प्रवास (कथा)

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
15 Aug 2015 - 10:33 pm

हैद्राबादच्या इमलीबन स्टेशनवरून रात्री ११ वाजताची महाराष्ट्र परिवहन मंडळाची सोलापूरला जाणारी एस.टी. बस निघायच्या बेतात होती . काही प्रवासी शेवटच्या मिनीटाला चढत होते .त्यानंतर बस लगेच निघाली . सुरेश हा नुकताच या रूटवर कंडक्टर म्हणून बदली होउन आला होता . तो प्रवाशांना तिकीटे देण्यात गुंतला होता . काही नवख्या उत्साही प्रवाशांनी सुरेशला विचारले 'मास्तर , बस सोलापूरला कधी पोचते हो ? ' . गेले काही दिवस अनुभवलेल्या ट्रॅफिकमूळे सुरेश या प्रश्नाला उत्तर द्यायला फारसा उत्सूक नव्हता . त्यामुळे त्याने काहिशा निरुत्साहानेच ' पोचु सकाळपर्यंत . ते आता ट्रॅफिकवर आहे ' असे गूळमुळीत उत्तर दिले . बस हळूहळू शहराच्याबाहेर आली व कुकुटपल्ली पार करून सोलापुर हायवेला लागली . रात्री १२.३० च्या सुमारास झहिराबादच्या पुढे एका ढाब्यापाशी बस जेवणासाठी थांबली . सुरेश व ड्रायव्हर रायकर एक रिकामे टेबल बघून जेवण करू लागले . ड्रायव्हर रायकर हे या रूटवर बरिच वर्षे होते . त्यामुळे सुरेशची अवस्था लक्षात घेउन त्यांनी ' आज ट्रॅफिक ठिक आहे ' असा धीर दिला . बसचा पुढचा प्रवास सुरु झाला . रात्री ३ च्या सुमारास बस कर्नाटक प्रांतातील हुमनाबादला आली . साधारण पहाटे ४ च्या सुमारास बस महाराष्ट्र हद्दीत शिरुन नळदुर्ग येथे पोचली . ५ च्या सुमारास बस उमरगा येथे पोचली . आता बरयापैकी उजाडले होते . पहाटेच्या ताज्या हवेमुळे व प्रसन्न वातावरणामुळे सर्वांचाच प्रवासाचा थकवा पळाला होता व सर्वजण चांगलेच तरतरीत झाले होते . आतापर्यंतचा प्रवास व्यवस्थित व ट्रॅफिकचा फारसा त्रास न होता पार पडल्यामुळे सुरेशचाही वैताग निघून गेला होता . तो आता बसमधील प्रवाशांना स्वताहुन उत्साहाने सांगू लागला ' आता ६ पर्यंत सोलापूरला पोचतोय बघा . '

कथाअनुभव

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

15 Aug 2015 - 10:35 pm | किसन शिंदे

फुसका बार!

दुसर्‍या, तिसर्‍या ओळीतल्या प्रत्येक वाक्यानंतर कथा वळण घेईल असं वाटत होतं, पण कथा तर तशीच सरधोपट मार्गाने पुढे सरकते.

सिरुसेरि's picture

15 Aug 2015 - 10:43 pm | सिरुसेरि

या कथेमध्ये हैद्राबाद - सोलापूर प्रवासाबरोबरच , त्या रूटवर नव्याने आलेल्या कंडक्टरच्या मनोवस्थेचा निरूत्साहा पासून ते उत्साहापर्यंतचा प्रवास एका प्रवाशाच्या नजरेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे . त्यामुळे कथा व तांत्रिक बाबी याबद्दल मते , सुचना जरूर सांगाव्यात .

सिरुसेरि's picture

15 Aug 2015 - 10:49 pm | सिरुसेरि

कथेतील एक वाक्य असे बदलायचे आहे .
' आता आपल्या प्रांतात आल्याच्या जाणीवेमुळे , पहाटेच्या ताज्या हवेमुळे व प्रसन्न वातावरणामुळे सर्वांचाच प्रवासाचा थकवा पळाला होता व सर्वजण चांगलेच तरतरीत झाले होते .

हैद्राबाद पासून सोलापुरला येताना जाहीराबाद ढाब्यासाठी फेमस आहे बरोबर आहे मात्र हुमनाबादनंतर रुट गंडलाय. आधी उमरगा. त्याच्या आधीच महाराश्ट्र बॉर्डर सुरु होते. उमर्ग्यापासून एक तासाने नळदुर्ग येते. नळदुर्गपासुन सोलापूर १ तास.
अगदी डबडा बस असेल तर जेवणासहीत ७ तास लागतात. फास्ट बसला ६ तास. महाराष्ट्राचे कंडक्टर सोलापुरला पोहोचायचा परफेक्ट टाइम सांगतात. हैद्राबाद्ला पोहोचायचा शक्यतो एक तास वाढवून सांगतात. (उलट आंध्राचे कंडक्टर)

मास्टरमाईन्ड's picture

15 Aug 2015 - 11:52 pm | मास्टरमाईन्ड

आहे का?

सिरुसेरि's picture

16 Aug 2015 - 12:03 am | सिरुसेरि

क्रमशः नाही . धन्यवाद . तसेच 'नळदुर्ग' ,'उमरगा' या ठिकाणांच्या दुरुस्तीबद्दलही धन्यवाद .

तुडतुडी's picture

17 Aug 2015 - 3:45 pm | तुडतुडी

ह्यात कथा काय आहे ? नुसतं प्रवास वर्णन

सिरुसेरि's picture

17 Aug 2015 - 5:12 pm | सिरुसेरि

महाराष्ट्रातील बरेच लोक हैद्राबादला आयटी , नॉन आयटी मधील काम , व्यवसाय या निमित्ताने स्थायिक आहेत तसेच जाउन येउन आहेत . यामध्ये सोलापूरमधीलही खूप लोकं आहेत . बरेचदा वीकएंड , इतर सूट्टी , बिझीनेसचे काम पूर्ण झाले असेल तर यातील बरीच मंडळी नियमितपणे सोलापूरला रात्रीच्या बसने जातात . हा रूट हैदराबाद ( आंध्रा / तेलंगणा ) ते हुमनाबाद ( कर्नाटक ) ते महाराष्ट्र असा एकूण ३ राज्यांमधून जातो . जेव्हा एखादे वाहन परप्रांतातून प्रवास करीत असते , तेव्हा त्या वाहनाला त्या त्या स्थानिक राज्यांतील वाहनांकडून 'पूढे जायला जागा न देणे , आपलीच गाडी पूढे घालणे ' असे प्रकार थोड्याफार प्रमाणात, विशेष करून रात्रीचा प्रवास असेल तर सहन करावे लागतात . व थोडे नमते घेउनच , किंचीत तणावाखाली , आणी सावधपणे प्रवास करावा लागतो . यामध्ये कधी कधी थोडा जास्त वेळ जातो. एकदा वाहन आपल्या प्रांताच्या हद्दीत आले की ही स्थिती पालटते . व आता परप्रांतातील वाहने थोडे नमते घेउन , किंचीत तणावाखाली आणी सावधपणे प्रवास करतात . त्या त्या रूटवर नियमित प्रवास करणारया प्रवाशांना या गोष्टी माहिती असतात . त्यामूळे ते शक्यतो कंडक्टर , ड्रायव्हर यांना 'कधी पोचू' असे विचारत नाहीत . तसेच नवखा प्रवासी असेल तर त्याला आपण होउन या गोष्टींची माहिती देतात . या कथेतील कंडक्टर सुरेश हा नुकताच या रूटवर आला असल्याने तो या ट्रॅफिकच्या त्रासाला सरावलेला नाही . म्हणून त्या तणावामूळे तो सुरुवातीस प्रवाशांना ठाम वेळ सांगत नाही व थोडा अलिप्त राहतो. व नंतर त्याचा तणाव दूर झाल्यावर तो स्वताहून उत्साहाने प्रवाशांशी उत्साहाने बोलतो व बस पोचण्याची वेळ सांगतो . अशी हि कथा आहे .

कंडक्टर नुकताच या रुटवर बदली म्हणून आलाय . . . . . घ्या सांभाळून. कंडक्टर १२:३० ते ३, ३ ते ४ आणी ४ ते ५ झोपला असेल त्यामुळे प्रवास वर्णन कमी लिहिलय. असो. . कंडक्टरला परत हा रूट दिवसा मिळावा अशी आशा बाळगतो जेणेकरून मि. पा. साठी भरभरून प्रवास वर्णन लिहिले जाईल.

सिरुसेरि's picture

17 Aug 2015 - 6:37 pm | सिरुसेरि

कंडक्टर , ड्रायव्हर ही सुद्धा माणसेच असतात . त्यांनाही ताण तणाव , सुख - दुख्खे असतात .

मी-सौरभ's picture

17 Aug 2015 - 6:56 pm | मी-सौरभ

डियर सर,
तुम्ही पत्ता चुक्लाय हे 'मुपी' नाही 'मिपा' आहे

धन्यवाद :)

सिरुसेरि's picture

17 Aug 2015 - 7:23 pm | सिरुसेरि

तुमचेच फंडे क्लिअर करा . हा साधा तांबड्या छताच्या एस टी बसचा प्रवासाचा लेख आहे . तुम्हा हुच्च्भ्रू लोकांसारखा अमेरिकेच्या प्रवासाचा लेख नाही .

मी-सौरभ's picture

19 Aug 2015 - 11:21 pm | मी-सौरभ

मी हुच्चभ्रू
यस, याच साठी दिला होता वरचा प्रतिसाद
उद्या बॉस ला ह1बी साठी नॉमिनेट करायला सांगतो

द-बाहुबली's picture

17 Aug 2015 - 9:13 pm | द-बाहुबली

प्रवासवर्णन ? मग फोटो कुठे आहेत ?

चांदणे संदीप's picture

20 Aug 2015 - 12:28 am | चांदणे संदीप

कथेचा आशय आवडला. अजून खुलविता आली असती. कथेने वेग घेण्याआधीच तिचा प्रवास संपला!
@सिरुसेरी : तुमच्या प्रत्यक्ष पाहण्यातला होता का हा प्रवास व तो 'मास्तर'?
अनेक रात्री बसच्या लांबच्या लांब प्रवासात घालवलेला
Sandy

चौथा कोनाडा's picture

4 Sep 2020 - 1:15 pm | चौथा कोनाडा

+१

सिरुसेरि's picture

20 Aug 2015 - 2:19 pm | सिरुसेरि

धन्यवाद Sandy जी. हो. काही वर्षांपूर्वी , हैदराबादला असताना , 'हैदराबाद - सोलापूर ' हा रात्री ११ च्या एस टी बसचा प्रवास काही काळासाठी नियमितपणे झाला आहे . तेव्हातरी 'हैदराबाद - सोलापूर ' अशा खाजगी बसेस नसल्याने हिच एस टी बस सोयीची होती . तेव्हा फेसबूक , व्हाटसअ‍ॅप नसल्याने झोप लागेपर्यंत बाहेरचे ट्रॅफीक बघणे तसेच सहप्रवासी , कंडक्टर , ड्रायव्हर यांच्यातील संवाद ,त्यांची देहबोली निरीक्षणे हाच काय तो टाईमपास होता. त्यामूळेच जेव्हा नवीन कंडक्टर या बसवर आला तेव्हा प्रवासाची सुरुवात व शेवटचे ठिकाण जवळ येणे या काळात त्याच्या देहबोलीत पडलेला पॉसिटीव्ह फरक लक्षात आला . व कथाही यांच दोन टोकांवर , हा फरक केंद्रस्थानी ठेउन लिहावी असे वाटले . प्रतिक्रियांमध्ये मी सुरुवातीलाच एक खूलासा केला होता .
"या कथेमध्ये हैद्राबाद - सोलापूर प्रवासाबरोबरच , त्या रूटवर नव्याने आलेल्या कंडक्टरच्या मनोवस्थेचा निरूत्साहा पासून ते उत्साहापर्यंतचा प्रवास एका प्रवाशाच्या नजरेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे . "