पहिला पाऊस

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जे न देखे रवी...
29 May 2013 - 10:08 am

नो चिकचिक नो झिगझिग
अन दरवळणारा मातीचा वास
आज आमच्याइथे पहिला पाऊस पडला !

अंग भिजवायला पुरेसा नव्हता,
मन मात्र पार न्हाऊन निघाले..

- तुमचा अभिषेक

मुक्तक

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

29 May 2013 - 1:23 pm | पक पक पक

अपेक्षाभंग....

तुमचा अभिषेक's picture

29 May 2013 - 2:51 pm | तुमचा अभिषेक

सहमत आहे, पण नाही राहावले, गेले महिनाभर इथे मुंबईत गरमीने अंगाला पाणी सुटून जे नुसती चिकचिक झिगझिग होतेय ती आज झाली नाही, कसलं बरं वाटलय म्हणून सांगू जेव्हा महिन्याभरानेच आज डॉकयार्ड ते बेलापूर या तासाभराच्या प्रवासात थंड झोप लागली.... सिमेंट काँक्रीटचे जंगल आमची मुंबई पण आज त्या दगडी रस्त्यांनाही कुठूनसा कोकणातल्या मातीचा वास येत होता, त्यावरून चालताना अंगाखांद्यावर आभाळातून पडणारे पावसाचे थेंब, किती वाट बघत होतो मी या थंडाव्याची गेले महिनाभर.... ऑफिसमध्ये आल्यावर देखील हाच विषय चर्चेचा, म्हटल आपल्या ऑनलाईन कट्ट्यावरही या भावना शेअर कराव्यात, तर जे मनात आले ते टाईपले !

तुम्ही त्या पाच ओळींऐवजी याच सहा ओळी आधी लिहायला हव्या होत्या :-)

कोमल's picture

29 May 2013 - 3:46 pm | कोमल

हो तर.. खरंच अभि भौ..

तुमचा अभिषेक's picture

29 May 2013 - 3:57 pm | तुमचा अभिषेक

हो खरंय ते.. वरच्यापेक्षा हे वाचणेबल आहे..
खरे तर घरी असतो तर एखादा छोटामोठा उतारा लिहिला असता पटकन.. पण ऑफिसमध्ये म्हणून जरा फस्स..
मुळात चार-पाच ओळी म्हणून मी कवितेच्या दालनात टाकले अन लोकांनी कविता किंवा तत्सम लिखाण म्हणून वाचले तर त्यांच्या अपेक्षा वेगळ्याच असणार .. कविता वा चारोळी मी आजवर नाही केली, जमणे तर दूरची गोष्ट आवड नसल्याने वाचतही नाही.. याला फेसबूक शेअर किंवा ऑर्कुटवर काढलेला पहिल्या पावसावरचा धागा या नजरेने बघा.. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2013 - 4:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

हवे असल्यास तुमचा धागा तुमच्या प्रतिसादातील जरूर तो भाग टाकून तुम्हाला संपादित करता येईल... दोन्ही मिळून अजून सुरेख कविता बनेल.

तुमचा अभिषेक's picture

29 May 2013 - 4:35 pm | तुमचा अभिषेक

सूचनेबद्दल धन्यवाद पण आता खरेच नकोच ते.. आणि कविता म्हणाल तर खरेच माझा प्रांत नाहिये.. पण ललित किंवा गद्यप्रकारात पावसावरच काही लिहावेसे वाटल्यास पुढे मागे लिहेनच, अजून बरेच पावसाळे बघायचे आहेत .. :)

आज सकाळी कचेरीच्या दिशेने ड्रायव्हिंग सुरु करतानाच काळे ढग दाटून आलेले पाहून लवकरच तो येणार अशी खात्री वाटतच होती. पण लवकर म्हणजे किती? तर अगदी ऑफिसात पोचेपोचेपर्यंतच समोरच्या काचेवर थेंब जमा झालेले पाहून पाऊस येण्यासाठी जामच उत्सुक आहे अशी खात्री झाली..

बेताबेताने पड रे बाबा..

-(मुंबईपर्जन्यपीडीत) गवि

निल्सन's picture

29 May 2013 - 3:25 pm | निल्सन

आमच्या इथे (ठाण्याला) काल रात्री २ वाजल्यापासुन जोरदार पाऊस पडत होता. एवढा आनंद झाला कि आम्ही दोघे(मी अन माझा नवरा) उठून खिडकीतुन पावसाची मजा घेत होतो पण मेल्या त्या लाईटीला बघवेल तर शपथ गेली लगेच, मग जे असे काही उकडायला लागले की सर्व मजाच निघून गेली.

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2013 - 3:36 pm | प्रभाकर पेठकर

मग जे असे काही उकडायला लागले की सर्व मजाच निघून गेली.

अरे...! कमाल आहे! बाहेर जाऊन मस्त पैकी भिजायचे पावसात. किती रोमँटिक क्षण गमावलात तुम्ही. पुढच्या वेळी लक्षात ठेवा, आणि पाऊस आला की, लाईट जावा म्हणून, देवाकडे प्रार्थना करा. महाराष्ट्रात तरी देव ऐकतो लगेच.

तुमचा अभिषेक's picture

29 May 2013 - 4:20 pm | तुमचा अभिषेक

खरंय.. मी देखील सकाळी ब्रश हातात धरून खिडकीत गेलो तर पहिल्यांदा वाटले मुंबईवर आज धुके जरा जास्तच पडलेय की काय, पण पाहतो तर रिमझिमत होता मस्त पाऊस.. तयारी मग पटपट आवरताना देवाकडे एकच प्रार्थना करत होती की मी बाहेर पडेपर्यंत टाकी खाली करू नकोस........ ऐकले माझे :)

पहिले बारीश मे नही भिज्या तो लाईफ मे क्या मजा !

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2013 - 5:05 pm | अत्रुप्त आत्मा

@पहिले बारीश मे नही भिज्या तो लाईफ मे क्या मजा ! >>> वाहव्वा!!! :)

तनुजा महाजन's picture

29 May 2013 - 3:32 pm | तनुजा महाजन

मस्स्त पाउस........

तनुजा महाजन's picture

29 May 2013 - 3:32 pm | तनुजा महाजन

मस्स्त पाउस........

लॉरी टांगटूंगकर's picture

29 May 2013 - 4:55 pm | लॉरी टांगटूंगकर

इथे माझ्याकडे पावसाचं वातावरण तयार झालंय, गाण्याआधी तंबोरा जुळवून तबल्याची ठोका ठोक होते अन् मग मुख्य गाणं सुरु होतं तसाच पावसाआधीचा मस्त पिवळट प्रकाश अन् जोरदार वारा सुटलाय.. अन् च्यायला मला पण आजच गाडी सर्विसिंगला टाकायची हौस आली होती, निवांत भटकत आलं असतं

पुण्यालाच मेला हुकवतोय.. किंवा असं वाटतं मलाच हुकवतोय की काय.. :(
अजुन किती दिवस असं करणार आहे कुणास देवाक ठाऊक..
मुंबईकरांवर बरीच जळजळ झाली बॉ.

तुमचा अभिषेक's picture

29 May 2013 - 5:28 pm | तुमचा अभिषेक

मुंबईकरांवर बरीच जळजळ झाली बॉ.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
चला धागा अगदीच फुकट नाही गेला,
एक सुप्त हेतू तरी साध्य झाला. :)

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2013 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा

@एक सुप्त हेतू तरी साध्य झाला. >>> =)) अस्सं होय!? =))