थैमान

जयंत माळी's picture
जयंत माळी in जनातलं, मनातलं
4 Mar 2015 - 3:11 pm

स्वाइन फ्लूने सध्या सर्वत्र
थैमान घातले आहे.
सध्या महाराष्ट्रात स्वाइन फ्लू
झालेल्या रुग्णांचा आकडा
झपाट्याने वाढत आहे.

कसा आहे हा जीवघेणा व्हायरस. ? काय आहेत
स्वाईन फ्ल्यू
होण्यामागची कारणे जाणून ?
घ्या लेखातून.
स्वाइन फ्लू हा इन्फ्लूएन्झा रोगाचा प्रकार असून जो सर्वसाधारणपणे डुक्कर या प्राण्यात आढळणार्या विषाणूंमुळे होतो. सतत डुक्कर
या प्राण्याच्या संपर्कात
राहणार्या माणसांना या रोगाची लागण होऊ शकते. मात्र डुकराचे मांस खाण्याचा या आजाराशी काहीही संबंध नाही. विषाणूंचा प्रसार हा रोग्याच्या नाकातील व घशातील स्रव, त्याचा घाम
आणि त्याची थुंकी यापासून होतो.

स्वाइन फ्लू हा जुलै २००९ पासून चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. हा आजार तीव्र श्वसनाच्या अनेक लक्षणांसह आढळतो. मेक्सिकोने
केलेल्या परीक्षणात नवीन एच१ एन१ विषाणूंची नोंद करण्यात आली. आजवर याचा तीव्र प्रादुर्भाव मेक्सिको शहरातच झालेला आहे. अमेरिकेत मात्र याचा प्रादुर्भाव फारच कमी आहे.
एच१ एन१ नावाचा हा विषाणू लवकर पसरत असल्यामुळे एकाच वेळी अनेक
लोकांना याची लागण होऊ शकते. पण, आपल्याकडे स्वाइन फ्लूमुळे मृत्यूच होतो, असा गैरसमज पसरत चालला आहे. मात्र रुग्णाला उशिरा उपचार
मिळाल्यामुळे किंवा प्रतिकार
शक्ती कमी झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
योग्य वेळी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे या आजाराचा प्रसार वेगाने होऊ शकतो. किंबहुना योग्य उपचार आणि औषधांचा कोर्स पूर्ण केल्यास दहा दिवसांत हा आजार
बरा होऊ शकतो. असा होतो स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग
स्वाइन फ्लूचे विषाणू हवेत आठ
तास जिवंत राहू शकतात. केवळ
हवेतच नाही तर खुर्ची,
टेबलसारख्या ठिकानीही जिवंत
राहतात. त्यामुळे बाहेरून
आल्यावर हात न धुतल्यास आणि नाक, डोळे, तोंड
यासारख्या अवयवांशी संपर्क
आल्यास विषाणूंचे संक्रमण होतं. तसंच विषाणूबाधित
व्यक्तीच्या संपर्कात
राहिल्यानेदेखील हा आजार पटकन बळावू शकतो.
अशा व्यक्तीच्या खोकण्याने
किंवा शिंकण्यामुळे हवेत जे
तुषार उडतात, त्या तुषारातील
विषाणू धूलिकणवेष्टित स्वरूपात जिवंत राहतात. या विषाणूंचा हात- पायांशी संपर्क झाल्यास याचा संसर्ग होऊ शकतो.

स्वाईन फ्ल्यूची लक्षणं
स्वाइन फ्लूची बाधा झाल्यास सात दिवसांतच त्याची लक्षणं दिसू लागतात. सर्दी आणि ताप येणे, तापासोबत थकवा येत असल्यास गंभीर लक्ष समजून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सतत खोकणे, शिंकणे, घसा खवखवणे किंवा दुखणे, डोकेदुखी, थकवा येणे,थंडी आणि अशक्तपणा उलटय़ा होणे ही देखील स्वाईल फ्ल्यूची लक्षणे आहेत. स्वाईन फ्ल्यू कोणालाही होऊ शकतो
हा आजार कोणालाही होऊ शकतो. मात्र, वृद्ध व्यक्ती, पाच
वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये, गर्भवती महिलांमध्ये,
एचआयव्ही बाधित, अस्थमा किंवा मधुमेह यासारख्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

कसे होते स्वाईन फ्ल्यूचे निदान
प्राथमिक निदान हे लक्षणांवर
आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठवला जातो.
रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणे आणि राष्ट्रीय संचारी रोग
संस्था, दिल्ली या ठिकाणीच
प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था केली आहे.

स्वाईन फ्ल्यू पासून
वाचण्यासाठी हे करावे
हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.
गर्दीमध्ये जाणं टाळावे.
खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. किंवा पेपर धरावा. वापरून झाल्यावर तो पेपर फेकून
द्यावा. भरपूर पाणी प्यावं
पुरेशी झोप घ्यावी पौष्टिक आहार घ्यावा मल्टि व्हिटॅमिनचा गोळ्या
घ्याव्यात
वरीलपैकी कोणतीही लक्षणं
जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे
धाव घ्यावी.
लागण झालेल्या रुग्णांच्या जवळ (सहा फुटांपर्यंत) जाऊ नये.
हस्तांदोलन किंवा आलिंगन करु
नये.
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

समाजऔषधोपचारमाहिती

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Mar 2015 - 3:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उपयुक्त माहिती दिलीस रे जयंता.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही म्हणतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2015 - 3:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

(बहुतेक वयोमानाने असेल, पण) फारच विसरभोळ्या झालात माईसाहेब. ते...

"गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही हे म्हणतात."

... असे हवे, नाही का ? :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 4:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे कैलासवासी झाले ना त्यांचे? का पुनर्जन्म झाला?

एस's picture

4 Mar 2015 - 3:42 pm | एस

असेही ऐवजी असे हे असे त्यांना म्हणावयाचे असेल. तुम्हीपण ना, आले लगेच त्यांना त्यांच्या वयाची जाणीव करून द्यायला! :-D

जयंत माळी's picture

4 Mar 2015 - 4:32 pm | जयंत माळी

माईसाहेब कुरसूंदीकर हो गर्दीत जायचे नसतेच.

माई चे हे गर्दीत जायचे,एकदा असेच गर्दीत गेले आणी गर्दीस मिळाले.
आयकुन मी गर्द ..आपल ते सर्द झालतो.

आनन्दा's picture

4 Mar 2015 - 5:43 pm | आनन्दा

(rofl)

आकाश कंदील's picture

5 Mar 2015 - 12:13 pm | आकाश कंदील

बरोबर आहे माईसाहेबांचे अहो त्या गर्दीच्या ठिकाणी गेल्या नाहीत तर इतर लोकांना 'स्वाइन फ्लू' होणार नाहीना असे त्यांना त्यांच्या ह्यांनी सागितले असावे (बहुतेक आकाशवाणी झाली असावी त्यांच्या कानात)

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2015 - 8:52 pm | श्रीगुरुजी

इथे "वराहज्वर" या मूळ विषयाची चर्चा राहिली बाजूलाच, उलट माईसाहेबाशी संबंधित प्रतिसादांची भाऊगर्दी झाली आहे.

*LOL*

माईसाहेब, एकटादुकटा गर्दीत जाऊ नकोस रे आणि तुझ्या 'ह्यां'ना ही जाऊन देऊ नकोस. उगाच ह्या उतारवयात चेंगराचेंगरीत सापडाल आणि अनर्थ होईल.