गाभा:
मी बरेच दिवस राम गणेश गडकरीलिखित 'चिमुकली कविता' नावाची एक कविता शोधत आहे.
मला या कवितेतील एकच तुटक ओळ 'तिच्या हनुवटीवर गणितातले दशांश चिन्ह ' आठवते.
जी एं च्या 'माणस आरभाट आणि चिल्लर' या पुस्तकातही या कवितेचा उल्लेख आहे.
कोणाला पुर्ण कविता माहीत असेल तर कृपया इथे द्यावी.
प्रतिक्रिया
13 Nov 2008 - 8:39 pm | लिखाळ
मी थोडी शोधाशोध केली. राम गणेश यांच्या इतर काही कविता मिळाल्या पण आपल्याला हवी असलेली नाही मिळाली.
मिळाली तर लगेच दुवा देईनच.
मी ही कविता वाचली नाहीये. कुणी इथे दिल्यास मला सुद्धा वाचण्याची इच्छा आहे.
-- लिखाळ.
13 Nov 2008 - 8:56 pm | पांथस्थ
माझ्या कडे त्यांचा कवितासंग्रह आहे त्यातहि नाहि सापडली. मिळाली तर नक्कि कळवीण.
(कविताप्रेमी) पांथस्थ