंगत जाते ...

लोकांना जरी चर्चा लक्षात राहिली नाही तरी "उलटसुलट / भडखाऊ / आक्रस्ताळी " विधाने करणारे तुम्ही जरुर लक्षात राहता व हा हा म्हणता तुमचा "वितंडवादी भांडखोर प्रतिसादकर्ता " म्हणुन लौकीक वाढु लागतो.

*****
२. काव्यविभाग :
ह्यात प्रतिसाद देण्याआधी २ शक्यता विचारात घ्याव्यात.

पहिली म्हणजे तुम्हाला काव्य कळते का ?
ह्याचे उत्तर होय असल्यास कधीही पहिला प्रतिसाद "कविता आवडली" असा चुकुनही टाकु नये, मग तुमच्या काव्य समजण्याचा काय घंटा उपयोग ? त्याऐवजी चुका शोधण्याचा प्रयत्न करीत रहा, म्हणजे उदा. तुम्ही " आशय उत्तम आहे पण वॄत्तात / मात्रेत मार खाल्लात, शेवटच्या २ कडव्यात जरासा तोल ढासळला , चांगला प्रयत्न आहे पुढील प्रयत्नास शुभेच्छा, थोडीशी भडक वाटते आहे, यमक जुळवण्याचा नादात कवितेचा गाभा ढासळला , जर अलाण्या फलाण्याच्या जागी फलाणे फलाणे टाकले तर जमुन जाईल , आशय व्यवस्थीत समजला नाही, फारच विस्कळीत वाटली " ह्यापैकी एखादी प्रतिक्रीया पुन्हा एकदा १०-२०-३० करुन टाकुन द्यावी. मात्र नक्की काय करायला हवे हे "गुलदस्त्यात" राहु द्यावे, स्पष्टपणे सल्ला मुळीच देऊ नये.
तुम्ही फारच पट्टीचे असाल तर मात्र त्याच धाग्यात उत्तर देताना लगेच " प्रति कविता " रचुन दाखवावी व वरुन "हे जमते का पहा " असे ठेऊन द्यावे. मग मात्र "प्रतिभेला सलाम, तोडलतं, खल्लास " असे प्रतिसाद मुळ कवितेला यायच्या ऐवकी तुम्हालाच येतात व हा हा म्हणता तुम्ही "काव्य ह्या प्रांतातले दादा/अधिकारी " म्हणुन ओळखले जाऊ शकता.
असो.

आता दुसरा प्रकार म्हणजे तुम्हाला काव्यातले काहीही कळत नाही, तुम्ही चक्क माठ आहात तर काय करावे.
सर्वात प्रथम जी येईल त्या कवितेला वर टारझन म्हणतो तसे प्रतिसाद देत सुटावे पण ह्यात एक गोम आहे, इथे प्रत्येक प्रतिसादात " आम्हाला काव्यतले काहीही कळत नाही जे जगजाहीर आहे / आयला, आम्हाला कविता करायला फतरे जमत नाही / ज्या दिवशी कविता करत येईल त्यादिवशी मारुतीला २१ नारळं वाढवीन " हे पालुपद जोडुन द्यावे. मात्र तुम्हाला काव्यातले कळत नसुन तुम्ही असे प्रतिसाद कसे देता असा प्रश्नाल्यास सोईस्कर मौन पाळावे.
मधुन आधुन "कवितेल दुरुस्त्या" सुचवाव्यात, म्हणजे जसे की "ढळले च्या जागी कोसळले किंवा कळले कसे होईल ? / धावती गाढवे च्या जागी ...... जाऊ द्या, बोलण्यासारखे नाही ते " असे विचारत रहावे. तुमचे चुक आहे तुम्हालाही माहित असते पण कवी / कवयत्री मात्र जाम खुष होऊन स्पष्टीकरण वगैरे देतात व तुम्हाला भाव मिळतो, लगेच त्यांचे आभार मानुन मोकळे व्हावे. तुम्हाला काय व किती कळले ही बाब आधीही महत्वाची नव्हती व आताही नाही, आपले अस्तिस्व जानणुन दिल्याशी मतलब.
जर तुम्ही पुधच्या यत्तीतले असाल तर "खरडवह्यातुन" ह्या कवितेबाबत कवीशी "चर्चा" सुद्धा करु शकता, मात्र त्यासाठी थोडी हिंमत व थोडा अर्धवटपणाचा आव मात्र आणावा लागेल. ह्यातुन तुम्ही त्या कवी / कवियत्रीच्या "बडी लिस्ट / गुड लिस्ट " मध्ये सुद्धा शिरकाव करु शकता ...

तर कविता कळो अथवा न कळो प्रतिसाद हा दिलाच पाहिजे ...
असो.

( विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात ...
धन्यवाद ...! )

प्रतिसाद क्रमश :

( नियमाप्रमाणे ) अवांतर : मुळ लेखापेक्षा प्रतिसाद मोठ्ठा झाला काय ? बोंबलतेय आता पब्लिक

( नियमाप्रमाणेच ) अति-अवांतर : काय सहजशेठ, कसे काय ? सर्व काही क्षेम ना ?

------
छोटा डॉन

अवलिया's picture

17 Dec 2008 - 10:46 pm | अवलिया

मित्रा

तोडलस , जिंकलस... आणखीन काय काय असते ना ते केलेस...

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

अवलिया's picture

17 Dec 2008 - 11:39 pm | अवलिया

उदा : जर चर्चा "निवासी /अनिवासी " असेल तर तत्काळ "आम्हाला आमचा देश प्यारा, भाकरीसाठी परकीयांपुढे शेपटी हलवणे आम्हाला मान्य नाही" .....एकदा का हे जमले की आपोआपच "विरोधी प्रतिसादांचे आग्यामोहळ" अंगावर धावुन येते, ....." आम्ही भारतातच राहुन मीठ भाकरी खाऊ, तुमचा पिझ्झा / पाश्ता तुम्हाला लखलाभ होवो किंवा म्हातार्‍या आईवडीलांची काळजी घेणे हे मला हिरव्या नोटांपेक्षा जास्त महत्वाचे वाटते किंवा तुमच्या प्रासादापेक्षा माझी झोपडीच मला प्रिय वगैरे वगैरे " ....... "ग्रीनकार्डावर टिका " करणारे पिल्लु सोडु द्यावे, चर्चा अजुन भडकते व लोक पुढे तुम्ही अजुन काय खरडतात / दिवे लावताय ह्याची वाट पाहतात ...
..... मजा काही औरच.... " असा प्रतिसाद टाकुन द्यावा, अजुन ज्वाळा भडकतात ...
.....पण ह्या समारोपातच " जय हिंद, जय महाराष्ट्र " सारखी घोषणा टाकुन आपले देशप्रेम पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी दवडु नये.
हा हा म्हणता तुम्ही "वाद विवादातले प्रसिद्ध प्रतिसादकर्ते" होऊन जाल ...

हे सगळे मुद्दे अगदी मस्त घेतले आहेस. जसे काही माझ्याच मनातुन उचलले. लेखन कौशल्य आणि वादप्रभु्त्व सिद्ध करणा-या नपुंसक आणि वांझोट्या चर्चांसाठी तसेच फावल्या वेळची करमणुक हेच एकमेव उद्दिष्ट असलेल्या चर्चांसाठी याचा फार छान उपयोग होतो.

फक्त याचा तोटा असा होतो, की तुम्ही खरेच असे आहात असे समजुन लोक तुमच्याकडे तुम्ही घाउक द्वेष करणारे आहात असे समजतात व तुम्हाला टाळतात किंवा टाळु शकतात. हे होवु द्यायचे नसेल तर काय करावे किंवा केले पाहिजे या विचारात मी सध्या आहे.
अर्थातच तुला काही सुचत असेल तर कळव.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

छोटा डॉन's picture

17 Dec 2008 - 11:42 pm | छोटा डॉन

नपुंसक आणि वांझोट्या चर्चांसाठी तसेच फावल्या वेळची करमणुक हेच एकमेव उद्दिष्ट असलेल्या चर्चांसाठी याचा फार छान उपयोग होतो.

अगदी अचुक ...
केवळ करमणुक हेच उद्दिष्ट मानुन मी "ह्याचा" समावेश केला, बाकी माझ्याही मनात तसे काही नाहीच.
केवळ "गमजा" हेच उद्दिष्ट ...
असो.

की तुम्ही खरेच असे आहात असे समजुन लोक तुमच्याकडे तुम्ही घाउक द्वेष करणारे आहात असे समजतात व तुम्हाला टाळतात.

असे काही नाही हो नाना, कोण म्हणतो असे ?
सर्व काही क्षणिक हो, कोनीही सिरीअस घेत नाही ...

हे होवु द्यायचे नसेल तर काय करावे या विचारात मी सध्या आहे. तुला काही सुचत असेल तर कळव.

अगदी नक्की कळवीन ...
विचार करुन उद्या लिहतो, आता ( भारतात झोपायला ) खुप उशीर झाला आहे ...
पण चांगली आयडीया दिलीत, ह्यावरही जरुर लिहावे असे ठरवतो ...

------
छोटा डॉन

टारझन's picture

17 Dec 2008 - 11:03 pm | टारझन

बैंडविड्थ बोंबलणे कशास्नी म्हंत्यात त्ये कळाले !! बाकी काय बोलावे .... डाण्याने राहिलेली कसर "शब्दशः" पुर्ण केलेली आहे... काथ्याकुटातल्या कुटनिती (ज्या आम्हाला माहितीच नव्हत्या) परफेक्ट बाहेर पडल्यात ...
डाण्याच्या आणखिन एका तडाखेबंद प्रतिसादा करता टाळ्या

शब्दकोष रिता झाला आहे !!!

- (छोडा डॉण समर्थक) टारडॉण

अवलिया's picture

17 Dec 2008 - 11:11 pm | अवलिया

काथ्याकुटातल्या कुटनिती (ज्या आम्हाला माहितीच नव्हत्या) परफेक्ट बाहेर पडल्यात ...

असे लिहुन टारझन महाराजांनी आपल्या गाढ विद्वत्ता असुन सुद्धा अंगी असलेल्या विनय की नम्रतेचे जे दर्शन घडवले आहे ते पाहुन अतिशय बरे वाटले

काय हो चतुरंगशेट बरोबर आहे ना मी काय म्हणतो ते... गेले वाटते म्हणजे भासमान मधे हो... तुम्हाला काय वाटले?

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

धमाल नावाचा बैल's picture

18 Dec 2008 - 12:36 am | धमाल नावाचा बैल

" आम्ही भारतातच राहुन मीठ भाकरी खाऊ, तुमचा पिझ्झा / पाश्ता तुम्हाला लखलाभ होवो किंवा म्हातार्‍या आईवडीलांची काळजी घेणे हे मला हिरव्या नोटांपेक्षा जास्त महत्वाचे वाटते किंवा तुमच्या प्रासादापेक्षा माझी झोपडीच मला प्रिय वगैरे वगैरे "

हाण तिच्याआयला!! डानराव जहबहर्याच!!!

नानासाहेब, खाई त्याला खवखवे ही म्हण माहित आहे का हो? ;)

आपला

(म्हणीप्रेमी) बैलोबा

अवलिया's picture

18 Dec 2008 - 10:51 am | अवलिया

आणि अति शहाणा त्याचा बैल रिकामा (राहुन धमाल करतो) ही पण म्हण माहित आहे :)

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

छोटा डॉन's picture

17 Dec 2008 - 11:12 pm | छोटा डॉन

>> .... डाण्याने राहिलेली कसर "शब्दशः" पुर्ण केलेली आहे...
असहमत ..!
"पुर्ण केली " ह्या शब्दाला माझा आक्षेप आहे, आम्ही तेथे "क्रमशः" असे स्पष्ट लिहले आहे.
असो.

तुमचे ज्ञान व वाचन अर्धवट / अपुरे असल्याने ह्यापुढे तुमच्याशी वाद घालायची माझी इच्छा नाही तसेही ह्यापुढील तुमच्या कसल्याही प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही.

( हे भांडण नाही, उलट ह्यातुनच आम्ही तुम्हाला अजुन वाद घालण्याची एक युक्ती जाता जाता शिकवली हे ध्यानात आलेच असेल. असो. )

------
छोटा डॉन

आजानुकर्ण's picture

17 Dec 2008 - 11:13 pm | आजानुकर्ण

काय लिवलंय.. काय लिवलंय... काथ्याकूट फारच आवडला

आपला
(खोटा डॉन) आजानुकर्ण

अवलिया's picture

17 Dec 2008 - 11:14 pm | अवलिया

नक्कि का?

(खोटा कर्ण) अवलिया

अवलियाची अनुदिनी

आजानुकर्ण's picture

17 Dec 2008 - 11:15 pm | आजानुकर्ण

हो ना नाना

आपला
(टवळिया) आजानुकर्ण चेंगट

अवलिया's picture

17 Dec 2008 - 11:19 pm | अवलिया

आपला?
बर बर हरकत नाही :)

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

क्रमशः मालीकेतील एक सुंदर कलाकृती.

श्री छोटा डॉन यांच्या हुच्च अभिरुचीचे व प्रतिसादाचे अंतरंग उघडून दाखवण्याचे कौशल्याचे कौतुक करावे तितके कमीच.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

छोटा डॉन's picture

18 Dec 2008 - 5:09 pm | छोटा डॉन

>> पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
एवढ विंटरेक्ट दाखवल्या बद्दल आभार ...
पुढ्चा भाग टा़कला आहे ...
धन्यवाद ...!
http://www.misalpav.com/node/5164

------
( हलकट ) छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Dec 2008 - 10:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

डानराव, तुमची भास्नं करायची कला आमास्नी ठावकी व्हती पर तुमी येवडे मुद्देसूद आणि सुद्द, लांब परतिसाद लिवू शकता हे आमास्नी ठावं नव्हतं. सकालच्या पारीला हा परतिसाद वाचला, सहजरावही तुमावर खुस झाले आणि आमी हसून हसून खाली पडलो. (नशीब ऑफिसमेट सुट्टीवर आहे, नाहीतर त्याने येरवड्याला फोन लावला असताच!)
असो. तुमचे जे काही पोवाडे गायचे आहेत ते आम्ही तुमच्या खरडवहीत गाऊच (खरडवहीत कसं बरं गातात? :? ) पण तरीही तुमच्यासाठी एकदा स्टँडींग ओव्हेशन. (लिखाळ रागावेल बहुदा पुन्हा मी इंग्लिश शब्द वापरला म्हणून! ;-) )

प्रतिसादावर खरी प्रतिक्रिया: येऊ द्या, वाचते आहे; शेवटचा भाग आला की एकदमच उत्तर देईन म्हणते(/तो).

कशिद's picture

17 Dec 2008 - 11:24 pm | कशिद

किती मोठा लेख लिहिला आहेस टार्ज़न....

बाकि चालू द्यत

इनोबा म्हणे's picture

18 Dec 2008 - 12:06 am | इनोबा म्हणे

टार्‍या आणि डान्या दोघांनाही सलाम!

-इंटरनैशनल इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

18 Dec 2008 - 1:10 am | विसोबा खेचर

ता.क. लेख प्रक्षोभक , अश्लिल , व्यक्तिगत टिका करणारा किंवा अवांतर वाटल्यास उडवला तरी चालेल.आमचा हेतू अवांतरपणा कमी करण्यासाठी रिलेव्हंट प्रतिक्रीया गोळा करणे हा आहे

चालू द्या!

झकासराव's picture

18 Dec 2008 - 10:13 am | झकासराव

टार्‍या.
तुझ्याच लेखातील काथ्याकुट विभाग मधील
प्रतिक्रिया न. १ ते ८ सगळ्या घे.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

धमाल मुलगा's picture

19 Dec 2008 - 11:14 am | धमाल मुलगा

साल्या, शिल्लक काय ठेवलंय की नाही?
आता ह्यावर मी प्रतिक्रिया काय देऊ, डोंबल?

तोडलंस मित्रा...तोडलंस.....
काय लिहिलंयस रे.....एकदम चाबूक झालाय लेख :)

चतुरा's picture

21 Dec 2008 - 4:50 am | चतुरा

वरील सर्वांना घाऊक सहमत!

ब्रिटिश टिंग्या's picture

31 Dec 2008 - 6:04 pm | ब्रिटिश टिंग्या

तद माताय!
ज ह ब ह र्‍या!
हहपुवा!
सहमत!

(कोणे एके काळचा बर्‍यापैकी यशस्वी प्रतिसादकर्ता परंतु सध्या निवृत्त झालेला) टिंग्यासुमार!

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

लेख फार विचार पुव्अक लिहिला आहे. धन्यावाद!

विजुभाऊ's picture

19 Oct 2010 - 1:45 pm | विजुभाऊ

(कोणे एके काळचा बर्‍यापैकी यशस्वी प्रतिसादकर्ता परंतु सध्या निवृत्त झालेला) टिंग्यासुमार!
टिंग्याला हल्ली जळी स्थळी काष्ठी पाषाणी इनोच दिसतो

लेख वर काढत आहे. धुळवडींमधले काही अजून प्वाइंट्स अ‍ॅडवायला पाहिजे होते असं राहूनराहून वाट्टंय.

एकुलता एक डॉन's picture

13 Apr 2014 - 7:22 am | एकुलता एक डॉन

हो ना
आज्काल जुने लेख
वर काढ्याचे प्रमाण खुप वाढलीय

कवितानागेश's picture

13 Apr 2014 - 1:22 pm | कवितानागेश

मनाला भिडणारी 'चर्चा'! ;)
खास करुन हा भाग;
पहिला प्रकार म्हणजे उगाच १-२ ओळीत काहीतरी खरडुन मग कोंबड्या झुंझवण्याची मजा पहात बसणारा प्रकार. मग विषय काहीही असला तरी तो मात्र ज्वलंत, धगधगता, व्यवस्थीत चिरफाड करता येईल असे असला म्हणजे आपले काम सोपे होते. आपण पहिल्या ५-६ प्रतिसादांची वाट पहायची, आपोआपच त्यात आरामत २ विरोधी सुर नक्की निघतात, मग १०-२०-३० / छापा-काटा करुन आपण कोणत्या बाजुला आहेत हे ठरवावे, एकदा का हा निर्णय झाला मग कसली भिती नाही. मात्र बाजु निवडताना आप्ले विरोधक जास्त असतील ही काळजी घ्यायला हवी. सुरवात करतानाच एखाद्या आधीच पडलेल्या आपल्या विरोधी प्रतिसादातले एखादे वाक्य निवडुन त्याला लगेच "स्पष्ट असहमत, हे वास्तवीक असे पाहिजे " ह्या अर्थाचा प्रतिसाद द्यावा.

आमचे एक 'सर' स्वयंभू असल्यानं वरचा भाग न वाचता देखील अशाच पद्धतीचं कार्य त्यांच्याकडून घडत असतं. :)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2014 - 6:41 pm | अत्रुप्त आत्मा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2014 - 6:45 pm | अत्रुप्त आत्मा

"सरां'च्या" लाडक्या शिष्याच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!!! :p

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2014 - 6:46 pm | अत्रुप्त आत्मा

"सरां'च्या" लाडक्या शिष्याच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!!! =))