हलीम

सुनील's picture
सुनील in पाककृती
29 Aug 2008 - 5:03 pm

श्रावण संपत येतोय. पुढील आठवड्यात गणरायांचे आगमन. तेव्हा येत्या वीकांताचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी ही एक पाककृती....

साहित्य
मटण : अर्धा किलो शक्यतो बोकडाचे. अगदीच शक्य नसल्यास lamb चालेल परंतु बोनलेस घेऊ नये.
गहू : पाव किलो
धने पावडर : एक चमचा
जीरे पावडर : एक चमचा
दालचिनी पावडर : अर्धा चमचा
लवंग पावडर : अर्धा चमचा
लाल तिखट : सहा चमचे
आले-लसूण पेस्ट : दोन चमचे
दही : चार चमचे
कांदे : पाच
हिरव्या मिरच्या : दोन-तीन
चिरलेली कोथिंबीर : पाव वाटी
तेल : जरुरीपुरते
तूप : जरुरीपुरते
मीठ : जरुरीपुरते
पाणी : भरपूर

पूर्वतयारी
१) किमान एक दिवस (२४ तास) आधी गहू भिजत घालावेत.
२) गहू १०-१२ तास भिजल्यानंतर सावलीत वाळत घालावेत.
३) गहू वाळले की भरड कुटून घ्यावेत. भरड राहणे महत्वाचे पार पीठ करू नये.
४) मटणाला धने, जीरे, दालचिनी व लवंग पावडर, तिखट, आले-लसूण पेस्ट तसेच दही लावून किमान एक तास मुरवत ठेवावे.
५) एक कांदा बारीक तर उरलेले चार कांदे उभे चिरून घ्यावेत.
६) मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात.

कृती
१) तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.
२) त्यात मुरवलेले मटण आणि पाणी घालून तासभर शिजवत ठेवावे.
३) मधल्या काळात उभे चिरलेले कांदे तुपात तळून घ्यावेत.
४) तासाभरात मटण शिजले की त्यात कुटलेले गहू आणि पाणी घालून सुमारे अडीच तास शिजवत ठेवावे. अधुन-मधून पाणी घालून ढवळत रहावे.
५) मटणाचा पूर्ण लगदा झाला की चवीपुरते मीठ घालून शिजवणे थांबवावे.
६) वर तुपात तळलेला कांदा, चिरलेली मिरची आणि कोथिंबीर भुरभुरावी.

टीप
१) वरील प्रमाण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरावे.
२) सोबत रक्त वारुणीची संगत असल्यास उत्तम!
३) पुढील महिन्याच्या मध्यावर रमजान येतोय. मुंबईत राहणार्‍यांनी निदान एखाद्या रात्रीतरी महंमद अली रोडवर चक्कर टाकावी, हा आग्रहाचा (आणि फुकटचा) सल्ला!

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

29 Aug 2008 - 5:10 pm | मनस्वी

मटणप्रेमी लोकांनी वरील प्रकार एकदा तरी ट्राय करून पहावा.. मस्त लागतो!
पाकृ बद्दल धन्यवाद सुनील.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

नंदन's picture

29 Aug 2008 - 5:15 pm | नंदन

पाककृती मस्तच, पण जन्मात जमेल असे वाटत नाही :(. मात्र वाचून हलीम आणि वेगवेगळ्या कबाबांच्या आठवणी परत ताज्या झाल्या :).

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

टारझन's picture

29 Aug 2008 - 5:30 pm | टारझन

हलीम हैदराबाद ची स्पेशॅलिटी आहे. खास रमझान मधे (म्हणजे अत्ताच्याच काळात, ऑगस्ट-सप्टेंबर) तिथे गल्लो गल्ली हलीम चे स्टॉल उघडतात.
लै जबराट . गेल्या वर्षीच कंपनी कृपेने हैदराबादात होतो. रोज विचार करायचो की साला हे स्टॉल कसले आहेत. एक दिवस मला क्लायंट ने ते खाउ घातले. वरून फक्त शिर्‍यारारखं दिसणारं हलिम .. दिवस भर एका भट्टीत मटण-चिकन बोनलेस करून एका दांडक्याने कुटत असतात.. दिवस भर कुटून चेंदामेंदा झाला की त्याची एक पेस्ट तयार होते .. वर खरपुस तळलेला कांदा आणि लिंबु - कोथिंबीर ... आ हा हा हा ... बेष्ट ...

हलीम प्रकाशात आणल्या बद्दल सुनिल चे अभिनंदन

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मनस्वी's picture

29 Aug 2008 - 5:32 pm | मनस्वी

>मटण-चिकन बोनलेस करून
टारझन दादा, बोनलेस नाही.. हाडांसकट असते ते. बराच वेळ शिजवल्याने हाडांचीही पेस्ट होते.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

सुनील's picture

30 Aug 2008 - 6:30 pm | सुनील

हलीम प्रकाशात आणल्या बद्दल सुनिल चे अभिनंदन

धन्यवाद...
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बेसनलाडू's picture

29 Aug 2008 - 9:38 pm | बेसनलाडू

लाजवाब पाककृती. खूप ऐकले आहे हलीमबद्दल,पण चाखायचा योग अद्याप आलेला नाही :(
(हावरट)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

30 Aug 2008 - 12:28 am | विसोबा खेचर

वा सुनीलराव, हलीमची पाकृ अगदी परफेक्ट दिली आहे!

हलीम ही माझी अत्यंत आवडती पाकृ! इथे दिल्याबद्दल आपले लई लई आभार....

उत्तम हलीम हैदराबदला खाल्ले आहे आणि लखनौला नझीराबानूच्या कोठ्यावर खाल्ले आहे. सोबत व्हॅट ६९ होती आणि समोर मस्तपैकी हलीमची डिश. आणि नझीराबेगमची काफीतली जीव ओवाळून टाकावा इतकी सुरेख ठुमरी चालली होती! सला, अब क्या बताऊ आपको?! :)

सुनीलराव, बर्‍याच वर्षात लखनौला गेलो नाही परंतु आपल्या हलीममुळे मात्र लखनौच्या संध्याकाळच्या काही आठवणी जाग्या झाल्या.. ९७/९८ च्या सुमारास लखनौला खूप वार्‍या केल्या. तेव्हा व्हॅट ६९ हे माझं प्रेम होतं! सोबत लखनवी हलीम, बहदुरी भेजा, पायासूप, लखनवी बिर्याणी आणि लखनौच्या कोठ्यावरचं गाणं अगदी भरभरून ऐकलं! एखाददोन प्रसंगी तिथे गायलोही आहे!

त्या लखनवी कोठ्यावरचा सारंगीवाला हुसेनखान याला एकदा मी 'प्रीतम सैय्या...' ही ललितागौरीतली बंदिश गाऊन दाखवली होती. त्यावर खुश होऊन तो मला एकदा त्याच्या घरी घेऊन गेला होता. तिथे त्याच्या बेगमच्या हातच्या हलीमची चव आजही जिभेवर रेंगाळते आहे!

वो भी क्या दिन थे साले!

आपला,
(लखनवी कोठ्यावरचा गवई!) तात्या.

सुनील's picture

30 Aug 2008 - 6:32 pm | सुनील

सुनीलराव, बर्‍याच वर्षात लखनौला गेलो नाही परंतु आपल्या हलीममुळे मात्र लखनौच्या संध्याकाळच्या काही आठवणी जाग्या झाल्या

धन्यवाद..
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश's picture

30 Aug 2008 - 7:12 pm | ब्रिटिश

सुन्या रे जल्ली मस्तच हाय तु़जी डीस.

मटन म्हन्ला की तोंड्नाशी पुर येत पान्याचा.

माजे आयची आगरी मटनाची डीस टाकीन यक दिस सायटीवर

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला नावानच सगला हाय)

प्रभाकर पेठकर's picture

30 Aug 2008 - 7:33 pm | प्रभाकर पेठकर

माजे आयची आगरी मटनाची डीस टाकीन यक दिस सायटीवर
नुसते मटनच नाही सर्व आगरी पदार्थांच्या पाककृती येऊ द्यात मिपावर. विशेतः सुक्या बोंबलाचे कालवण.

सुनील's picture

30 Aug 2009 - 6:41 pm | सुनील

बरोबर एक वर्षांपूर्वी ही पाकृ टाकली तेव्हा फोटो नव्हता. आजच हलीम केला तेव्हा आता हे फोटो टाकतोय..

आज पाकृत दोन बदल केले -
१) गहू भिजवून, वाळवून, कुटायला वेळ नव्हता म्हणून लापशी (गव्हाचा रवा) वापरला.
२) लवंग आणि दालचिनी बरोबर वेलची आणि जायफळाची पूडदेखिल वापरली.

बाकी पाकृ तीच.


(मसाला घालून मुरवत ठेवलेले मटण)


(तुपात तळलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालून सजवलेला हलीम)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन's picture

30 Aug 2009 - 10:34 pm | नंदन

क्या बात है! अप्रतिम फोटो!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

31 Aug 2009 - 10:55 am | सहज

ग्रेट, सुनीलसाहेब जस्ट ग्रेट!!

विसोबा खेचर's picture

31 Aug 2009 - 3:16 pm | विसोबा खेचर

जबरा फोटू...

काल चान्स हुकला रे!

तात्या.

सुनील's picture

31 Aug 2009 - 6:36 pm | सुनील

काल चान्स हुकला रे!
काल तू फारच घाईत होतास. एकदा शांतपणे "बसू".

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कपिल काळे's picture

31 Aug 2009 - 10:13 am | कपिल काळे

टेस्ट करुन बघायला हवं. फोटूसुद्धा मस्त.

अजुन कच्चाच आहे's picture

31 Aug 2009 - 5:05 pm | अजुन कच्चाच आहे

परवाच श्रावण सोडला सगळ्यांनी! (मी धरलाच नव्हता)
योगायोगाने संजीव कपूरची इन्स्टंट 'चिकन हलीम' ची रेसिपी मिळाली ती केली होती.
ठिक होती पण ह्या धाग्यामुळे आता पुन्हा ओरीजिनल हलीम करावे लागणर!

.................
अजून कच्चाच आहे.

श्रावण मोडक's picture

31 Aug 2009 - 6:42 pm | श्रावण मोडक

राव खरंच हे धागे... छळवाद. :)

आंध्रा हालीम खाल्ले आहे पण आवडले नव्हते :(