लाल मास (चिकन) आणि बाजरीची भाकरी

Mrunalini's picture
Mrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म
14 Jun 2013 - 11:49 pm

साहित्यः

चिकन - १.२ किलो
कांद्याची पेस्ट - १ वाटी
सुकी लाल मिरची - १०-१२
धणे - १ चमचा
लसुण - ७-८ पाकळ्या
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
दही - २ चमचे
लिंबु - १/२
लाल तिखट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
धणे पावडर - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
लवंगा - ३-४
काळि मिरी - ३-४
दालचिनी - १ इंचाचा तुकडा
तेजपत्ता - २-३
हिरवी विलायची - २-३
मोठी विलायची - १
तुप - ४ चमचे
मिठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी

भाकरीसाठी साहित्यः

बाजरीचे पीठ - १ वाटी
गरम पाणी लागेल तसे
तीळ - १ चमचा
मिठ चवीनुसार

कृती:

१. ७-८ सुक्या लाल मिरच्या १ तास पाण्यात भिजवुन ठेवाव्यात. ह्या भिजवलेल्या मिरच्या, धणे व ४ लसुण पाकळ्या ह्याची smooth पेस्ट करुन घ्यावी. तसेच उरलेल्या लसणाच्या ४ पाकळ्यांची पेस्ट करुन घ्यावी.

p1

२. चिकनला १/२ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट, लिंबु, २ चमचे दही, २ चमचे कांद्याची पेस्ट, २ चमचे भिजवलेल्या मिरचीची पेस्ट व थोडेसे मिठ लावुन १-२ तास marinate करावे.
३. कढईत तुप गरम करावे. त्यात आख्खा गरम मसाला टाकुन परतावे. १ मिनिटाने त्यात उरलेली कांद्याची पेस्ट टाकुन निट परतुन घ्यावे.
४.कांदा चांगला परतल्यावर त्यात आख्ख्या ३-४ लाल सुक्या मिरच्या, आले-लसुण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे पावडर व उरलेली लाल मिरचीची पेस्ट टाकुन तेल सुटे पर्यंत परतावे.
५. मसाल्याचे चांगले तेल सुटु लागल्यावर, त्यात marinate केलेले चिकन्चे तुकडे टाकावेत. हे सर्व तुकडे वेगवेगळे ठेवावेत, जेणेकरुन प्रत्येक चिकनचा तुकडा हा खालुन परतला जाईल.
६. अशा प्रकारे चिकन सर्व बाजुन परतल्यावर, त्यात उरलेले marination व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे.
६. मिठ टाकताना हे लक्षात ठेवावे कि marination च्या वेळी सुद्धा थोडे मिठ टाकले होते.
७. चिकन चांगले परतल्यावर त्यावर झाकण ठेवुन मध्यम आचेवर चिकन १०-१५ मिनिटे शिजु द्यावे.
८. १०-१५ मिनिटात चिकन शिजलेले असेल. त्यात १/२ किंवा १ वाटी पाणी टाकुन परत ५ मिनिटे उकळी द्यावी.
९. सर्वात शेवटी त्यात १ चमचा गरम मसाला व १ चमचा लसुण पेस्ट टाकावी.
१०. गरमा-गरम लाल मास (चिकन)तयार आहे.

टिपः

१. इथे मला मटण मिळाले नाही त्यामुळे मी चिकन वापरुन केले आहे. मटण वापरताना सुद्धा सेमच पाकृ असणार, फक्त मटण शिजायला थोडे जास्त पाणी व वेळ लागेल.

p3

भाकरीची पाकृ:

१. बाजरीचे पीठ चाळुन घ्यावे. त्यात चवीनिसार मिठ टाकुन मिक्स करावे.
२. ह्यात पीठ भिजेल इतके गरम पाणी टाकुन, पीठ चांगले मळुन घ्यावे.
३. पीठातील छोटा गोळा घेउन, त्याची भाकरी थापुन घ्यावी.
४. भाकरी थापल्यावर त्यावर थोडे तिळ टाकुन, हलक्या हाताने किंवा एकदा लाटणे फिरवुन त्यावर बसवुन घ्यावे.

p2

५. गरम तव्यावर नेहमी प्रमाणे भाकरी भाजुन घ्यावी.
६. तयार झालेल्या भाकरीवर तुप लावुन, गरमा गरम लाल मास सोबत serve करावे.

टिपः

१. बाजरीचे पीठ हे फ्रेश दळुन आणलेलेच असावे.
२. पीठ जर जुने असेल तर, भाकरी निट थापता येत नाहीत व तसेच त्यांची चव सुद्धा कडु लागते.
३. पीठ भिजवताना चांगले गरम केलेले पाणी वापरावे, म्हणजे भाकरी निट थापली जाते.

p4

प्रतिक्रिया

निशिगंध's picture

15 Jun 2013 - 2:50 am | निशिगंध

एकदा करुन पहायला पाहिजे..

पैसा's picture

15 Jun 2013 - 9:52 am | पैसा

रंग बघूनच खलास! आणि ती तीळ लावलेली भाकरी पण जबरदस्तच आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2013 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुन्हा एकदा आवडले. मी तर ती भाकर आणि रस्सा चुरुन हाणेन. :)

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

15 Jun 2013 - 12:29 pm | विसोबा खेचर

............!!!!!!!!!!

सुहास झेले's picture

15 Jun 2013 - 1:57 pm | सुहास झेले

भारी !!

प्रतिज्ञा's picture

15 Jun 2013 - 9:42 pm | प्रतिज्ञा

सुन्दर :)

सस्नेह's picture

15 Jun 2013 - 9:52 pm | सस्नेह

बाजरीच्या भाकरीवर माझा लोण्याचा गोळा !

अग बनवल होतं मी लाल चिकन, काय भन्नाट चव होती.
तेच मसाले आपले पण जरा प्रमाण अन पदार्थात अ‍ॅड करायची पद्धत इकडे तिकडे झाली की किती चव बदलते.
मस्ताड!

खरच गं.. सही लागते एकदम आणि त्यात भाकरी सोबत तर भन्नाट्च लागते.

झकास ब्येत (बेत) आहे हा.

तीळ लावून केलेली भाकरी म्हणजे व्वा क्या बात है!
*dance4* *DANCE* :dance:

कर(संक्रांतीनन्तरचा दुसरा दिवस) साठी खूप चांगला मेनू आहे हा.

आपला लाडका: आयुर्हीत

Mrunalini's picture

7 Jan 2014 - 4:32 pm | Mrunalini

धन्यवाद!! :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jan 2014 - 6:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

कमाल रिप्रेझेंटेशन!!!, राजस्थानी कुझिन म्हणल्याबरोबर आपण कठपुतली पण अरेंज केल्यात!! सही है!!

Mrunalini's picture

7 Jan 2014 - 4:32 pm | Mrunalini

धन्यवाद!! :)

अमेय६३७७'s picture

7 Jan 2014 - 4:38 pm | अमेय६३७७

रेसिपी आणि सादरीकरण आवडले.

कपिलमुनी's picture

7 Jan 2014 - 5:09 pm | कपिलमुनी

चिकान तर आवडलेच आणि भाकरीची रेसिपी सुद्धा..
बादवे, भाकरी उचलुन टाकताना मोडते .. त्यावर टीप द्याल का ??

मला वाटते बाजरीचे पीठ जर जुने असेल तर भाकरी मोडते. तसेच पीठ मळताना त्यात २-३ चमचे गव्हाचे पीठ टाकले आणी ते गरम पाण्यात मळले तर जास्त फरक पडतो. एकदा करुन बघा.

कपिलमुनी's picture

8 Jan 2014 - 3:07 pm | कपिलमुनी

येत्या विकांताला भाकरीचा प्रथम प्रयोग करतो

अर्धवटराव's picture

8 Jan 2014 - 3:40 am | अर्धवटराव

तुझं प्रतकल्याण होवो मृणालिनी. पाकृ आणि फोटु बघुन जीवाला कसली चैन पडली म्हणुन सांगु.
इतकी सोपी करुन सांगितलीस पाकृ... मला पण जमेल असं वाटतय. हुरुप आला :)

Mrunalini's picture

8 Jan 2014 - 3:22 pm | Mrunalini

मंडळ आपले आभारी आहे. :D