॥ मुलखेडचा खंडोबा ॥

अनिल तापकीर's picture
अनिल तापकीर in जनातलं, मनातलं
11 Nov 2013 - 1:23 pm

॥ ॐ मार्तंड भैरवाय नम:॥
मुलखेड, मुळशी तालुक्यातील मुळा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर खेडे. सगळीकडे हिरवीगार शेती, पाठीमागे आणि डाव्या बाजूला डोंगररांग डोंगरातील घनदाट झाडी, आणि उजव्या बाजूने गावाला वळसा घालून बारामहीने वाहणारी मुळा नदी
नदीकाठी शंकराची दोन सुंदर प्राचीन मंदिरे , गावाच्या मध्यभागी विठ्ठल मंदिर आणि थोडे खालच्या बाजूला ग्रामदैवत भैरवनाथ तेही मंदिर पुरातन,
आणि गावाचा पाठीराखा खंडोबा वरती डोंगरावर बसून गावाचे रक्षण करतोय. साधारणता बाराशे ते पंधराशे फुट उंचीचा खंडोबाचा डोंगर आहे. दक्षिणेच्या बाजूने सरळ चढण आहे तो भाग सर्व खडकाचा असल्यामुळे थोडा वृक्ष विरहित आहे परंतु डोंगराचा उत्तर आणि पश्चिम भाग हे घनदाट झाडीने व्यापलेले आहेत.
खंडोबाचे मंदिर पुरातन आहे ते कोणत्या काळात बांधले गेले आहे हे कोणालाच माहित नाही. परंतु मंदिर खूप सुंदर आहे. आतमध्ये खंडोबा, म्हाळसाई मार्तंड भैरव आणि इतरही काही सुंदर मूर्ती आहेत व बाहेर कासव आणि एक पडकी दीपमाळ आहे. वरती चढून गेल्यावर थोडीशी दमछाक होती. परंतु एकदा तेथे पोहचले कि मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहून सर्व शीण कुठच्या कुठे जातो. शिवाय थंड वाऱ्याने तहानही हरपल्या सारखी होते.
मुलखेड मध्ये खंडोबा, भैरवनाथ आणि शंकर हि एकाच देवाची तीन म्हणजे शंकराच्या अवताराची तिन्ही मंदिरे आहेत तीनही मंदिरे पुरातन आहे परंतु त्यांचा इतिहास कोणालाच माहिती नाही.
खंडोबा मंदिराची सेवा वंश परंपरेने गावाचे माजी पोलिस पाटील रघुनाथ नाना तापकीर ( पाटील) यांच्याकडे आहे. ते व त्यांची सर्व भाऊकी खंडोबाची सेवा करतातच परंतु सर्व गावही देवाच्या सर्व कार्यक्रमात भाग घेत असते. शिवाय घोटावडे गावाचे गुंडगळ बंधू हे हि देवाची मोठ्या भक्तिभावाने सेवा करतात.
खंडोबा देवाचे उत्सव चैत्र पोर्णिमा आणि नवरात्रीमध्ये साजरे होतात. चैत्र पौर्णिमेला पाटील घराणे एक खूप उंच गुढी (काठी ) सजवून वरती नेतात सर्व गावकरी भंडार खोबरे घेऊन वरती जातात. घोटावड्या गुंडगळ हेही काठी सजवून आणतात आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत भंडार खोबरे उधळून "येळकोट येळकोट जय मल्हार" चा गजर करतात.
नवरात्रीमध्ये नवही दिवस जागर होतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आता डोंगरावर जाण्यासाठी रघुनाथ तापकीर यांनी आणि काही भाविकांनी रस्ताही बनविला आहे. चारचाकी दुचाकी मंदिरापर्यंत नेता येते.
मुलखेडचा खंडोबा हे जागृत देवस्थान आहे. त्याची जो मनोभावे सेवा करतो त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. नुकताच मंदिराची दुरुस्ती करण्यात आली आहे. समोर एक पत्र्याचे शेड बनविले आहे. रंगरंगोटी करून नवीन कळस बसविले आहेत.
कळस संदर्भात एक घटना नुकतीच घडली आहे. कळस बसविल्या नंतर काही दिवसातच ते चोरीला गेले. राक्षसी वृत्तीच्या चोरट्यांनी कळस चोरले खरे परंतु खंडेरायाने त्यांना काहीतरी अद्दल घडविली आणि त्यांनी काही दिवसातच चोरलेले कळस पुन्हा मंदिराजवळ आणून टाकले.
वरील घटना हि जेजुरी येथे काही वर्ष्यापुर्वी घडलेल्या घटनेची आठवण करून देते. मुलखेड गावातील वयोवृद्ध सांगतात कि आपल्या गावाचा खंडोबा हा जेजुरीचाच आहे.

संपूर्ण महारा ष्ट्र चे कुलदैवत खंडोबा देशातही इतर खूप ठिकाणी आहे त्याची हि माहिती
खंडोबाची खालील स्थाने आहेत.[१०]

अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद जिल्हा)
आदी मैलार (बीदर जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ)
काळज (ता. फलटण)(सातारा जिल्हा)
जेजुरी (पुणे जिल्हा) (खंडोबा देवाचे मुख्य पीठ)
देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
निमगाव दावडी (पुणे जिल्हा)
पाली (सातारा जिल्हा)
पिंपळगाव निपाणी ता. निफाड जि. नाशिक
मंगसुळी (बेळगाव जिल्हा)
माळेगाव (नांदेड जिल्हा)
मैलार लिंगप्पा (खानापूर, बेळगाव जिल्हा)
मैलारपूर (यादगीर) (बेळ्ळारी जिल्हा)
शेगुड (अहमदनगर जिल्हा)
सातारे (औरंगाबाद जिल्हा)

प्रवासमाहिती

प्रतिक्रिया

चावटमेला's picture

12 Nov 2013 - 10:50 am | चावटमेला

छान माहिती.

मृगनयनी's picture

12 Nov 2013 - 1:52 pm | मृगनयनी

धन्यवाद अनिल'जी.... सुन्दर आणि मला उपयुक्त माहिती.... :)
:) आवडले!... येथे पुणे गावातून - पर्यायाने साधारण शनवारवाड्यापासून यायला किती वेळ लागतो? दुचाकी, चारचाकी, बस यांपैकी कोणते वाहन जास्त suitable आहे?

एक प्रश्न :- हे रघुनाथ तापकीर' आपल्या नात्यातले का ?

आमचं कुलदैवत पालीचा खंडोबा . पण खंडोबा बानू बाईच्या रुपावर भाळून तिच्या मागे फिरतो . आणि म्हालसाई असतानाही तिच्याशी लग्न करतो हे काही पटत नाही बा . आणि खंडोबा हा शंकरांचा अवतार आहे असं मानलं तर अजिबात नाही पटत . त्यामुळे कुलदैवत असूनही मला कधी भक्तीभावाने हाथ जोडावेशे नाही वाटले

सह्याद्रीवर लोककलांचा कुठलासा कार्यक्रम असतो त्यात पारंपारिक वाघ्या-मुरळी जागरणाची एक झलक दाखवत होते. त्यात मुरळी सांगत होती की, 'खंडोबाच्या पाच बायका..म्हाळसा वाण्याची, बानु धनगराची, फुलाई माळ्याची, रमाई (?) शिंप्याची नि चंदा बागवानाची'.

अनिल तापकीर's picture

12 Nov 2013 - 7:15 pm | अनिल तापकीर

सर्वांना धन्यवाद,
मृगनयनी जी धन्यवाद, चांदणी चौकापासुन फक्त १८ कि मी आहे मुलखेड पिरंगूट पासुन सहा किमी शनिवार वाड्यापासन युनिवर्सिटी रोडने पाषाण्,सुस, नांदे,चांदे,नि मुलखेड असा जवळचा रस्ता आहे फक्त पाऊन तास लागेल.आणि जायचे असेल तर मला कळवा तुमची सर्व व्यवस्था मी करू शकतो. कारण माझे ते गाव आहे नी डोंगरच्या पायथ्याला जरा अंतरवर माझे घर आहे. रघुनाथ तापकीर हे आमच्या गावचे माजी पोलीस पाटिल आहेत तसे आम्हीही तापकीर आहोत आमचे भाऊकीचे नाते आहे.
म्हैस्रावजी खंडॉबा हे शिवाचाच अवतार आहेत. तुम्हाला काही शंका असल्यास आनि आवड असल्यास त्या संदर्भातील पुस्तके वाचा

मृगनयनी's picture

12 Nov 2013 - 7:26 pm | मृगनयनी

धन्यवाद अनिल'जी.... खंडोबा हे आमचे कुलदैवत आहे. त्यामुळे मला खंडोबाविषयी पूर्ण माहिती आहे. फक्त आपण जे खन्डोबाचे मन्दिर आणि ठिकाण जे वर नमूद केले आहे, त्याबद्दल मी अनभिज्ञ होते. पण आपण दिलेली माहिती खरोखर माझ्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकते. त्याचबरोबर आपण दाखवलेल्या आस्थेबद्दल शतशः आभारी आहे. :)

बॅटमॅन's picture

14 Nov 2013 - 6:37 pm | बॅटमॅन

रा.चिं.ढेरे यांनी महाराष्ट्राचे लोकदैवत खंडोबा नामक एक छोटेसे परंतु अप्रतिम पुस्तक लिहिलेय. खंडोबा दैवताचा अथपासून इतिपर्यंत इतिहास फार रोचकरीत्या सादर केलाय. ते जरूर वाचावे अशी शिफारस करतो. मूलगामी अभ्यासाचा वस्तुपाठ ठरावे ते पुस्तक म्हणजे.

हे अजून कळलेले नाही…

बऱ्याच वेळेला वाचायला मिळते …
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत भवानी
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत अंबाबाई…. इत्यादी इत्यादी

कोणता न कोणता देव किंवा देवी कोणाचे तरी कुलदैवत असणारच ना!!!
आता तो संपूर्ण महाराष्ट्राचा असेल तर मग बाकीच्या देवांनी किंवा देवांसाठी काय करायचे?

की आपली एक बोलण्याची एक पद्धत, हे दैवत किंवा देवस्थान किती प्रसिद्ध आहे हे कळावे म्हणून!!!

बॅटमॅन's picture

15 Nov 2013 - 1:05 pm | बॅटमॅन

उत्तर तुम्हीच दिलेले आहे. बोलण्याची पद्धत :)

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Dec 2013 - 8:09 pm | llपुण्याचे पेशवेll

मी दक्षिण्काशी हे नाव कोल्हापूरकरांनी कोल्हापूरला, नाशिककरांनी नाशिकला, पैठण/औरंगाबादकरांनी पैठणला म्हणताना ऐकले आहे. हल्ली मी देख्यील पुण्याला दक्षिण काशी असेच म्हणतो. :)

बॅटमॅन's picture

16 Dec 2013 - 12:10 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी!!!

वाचण हि माझी नुसती आवड नाहीये. Its my passion . पण खंडोबा बद्दल वाचायची अजिबात इच्छा नाही. हो मी पण एका लेखात वाचला होता. बहुतेक सकाळ मध्ये आला होता तो लेख. खंडोबाला ह्या ५ बायका होत्या म्हणून. आणि त्यांना मिळवण्यासाठी त्याने केलेली नाटकं, बानुच्या मागे जायला मिळाव म्हणून म्हाळसा ला तो कसा फसवतो हे वाचून तर चीड आली . त्यात खंडोबा हा देव नसून १ अतिशय पराक्रमी सरदार होता असं लिहिलं होतं. मनी आणि मल्ल सारख्या दुष्टांना मारून तो लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. लोक त्याला देवाचाच अवतार मानू लागले. आपण नाही का शिवाजी महाराजांना शिवांचाच अंशावतार मानतो. सचिन तेंडुलकरला, रजनीकांतला सुधा लोकांनी देव बनवून ठेवलंय. तसंच काहीसं प्रकरण असावं.
श्री क्रीश्नांना १६१०८ बायका होत्या. पण त्या मागचा उद्देश उदात्त होता. खंडोबा जर शंकरांचा अवतार असतील तर असला थिल्लर पणा देव करू शकतो का?
महादेव मालिका जी सध्या life ok वर लागते त्यात बनू हि म्हल्साई ची मोठी बहिण दाखव्लीये. आणि तीच त्या दोघांच्या लग्नात पुढाकार घेते असा दाखवलाय. गंगा नुसती स्वताला शिवप्रिया म्हणाली तर पार्वती संतापून निघून गेली. मग हे ५-५ बायकांचं प्रकरण? अजिबात पटत नाही.

हा हा हा =)) बरं कृष्णाला १६१०८ बायका असल्या तरी त्यापैकी पट्टराण्या ८ होत्याच ना? १६१०० बायकांना नुस्ता आश्रय दिला हे ठीक, पण बाकीच्या ८ चे काय? म्हणजे कृष्णाने ८ बायका केल्या तर चालतात, खंडोबाने काय घोडे मारलेय आँ? शंकर विष्णू अन राम हे वगळले तर एकाधिक बायकावाले देवच अधिक. इंद्र तर बोलूनचालून भानगडसम्राट, गणपतीलाही २ बायका. एकापेक्षा जास्त बायका नकोत तर एकटा खंडोबा का वाईट?

मालोजीराव's picture

18 Nov 2013 - 3:34 pm | मालोजीराव

खंडोबा संस्थानतर्फे यांच्यावर अब्रू लुस्कानीचा दावा लावा

प्यारे१'s picture

18 Nov 2013 - 3:36 pm | प्यारे१

ते 'जनहितार्थ' टाईपचा शब्द राहीला काय रे मालोजी?

अन त्यात प्रतिवादीचे नाव 'म्हैस' च लावा ;)

त्रिवेणी's picture

16 Nov 2013 - 6:24 pm | त्रिवेणी

अनिल जी खुप खुप धन्यवाद या ठिकाणची ओळख करून दिल्याबद्दल. आता एकदा इथे नक्की येऊ. मंदिराजवळ झाडी वैगरे आहेत का? म्हणजे घरून येताना जेवणाचे डब्बे आणू.

अनिल तापकीर's picture

16 Nov 2013 - 7:08 pm | अनिल तापकीर

सर्वांना धन्यवाद,त्रिवेणीजी धन्यवाद्,आपल्याला माझ्या गावाचे देवस्थान आवडल्याबद्दल मंदीराच्या दक्षिणेला जंगलच आहे. आनी मंदीरच्या बाजुने देखील झाडी आहे.मस्त गारवा असतो.दुचाकी मंदीरापर्यंत जाते.आणि रविवारी येणार असेल तर मी ही भेटू शकतो कारण मी रविवारी गावालाच जात असतो.

चावटमेला's picture

18 Nov 2013 - 3:27 pm | चावटमेला

खंडोबाचे आणखीन एक स्थान - बाळे (जि. सोलापूर)

अभ्या..'s picture

20 Dec 2013 - 11:09 am | अभ्या..

खंडोबाचे आणखीन एक स्थान. जिथे पार कर्नाटकापासून आंध्रा तेलंगणातले भाविक आवर्जून येतात. मैलारपूर (नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हि मूर्ती चल आहे. लेखी कराराने वर्षातले ८ महिने अणदूर येथे (४ कीमी लांब) व ४ महिने नळ्दुर्गात असते. यात्रा याच कालावधीत असते. सध्या यात्रा जवळ आलीय. वृत्तांत येईलच :)

सुहासदवन's picture

20 Dec 2013 - 12:48 pm | सुहासदवन

हि मूर्ती चल आहे
म्हणजे काय?

मूर्ती स्वतःहुन चालत जाते की कोण घेऊन जाते त्या ठिकाणी?
मूर्ती स्वतःहुन चालत नसेल तर मग चल कशी?

परिंदा's picture

23 Dec 2013 - 1:00 pm | परिंदा

जी मुर्ती एकाच ठिकाणी प्रतिस्थापित असते, तिला स्थिर मुर्ती म्हणतात. पंढरपूरचा विठ्ठल, ही मुर्ती वर्षानूवर्षे एकाच जागी स्थिर आहे. बहुतेक सर्व ठिकाणी स्थिर मुर्ती असतात.

चल मुर्ती एकाच जागी स्थापित नसते, त्यामुळे ती हलवता येते. चल मुर्तीला भाविकच एका ठिकाणाहून दुसरी कडे घेऊन जातात. अश्या मुर्त्या खुप कमी आहेत.

पाषाणभेद's picture

24 Dec 2013 - 2:03 am | पाषाणभेद

>>>> सध्या यात्रा जवळ आलीय. वृत्तांत येईलच.....
अभ्या, लेका वृत्तांत येवूच दे पण त्या बरोबर यात्रेतली छायाचित्रे तुझ्या नजरेतली हवी रे! गुडीशेव रेवडी, मोठा पाळणा, आंगडी टोपडी घातलेले शेंबडे पोर, डोक्यावर बोचके घेतलेली नवूवारी साडीतली त्याची आई, तिरपी टोपी झालेला त्याचा बा, एखादी आजी, शेव, जिल्बी तळणारा हलवाई, बांगड्या भरणारी एखादी ताई.... कितीतरी छायाचित्रे माझ्या डोक्यात आहे.

सालं शहरात राहून या गोष्टी हातातून निखळून गेल्यात रे. येवूदे लवकर.

अर्थातच पाभेराव. तशीच येणार छायाचित्रे. :)
मला त्या यात्रेसंदर्भात ज़रा कमी माहिती आहे. ती मिळ्वुन येणार हां वृत्तांत.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2013 - 8:21 am | मुक्त विहारि

धन्यवाद

खंडोबा संस्थानतर्फे यांच्यावर अब्रू लुस्कानीचा दावा लावा

खुशाल लावा . भगवान शंकरांचा अपमान केल्याबद्दल मीच दावा लावते

आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या, नैतर म्हशींचा अपमान केल्याबद्दल पेटा संघटनेच्या वतीने मीच तुमच्यावर दावा लावतो.

आदूबाळ's picture

16 Dec 2013 - 12:45 pm | आदूबाळ

कपडे घालूनच लावा दावा. बारक्या बारक्या कारणांवरून पेटा-लेले लोक कपडे फेकून देतेत...

कपडे फेकण्यालाही हर्कत नाही, फक्त ते कंडिशन्स अप्लाय ;)

ज्याला राम , कृष्ण हे भगवान विष्णू चेच अवतार आहेत हे अजून कळल नाही त्याला त्या ८ पट्ट राण्या मागचा हेतू काय कललेला असणार? शिवाजी महाराजांना सुधा ८ राण्या होत्या कि. पण महाराज काय किवा श्रीकृष्ण काय कोणाही बद्दल चा आदर जरा सुधा कमी झालेला नहि. हे लोक दुसर्या स्त्री ला मिळवण्यासाठी आधीच्या स्त्री ला फसवून घर सोडून गेले नवते किवा एखादीच्या रूपावर भाळून रानोमाळ तिच्या मागे फिरत नवते .
खंडोबा ला ५ काय हजार बायका असल्या तरी आमचा काही म्हणणं नहि. फक्त त्याच्या मागचा उद्देश एवढा थिल्लर
असू शकतो का हा प्रश्न आहे . अकलेचे तारे तोडण्याआधी माझी प्रतिक्रिया नित वाचा .
किवा असहि असू शकत . वरती म्हणल्याप्रमाणे ह्या ४ बायका म्हल्साई च्या बहीनि , तिच्या सेविका किवा खंडोबा - म्हल्साला युद्धात मदत करणाऱ्या स्त्रिया असतील . पण लोकांना प्रत्येक गोष्टीत मनोरंजनात्मक कथा गुंफण्याची सवय असते तसं इथेही झाल असेल . ह्या युद्धात ज्या स्त्री पुरुषांनी मदत केली त्यांना वाघ्या मुरली म्हणलं जातं . खंडोबाच्या नावाने एखाद्या मुलीला सोडून द्यायचं , तिचं खान्डोबाशी लग्न लावायचं आणि तिला मुरळी म्हणून घोषित करायचं .हि प्रथा अजूनही सर्रास चालू अहे. अश्या लाखो बायका मुरळी असण्याच्या नावाखाली खंडोबाच्या गळ्यात बांधण्यात आलेल्या आहेत

ज्याला राम , कृष्ण हे भगवान विष्णू चेच अवतार आहेत हे अजून कळल नाही

माझ्या कुठल्या प्रतिसादातून तुला असं वाटलं की मला अवतार वैग्रे कन्सेप्ट माहिती नाहीत?

खंडोबा ला ५ काय हजार बायका असल्या तरी आमचा काही म्हणणं नहि. फक्त त्याच्या मागचा उद्देश एवढा थिल्लर
असू शकतो का हा प्रश्न आहे .

मग एक सांग, सुभद्रेच्या रूपावर अर्जुन भाळला नाही का? थिल्लर कुठचा. तेही सोड, देवाधिदेव इंद्राने अहल्येचा भोग घेतलाच ना गौतम ऋषींचा वेष घेऊन? मुद्दा खंडोबाच्या समर्थनाचा नाहीये, बाकीच्यांचं तुला का दिसत नै हा आहे.

खंडोबाच्या नावाने एखाद्या मुलीला सोडून द्यायचं , तिचं खान्डोबाशी लग्न लावायचं आणि तिला मुरळी म्हणून घोषित करायचं .हि प्रथा अजूनही सर्रास चालू अहे. अश्या लाखो बायका मुरळी असण्याच्या नावाखाली खंडोबाच्या गळ्यात बांधण्यात आलेल्या आहेत

हे अर्थातच चूक आहे. पण याचे समर्थन मी कुठे केलेय? मूळ प्रतिसाद काय, तुझे अर्ग्युमेंट काय, नक्की कशावर चर्चा चाललीये ते तरी ठाऊक आहे ना?

मी कधी असं काही वाचलं नाही कुठे?

बॅटमॅन's picture

20 Nov 2013 - 8:37 pm | बॅटमॅन

आँ??? शिवचरित्र वाचा की हो, लै वेल नोन गोष्ट आहे ती.

सूड's picture

20 Nov 2013 - 9:19 pm | सूड

ब्याट्या, अरे मिपा परंपरेनुसार निस्तं 'अभ्यास वाढवा' म्हणायचं अस्तंय रे !!

मृत्युन्जय's picture

18 Dec 2013 - 1:19 pm | मृत्युन्जय

शिवाजी महाराजांना ३ उपस्त्रिया होते असे मध्ये कुठेतरी वाचले होते. हे खरे आहे का? ही उपस्त्रिया काय भानगड असते?

उपस्त्रिया म्हणजे (बहुतेक) लग्नाशिवायच्या.

हे मी कुठल्याही संशोधनग्रंथात कधी वाचलेले नाही. अन्यत्र एकदोन ठिकाणी नुसत्या कुजबुजीच्या स्वरूपात वाचलेले आहे. याला नक्की आधार काय हे माहिती नाही. समजा भाकडकथा मानली तरी नक्की कुठल्या बखरीत याचा उल्लेख आहे ते कधीच सायटेशन दिसले नाही.

स्पंदना's picture

21 Nov 2013 - 5:28 am | स्पंदना

१)सई बाई
२)सोयराबाई
३) पुतळाबाई
४) काशीबाई
५) सगुणाबाई
६) लक्ष्मीबाई
७) सकवारबाई
८) गुणवंतीबाई

म्हैस's picture

12 Dec 2013 - 6:29 pm | म्हैस

मग एक सांग, सुभद्रेच्या रूपावर अर्जुन भाळला नाही का? थिल्लर कुठचा. तेही सोड, देवाधिदेव इंद्राने अहल्येचा भोग घेतलाच ना गौतम ऋषींचा वेष घेऊन

अहो अर्जुनाची आणि इंद्राची तुलना भगवान शंकरांशी करताय?
कामदेवाला जाळणारे , कामिनी शेजारी बसलेली असताना तिच्याकडे धुन्कुन्सुधा न पाहणारे भगवान शिव ……। त्यांची तुलना जगात कोणाशीही होऊ शकत नाही
कुठे अर्जुन, कुठे इंद्र आणि कुठे शिव शंकर

बाप्पू's picture

13 Dec 2013 - 9:42 pm | बाप्पू

देवाधिदेव इंद्राने अहल्येचा भोग घेतलाच ना गौतम ऋषींचा वेष घेऊन?

हि गोष्टीमुळे इंद्राला देव कसे म्हणावे हा प्रश्न पडतो… लहानपणी TV वर हा सीन पहिला होता.
हा पराक्रम करण्यामध्ये चंद्र देवाने पण साथ दिली होती त्याला… नक्की आठवत नाही पण तसेच पहिले होते कदाचित त्या सिरिअल मध्ये

जेजुरिचे देव चोरिला जाने , या बद्द्ल काहि सांगा , आशि चोरि कधि झालि होति क ?

हे अर्थातच चूक आहे. पण याचे समर्थन मी कुठे केलेय

मी कुठे म्हणलय तुम्ही ह्याचा समर्थन केलय म्हणून? उगीच स्वताच्या अंगावर का ओढवून घेताय?
माझा प्रतिसाद तुमच्या लक्षात आला नहिये. आणि तुम्हीच मूळ विषयाला सोडून बडबडताय

देवाधिदेव इंद्राने अहल्येचा भोग घेतलाच ना गौतम ऋषींचा वेष घेऊन?

इंद्र हा कुणी perticular देव नाहीये . ते १ पद अहे. देवांच्या राजाचं . मर्त्य लोकातलाच बक्कळ पुण्या कमावलेला पण भोगाची आस ठेवून असलेला जीव इंद्र पडला पोहोचतो . पण पुण्यसंचय संपला कि त्याला तिथून पुन्हा हाकलून दिलं जातं . त्यामुळे स्वर्ग हि शाश्वत सुख देणारी गोष्ट नाहीये .

म्हैस असूनही बरंच माहितीय हो तुम्हाला म्हैसबाई !!

म्हैसबाई

ते म्हैस बुवा आहेत

पिलीयन रायडर's picture

20 Dec 2013 - 6:32 pm | पिलीयन रायडर

नाही नाही.. त्या कन्फर्म म्हैस बाई आहेत..