गाभा:
पाककृती,भटकंती साहित्य वगैरे टिपिकल मराठी विषयांव्यतिरिक्त अर्थ विषयक घडामोडी आणि चर्चा ह्याकरिता मिपावर एक दालन उघडण्यात यावे जेणे करून अर्थ साक्षरता वाढीस लागेल असे मला वाटते. तसेच ह्यापूर्वी प्रसिद्ध झालेले अर्थविषयक धागे ह्या दालनात आणून रचून ठेवावेत असे वाटते.
सर्व क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करणाऱ्या मराठी माणसासाठी ते एकच क्षेत्र असे आहे जिथे तो "दादा" बनून वावरू शकतो तुम्हाला काय वाटते?
(जर हा धागा इथून उडवला गेला नाही तर द्या तुमचे मत आणि उघडा नवे दालन )
प्रतिक्रिया
8 Dec 2013 - 1:50 pm | पैसा
चांगली कल्पना आहे. पण अर्थविषयात एवढे धागे येतात का माहित नाही.
8 Dec 2013 - 2:33 pm | ज्ञानव
३५३ वाचने आणि दोनच प्रतिसाद.....
8 Dec 2013 - 2:32 pm | ह भ प
अन त्यात शंका विचारण्याची सोय असावी.. म्हणजे माझ्या सारख्या अडाण्याला चार गोष्टी कळतील..
8 Dec 2013 - 3:13 pm | आदूबाळ
असं दालन असू नये असं मला वाटतं. या दालनात दोन प्रकारचे लेख येऊ शकतात -
(प्रकार १) उत्सुकता म्हणून अर्थविषयांचा आढावा घेणारे लेख (उदा. युरोपियन फायनान्शियल क्रायसिस)
(प्रकार २) अर्थसल्ला देऊ पहाणारे लेख
प्रकार १ साठी मुख्य बोर्डावरच भरपूर संधी आहे. असे अभ्यासू लेख अधूनमधून येत असतात, त्यावर खूप छान चर्चाही रंगते. मिपावरचे मला माहीत असलेले अर्थतज्ज्ञ म्हणजे क्लिंटन, मोदक, संक्षी, वेल्लाभट. यांनी (आणि इतर अर्थतज्ज्ञांनी असेच उत्तमोत्तम धागे काढावेत ही विनंती.)
प्रकार २ ला माझा आक्षेप आहे. गुंतवणूक विषयक सल्ल्यांत मिपाने माध्यम म्हणूनही सामील होऊ नये असं माझं मत आहे. क्ष शेअरची हॉट टिप लागली आहे, य म्युचुअल फंड चांगला आहे, वगैरे भानगडींपासून मिपा लांबच बरं. (आणि हो, मला इतिहासही ठाऊक आहे.) समजा एकादा सदस्य "तो" शेअर घेऊन बुडला तर तो त्या टिपकर्त्याबरोबर मिपालाही दोष देईल. (मिपा धोरण काहीही असलं तरी.) मिपासदस्य म्हणून मला हे आजिबात आवडणार नाही.
समजा सल्ला गुंतवणूक विषयक नसला (उदा. करसल्ला) तरीही प्रश्नकर्त्याच्या परिस्थितीचं संपूर्ण भान ठेवूनच हा सल्ला द्यावा लागतो. त्यात आर्थिक परिस्थितीबरोबर कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती वगैरेही आली. हे तपशील उघडपणे किती जण देतील? अशा वेळी "तुमच्या विश्वासू सीए कडे जा" हा सल्ला सर्वश्रेष्ठ असतो. तो देण्यासाठी मिपाची गरज नाही - कॉमन सेन्सचा भाग आहे.
8 Dec 2013 - 4:52 pm | मुक्त विहारि
आंजावर टोपीवाल्यांची कमतरता नाही.
आपले मिपा अशा गोष्टींपासून दूर असलेलेच बरे....
8 Dec 2013 - 3:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
कल्पना छान आहे.
मात्र त्यात विषयाचे बंधन नसावे. हे एखाद्या विषयाची सोप्या भाषेतली शास्त्रिय माहिती देण्याच्या उद्देशाने काढलेल्या धाग्याचे वेगळे दालन असावे. कोणताही सर्वसामान्य मिपाकराला उपयोगी / वाचायला आवडेल असा विषय असावा (अर्थ, व्यवस्थापन, संगणक, इ.). मिपावर अनेक विषयांचे तज्ञ आहेत त्यांच्या ज्ञानाचा फायदा सर्व मिपाकरांना होईल. यामुळे मनोरंजनाबरोबर मिपा वाचकांचे विश्वासू प्रबोधनही होईल.
तेथे केवळ अभ्यासू लेख असावे. गंमत अथवा ललित लेख नसावेत... त्याकरिता मुख्य (स्वगृह) पान आहेच. यापानावर फार अवांतर अथवा उगिच केलेली टिंगलटवाळी असू नये.
8 Dec 2013 - 5:35 pm | चौकटराजा
मी मिपावर येऊन वर्षाहून अधिक काळ गेला आहे. अर्थ व राजकारण यात खरोखरच रस असलेले व गति असलेली मिपावर फार कमी लोक आहेत. काही आय डी कॉग्रेस द्वेषाने काही भाजपा द्वेषाने तर काही आण्ण्णा व केजरीवाल द्वेषाने देखील पछाडल्या सारख्या लिहित असतात. हे बरोबर नाही. अर्थ व राजकारण हे नर्म विनोदासाठी येथे येण्याचे विषय नाहीत.याचे भान क्लिंटन, विकास ई नी बर्यापैकी ठेवलेले दिसते. राजकारणात भाग घेणे व त्यात रस दाखविणे या दोन्ही गोष्टी वेगळया आहेत. रस हा घेतलाच पाहिजे. अर्थ कारणाचे तेच आहे. बरेच लोक गरीब रहातात कारण जुगार न खेळता देखील चोर्या न करता देखील श्रीमंत होता येते ते सांगणाराच कोणी नसतो.
अतिशय गंभीरपणे इन्कमटॅक्स ( की ज्या विषयी भल्या भल्यांच्या संकल्पना पूर्ण चुकीच्या असतात )या विषयावर लिहिलेला एकही लेख मी एथे वाचलेला नाही यात सारे आले.
8 Dec 2013 - 6:26 pm | ज्ञानव
अर्थ सल्ला म्हणजे शेअरची टीप इतका संकुचित विचार मी केला नाही. तुम्हाला काय "इतिहास" माहित आहे ते मला माहित नाही पण तो एक अनुभव म्हणजे सर्वस्व नव्हे. टीप देणार्याला नावे ठेवणे हा बुडीत गेलेल्या माणसाचा नव्हे तर प्रत्येक अपयशी माणसाचा स्थायी भाव असतो. पण असे मूर्ख जे आहेत ते कमी व्हावेत आणि तुमच्या माझ्यासारखे शहाणे वाढावेत हाच हेतू आहे.
अर्थसाक्षारता हाच माझा एकमेव उद्देश आहे. एखाद्या विम्याची पोलिसि मी का, केव्हा, कोणत्या वयाला, किती काळापर्यंत घ्यावी हे जर मला इथे समजले तर मला एक दिशा मिळेल केवळ शब्दबंबाळ तात्त्विक (?) लेखन करायचे आणि त्यावर प्रतिसादातून निरर्थक आरडा ओरडा करायचा इतपत मिपा लहान राहू नये. अर्थक्षेत्रातील घडामोडी सांगणारे लेख इंग्रजी, गुजराती मासिकातून येतात पण मी चवथी पास माणूस ते वाचू शकत नाही आणि मराठीत आजच्या घडीला एकही अर्थसाक्षर करेल असे पोर्टल नाही. ह्या क्षेत्राची terminologoy मला कळत नाही.
सिरियात फुटलेल्या बॉम्बचे आणि डॉलरचे काय गणित आहे कुणी सांगेल का ?
आज अल्गोरीधामिक ट्रेडिंग बद्दल गुजरती लोक पुढे नव्हे पार पुढे गेले आहेत आणि मला त्याबद्दल माहितीही नाही हे का होते.
मला वाटते आता जे कुणी अर्थकारण आणि अर्थासाक्षर्ते विषयी लिहू शकते त्यांनी लिहावे आणि मिपाचा कट्टा पानवाल्याच्या टपरीवर पान विडी ओढून पिंक टाकणारा कट्टा होऊ नये ते एक व्यासपीठ असावे जिथे विविध विषयाची माहिती मिळेल आणि मराठी माणूस किती विषयात गंभीर मुशाफिरी करू शकतो ते कळेल...
8 Dec 2013 - 7:07 pm | मंदार कात्रे
एक मुद्दा इथे आवर्जून माण्डावासा वाटतो तो म्हणजे जगभर पसरलेल्या केरळी मण्डळी साठी अनेक रेडियो केन्द्रे कार्यरत आहेत , त्यावरही दररोज सुमारे २ तास अर्थ व गुन्तवणूक विशयक माहिती आणि चर्चात्मक कार्यक्रम हमखास असतात. यास्तव असे सदर मिपा वर सुरू झाल्यास आनन्दच होइल... स्वागतार्ह सूचना!
9 Dec 2013 - 12:19 pm | शशिकांत ओक
ज्ञानव जी, पैसा युयोग्य मार्गांनी मिळवावा, तो कसा योग्य प्रकारे वर्धन करावा, याच्या वैधानिक युक्त्या सांगणारे धागे काढले जावेत.
नंतरच्या प्रतिसादातून आपण एका दणक्यात
असे वाचून .... पुनांच्या
या वक्तव्याची आठवण आली.
9 Dec 2013 - 12:23 pm | ज्ञानव
नको हो जी फक्त आपण ज्यांना घाबरतो त्यांच्या मागे लावावा उदा. बिबिजी वगैरे
मी साधा अर्थ यात्री आहे. अपरिपक्व आहे म्हंटले तरी वावगे होणार नाही पण फोकस्ड आहे निदान आता तरी....
धन्यवाद
9 Dec 2013 - 3:10 pm | कंजूस
असे दालन हवेच .'भटकंती'चा बुकमार्क केला तसा त्याचा करून ठेवेन .
पेपर अथवा पुस्तकातील लेखावर शंका विचारून उत्तरे मिळत नाहित तसेच लेखकाला त्यात नवी माहिती टाकता येत नाही .
9 Dec 2013 - 3:15 pm | ज्ञानव
हा छान मुद्दा मांडलात
धन्यवाद
9 Dec 2013 - 4:43 pm | कंजूस
सामान्यांना काही खास सुरक्षित गुंतवणुकीची माहिती हवी असते उदा: पिपिएफ ,पोस्टातील एम आईएस ,इनफ्रास्ट्रक्चर बॉंड ,टैक्स वाचवणाऱ्या योजना इत्यादि.
तसेच काहीवेळा विमा योजनेकडेही गुंतवणूक महणून पाहिले जाते . यांची तरी चर्चा होण्यास हरकत नाही .
१९७८ मध्ये पिपिएफ जाहिर झाली त्यावेळी श्री ए एन शानभाग यांचे 'इन दि वंडरलैंड अव इन्वेस्टमंट ' हे पुस्तक आले होते .त्याची खूप चर्चा झाली होती .
10 Dec 2013 - 8:08 am | ज्ञानव
अनाहीतावरील सर्व भगिनींना विंनती की आपलेही मत इथे मांडा. "अर्थक्षेत्र" नावाचे दालन मिपावर हवे कि नको ? तुम्हाला काय वाटते?
संपादक मंडळासही नम्र विनंती की एकदा आपलेही मत इथे जाहीर करावे.कारण माझ्या दृष्टीने हा विषय अतिशय गंभीर असून अनेक मराठी बंधू-भगिनींना त्या विषयाची माहिती मिळणे आवश्यक आहे.
28 Dec 2013 - 12:35 pm | साती
मला जनरल माहिती असलेले लेख आवडतील.
गंमत अशी होते की आपण आपल्या क्षेत्रातली बेसिक माहिती ज्याला साक्षरताही म्हणू शकतो ती इथे द्यायचा प्रयत्न करतो आणि लोक फार व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न विचारतात असा माझा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आहे.
असे व्यक्तिगत सल्ले नेटकंसल्टेशन स्वरूपात देणे मला तरी आवडत नाही.
माहिती देणारा आणि फायदा घेणारा दोघेही व्यक्तिगत स्वरूपाच्या नसलेल्या मुद्द्यांची चर्चा करित असतील तर मला आवडेल.
28 Dec 2013 - 1:02 pm | ज्ञानव
मांडलेत. माझी हि हीच अपेक्षा आहे.
१००% मान्य. फक्त विनामूल्य सल्ले ही अपेक्षित असणे हा हि भाग आमच्या क्षेत्रात भरपूर आहे.
10 Dec 2013 - 2:05 pm | विवेक्पूजा
अर्थ सल्ला म्हणजे शेअरची टीप इतका संकुचित विचार मी केला नाही. तुम्हाला काय "इतिहास" माहित आहे ते मला माहित नाही पण तो एक अनुभव म्हणजे सर्वस्व नव्हे. टीप देणार्याला नावे ठेवणे हा बुडीत गेलेल्या माणसाचा नव्हे तर प्रत्येक अपयशी माणसाचा स्थायी भाव असतो. पण असे मूर्ख जे आहेत ते कमी व्हावेत आणि तुमच्या माझ्यासारखे शहाणे वाढावेत हाच हेतू आहे.
अर्थसाक्षारता हाच माझा एकमेव उद्देश आहे. एखाद्या विम्याची पोलिसि मी का, केव्हा, कोणत्या वयाला, किती काळापर्यंत घ्यावी हे जर मला इथे समजले तर मला एक दिशा मिळेल केवळ शब्दबंबाळ तात्त्विक (?) लेखन करायचे आणि त्यावर प्रतिसादातून निरर्थक आरडा ओरडा करायचा इतपत मिपा लहान राहू नये. अर्थक्षेत्रातील घडामोडी सांगणारे लेख इंग्रजी, गुजराती मासिकातून येतात पण मी चवथी पास माणूस ते वाचू शकत नाही आणि मराठीत आजच्या घडीला एकही अर्थसाक्षर करेल असे पोर्टल नाही. ह्या क्षेत्राची terminologoy मला कळत नाही.
सिरियात फुटलेल्या बॉम्बचे आणि डॉलरचे काय गणित आहे कुणी सांगेल का ?
आज अल्गोरीधामिक ट्रेडिंग बद्दल गुजरती लोक पुढे नव्हे पार पुढे गेले आहेत आणि मला त्याबद्दल माहितीही नाही हे का होते.
मला वाटते आता जे कुणी अर्थकारण आणि अर्थासाक्षर्ते विषयी लिहू शकते त्यांनी लिहावे आणि मिपाचा कट्टा पानवाल्याच्या टपरीवर पान विडी ओढून पिंक टाकणारा कट्टा होऊ नये ते एक व्यासपीठ असावे जिथे विविध विषयाची माहिती मिळेल आणि मराठी माणूस किती विषयात गंभीर मुशाफिरी करू शकतो ते कळेल...
>>>> १००% अनुमोदन....
झाला तर फायदाच होइल अस माझ मत....
10 Dec 2013 - 2:43 pm | ज्ञानव
आपल्या अनुमोदानाने हुरूप वाढतोय....पण काय माहित शेवटी ते संपादक मंडळाच्या हाती आहे.
25 Dec 2013 - 3:25 pm | ज्ञानव
25 Dec 2013 - 4:14 pm | अभ्या..
ज्ञानवराव,
आपल्या शेअर ट्रेडिंगच्या ज्ञानाविषयी पूर्ण आदर बाळगूनच हे लिहितोय.
अर्थशास्त्र म्हणजे शेअर सोडून बरेच काही असणार पण इथल्या निरिक्षणावरुन माझे तरी असे मत बनलेय हा चाकरमान्यांचा कट्टा आहे. जास्तीत जास्त सद्स्य हे नोकरदार, रिटायर्ड अथवा नोकरदार/गृहिणी आहेत. गुंतवणूक किंवा बचत ह्या दृष्टिकोनातून तरी किती करणार? ऑनलाइन सल्ल्याला कितपत किंमत देणार? बर तुम्हीच याची अनिश्चितता अन अभ्यास यावर जड जड शब्दात चर्चा करणार मग बेसिक कुतुहल असणार्याला काय कळणार? शेअरचे अन त्या धंद्याचे इतर पैलूसंदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला होता पण त्याचे हि उत्तर वेगळ्या पध्द्तीने शेअर ट्रेडिंग कसे केले जाते असे मिळाले. माझा मुद्दा असा होता कि हा व्यवसाय म्हणून कसा केला जातो, त्याला मदत करु शकणार्या कुठल्या गोष्टी ठरतात? याची उत्तरे मिळतील पण तसे ज्ञान मिळाले नाही.(उदा. मी दारुचा व्यवसाय करतो. एफेलार ३ वर लिकर घेऊन विकणे व त्या फरकावर समाधानी राहणे एवढेच बीअर बारचे अर्थशास्त्र नाही, ते वाईन शॉप झाले. पण बारचे ठिकाण, वातावरण, ग्राहकाची गरज, अधिकच्या सेवा (खाणे वगिअरे) त्यातल्या मनोव्रूत्ती, तंत्र्ज्ञानाची मदत, त्यातल्या रोजगाराच्या संधी, धोके, फायदे असा समग्र विशय हाताळला तर ते अधिक मनोरंजक ठरेल.)
असेच इतर अर्थशास्त्रातले ज्ञान उदा. एखाद्या नवीन व्यवसायाचा प्रोजेक्ट कसा करावा, त्याची उभारणी, त्याला आवश्यक कर्जे, त्यांचे दर, उपलब्ध्ता, बाजारपेठेचा अभ्यास, ब्रॅन्डीण्ग, अॅडाव्हर्टायझिन्ग, मार्केट ट्रेन्ड, त्या व्यवसायातले विविध अनुभव, मनुष्य्स्वभाव अशा गोष्टींचा जरी मनोरंजक पध्द्तीने आढावा घेतल्यास मिपाकरांना मनोरंजनाबरोबरच ज्ञान हि मिळेल असे मला वाटते.
एकूण पाहता अशा प्ध्धतीचे लिखाण मराठी कट्ट्यावर होईल असे मला तरी वाटत नाही तस्मात नवीन दालन वगैरे सोडा आहे त्या विषयांवर बर्यापैकी प्रतिसाद( ते पण टिपीकल ८ टक्के नव्हे ७.५ हो, किंवा रिलायन्स नको आयस्सीसीआय घ्या हो वगैरे टाइपचे) मिळाले तरी बस्स सध्या. :)
म्हणून इतक्यात हे राम नको, हरे कृष्ण मनोवृत्ती स्विकारा :)
25 Dec 2013 - 4:26 pm | ज्ञानव
म्हणून हे क्षेत्र कसे आहे? लिहितो यावर....
ह्याचा संदर्भ देऊ शकाल का?
25 Dec 2013 - 4:47 pm | अभ्या..
www.misalpav.com/comment/535700#comment-535700
25 Dec 2013 - 5:54 pm | ज्ञानव
तिथेच उत्तर दिले होते.
आणि त्याव्यतिरिक्त काही कुणी मार्केट मध्ये देत असेल तर ते नक्कीच चीटिंग आहे.
25 Dec 2013 - 4:52 pm | खेडूत
'हे राम' म्हणण्या इतकी वाईट अवस्था नाही हे निश्चित.
मात्र सर्वंकष गुंतवणूक हा विषय समजण्यासाठी किमान चारपाच लेखकांनी एकत्रित लिहिले पाहिजे. विविध बाजू आणि मते पुढे यावॆत. म्हणजे स्वतंत्र व्यवसाय वगैरे करण्या बाबत माहिती पण असायला हवी. अर्थ साक्षरता, मग गुंतवणूक, प्रगतीची मोजमापे, जोखिम, स्पर्धा-टिकून मोठे होणे वगैरे! (टप्प्या टप्प्याने येऊ द्या ) मग आपण त्या सगळ्यात कुठे आहोत ते समजणे आणि लक्ष्य ठरवता येणे ही पहिली पायरी असू शकेल.
मुळात गुंतवणूक हा अद्याप (दुर्दैवाने) प्रथमिक्तेचा विषय नाही. विम्यापेक्षा एक पायरी वरती आहे इतकेच. पुढच्या पिढीत मात्र हळू हळू जाणीव येतेय असे निरीक्षण आहे. बरेच पालक अर्थ जागरूकता वाढवताना दिसत आहेत.
28 Dec 2013 - 1:28 pm | अर्धवटराव
असा विभाग निघणे काळाची गरज आहे. मिपा केवळ फास्ट्फूड कट्टा नसुन इथे चवीबरोबर पौष्टीकता देखील नांदते. अर्थ, आरोग्य वगैरे स्वतंत्र विभाग बनायलाच हवे. कधि कधि अशा विषयांचे धागे इतर (अ/)परिपक्व धाग्यांमुळे मागे पडतात व विस्मरणात जातात. स्वतंत्र दालन इज मस्ट.
28 Dec 2013 - 1:31 pm | ज्ञानव
हे हे हे व्हूपी .....
जन रेटा लावा रे जोर लावा ......
संपादक भाऊ काहीतरी तर लिहा.....
28 Dec 2013 - 2:49 pm | अभ्या..
खच्चून विरोधासहित शुभेच्छा. :)
28 Dec 2013 - 5:12 pm | आदूबाळ
माझ्यापण...
28 Dec 2013 - 5:22 pm | ज्ञानव
इच्छा आणि त्या जर शुभच आहेत तर त्या ठेऊन घेतो.
28 Dec 2013 - 6:41 pm | नगरीनिरंजन
टेक्निकल अॅनालिसिस व शेअर टिप्स म्हणजे अर्थसाक्षरता नव्हे.
अर्थशास्त्रावर व अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावर, वेगवेगळ्या प्रवाहांवर अभ्यासपूर्ण लेख येणार असतील तर ठीक आहे.
आर्थिक गुंतवणूक हा वैयक्तिक मामला आहे आणि ती ज्याच्या त्याच्या भविष्याबद्दलच्या धारणांवर अवलंबून असावी, त्याची चर्चा चव्हाट्यावर करायची गरज वाटत नाही. गुंतवणूकीचे काही उद्दिष्ट्य नसताना निव्वळ पैसा वाढत राहावा म्हणून जाणकार लोकांनी केलेल्या उलाढाली वाचून कोणाचा फायदा होईल असे मलातरी वाटत नाही.
28 Dec 2013 - 7:45 pm | ज्ञानव
आणि एकमत पण तुम्ही मूळ धाग्या पासून ८ वी प्रतिक्रिया वाचलीत का ?
आपल्या संदर्भसाठी देतोय....
बाकी मला फक्त आणि फक्त चर्चाच त्याही ज्ञानवृद्धी करणाऱ्याच अपेक्षित आहेत. अन्यथा मला बरीच मेल्स आली ज्यात तांत्रिक विश्लेषणा बद्दल किंवा महिन्याला एक टीप द्या असे सांगण्यात आले.
पण....
28 Dec 2013 - 10:44 pm | आदूबाळ
तुम्ही ही प्रतिक्रिया रेफर करताय म्हणून एक स्मरण द्यावसं वाटतं:
या (व अशा) धाग्यांच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत शेअर्सच्या विषयावरील धागेच वाचनात आले आहेत.
29 Dec 2013 - 8:32 am | ज्ञानव
ते माझ्याही स्मरणात आहे. पण जे अवतरण तुम्ही दिले आहे त्यापासून २ ओळी पुढे मी जे म्हंटले आहे ते निदर्शनास आणू इच्छितो
मी स्वतः साठी वैयाक्तिक वेगळे दालन मला काढून द्या असा "बाल"हट्ट धरलेला नाही तर मिपावर जे कुणी अर्थ विषयक लिहू शकतात त्यांनी काही तरी "अर्थपूर्ण" लिहावे हि माफक अपेक्षा आहे. जर तुम्ही घराचे बजेट ह्या विषयावर लिहू शकत असाल तर तुम्ही त्या विषयावर लिहा. पैशाच्या बाबतीत जे तुम्हाला (वैयक्तिक श्री अदुबाळ ह्यांना नाही )कळते त्याबद्दल लिहा मी शेअर्स किंवा तत्सम कुठलेही ट्रेड आणि त्याचा streteji जाणतो मी त्याविषयी लिहीन. मी आयकर जाणतो मी कधीतरी त्याविषयीही लिहीन मी गुंतवणूक वाढवणे आणि त्याचा व्यवसाय करणे जाणतो कधीतरी ते हि लिहीन.
पण तुमच्या सगळ्या प्रतीक्रीयाना "अविश्वासाचा" दर्प येतो तो का? तुमच्या आर्थिक वेदना उलगडून सांगा मलमपट्टी जर मला नाही जमली तर कुणीतरी ती करेलच की. आणि......जाऊ देत सध्या एव्हढेच पुरे. नाहीतर तुमची "स्मरणवही"
"ज्ञानावला,आठवण करून देण्याच्या गोष्टी" ह्या हेड खाली भरून जाईल.
बाकी मला माहित नाही डॉलरचे काय गणित आहे ते अजून माहिती काढणे सुरूच आहे. आणि माहिती मिळाली पण जर त्याचे आकलन मला झाले नाही तर मी काहीही लिहू शकणार नाही हे हि तितकेच खरे.
कारण नुसते नेट वर वाचायचे आणि इथे छापून आणायचे हा माझा पिंड नाही.
29 Dec 2013 - 2:48 pm | आदूबाळ
व्यनि केला आहे.
28 Dec 2013 - 8:07 pm | मी-सौरभ
आणुमोड्न
29 Dec 2013 - 4:48 am | इन्दुसुता
अर्थसाक्षरता ही काळाची गरज आहेच. वर तुम्ही स्पष्ट केले आहे की या दालनात काय असावे हे तुम्हाला अभिप्रेत आहे... ते साध्य मनात ठेवून असे दालन येणार असेल तर स्वागत आहे.
त्यात अर्थसाक्षरतेसाठी काय वाचन करून माझ्यासारख्या लोकांना ज्ञान प्राप्त करून घेता येईल अशा स्वरूपाची माहिती सुध्दा असावी.
30 Dec 2013 - 11:04 am | कपिलमुनी
ज्ञानव भौ..
दालनाची वाट कशाला पहायची ?? लिहित रहायचे ..
राह मे चलते रहो .. कारवां बन जायेगा
30 Dec 2013 - 11:32 am | ज्ञानव
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण वेगळे दालन
१)एकाच विषयावरची माहिती संगतवार मिळेल त्यात इतर धागे मध्ये मध्ये येणार नाहीत.
२)एकाच विषयाची चार बुद्धिमंत, अनुभवी आणि माझ्यासारखे नवशिके एकत्र येतील तर वैचारिक विस्तार वाढेल.
३)अर्थ विषयक गैर समज असतील एखाद्याचे अगदी माझेसुद्धा तर ते दूर होतील.
५)एक नियमावली करून लेखन सीमित करता येईल.
असे बरेच काही (चांगले)डोक्यात आहे म्हणून.
का नको ?
१)ते शेअर्स पुरतेच मर्यादित राहण्याची भीती.
२)टिप्स देणे धंदा करणे सुरु
३)माझ्यासारखे अर्धवट कदाचित लोकांची दिशाभूल करून त्यांचे आर्थिक नुकसान करू शकतात म्हणून.
४)मीसळपाव बदनाम होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून.
५)कशाला तो अर्थसाक्षरतेचा उपद्व्याप? त्याने काय साध्य काहीच होणार नाही म्हणून
६)आम्ही "साक्षरच" आहोत म्हणून.
७)असे काही तरी वाचून कुणी गुंतवणूक बहाद्दर होत नसतो म्हणून.
८)मिसळपाव हे क्षण भर विरंगुळा म्हणून निर्माण केलेले संस्थळ आहे तिथे उगाच हे रुक्ष विषय कशाला म्हणून.
९)अर्थक्षेत्राबद्दल सर्व समावेशक लिहू शकतील असे लेखक आहेत का?असल्यास त्यांच्या अधिकाराची खात्री काय ?म्हणून
१०)जाऊ द्यात, उगाचच... नकोच
असे बरेच काही(??)डोक्यात आहे म्हणून.
अपेक्षित आहे कि
सर्वांनी चर्चा (वाद किंवा भांडण नव्हे) करून ह्यावर निर्णय घेणे.
30 Dec 2013 - 2:30 pm | अभ्या..
आपणच लिहिलेल्या प्रकटनाला 5 , गुन्तवणुकिवरिल लेखाना अनुक्रमे 11, 13,16 दालन हवे की नको या चर्चेला 40 अन पुल्देशपाण्डे धाग्याला 75 अशा प्रतिसाद संख्येवरून सन्स्थळाचि प्रकृती आपल्या ध्यानी आली असावी.
30 Dec 2013 - 3:11 pm | ज्ञानव
आणि वरील अवतरण तिरकस म्हणून न घेता आपण केलेल्या निरीक्षणाचे खरोखरच कौतुक वाटते म्हणून आहे.
30 Dec 2013 - 2:09 pm | सविता००१
मला तरी असं दालन हवं हे खरच वाटतं. त्याला वैयक्तिक क्न्सल्टिंगचे स्वरूप येउ न देता (जसं वर सातीताईने लिहिले आहे)काही चांगले ज्ञान मिळ्त असेल तर नक्कीच हे व्हायला हवं.
30 Dec 2013 - 5:36 pm | जेपी
आमचे पण अनुमोदन
1 Jan 2014 - 8:23 pm | विअर्ड विक्स
एखाद्या गोष्टीचा दर्जा हा त्यावरील प्रतिसादाच्या संख्येने नाही तर त्या लेखाच्या गुणवत्तेवरून ठरतो.... असो... ज्ञानव साहेब आप आगे बढो हम आपके साथ है..... नि हे सदन हरे राम व हरे कृष्ण यांसाठी नसून सरस्वतीची उपासना करून लक्ष्मीचे वरदान मिळ्वणारयांसाठी असावे अशी माफक अपेक्षा .
अर्थ क्षेत्र हे शेअर मार्केट पुरते मर्यादित नव्हे त्यास अनेक पैलू आहेत एकदा दालन खुले झाले कि इतर पैलू पण उलगडू शकतील....
2 Jan 2014 - 10:56 am | ज्ञानव
आणि मी शेअर्स बद्दल लिहिले तरी इतर कुणीतरी बँकिंग,बजेट,अर्थाशात्र ह्या किंवा तत्सम विषयावर लिहावे असे मनापासून वाटते.
9 Feb 2014 - 8:18 pm | ज्ञानव
ह्याचे काय झाले ? नवे दालन १ एप्रिल २०१४ पासून सुरु करा हो....अशी संपादक मंडळाला विनंती.
9 Mar 2014 - 8:32 am | ज्ञानव
ह्याला फक्त ८ लेखांसाठी नवे दालन आणि अर्थक्षेत्रसारखे महत्वाचे विषयाला काही नाही ?
एकूण अर्थाक्षेत्राबद्दल दखलही घेतली जाऊ नये ह्याचे वाईट वाटते.
10 Mar 2014 - 11:55 am | पिवळा डांबिस
श्री. ज्ञानवसर,
तुमच्या चांगल्या हेतूबद्दल मनात शंका नाही. तुम्ही तुमच्या मिपावरच्या एक वर्षाच्या वास्तव्याबद्दल लिहिलंत...
मी मिपावर पहिले काही मोजके आठवडे सोडता पहिल्यापासून, म्हणजे गेली सहा वर्षेतरी मिपावर सभासद आहे. त्यामुळे अर्थातच मिपाच्या इतिहासाचा साक्षीदारही आहे....
अर्थगुंतवणूक हा अतिशय वैयक्तिक विषय आहे. गुंतवणूकदाराची रिस्क घेण्याची क्षमता आणि नफा-नुकसान सोसायची तयारी या संदर्भात म्हणतोय मी. जी गुंतवणूक तुमच्या दृष्टीने गुलाबी असेल तीच गुंतवणूक कुणा दुसर्याच्या दृष्टीने धोकादायक असेल. मिपावर जनरल सेक्शनमध्ये गुंतवणूक विषयक धागे येण्यात काहीही गैर नाही, पण एक वेगळा भाग सुरू केल्यास त्यातील धाग्यांना गुंतवणूकविषयक सल्ला मानला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही हे मान्य कराल की गुंतवणूक करण्यासाठी त्या गुंतवणूकीचा सांगोपांग अभ्यास करणं (गुंतवणूक करण्याआधी!) हे अतिशय आवश्यक असतं. ते न करता जर कोणी धाग्यांवर किंवा सल्ल्यांवर अवलंबून गुंतवणूक केली आणि लॉस घेतला तर तो अप्रत्यक्ष दोषही मिपावर येऊ नये असं मला मिपाचा एक दीर्घकालीन हितचिंतक म्हणून वाटतं.
आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो (कारण इतर तरूण लोकांचं भवितव्य त्यावर अवलंबून आहे केवळ म्हणून) मी स्वतः गेली पंचवीस वर्षे तरी गुंतवणूक करत आलेलो आहे. या कालावधीमध्ये लाखो रुपयांचा लॉस (आणि गेन, खोटं कशाला बोला?) घेतलेला आहे. पण त्या प्रत्येक गुंतवणूकीमागे सतत अभ्यास केला आहे (तरीही काही ठिकाणी लॉस घेतला आहे हे विशेष!!). तुमचं हे वेगळं दालन मला "पी हळद,हो गोरी!" अशाप्रकारचं होईल अशी साधार भीती वाटते.
पाककृती, भटकंती, आणि काही प्रमाणात राजकारण सुद्धा, हे तसे निरूपद्रवी विषय आहेत. आर्थिक गुंतवणुकीचं तसं नाही. कुणी कुठे गुंतवणूक करावी हे तर आपण ठरवू शकत नाही. ज्यांना सल्ले हवे असतील त्यांच्यासाठी आंतरजालावर अनेक संस्थळं आहेत. पण मिपाने तरी असल्या चट मंगनी, पट ब्याह गोष्टींना अप्रत्यक्षरित्याही सहायक ठरू नये असं मला वाटतं.
अर्थात हे फक्त माझं आपलं वैयक्तिक मत, शेवटी सर्व नीलकांताच्या मनावर....
चूभूद्या घ्या...
10 Mar 2014 - 1:49 pm | प्यारे१
+११११
>>>पाककृती, भटकंती, आणि काही प्रमाणात राजकारण सुद्धा, हे तसे निरूपद्रवी विषय आहेत.
राजकारण, चित्रपट, क्रिकेट ह्यावर भारतामध्ये १२० कोटी 'तज्ज्ञ मते' मिळतील असं कुणीतरी म्हटलेलं आहेच.
बाकी 'मिपाचा' इतिहास वेगळा आणि 'मिपाकरांचा' इतिहास वेगळा असायला हवा ना? ;)
10 Mar 2014 - 4:24 pm | ज्ञानव
पण "मिपाकारांचा" इतिहास मिपाचा इतिहास घडवू देईल असे वाटत नाही.
मराठी माणसाचे दुर्दैव आहे. शेरेगर आम्ही डिझर्व करतो.
11 Mar 2014 - 12:02 am | आत्मशून्य
बाकी कोणी तरी फुकट लोकल प्रवासाची स्किम काढली होती ते काय प्रकरण होतं हो ?
अवांतरः- मिपावर अर्थविषयक दालन असावेच. मिपाला केवळ दंग्याचे बंधन नको.
11 Mar 2014 - 11:55 am | ज्ञानव
होते. भाइंदर आणि घाटकोपर इथे बरेच ऑपरेटर होते असे ऐकून आहे. त्रैमासिक पासच्या ३०-३५% रक्कम भरायची आणि तिकीट पास न काढता विरार ते चर्चगेट सगळीकडे विना तिकीट फिरा जर पकडले गेलात तर पैसे भरा पावती दाखवा आणि पावतीतील दंडाचे पैसे परत घ्या. कार इन्शुरन्स किंवा तत्सम सारखे.
ह्याहून विस्तारित नको.. कारण क्राईम बघणे, चर्चा करणे आणि ऐकणे म्हणजे क्राईमला प्रोत्साहन देणे असते असे माझे मत आहे.
11 Mar 2014 - 2:29 pm | सुबोध खरे
अशीच स्कीम उल्हासनगरला सिंध्यानी राबविली होती. पण एक दिवस मध्य रेल्वे च्या अधिकार्यांनी मनावर घेतले आणि सगळ्या अंबरनाथ गाड्यांमध्ये तिकीट तपासनीस मोठ्या प्रमाणात तैनात केले. पंधरा दिवसात ती स्कीम कोलमडली आणि ती तयार करणाऱ्या सिंधी माणसाचे दिवाळे वाजले. काळजी नसावी
11 Mar 2014 - 2:35 pm | वैभव जाधव
अस्ल्या स्कीमांची माहिती अर्थ्शास्त्राच्या नव्या दालनात यावी हिच इच्छा. ;)
माहीत नसते हो असले काही.
11 Mar 2014 - 2:43 pm | ज्ञानव
नको. पण सावधतेचा इशारा म्हणून तरी ती यायलाच हवी. आर्थिक गुन्हे अतिशय बेमालूमपणे मांजराच्या पावलाने होतात.
अगदी अलीकडेच एक आयकर बाबतची केस होती एका बाईला पुरुष म्हणून दाखवले आणि क्लेम नोटीस काढली. नंतर आयकर अधिकारी तिला म्हणाला "तुमचे लिंग बदलायला २५००० खर्च येईल." (ह्या पुढील त्याची भाषा इथे उधृत करणे शक्य नाही.) पण त्याच्या लिंगबदलाची पूर्ण व्यवस्था लाऊन दिली आहे.
10 Mar 2014 - 10:45 pm | उपाशी बोका
पिडाकाका, नवीन दालन नसावे, या मताशी आपल्याशी असहमत आहे. मीसुद्धा मिपावर पहिल्या दिवसापासून सभासद आहे आणि मिपाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. पण एकंदरीत, मिपावरील खेळीमेळीच्या आणि प्रामाणिक वातावरणाबद्दल मला शंका वाटत नाही, उलट अभिमानच वाटतो.
आर्थिक गुंतवणुकीचं ज्ञान असणे, ही आजची गरज आहे. त्यासाठी हातात आयते मासे देण्याऐवजी, मासेमारी कशी करावी हे शिकणे आणि शिकवणे अधिक गरजेचे आहे, असे मला वाटते. तशी तज्ञ मंडळीपण आपल्यामध्ये आहेत (उदा. क्लिंटन वगैरे). डॉ. खरे यांनी पण त्यांच्या एका लिंकमधे हाच मुद्दा मांडला होता की शाळांमध्येपण हा विषय शिकवला जात नाही. त्यामुळे होते काय की बरोबर काय आहे आणि चूक काय तेच कळत नाही. आर्थिक गुंतवणूक म्हणजे केवळ शेअर मार्केट नाही, तर इतर अनेक चर्चा महत्वाच्या असतात उदा. पैशाची किंमत महागाईने कशी कमी होते (NPV), स्टॉक्/बाँड्/डिबेनचर्स, सोने/स्थावर मालमत्ता, टॅक्स आणि त्याचे नियोजन, पीपीएफ, विमा, पेन्शन, फिक्स डिपॉझिट, रिटायर झाल्यावर किती पैसे लागतील याचा अंदाज आणि त्याचे नियोजन, इमर्जन्सी फंड, मुला/मुलींच्या शिक्षणाचा खर्च, लग्नकार्यासाठी पैशाची तयारी, आकस्मित खर्च (आजारपण, मोठी गाडी-दुरुस्ती), त्याची सोय (क्रेडिट कार्ड वापरू की फिक्स डिपॉझिट वगैरे). असे अनेक विषय असतात, ज्याची सरळ-सोप्या शब्दात मराठीमध्ये माहिती देणारी साइट माझ्या माहितीत तरी नाही.
माझ्यामते मिपावर गुंतवणूकविषयक सल्ला न देता, असे दालन चालवणे शक्य आहे. असा एखादा प्रयत्न करण्याआधीच तो हाणून पाडू नये, इतकेच म्हणावे वाटते.
10 Mar 2014 - 11:04 pm | पिवळा डांबिस
नाय रे बाबा, मी कोण बापडा हाणून पाडणार?
मी आपलं माझं मत सांगितलं...
जे काय करायचं ते नीलकांताच्या हातात आहे असंही सांगितलं...
गुंतवणूक या विषयावर तज्ञांनी लिहिलेलं खूप मटेरियल उपलब्ध आहे. ज्याला सांगोपांग अभ्यास करायचा आहे त्याला कोण कशाला अडवेल? पण माझ्या पहाण्यात अभ्यास करण्याऐवजी, शॉर्टकट वापरून नंतर हात पोळून घेतलेले अनेक आहेत. जरी धागाकर्त्यांनी टीप्स देणार नाही असं म्हंटलं (आणि ते खरोखरीच देणार नाहीत असा माझा विश्वास आहे) तरी वाचणारा काय निष्कर्ष काढेल हे आपण ठरवू शकत नाही. आणि जेंव्हा माणूस गुंतवणुकीत मार खातो तेंव्हा मी पुरेसा अभ्यास केला नाही म्हणुन मार खाल्ला असं म्हणण्याऐवजी, मला अमूकामूक ठिकाणावरून सल्ला मिळाला म्हणुन माझं नुकसान झालं असं म्हणतो. तो अप्रत्यक्ष दोष देखील मिपावर येऊ नये असं मला वाटतं.
आणि मिपाच्या जनरल सेक्शनमध्ये गुंतवणूकविषयक धागे टाकायला मी कुठे हरकत घेतोय? ज्याला ते धागे संग्रहणीय वाटत असलील तो पर्सनल बुकमार्क्स करू शकतोच की!! वेगळा सेक्षन केला म्हणजे या विषयावर दणादण धागे येतील असं थोडीच आहे?
बाकी माझं अजून काही म्हणणं नाही...
10 Mar 2014 - 3:06 pm | सुखी
अर्थकारणा साठी वेगळे दालन असायला हवे..
10 Mar 2014 - 3:11 pm | सुखी
सध्या स्वगृह आणि नवे लेखन यान्ची एकच लिन्क आहे. त्यातिल एक काढुन टाकता येइल.
10 Mar 2014 - 4:07 pm | ज्ञानव
श्री पिवळा जी,
वेगळे दालन म्हणजे शेअर्सच्या टिप्स देणारे दालन नव्हे हे मी वर सतत नमूद करत आलो आहे. विमा, आयकर,सेवाकर, अर्थ नियोजन (वैयक्तिक, व्यावसायिक, बँक्स,विश्वस्थ संस्था, एच यु एफ ) एखाद्या व्यवसायाचे अर्थकारण, लोकांचे पैसा, संपत्ती,अर्थशास्त्र ह्या बद्दलचे समज - गैरसमज------- यादी भरपूर आहे.
ज्या "इतिहासाचा" उल्लेख तुम्ही केलात त्याबद्दल मला आलेल्या व्य. नि.तून माहिती मिळाली. सुरवतीला मी त्याबद्दल अनभिज्ञच होतो. पण जेव्हा ते कळले तेव्हा दोन गोष्टींचे वाईट वाटले
१) जी घटना घडली ती घडू नये म्हणूनच साक्षरता हवी असा विचार करण्याऐवजी नकोच ते असा विचार आपण करावा हे कितपत योग्य आहे.
२) मी शेअर्सबद्दल लिहितो म्हणजे मी किंवा अन्य कुणीतरी त्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल की काय हा विचार ही दुखः दायकच आहे.(सबब आता मी ते बंद केलच आहे.)
आज अनेक माध्यमांद्वारे मिळणारी माहिती ही दिशाभूल करणारीसुद्धा असते म्हणून आपण माध्यमांना दोष देतो तसे उद्या कुणी मिपाला दोष देईल हा विचार जितका तीव्र आहे तितकाच मिपावरून जर योग्य माहिती आणि तीही माझ्या मराठीत (जी इतरत्र फार कमी उपलब्ध आहे.)मला मिळाली असती तर मी वेळीच सावध झालो असतो असे एखाद्याला वाटणे शक्य आहे. तसेच मिपावर चर्चा होऊन काहीतरी निष्पन्न होऊ शकते मात्र इतर मध्यामांद्वारे मिळणार्या माहितीची योग्यायोग्यता पडताळून पाहणे शक्य नाही जे इथे चर्चेद्वारे शक्य आहे.
राजकारण, भटकंती,पाक कृती जरी निरुपद्र्वी असले तरी ते वेगळ्या दालनातून का ? फक्त मुख्य धाग्यातच ते येऊ देत थोडक्यात तो पंक्तिप्रपंच नकोच.
झालेल्या लॉसबद्दल उल्लेख केला आहे तो का आणि कसा झाला त्यातून तुम्ही कुणाला सावध करू शकता का? कसे?
तुमचा अनुभव जर शेअर केलात तर इतर सावध होतील आणि होणार्या चर्चेतून नक्कीच अगदी नक्कीच काहीतरी चागले निष्पन्न होऊ शकेल. मिपावर बरेच सी ए असू शकतील त्यांनी काही अनुभव लिहून इतराना सावध करणे किंवा इतरांच्या ज्ञानात भर घालणे असे विधायक स्वरूपाचे थोडेसे कार्य करावे असे मनापासून वाटते.
11 Mar 2014 - 11:00 pm | पिवळा डांबिस
श्री. ज्ञानवसर,
सॉरी हां, वर उपाशी बोक्याला रिप्लाय दिला पण इथे खाली येऊन बघितलंच नाही, त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला उत्तर दिलं नाही, तरी राग नसावा...
'इतिहासा'ला बाजूला ठेवूया. कारण त्यावर इथे इतकी चर्चा झालेली आहे की अजून नवीन चर्चा करण्यासारखं काही शिल्लक नाही.
मी वर उ.बो.ला सांगितल्याप्रमाणे जनरल सेक्षनमध्ये असे आणि कोणतेही धागे टाकायला माझी काहीच हरकत नाहीये.
मी या प्रपोजलशी सहमत आहे... :)
तीच तर शिंची अडचण आहे ना. प्रत्येक वेळेची परिस्थीती वेगवेगळी असते, कारणं वेगवेगळी असतात हो. नाहितर पहिल्या लॉसनंतर मीच सुपरज्ञानी होऊन नंतरचे लॉसेस टाळले नसते काय? :)
असो. माझा काही अमुक एक कराच किंवा करूच नका असा हट्ट नाही. मी एकंदर मिसळपाव या संस्थळाच्या भल्यासाठी मला काय योग्य वाटतं ते एक मिपाचा हितचिंतक म्हणून सांगितलं. धोरण ठरवणारे आणि अंमलबजावणी करणारे अन्य आहेत.
पिडां म्हणे आता, उरलो उपदेशापुरता!!
:)
12 Mar 2014 - 9:26 am | ज्ञानव
हे उत्तर अपेक्षाभंग** करणारे आणि अस्वस्थ करणारे आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळची परिस्थिती वेगळी भासत होती, कारणे (!!!!!????) वेगवेगळी होती तरीही असे जे तुमच्या बाबतीत घडले ते इतरांच्या बाबतीत घडू नये आणि लोक वेळीच सावध व्हावेत हा विचार तुमच्या मनात रुजला नाही किंवा अजून ही रुजत नाहीये हेच मराठी माणसाचे दुर्दैव आहे. सुपरज्ञानी होण्या आधी ज्ञानी होणे आवश्यक असल्याने आपण त्या दृष्टीने एक पाउल तरी उचलुया असे वाटले नाही तर कठीण आहे आणि त्याही पेक्षा वेदनादायी दुखःद आहे.
आणि सुपरज्ञानी ह्या शब्दाने "नेसेन तर शालूच नेसेन नाहीतर ....." ह्याची आठवण झाली.
मराठी माणसाच्या ह्या उदासीन स्वभावाची कीव येते.
परप्रांतीय असोत कि अन्य कुणी जे आम्हाला टोपी घालून जातात ते आपण डिझर्वच करतो कारण पैसे, नफा म्हणजे लोच्या, फसवेगिरी अगदी वाईटच सगळे आम्हाला दिसू लागते.
नाटक राजकारण हे विषय बरे "निरुपद्रवी" तरीही शिरा ताणून बोलायला.
12 Mar 2014 - 11:35 pm | आत्मशून्य
टॅबु आहे की काय शंका नेहमी येते. जे व्हायचय ते होउदे झुकती है दुनीया झुकानेवाला चाहिये हेच खरे. आर्थीक बाबींवर मुक्त चर्चा हवीच हवी.
13 Mar 2014 - 12:24 am | पिवळा डांबिस
पण तुम्ही माझ्यावर कशाला नाराज होताय?
मी इथे मिपावर कुणालाही कोणत्याही विषयावर मग ते अर्थकारण असो की आणखी काही, लिहायला हरकत घेतलेली नाही. मी फक्त नवीन दालन सुरु करावं की नको या विषयावर माझं मत व्यक्त केलं. ठरवणारा मी नाही हेदेखील सांगितलं. आता आणखी काय करायला पाहिजे होतं? मी माझं मतही व्यक्त करू नये का?
हा गंभीर आरोप आहे. पिवळा डांबिस आयडीच्या मनात कधी काय रुजलं किंवा रुजलं नाही याची तुम्हाला काही कल्पना असण्याची सुतराम शक्यता नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात, तेंव्हा असा उगीच मोठा घास तोंडी नये घेऊ...
हेच मी माझ्या पूर्वीच्या प्रतिक्रियेत म्हंटलं होतं. आम्हाला कोणी टोपी घालून जात नाहीत, आपणच ती टोपी घालून घेतो पण गंडल्यावर दोष मात्र त्या परप्रांतीय की अन्य कुणी यांच्यावर लावतो. तसाच दोष मिपावर येऊ नये म्हणूनच मी खास दालन नको म्हंटलं होतं!
आयुष्यात शालू कधी नेसला नाही त्यामुळे ही म्हण माहिती नव्हती पण जर तुम्ही "खाईन तर तुपाशी..." असं काहिसं म्हणत असाल तर ते थोडंफार खरं आहे आमच्या बाबतीत! काही गोष्टींशी अजिबात तडजोड आम्ही करत नाही, मग त्यासाठी कितीही कष्ट/यातना पडल्या तरी बेहेत्तर!! :)
असो. तेंव्हा तुम्ही आमच्याविषयी काही विशेष अपेक्षाभंग वगैरे करून घेऊ नका. ज्या कारणासाठी पिवळा डांबिस या आयडीचा जन्म झालाय त्यात अर्थकारणविषयक लेखन हे बसत नाही. आतापर्यंत वर जे काही लिहिलं ते मिपाचं हित लक्षात ठेवून लिहिलं. चालकांपर्यंत ते पोचलं असणार याची खात्री आहे. यापुढील निर्णय त्यांचा. आणि तो कोणताही असला तरी राग नाही.
आणि तुमच्यावरही काही राग नाही....
13 Mar 2014 - 8:08 am | ज्ञानव
.
12 Mar 2014 - 9:33 am | ज्ञानव
** एकूण आपले लेखनातून दिसणारे आपले व्यक्तिमत्व,विचार आणि आपणास आलेले अनुभव त्याचे न केले गेलेले विश्लेषण वगैरे
15 Mar 2014 - 9:44 pm | आत्मशून्य
शेअर बाजाराचा वापर करून फ्रोड कसा करावा/ करतात :) यानुशंगाने एखादा लेख(माला) केस स्टडी येउदे.
16 Mar 2014 - 7:09 pm | ज्ञानव
हे मला माहित नाही. ट्रेड करताना होणार्या चुका मी लिहू शकतो कारण अनेक वर्षांचा संबंध आहे त्या गोष्टीशी; पण सध्या ऑडीट आणि कर विषयक कामात बर्या पैकी व्यस्त आहे. तेव्हा लेखमालेला थोडा वेळ लागेल.
16 Mar 2014 - 7:25 pm | आत्मशून्य
विविध बड्या धेण्डा काढून शेअर ट्रेडिंग व्यवस्थेच्या अभ्यासातून तांत्रिक त्रुटी मधून कसा फायदा उपट्ला जातो यावर प्रकाश हवा.
जसे समजा आधीच माहीत आहे उदया मोठा दहशतवादी हल्ला होणार आहे बाजार खाली जाइल तर अर्थातच शोर्ट सेलिंग करून अकल्पित फ़ायदा काढला जाईल. अशाच काही माहितीपर गोष्टी , व्यवस्थेतिल त्रुटी वगैरे वर प्रकाश टाकावा.