पिझ्झा पुरी

Mrunalini's picture
Mrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म
20 Mar 2013 - 1:17 am

साहित्यः

मैदा - १ कप
रवा - २ चमचे
टोमॅटो प्युरी - १/२ कप
बेसिल - १/४ चमचा
ओरेगानो - १/४ चमचा
काळि मिरी पावाडर - १/२ चमचा
रेड चिली फ्लेक्स - १/२ चमचा
चीज - १/२ वाटी
खायचा लाल रंग - १/४ चमचा
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार

कॄती:

१. मैदा व रवा एकत्र करुन घ्यावा. त्यात टोमॅटो प्युरी, बेसिल, ओरेगानो, काळि मिरी पावडर, चिली फ्लेक्स, लाल रंग व चवीनुसार मिठ टाकुन पीठ मळुन १ तास झाकुन ठेवावे.

p1

२. एका वाटीत चीज, काळि मिरी पावडर व चिली फ्लेक्स टाकुन चांगले मळुन घ्यावे.
३. पीठातील एक गोळा काढुन, त्यात मोदकांना भरतो त्याप्रमाणे थोडे चिज भरुन घ्यावा.

p2

४. ह्याची अगदी अलगद हाताने, पुरी लाटुन घ्यावी.

p3

५. कढईत गरम केलेल्या तेलामधे ही पुरी मध्यम आचेवर दोन्ही बाजुने तळुन घ्यावी.

p4

६. गरमा-गरम पिझ्झाच्या चवीची पुरी तयार आहे.

p5

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

20 Mar 2013 - 1:26 am | अभ्या..

लैच इनोव्हेटीव्ह आणि देखणी पाकृ. कलर्स पण एकदम मस्त आणि वेगळेच आलेत.
(माझ्याकडे डोमिनोजची लै पाउचेस राहतात. त्याचा उपयोग करता येईल ;) )
धन्यवाद मृणालिनी :)

कवितानागेश's picture

20 Mar 2013 - 1:35 am | कवितानागेश

आह्हा! काय मस्त दिसतायत पुर्‍या.
याच्याबरोबर तोंडी लावायला एखादे मस्त सॅलेड/ चटणी पण करुन पाकृ द्या.

रंग आकर्षक आहेच व कृतीमधील नाविन्य आवडले. छानच!
लहान मुलांसाठी योग्य पदार्थ. :)

सानिकास्वप्निल's picture

20 Mar 2013 - 2:49 am | सानिकास्वप्निल

इनोव्हेटिव्ह आणी इम्प्रेसीव्ह :)

स्पंदना's picture

20 Mar 2013 - 5:20 am | स्पंदना

येस्स! इनोव्हेटीव्ह !! मानल बुवा!
नक्की करणार.

वा....जहापनाह तुसी ग्रेट हो!!

जबरा इनोव्हेशन.. कसली कल्पना आहे ना..

दिपक.कुवेत's picture

20 Mar 2013 - 11:49 am | दिपक.कुवेत

पु~रांचा रंग काय भन्नाट आलाय! ते पाहुनच खाव्याश्या वाटतायत. आयडियाची कल्पना आवडली :)

ऋषिकेश's picture

20 Mar 2013 - 12:10 pm | ऋषिकेश

आयड्याची कल्पना भारी!

आशु जोग's picture

20 Mar 2013 - 12:43 pm | आशु जोग

'पिझ्झा माझी पुरी करा'

स्वाती दिनेश's picture

20 Mar 2013 - 1:10 pm | स्वाती दिनेश

छान आहे पिझ्झा पुरी!
स्वाती

धनुअमिता's picture

20 Mar 2013 - 1:45 pm | धनुअमिता

छान आहे. खुप आवडली.

सगळ्यांचे धन्यवाद... मंडळ आपले आभारी आहे. :D

अनन्न्या's picture

20 Mar 2013 - 7:04 pm | अनन्न्या

मुलाना नक्की आवडतील.

प्यारे१'s picture

20 Mar 2013 - 7:16 pm | प्यारे१

पैसा भरपूर आहे हो तुमच्या नशिबात! ;)
धनरेषा फार ठळक आहे.

पुर्‍या पाहून जळालेला प्यारे

हाहाहा... धन्यवाद प्यारे...
धनरेषा???? माहित नाही.... कुठली असते ती रेषा??

कच्ची कैरी's picture

21 Mar 2013 - 1:03 pm | कच्ची कैरी

खरच एकदम मास्टरशेफच्या पातळीवरची आहे ही रेसेपी .मला खुपच आवडली :)

खादाड's picture

21 Mar 2013 - 1:08 pm | खादाड

रंग काय दिसतोय :) तों.पा.सु !!ह्याच धरतीवर पराठा पण बनेल असं वाटतं!!

धन्यवाद. :) हो.. ह्याचाच पराठा पण करता येईल... तो पण करुन बघायला पाहिजे मला आता. ;)

तिमा's picture

21 Mar 2013 - 8:31 pm | तिमा

हा नवीन प्रकार लवकरात लवकर करण्याचा हुकूम सोडण्यात येईल.

- पाकअज्ञ तिमा

बंडा मामा's picture

22 Mar 2013 - 6:43 pm | बंडा मामा

तोंडाला पाणी सुटणारा पदार्थ आहे, पण त्याचे नाव काही तितके रुचले नाही.

धन्यवाद मामा :) ... पण पुरी मी पिझ्झाच्या चवीची केली त्यामुळे मी हे नाव दिले.. मला दुसरे कुठले नाव सुचले नाही. :(
तुम्हाला कुठले नाव सुचत असल्यास, प्लीज सांगा... मला नक्कीच आवडेल. :)

सुवर्णमयी's picture

23 Mar 2013 - 5:43 am | सुवर्णमयी

खूप मस्त रंग आला आहे

प्रभाकर पेठकर's picture

24 Mar 2013 - 2:31 am | प्रभाकर पेठकर

मस्त दिसते आहे पाककृती. ह्याला 'टोमॅटो पित्झारी' असे नांव देता येईल.

nishant's picture

25 Mar 2013 - 2:07 pm | nishant

नाव आवडेश. ;)

अरे वा काका... मस्तच नाव. धन्स ... :)

पैसा's picture

25 Mar 2013 - 8:29 pm | पैसा

काय खल्लास रंग आलाय!

ज्याम आवडल्या .... कलर जास्त आवडला ...

तुमचा अभिषेक's picture

25 Mar 2013 - 9:17 pm | तुमचा अभिषेक

अफलातून प्रकार आहे... बायकोला दाखवला तर ट्राय मारू शकते.. आत घातलेले पदार्थ तिच्या आवडीचेच आहेत.. :)