नमस्कार मंडळी.......
कालच्या फोटोंना दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद........ :)
खूप छान वाटलं सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून..........
तुमच्या प्रशंसेने प्रेरित होऊन काही फोटो टाकते आहे....
आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तिकडचे फोटो......
आशा आहे हे पण फोटो तुम्हाला आवडतील....... :)
हा पहाटे काढलेला फोटो.....
प्रतापगड.......
महाबळेश्वरच्या वाटेवर.......
/>
वेण्णा लेक.......
सुर्यास्त..........
ह्या सगळ्यावरून एक विचारावसं वाटतं.......स्वर्ग म्हणतात तो हाच का ????
प्रतिक्रिया
21 Aug 2008 - 2:18 pm | ऋचा
मस्त आणि सुंदर फोटो.
मलाही असच वाट्ट ........कदाचित हाच स्वर्ग असावा :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
21 Aug 2008 - 2:34 pm | अमोल केळकर
मस्तच फोटो
धोम धरण / टेबल लॅन्ड ( पाचगणी ) पाहिलं नाही का ?
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
22 Aug 2008 - 12:46 pm | मिंटी
धोम धरण / टेबल लॅन्ड ( पाचगणी ) पाहिलं नाही का ?
नाही धोम धरण नाही बघितलं.....पाचगणीला गेलो होतो पण फारच गर्दी होती म्हणुन मग फोटो नाही काढले...............
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...... :) :)
21 Aug 2008 - 2:47 pm | धमाल मुलगा
जबरा फोटो...
एक से बढकर एक :)
कोलबेर, सुर्य आणि इतर दिग्गज 'त्रिनेत्र' वाल्यांच्या कॅमेराधारी फौजेत आणखी एक शिपाई दाखल झालेला दिसतोय.
मिंटी, येऊ दे अजुनही फोटो...
मस्त आहेत सगळे फोटोज.
21 Aug 2008 - 4:30 pm | सूर्य
तुमची फोटोग्राफी छानच आहे. महाबळेश्वराचे स्वर्गीय सौंदर्य छान टिपले आहे तुम्ही. प्रतापगडाचा आणि वेण्णा लेक च्या वरती जे दोन फोटो आहेत ते सहीच आलेत. सुर्योदया (की सुर्यास्ता)चा फोटो तर अप्रतिम. तुमच्याकडे कोणता कॅमेरा आहे ?
- सूर्य.
21 Aug 2008 - 4:35 pm | मदनबाण
व्वा.. आत्ताच कसं गार गार वाटतय बघा ..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
21 Aug 2008 - 6:35 pm | शितल
सर्वच फोटो मस्त पण
शेवटचा फोटो तर सह्हीच..
21 Aug 2008 - 7:36 pm | प्राजु
मिंटी..
काय सुंदर काढले आहेस फोटोग्राफ. अतिशय प्रसन्न वाटलं. विशेष करू २, ३,४,५, ६ हे खूप आवडले.
सुर्यास्त खासच. मावळत्या दिनकरा.. असे म्हणावेसे वाटले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Aug 2008 - 8:07 pm | रेवती
सर्व फोटो आवडले पण क्र. ७ व ८ खूप आवडले.
रेवती
21 Aug 2008 - 8:13 pm | इनोबा म्हणे
सगळेच फोटो झकास आले आहेत.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
21 Aug 2008 - 9:14 pm | संदीप चित्रे
मिंटी -
फोटो मस्त आहेत ग ... स्ट्रॉबेरीज आणि नक्षीकाम केलेल्या काठ्यांचे फोटो असतील तर ते ही टाक .
महाबळेश्वरचा फील पूर्ण होईल :)
22 Aug 2008 - 12:00 am | विसोबा खेचर
सगळेच फोटू छान, परंतु १ला, ४था आणि शेवटचा फोटू जास्त आवडला...
आपला,
(महाबळेश्वरप्रेमी) तात्या.
22 Aug 2008 - 12:09 am | वर्षा
सुंदर आहेत सर्वच फोटो..शेवटचा खासच
-वर्षा
22 Aug 2008 - 12:29 am | कोलबेर
धुक्यातलं महाबळेश्वर सही दिसत आहे.
22 Aug 2008 - 11:00 am | झकासराव
वॉव!!!!!!!!!
मस्तच फोटो आहेत. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
22 Aug 2008 - 12:49 pm | स्वाती दिनेश
तुझ्या फोटों मुळे महाबळेश्वराची सैर झाली..(किती वर्षात महाबळेश्वरला गेले नाही..:()
सुरेख फोटो..
स्वाती
22 Aug 2008 - 2:04 pm | पक्या
सूर्यास्ताचे चित्र फोरग्राऊंड ला झाडाचे सिल्हाऊट (silhouette) टिपल्याने छान वाटतेय.
बाकी वा वा मस्त ग्रेट अफलातून म्हणण्याइतकी असामान्य चित्रे वाटली नाहीत. अशी चित्रे कॅमेरा हातात दिला की कोणीही काढू शकेल. राग नसावा. त्यातल्या त्यात वेण्णा लेक चे त्यातील एकट्या उभ्या असलेल्या झाडामुळे वेगळेपण कदाचित जाणवत असेल .
22 Aug 2008 - 7:09 pm | सुमीत भातखंडे
सहीच आलेत.
सुर्यास्ताच तर जबराच
22 Aug 2008 - 7:17 pm | ब्रिटिश टिंग्या
फोटो!
29 Aug 2008 - 2:22 pm | अमेयहसमनीस
जबरदस्त फोटो.
अमेय