तू, मी अन…..!!!
तप्त निखारे आणि वाऱ्याची झुळूक ,
रेतीमध्ये लिहिलेली धूळ त्यावर समुद्राची लाट ....
……
तू, मी अन वारा .......सगळेच दिशाहीन ...!!
पेटलेली शेकोटी फुललेली आग ,
उजेड देणारा दिवा जाळणारी मात्र वात….
…..
तू, मी आणि धरणी .....उरात फक्त धगधगणारा ओलावा… !!
समुद्राला साथ ओळखीच्या किनाऱ्याची ,
चंद्राला त्याच्या टिपूर चांदण्यांची ….
……
तू, मी आणि वाळ्वंट .....साथीला फक्त मृगजळ ....!!
सुर्य फक्त प्रकाशात दिसणारा ,
चंद्र अंधारातही लोभसवाणा …..
…..
तू, मी आणि स्वप्न ....... डोळ्यांपुढे दिवसरात्र…..!!
कथा कधीच संपली,डोळेही पुसले,
उसासा टाकला, मन अजून आठवणीत व्यस्त ….
....
तू, मी आणि ढग ....बरसुनही परत दाटून आलेले !!
हा पाऊस सतत बरसणारा
जगही आता चिंब भिजलेलं …
.....
तू, मी आणि चातक ...... अजूनही वाट पाहतोय ....!!
तू कधीतरी येशील ….हि फक्त एक आशा
‘तू आहेस’ म्हणून ‘माझे असणे’
.....
तू, मी आणि पुरावा ......श्वास चालू आहेत अजून ...इतकाच !!!
____फिझा.
प्रतिक्रिया
5 Apr 2013 - 1:18 pm | पक पक पक
:)
5 Apr 2013 - 6:10 pm | स्पंदना
मस्त! अगदी ड्रमाटिक!
6 Apr 2013 - 12:56 am | जेनी...
:)
6 Apr 2013 - 3:24 am | इन्दुसुता
आवडली.
तू, मी आणि पुरावा ......श्वास चालू आहेत अजून ...इतकाच !!!
हे विशेष आवडले.
6 Apr 2013 - 6:49 pm | श्री गावसेना प्रमुख
6 Apr 2013 - 9:21 pm | प्यारे१
आवडली.
जास्त संवेदनाक्षम लोकांची कधी कधी फार भीती वाटते.
7 Apr 2013 - 10:43 am | Bhagwanta Wayal
कविता ऊत्तम झाली आहे