हलीम
श्रावण संपत येतोय. पुढील आठवड्यात गणरायांचे आगमन. तेव्हा येत्या वीकांताचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी ही एक पाककृती....
साहित्य
मटण : अर्धा किलो शक्यतो बोकडाचे. अगदीच शक्य नसल्यास lamb चालेल परंतु बोनलेस घेऊ नये.
गहू : पाव किलो
धने पावडर : एक चमचा
जीरे पावडर : एक चमचा
दालचिनी पावडर : अर्धा चमचा
लवंग पावडर : अर्धा चमचा
लाल तिखट : सहा चमचे
आले-लसूण पेस्ट : दोन चमचे
दही : चार चमचे
कांदे : पाच
हिरव्या मिरच्या : दोन-तीन
चिरलेली कोथिंबीर : पाव वाटी
तेल : जरुरीपुरते
तूप : जरुरीपुरते
मीठ : जरुरीपुरते
पाणी : भरपूर
पूर्वतयारी
१) किमान एक दिवस (२४ तास) आधी गहू भिजत घालावेत.
२) गहू १०-१२ तास भिजल्यानंतर सावलीत वाळत घालावेत.
३) गहू वाळले की भरड कुटून घ्यावेत. भरड राहणे महत्वाचे पार पीठ करू नये.
४) मटणाला धने, जीरे, दालचिनी व लवंग पावडर, तिखट, आले-लसूण पेस्ट तसेच दही लावून किमान एक तास मुरवत ठेवावे.
५) एक कांदा बारीक तर उरलेले चार कांदे उभे चिरून घ्यावेत.
६) मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात.
कृती
१) तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.
२) त्यात मुरवलेले मटण आणि पाणी घालून तासभर शिजवत ठेवावे.
३) मधल्या काळात उभे चिरलेले कांदे तुपात तळून घ्यावेत.
४) तासाभरात मटण शिजले की त्यात कुटलेले गहू आणि पाणी घालून सुमारे अडीच तास शिजवत ठेवावे. अधुन-मधून पाणी घालून ढवळत रहावे.
५) मटणाचा पूर्ण लगदा झाला की चवीपुरते मीठ घालून शिजवणे थांबवावे.
६) वर तुपात तळलेला कांदा, चिरलेली मिरची आणि कोथिंबीर भुरभुरावी.
टीप
१) वरील प्रमाण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरावे.
२) सोबत रक्त वारुणीची संगत असल्यास उत्तम!
३) पुढील महिन्याच्या मध्यावर रमजान येतोय. मुंबईत राहणार्यांनी निदान एखाद्या रात्रीतरी महंमद अली रोडवर चक्कर टाकावी, हा आग्रहाचा (आणि फुकटचा) सल्ला!
याद्या
14543
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
हलीम
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त रे सुनिल
बोनलेस नाही
In reply to मस्त रे सुनिल by टारझन
धन्यवाद...
In reply to मस्त रे सुनिल by टारझन
मस्त
वा
धन्यवाद
सुन्या रे
जरूर....
In reply to सुन्या रे by ब्रिटिश
फोटो
लाहौल बिलाकुवत!
In reply to फोटो by सुनील
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to लाहौल बिलाकुवत! by नंदन
जबरा
In reply to फोटो by सुनील
हम्म..
In reply to जबरा by विसोबा खेचर
टेस्ट करुन
परवाच
आवरा
आंध्रा हालीम खाल्ले आहे पण