(डिस्क्लेमर : घटना खरी पण सुरक्षा कारणास्तव खरी नावे देता येणार नाहॆत. सग्गळी नावे-अस्मादिकांच सोडून बदलली आहेतच.)
आता ही गोष्ट कुठे घडली म्हणता? तर इथेच मुंबैत. माझ्याच हपिसात. फक्त ही वाचून हसायचं नाही बै कुणी. हो म्हणजे चालतच नाही आम्हाला असलं काही ! तो अधिकार फक्त आमचाच ! तर ते असो.
माझं ऑफिस हे मोठ्ठाल्या सरकारी ऑफिसेस ने वेढलेलं आहे. मधेच आमचं आपलं पिटुकल तीन मजल्यांच. एक एन. जी . ओ. बाकीची सगळी अगदी ३०-३५ मजल्यांची. त्यामुळे आमची मूर्ती लहान पण कीर्ती लैच महान. लई टरकून असतात बाकीचे ऑफिस वाले आम्हाला. आता कळेलच.
तर झाल असं ! १४ ऑगस्ट ला ऑफिसमध्ये एक पत्र आलं. ते मी घेतलं आणि आमच्या कण्हेरी बाई ला दिलं. तिच्या नावाने आलं होतं. आता ही कण्हेरी बाई म्हणजे आमची इम्मेडिएट बॉस . वय वर्षे ७५ फ़क्त. (प्रचंड गोरी आणि भन्नाट दिलखेचक अदा करणारी . स्वत:ला लैच सुंदर आणि सर्वज्ञानी समजणारी आणि सतत आह , उः अशी उसासे टाकणारी. मस्त मस्त झगे घालून फ़िरणारी. थोडक्यात मोस्ट सेक्सी आणि ब्युटीफुल वूमन … अंहं , गर्ल बर का!) .
५ मिनिटात कण्हेरी बाई आली . सविता, हमे लेटर मिला. अब?
मी: क्या है उसमे?
बाई: बुलाव सबको. हम एक साथे बोलुंगा (ही पारशी आहे त्यामुळे हिंदी सुंदर आहे. )
मी सगळ्यांना बोलावलं . पत्र तिने सांगितलं म्हणून मीच वाचलं. तर आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आमच्या ऑफिस मध्ये बॉम्बस्फोट करण्यात येणार अशी कुणा शहाबुद्दीन शेख नामक अतिरेक्याने धमकी दिली होती त्यात. झालं. वातावरणच बदलून गेलं. बर्या च वेळेला अशा पत्रामध्ये काही दम नसतो असं जरी असल तरी काळजी ही घ्यावीच लागते. तोवर शेजारच्या नेव्ही ऑफिस मधून त्यांचा एक सेक्युरिटी वाला तसल्याच पत्राची प्रत घेउन आला. आम्हाला असं पत्र आले, तुम्हाला पण येऊ शकतं. we will have to be alert. असं सांगून तो जातोय तोवर दुसर्याा ऑफिस मधून तशीच अजून एक प्रत आली. त्याबरोबरच त्यांनी असाही निरोप पाठवला होता की आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेतोय. तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही सगळेच हादरलो. जरी मुंबईत हे नवीन नसले तरी घाबरणारच ना? बाई ला काय कराव सुचेना. आमचा executive सेक्रेटरी - हा दुसरा नमुना. बाई नंतर हाच. पण काम तिच्या आधीपासून करतोय इथे . कोणतीही जबाबदारी नाहीच घेणार. अरे मय क्या करेगा? हे त्याचं ब्रम्हवाक्य! बाई ने विचारलं - what to do now ? तर हा म्हणे इसमे मय क्या करेगा?
बाई वैतागून : वो हम जानता. लेकीन कुछ तो करना परेगा.
सेक्रेटरी : yaa , savita arrange for the emergency funds. (अस्मादिक accountant आहेत. )
बाई: फॉर व्हॉट ?
सेक्रेटरी: लगेगा तो किदर जायेगा? बँक बंद रहेगा.
बाई: सविता - --
मी: yes mam but how much ?
बाई: अबी बॉम्ब परते टाइम देखा नही हम. लेकिन कितना लगेगा?
मी: ?????????????? ( मनात- अग, मी इथे येउन ४ वर्ष झालीत फ़क्त. मला याचा कसा अंदाज असणार? बावळट )
बाई: I think 5 lacs will do (कळलं आता?)
सेक्रेटरी: अरे इतना कायको?
मी: then ?
सेक्रेटरी: वो मी कैसे बोलेगा?
मी: फिर arrangements कितने की करू मै?
सेक्रेटरी: अरे तू accountant है. मय क्या करेगा?
इथे माझ्या मदतीला आमचा युनियन लीडर आला. आणि अजूनच वैतागात भर.
यु. ली : देका सविथा? अब्बी इनके पास ५ लाख है. लेकीन स्टाफ को देने टाइम ये कंगाल. कैसे चलेगा? हम बूक हरताळ करेंगे.
मी: सर- टाइम क्या है? हम बाद मी बाते करेंगे ना. अभी मुझे finance arrage करना पडेगा.
यु. लि: : ठीक है. लेकीन बाद मे मै छोडूंगा नही . आप भी थोडा बोलो बाई को .
मी: हो
इतकं होईतो पोलिस कमिशनर ऑफिसमधून २ अधिकारी आले. हेच पत्र त्यांनाही मिळाल होत आणि शिवाय ४ अतिरेकी पळून मुंबईत आलेत अशीही बातमी त्यांच्याकडे होती. आमच्या सेक्रेटरीने ताबडतोब त्यांना माझ्याकडे पाठवलं. जबाबदारी नको. दुसरं काय. ते अधिकारी अगदी मस्त होते. त्यांनी व्यवस्थित आम्ही काय काळजी घायला हवी ते सांगितलं, ते काय काय करणार आहेत, त्यांची भूमिका काय, ते कधी येणार असा सगळं सांगतायत तोवर बाई केबिन मधून आली. o my God , Savita ?? ये लोग क्या करता इदर? आजही फूटेगा क्या बॉम्ब? we haven’t planned anything yet . आता ते अधिकारी हैराण.
ही-ही बॉस आहे तुमची? - त्यातला एका पोलीस अधिकारी - मला.
मी काही बोलायच्या आत ही कण्हेरी बाई- प्रचंड गोड आणि खोट हसून - yes , How can I help you ?????? मी फ्लॅट.
पो. अ. : no , we are here to help you .
बाई : आह, आय सी!!, सी, हम लोगो के पास तीन मझला हय. पहिले पे ब्लड बँक हय. तो उधर कुछ नही होना मंगता.
पो. अ. : ???????
बाई: भयाण आत्मविश्वासाने- येस. पहिले माले पे कुछ हुआ तो वी कॅन गो टू सेकंड फ़्लोर.
पो. अ. :हुं ???????
बाई: येस. वी हाव वन हॉल अल्सो. वी कान मूव देर इझिलि. आदर पीपल कॅन टेक अवर हेल्प!!
पो. अ. : ओके . वी विल सी.
बाई नखर्याaत केबिन मध्ये गेली .
पो अ. : ही वेडी आहे का?
मी: नाही … नाही……। नाही ती खूप शहाणी आहे अस फक्त तिला वाटत.
आता ते पोलीस गेले. आणि आमची धुमशान सुरु. पैशांची सोय करून झाली. आता सगळ ऑफिस बाईकडे तिच्या आदेशा वरुन केबिन मधे. मग डीझास्टर मैनेजमेन्ट च्या लोकांशी सुरु झाला बाईचा संवाद. काय करावे – त्याच आउट्पुट अस की सगळ्या लोकांना हेलमेट आणि आमच्या ऑफिसच चिन्ह असलेले पोशाख दिवसभर सक्तीने घालायला लावायचे. सविता, तनुजा, सुवर्णा- केस मोकळे सोडायचे नाहीत. आणि स्फोटाच्या वेळी तुमच्या अंगाखांद्यावर दागिने नकोत. उगीच मारताना ते कशाला वाया घालवायचे? आता मात्र मी, तनू आणि सुवर्णा टरकलोच. बाईचे आदेश सुरु – my Savita has arranged the funds. Now tell me, what to be purchased on higher prority? We have sufficient blood stored downstairs. We have 2 ambulances with doctors, we have basic medicines. Now?????
सेक्रेटरी: मैडम: बम भार (बाहर) फूटा तो बिल्डिंग को नुक्सान पहुचेगा.
बाई: करेक्ट- खिड़की की कांच फूटेगी क्या? (मी, तनू, सुवर्णा एकामेकीन्कडे बघून आता हसायला लागलो. त्यात पण तनू म्हणतेय बघ बाई - तू लाडकी. आत्ता पण म्हणतेय माय सविता. आम्हाला नाही म्हणायची कधी. बेक्कार कुठली. आम्ही गालात हसतोय ते पाहून.........
बाई- डोंट लाफ, में बी टूमारो इज युवर लास्ट डे. हू नोज?
आम्ही: अवर लास्ट डे? मीन्स?
बाई- वी मैनेजमेंट पीपल आर नॉट कमिंग टुमारो, बट वी विल प्रे फॉर यू.
च्यायला..
मग यूनियन मेंबर्स ची खूप हुल्लड्बाजी. शेवटी मैनेजमेंट येणार वर मांडवली झाली. भयानक फोनाफोनी चालू झाली. आसपासच्या सगळ्याच ओफिसेस मधे हेच वातावरण. आता हवा तंग आमची. इकडे वाहने आणायची नाहीत, कुठे काही बोलायच नाही,असं सगळं हजारदा सांगून झाल. मैनेजमेंट चे सगळेच लोक चक्रावलेले. नेमकं काय करावं ते माहीत नाही. त्यामुळे उच्च उपाय करण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदा काचांची दारं, खिडक्या.. यावर बाईचा उपाय – हम सेलोटेप लगायगा. अंदरसे. तो कांच फूटेगा नहीं. आता आम्ही म्हणतोय की अगं बाँबस्फोट होणार आहे. सेलोटेप काय? तर ती मुळातली हुशारच.. ताबडतोब म्हणाली. हम जानता. लेकीन बम भार फूटा तो उसका धमाके से कांच फूटके अपना स्टाफ मरने का नय ना. झालं. ३५००/- चा सेलोटेप सगळ्या दार खिडक्यांना आतून लावून झाला. भन्नाट उकडायला लागलं. करतोय काय? तोवर आमच्या बाईने एक शिट्टी आणली. ती वाजवायचा सराव केला तिने. कारण - हम ऐसा डाउन मार्केट काम किया नहीं हैय. मग आम्हाला बोलावून सांगीतलं की उद्या जेव्हा स्फोट होइल, तेव्हा मी ही शिट्टी वाजवेन. तुम्ही ज्या कुठल्या मजल्यावर असाल, तिथून धावत खाली यायचं, आणि समोरच्या बागेत धावत जायचं. You know, its so simple.
आमचा डॉक्टर मला तिथेच म्हणाला- या बिनडोक ला समजतं का? आपट बार नाही फोडणारे कुणी इथे. चक्रम बाई. समोरची बाग़, ही ओफिसेस राहतील का?
तनू: आई गं. माझ तर लग्न पण नाही झालं अजून. देवा...
सुवर्णा- गप गं, उद्या आपण राहतोय का नाही ते बघ आधी.
बाकीचे- पण उद्या सुट्टी घेतलीच तर नाही का चालणार? आम्ही घरी करू ना झेंडावंदन
बाई : नो.
तोवर माझ्याकडे शेजारच्या ओफिस मधून कुणीतरी आले. म्हणून मी सुटले.
थोड्या वेळात परत केबिन मध्ये. आता रंगीत तालीम चालली होती. शिट्टीच्या आवाजानुसार धावत सुटायचं. पूर्ण पोशाख, हेलमेट घालून. आई गं. त्यात परत पोलीस आले. त्यांनी सांगितल की डॉग स्क्वाड घेउन आलेत आणि पूर्ण ऑफिस ते आताच चेक करणार आहेत. आता मस्तच. हे एकच मला फार आवडतं. इतके हुशार असतात हे लोक्स की बस. तेवढ्यात एक ट्रेनर बरोबर एक छानसा डॉग आलाच. त्या ट्रेनर ने फक्त एक छडी हातात ठेवली होती. बास. त्या ट्रेनर ला मी विचारलं याचं नाव काय आहे? तो म्हणाला सीझर. मी म्हणाले हात लावू? तो म्हणाला बिनधास. पण खायला काहीही दयायच नाही. कौतुक म्हणून पण नाही. दुसर म्हणजे तुम्ही दिलंत तरी तो खाणार नाहीच. पण सांगितलं.
तो म्हणाला- तुम्हाला सवय असेल कुत्र्याची तर आम्हाला ऑफीस दाखवा. म्हणजे सीझर ला. मी खुश. आणि पोलिसांच्या डॉग बरोबर मी म्हणून बाकीचे अचंबित. मी त्या सीझर बरोबर पूर्ण ऑफिस फिरले. नवीनच अनुभव. तो अमक्या ठिकाणी जा अस ट्रेनर ने सांगीतल की बरोबर जायचा. तिन्ही मजले झाले त्याचे चेक करून. आम्ही आलो बाईच्या केबिन पाशी. तेव्हा ट्रेनर म्हणाला, सीजर. Work completed. Nice boy. Now give a kiss to this lady. आणि काय गम्मत, त्या सीज़र ने मस्त गालावर किस दिला मला. कसलं गोड होत ते. आणि तेव्हाच आली आमची बया. O god, your dog will kill my Savita.. .
ट्रेनर : नो मैडम, ही वोंट. बट से सीझर. नॉट डॉग. ही इज माय बॉय.
मग बाई- ओके. नाउ सविता. दो हस्पताल को फोन करके रखो. हमारा स्टाफ एडमिट होगा तो थोड़ा डिपोजिट भरो मंगता तो. आज इधरही रहना मंगता सबने.
आता हादरलो आम्ही. अगं हे काय? शेवटी समजावलं पोलीसांनी.
मग आमच्या बाईचे फोन चालू झाले. अक्ख्या दुनियेला. प्रे फॉर अस म्हणून. लांबून काय सगळे म्हणत होते काही नाही होत हो... पण घाबरलो तर होतोच. बघावं तिकडे पोलीसांची कुमक दिसत होती. आमची ऑफिसची सिक्युरिटी टाईट केलेली. अनेक पोलिस ओफिसर्स, नेव्हीवाले, याशिवाय काही दिसत नव्हतं. आत येणार्याम जाणार्याम प्रत्येकाचं तूफानी चेकिंग. बापरे. आणि आमची लाडो - शिट्टी, पोशाख यातून बाहेरच नाही. एकाच वेळी वैताग, हसू, भीती असं सगळं. तेवढ्यात राज भवन वरुन फोन. सगळे ठीक आहात ना? हा अजून एक विनोद. कसेबसे घरी गेलो.
दुसर्यां दिवशी पहाटे निघालो घरातून. १५ ऑगस्ट म्हणून. जबरी चेकिंग. आपण अगदी ख़ास सरकारी पाहुणे आहोत की काय असं वाटत होतं.
झालं!! कार्यक्रम संपला. बाईने सगळ्या लोकांचे, पोलिसांचे आभार वगैरे मानले. आणि मग त्यांना केबिन मध्ये बोलावून विचारती झाली-
हम इतना सब किया कलसे. लेकिन वो bombblast तो हुआ ही नहीं. आपको ठीक से जानकारी नहीं मिलती शायद. You will have to work hard Mr. Commissioner. See, I do every possible thing for my staff you know?
आणि, एक आश्चर्य की हो पाहिले मी याची देही याची डोळा – पोलीस कमिशनर हसले मिशीत. आणि म्हणाले- येस,ट्रू मैडम.
आणि म्हणाले- जा रे सगळे. अफवाच ठरली शेवटी. पण सगळे दमलात खूप.
हुश्श!!!!!!!!!!
प्रतिक्रिया
8 Mar 2015 - 9:16 pm | अजया
मस्त लेख सविता.आवडला!
8 Mar 2015 - 9:16 pm | विशाखा पाटील
मस्तच ! हा गंभीर प्रसंग खरा, पण त्याला प्रसन्न विनोदी शैलीने हाताळलाय. प्रत्येक दृश्य आणि पात्र डोळ्यांपुढे उभं राहिलं.
13 Mar 2015 - 7:37 pm | आरोही
+1 असेच म्हणते ...मजा आली वाचताना ..
16 Mar 2015 - 1:02 pm | इनिगोय
+१
:-D
9 Mar 2015 - 11:07 am | स्पंदना
हायला!!
पोलिस कमिश्नर "इसमे मय क्या करेगा?" म्हनला नाही?
:))
त्या बॉम्ब ब्लास्ट ने मरु अथवा नाही, पण लाडो आणि "इसमे मय क्या करेगा?" मुळे नक्की हसून हसून मरु गो बाय!!
9 Mar 2015 - 2:36 pm | स्नेहल महेश
हसून हसून पोट दुखलं
बाकी बॉस खरोखर खूप हुशार आहे
10 Mar 2015 - 2:23 am | मधुरा देशपांडे
आई ग्गं, मधेच वाचताना काटा येत होता अंगावर पण तेवढेच हसवले सुद्धा. लेखन शैलीने वेगळी मजा आणली.
10 Mar 2015 - 2:40 am | स्रुजा
:))))
ये सव्या भाय का ईश्टायील हय. त्या सीझरलाच घेऊन हिंडलीस ? धन्य आहेस. आणि तुझ्या त्या झगेवाल्या लाडक्या बॉस ला सांग म्हणावं आज नाही फुटला बाँब तर नाराज होउ नकोस. तुला हवं तर दिवाळीत आणून फोडू तुझ्या घरी, काचा बिचा फुटण्याची फुल्ल ग्यारंटी आपल्याकडे लागली. आणि हो, त्या मय क्या करू ला तिच्याकडे पाठव फराळ घेऊन तेंव्हा. हवं तर सीझर ला पण आपण नेऊ गंमत बघायला :lol:
10 Mar 2015 - 5:28 am | श्रीरंग_जोशी
धमाल विनोदी कथा आहे.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत खुदू खुदू हसत होतो.
10 Mar 2015 - 5:28 am | श्रीरंग_जोशी
धमाल विनोदी कथा आहे.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत खुदू खुदू हसत होतो.
10 Mar 2015 - 8:51 am | इशा१२३
धमाल हसलेय.जबरदस्त लिहिले आहेस.प्रसंग उभा राहिला डोळ्यापुढे.तुझी बॉस आणि तीला सहन करणारी तु...दंडवत दोघींना.
10 Mar 2015 - 11:37 am | गिरकी
सविता, खरंच ४-५ आपटबार आणून हळूच फोड बाईच्या आसपास… मज्जा यील :)
10 Mar 2015 - 1:05 pm | प्रियाजी
भिती, उत्सुकता, काळजी व बॉसच्या मूर्खपणाचा संताप अशा संमिश्र भावना हा लेख वाचताना जाणवल्या. मात्र तुमची लेखनशैली खूप्पच आवडली. संकटाच्या प्रसंगीही तुम्ही डगमगत नसाल याची खात्री पटली. असेच प्रसंग माण्साची खरी ओळख पटवतात.
10 Mar 2015 - 1:59 pm | सुप्रिया
हा.हा. धमाल अनुभव कथन. अर्थात त्या वेळेस तुम्हालोकांची नक्कीच तंतरलेली असेल.
10 Mar 2015 - 2:26 pm | कविता१९७८
मस्तच गं, धमाल विनोदी बॉस आहे गं तुझी. खरंच प्रसंग उभा राहीला डोळ्यासमोर
10 Mar 2015 - 5:25 pm | सस्नेह
मजेशीर स्टायलीत लिहिलायस, सविता.
11 Mar 2015 - 4:15 pm | सानिकास्वप्निल
सव्या छान लिहिले आहे आवडले :)
11 Mar 2015 - 10:08 pm | रेवती
काय लोक असतात. हम इतना सब किया, बॉम्ब ब्लास्ट हुवा नाही म्हणतीये ती बाई! आणि साहेबीण म्हणून अशा लोकांना ग्रेट असल्यासारखं वागवावं लागतं.
13 Mar 2015 - 1:24 am | जुइ
सुरेख लिहिले आहेस.
13 Mar 2015 - 5:01 pm | स्वाती दिनेश
सविता, एकदम खुसखुशीत लिहिला आहेस अनुभव..
स्वाती
13 Mar 2015 - 5:08 pm | मितान
खास सविता स्टाइल !!!
भन्नाटच लिहिलंयस ! :))
13 Mar 2015 - 9:49 pm | प्रीत-मोहर
=)) =)) गंभीर प्रसंग हलक्या फुलक्या पद्धतीने हाताळायची इश्टाईल आवडली सॅवी.
15 Mar 2015 - 7:58 am | मोदक
:))
16 Mar 2015 - 3:36 pm | पिशी अबोली
अगं मी किती हसतेय हे वाचून!!! =))
इतका गंभीर प्रसंग कसा रंगवलायस तू..
बाकी सीजर जामच आवडलेला आहे..
17 Mar 2015 - 7:00 pm | Mrunalini
वा.. सही... खुप हसले वाचुन. मस्त झालय लेख. :D
18 Mar 2015 - 12:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
पण कायपण असो, तुमच्या बैंचे यकदम बराबर है... बॉंबस्फोट झालाच नाही म्हणजे खर्ची घातलेला इतका पैसा आणि श्रम फुकट गेले नाय काय ? आँ ??
19 Mar 2015 - 12:17 pm | एस
हाहाहा! लयच म्हणजे लयच!
19 Mar 2015 - 12:22 pm | सविता००१
सगळ्याच प्रतिसादकांचे.
आता वाटतंय आमच्या कण्हेरीबाईला जर सांगितलं की बाई गं असा असा लेख लिहिला होता मी आणि तो आवडला बर्यापैकी माझ्या मित्रमंडळात तर दुनियेला सांगेल - मुरडत - देखा, हम जानता हम कितना फेमस हाय. but you people only don't want to understand me. हम एक उंगली पे नचाता है सबको. आणि स्वतःवर खूश होउन परत आमच्यावर डाफरेल.
आमचा सिक्युरिटी वाला तर त्या १४ ऑ. ला हिची फडफड ऐकुनच म्हणाला होता. मी नक्की सुसाइड करणार आणि हिचं नाव लिहून ठेवणार. डोक्याची मंडई करतेय नुसती :))
20 Mar 2015 - 7:33 am | हाडक्या
गोष्ट मस्तय हा.. :)
20 Mar 2015 - 4:05 pm | विभावरी
छान आहे कथा . ऑफिस चे आणि बॉसचे वर्णन भन्नाट !
21 Mar 2015 - 9:02 am | अंतरा आनंद
हा हा मस्तच आहे घटना रंगवण्याची 'स-स्टाईल.
ही कडीच सगळ्यावर.
14 Jan 2016 - 4:35 pm | मन१
काय चाल्लय काय.
9 May 2024 - 6:29 pm | diggi12
एक नंबर