1

नवहिंदुत्ववाद.

Primary tabs

विकि's picture
विकि in काथ्याकूट
10 Nov 2007 - 2:08 pm
गाभा: 

दै. लोकसत्ताचे संपादक व थोर विचारवंत कुमार केतकर यांनी नवहिंदुत्ववादावर हे अप्रतिम अग्रलेख लिहीला . येथे टिचकी मारा-अग्रलेख
त्यात ते म्हणतात हिंदु नवमध्यमवर्गाला भारतीय तत्वज्ञान,कला,साहित्य यात फारसा रस नाही .त्यांचा ओढा तिरुपती,सिद्धीविनायक,स्वामी नारायण मंदीर यांच्याकडे आणि अनेक बाबा,गुरू आणि बापू यांच्याकडे आहे.
खरोखरच हा अग्रलेख सर्वांनी वाचावा यात लिहीलेले १००% सत्य आहे.या अग्रलेखाकडे समाजशास्रिय दृष्टीकोनातुन बघावे ही विनंती.
आपला
कॉ.विकि

प्रतिक्रिया

सर्किट's picture

10 Nov 2007 - 2:18 pm | सर्किट (not verified)

अत्यंत फालतू अग्रलेख आहे.
परंतु सुमार केतकर ह्यापेक्षाही सुमार लिहू शकतात, असे आमचे अनुभव आम्हाला सांगतात.
मराठी अस्मिता ही फक्त दांडगाई आहे, हे सांगण्याइतके धैर्य केतकर सध्या बाळगतात, ह्याबद्दल मात्र आम्हाला त्यांचे कौतुक वाटते.

केतकरांनी ज्या नवहिन्दुंविषयी लिहिलेले आहे, त्याची व्याख्या करताना, १९८५ नंतर अमेरिकेत गेलेले लोक, असा एक घटक त्यांनी वर्णिला आहे. आम्ही त्या घटकाचे सदस्य आहोत. आम्हाला भारतीयच नव्हे तर जागतिक तत्वज्ञानात रस आहे. एवढेच नव्हे, तर भारतीय कला, आअणि साहित्यातदेखील रस आहे. (जरा जास्तच रस आहे, असे म्हणणार्‍यांनी शकिरादेवींची गाणी ऐकावी. मला डिस्टर्ब करू नये.)

तेव्हा केतकर चूक आहेत. जनरलायझेशन करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही, हेच खरे.

- (जुना हिन्दु) सर्किट

विकि's picture

10 Nov 2007 - 5:56 pm | विकि

समाजसुधारणा करणे किती भयंकर आहे ते आपल्याला वरील प्रतिसादावरून दिसून आले आहे. केतकर लोकसत्तेच्या तसेच इतर माध्यमातून समाजसुधारायचे काम करत आहेत. सर्किटदादा आपण स्वतःला अपवादात्मक समजायला हवे होते.
आपला
कॉ.विकि

सर्किट's picture

13 Nov 2007 - 5:55 am | सर्किट (not verified)

सर्किटदादा आपण स्वतःला अपवादात्मक समजायला हवे होते.

का बरे ?

आम्ही अपवाद का ?

आम्ही तर स्वतःला नियम समजतो !

- सर्किटदादा

विकास's picture

10 Nov 2007 - 10:26 pm | विकास

सुमार केतकरांचा अग्रलेख आपण म्हणालात म्हणून वाचला. वास्तवीक प्रतिक्रीया देण्याचा पण लायकीचा हा लेख वाटला नाही. सोनीयांचा घरी लाळघोटे पणा करताना हा माणूस वृत्तपत्रीय आचारसंहीता पार धुळीस मिळवत आहे. वाक्यावाक्याला मला फक्त समाजभेदी पणा दिसला. कुणाचेच महत्व वाढवायचे नाही म्हणून, पण जसे औरंगजेबाच्या सैन्यातील घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसत असे म्हणत तसेच या माणसास जळीस्थळी काष्ठी पाषाणी मोदी आणि संघ दिसतो, असे म्हणावेसे वाटले. त्यातही मजा बघा की सोय असते तेंव्हा संघाला शिव्या, गरज लागेल तेंव्हा मोदी कसे संघाला मान्य नाहीत हे सांगणार. म्हणजे ह्यांना संघ मान्य नाही. संघाला मोदी नाहीत मग त्रैराशीकाने ह्यांना मोदी मान्य असे म्हणावे लागेल :)

असो, आता या अग्रलेखात त्यांनी समाजभेदी पणा करताना कुणाकुणाला नावे ठेवली आहेत, कोण यांच्या दृष्टीने वाईट वृत्तीचे आहेत ते पहा:

  • उच्चवर्णीय
  • मध्यमवर्गीय
  • १९६० ते १९८५ च्या दरम्यान अमेरिकेत गेलेले भारतीय
  • १९८५ नंतरची अमेरिकेत गेलेली कॉम्यूटर जनरेशन
  • सिद्धीविनायक, स्वामीनारायण, बाबा, गुरू, बापू (थोडक्यात कुठलाही हिंदू संप्रदायात) जाणारे
  • ओबीसी - बीसी -आदीवासी वर्गातील लोकं

म्हणजे थोडक्यात जे जे कोणी स्वतःला ज्या कुठल्याही श्रद्धेने हिंदू समजत असतील असे सर्वजण हे केतकरांच्या दृष्टीने नवहिंदूत्ववादी आणि म्हणजे समाजविघातक आहेत. हे असले भडक आणि समाजभेदी लिहीण्याला "अप्रतिम" केवळ वर म्हणल्याप्रमाणे समर्था (सोनीया) घरचे... अथवा कम्यूनिस्टविचारांनी एकांगी झालेलाच म्हणू शकेल.

केतकर मानभावीपणे वर म्हणतात की , "बीसी -ओबीसी वर्गाला हिंदूत्ववादी राजकारण जवळचे का वाटू लागले हाही तसा सखोल अभ्यासाचा विषय आहे" पण तसेच भारतात स्वातंत्र्यानंतर जी काही स्वप्नाळू सद्भावनेतून पण नंतर एकांगी आततायी वृत्ती, समाजवादी आणि कम्यूनिस्ट विचारसरणीने आणली तीचा पराभव का झाला ह्याचा विचार करायला मात्र ते तयार नाहीत.

आता राहून राहून हिंदूत्व ह्या शब्दाबद्दल : हा शब्द स्वा. सावरकरांनी कॉईन केला आहे असे त्याचे समर्थक आणि विरोधक म्हणतात. त्यांच्याच एका वाक्यात, "हिंदूत्व हे काही हिंदूधर्म याच्याशी समानार्थक नव्हे किंवा हिंदूधर्म हाही शब्द 'हिंदूइझमशी' शब्दाशी समानार्थक नाही." त्यावरील त्यांचा लेख वेगळ्या चर्चेच्या रूपात नंतर देईन. पण येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे नवहिंदूत्ववादी असला शब्द तयार करणार्‍या केतकरांनी आधी हिंदूत्व म्हणजे काय हे सावरकरांच्या शब्दातीलच वाचावे. आणि वाचले असल्यास प्रामाणीकपणे जगासमोर मांडावे. पण असे केले तर केतकर कसले. नैसर्गीक विचारांपेक्षा अनैसर्गीक विचारांनी माणूस हा जास्त चाचपडत बसतो या अर्थीचे येजुर्वेदातील (४०:९) एक गूढ वाक्य आठवले:

"अंधतम प्रविशंती ये असंभुती मुपास्ते.." - भावार्थः अज्ञानी लोकं (अज्ञानाच्या) अंधारात चाचपडतच असतात पण जे स्वतःला ज्ञानी समजून वागतात ते त्याहीपेक्षा जास्त अंधकाराच्या गर्तेत राहत असतात.

केतकर हे वरील भावार्थासंदर्भात दुसर्‍या प्रकारातील लोकांमधे गणले जाणारे व्यक्तिमत्व आहे.


[बाकी विकीसाहेब आम्ही कधी पासून वाट पहात आहोत पण आपण सर्वप्रकारच्या बेकायदेशीर हिंसेचा, जी हिंदूत्ववाद्यांचीच नाही तर कम्यूनिस्टांची, नक्षलवाद्यांची वगैरे आहे, तीचा अजूनही निषेध करायला तयार नाही आहात, फक्त हिंदूत्ववाद्यांना झोडपताहात! हे काही बरोबर वाटत नाही. अर्थात याचा सरळ अर्थ "हिंसा" समजायची वेळ आली की कम्यूनिस्टांचे वर्तन हे आपल्याजोगी अहींसक आहे. मग ते नक्षलवाद्यांनी केलेले खून असोत अथवा पश्चिम बंगाल मधील एसईझेड ची नंदीग्रामसारखी प्रकरणे आणि त्यात कम्यूनिस्ट सरकारचे "गरीब मुसलमानांच्या" विरूद्धचे वर्तन असोत. आपणास माहीत असेलच की नंदीग्राम मधील अत्याचार हे मुसलमान शेतकर्‍यांवर अधीक झालेत - त्यांची संख्या जास्त असल्याने. विचार करा हेच जर सेना-भाजपच्या राज्यात झाले असते तर केतकरांनी , मेडीयाने आणि आपल्यासारख्या लोकांनी किती उगाळले असते ते
...]

विकि's picture

12 Nov 2007 - 6:30 pm | विकि

आपण कोणाविषयी बोलताय याचे भान ठेवावे. केतकरांनी जे लिहीलेय ते वास्तव आहे. तुम्ही चर्चा करताना त्या त्या विषयावरच चर्चा करावी ही विनंती मध्येच कम्युनिष्ठांना आणू नये. या भुमीत समाजसुधारणा करणे किती कठीण आहे ते महात्मा फुले,लोकहितवादी,गोखले ,कर्वे,आंबेडकर यांच्यापासुन आपल्याला माहीती आहे . तसेच केतकरांचे आहे . तुमच्या प्रतिसादावरून असे वाटतय की तुम्ही संघ आणि मोदी यांचे कडवे समर्थक आहात.
सिद्धीविनायक, स्वामीनारायण, बाबा, गुरू, बापू (थोडक्यात कुठलाही हिंदू संप्रदायात) जाणारे या सर्व विभूती प्रतिमा आहेत.यांची अतिरंजित चित्रे रंगवली जातात आणि या प्रतिमा व्यवस्थित रंगवण्याचे ,रुजवण्यावे काम कोणि केले आहे ते आपण जाणतोच.
धर्म ही केवळ व्यक्तिगत श्रद्धेची बाब न राहता दाखवून देण्याची गोष्ट बनली आहे.
आपला
कॉ.विकि

विकास's picture

12 Nov 2007 - 7:03 pm | विकास

प.पू. मा.भ.प. विकी महाराज,

आपण कोणाविषयी बोलताय याचे भान ठेवावे. केतकरांनी जे लिहीलेय ते वास्तव आहे.

म्हणजे आपणास असे म्हणायचे आहे का की उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय, १९६० ते १९८५ च्या दरम्यान अमेरिकेत गेलेले भारतीय, १९८५ नंतरची अमेरिकेत गेलेली कॉम्यूटर जनरेशन, सिद्धीविनायक, स्वामीनारायण, बाबा, गुरू, बापू (थोडक्यात कुठलाही हिंदू संप्रदायात) जाणारे , ओबीसी - बीसी -आदीवासी वर्गातील लोकं हे सर्व वाईट वृत्तीचे आहेत असे? बरं यातील किती भारतीय तुम्ही तुमच्या नजरेने पाहीले आहेत? माझ्या पुरते बोलाल तर, मी सांगतो की, अमेरिकेतील (ज्यावर केतकरांची सर्वात जास्त वक्रदृष्टी आहे) ह्या समाजाचा सर्व क्रॉससेक्शन मी जवळून ईस्टकोस्ट ते वेस्ट कोस्ट वरपासून खालपर्यंत पाहीला आहे. तुमच्या सारखे आणि केतकरांसारखे ते बोटे मोडायची कामे करत नाहीत. त्यांच्या त्यांच्या आयुष्यात भरपूर कामे करत आयुष्याचा चांगल्यापद्धतीने आस्वाद घेत धर्म-अर्थ-काम ह्या तीन पायर्‍या जगत आहेत. तेच युके मधे आहे, म्हणूनच प्रिन्स चार्ल्सला दिवाळीला जावेसे वाटले.

तुमच्या प्रतिसादावरून असे वाटतय की तुम्ही संघ आणि मोदी यांचे कडवे समर्थक आहात.

मी आजपर्यंत फक्त देशाचे आणि त्या अनुषंगाने जे योग्य वाटते त्याचे समर्थन करत आलो आहे आणि अयोग्य वाटते त्यावर टिका करत आलो आहे. मोदी आणि संध ह्या नजरेतून केवळ आपण पहात आहात. एक गोष्ट मात्र त्या निमित्ताने मला नक्कीच विचारावीशी वाटते की, 'आजही जर लोकशाही मधे एखादा माणूस बहूमताने निवडून आला तर त्याचा अर्थ इतर विचार आणि व्यक्ती ह्यांचे हे त्याच्यासमोर दुबळे पडले आणि लोकांना ते भावले नाहीत असा होतो,' असे वाटत नाही का? बरं संघाबद्दल बोटे मोडताहात तर आज पर्यंत संघ बंद का करू शकला नाहीत ह्याचा कधी विचार केला आहेत का? संघ आणि संघसंबधीत सर्व संस्था ह्या उघड उघड कायदेसंमत चालत आहेत. त्या तुम्हाला/केतकरांना आवडत नाहीत म्हणून उरबडवेगिरी करण्याचे कारण नाही .

या भुमीत समाजसुधारणा करणे किती कठीण आहे ते महात्मा फुले,लोकहितवादी,गोखले ,कर्वे,आंबेडकर यांच्यापासुन आपल्याला माहीती आहे . तसेच केतकरांचे आहे .

केतकर स्वत:चा पगार घेत एसी मधे बसत उचलली जीभ लावली टाळ्याला करत बसले आहेत. त्यांची तुलना आपण महात्मा फुले,लोकहितवादी,गोखले ,कर्वे,आंबेडकर करताना पाहून आपली किव करावीशी वाटली.

तुम्ही चर्चा करताना त्या त्या विषयावरच चर्चा करावी ही विनंती मध्येच कम्युनिष्ठांना आणू नये.

जेंव्हा जेंव्हा आपण हिंदू आणि हिदूत्ववादी यांच्या वर बोलता तेंव्हा आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांना हिंसाचारी समजून बोलता, पण आपणास सातत्याने केलेले सर्वसकट हिंसेच्या निषेधाचे आवाहन मात्र आपण कायम टाळत आहात. यातून दोन गोष्टि सिद्ध होतात: एक आपण कम्यूनिस्टांची हिंसा ही अमान्य करत नाही आणि म्हणून आपण देश आणि समाजापेक्षा कम्यूनिस्टांशी आणि त्यांच्या नितीशीच प्रामाणीक राहात आला आहात. म्हणून जेंव्हा केंव्हा आपण असे एकेरी लिहाल तेंव्हा तेंव्हा मी आपल्याला या पक्षाच्या प्रामाणिकपणाची आणि देशाबद्दलच्या अप्रामाणिकपणाची आठवण करत राहाणार (अनलेस तुम्ही कम्यूनिस्टांसहीत सर्व हिंसेचा निषेध करायला लागलात तर...)

सर्किट's picture

13 Nov 2007 - 5:58 am | सर्किट (not verified)

सावरकरांची हिंदुत्वाची (मला व्यक्तिशः अतिशय आवडणारी) व्याख्या अशी:

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका
पितृभूपुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः

- सर्किट

सावरकरांची हिंदुत्वाची (मला व्यक्तिशः अतिशय आवडणारी) व्याख्या ....

सावरकरांचा मूळ लेख मी उपक्रमावर चालू असलेल्या संदर्भात 'पोस्ट" केला आहे.

सर्किट's picture

13 Nov 2007 - 10:04 am | सर्किट (not verified)

विकासराव,

मनोगतावरील बेगडी क्रांतिकारकांना आव्हान म्हणून (सर्वपक्षी नावाच्या) मी समग्र सावरकर नावाचे एक संकेतस्थळ सुमारे वर्षभरापूर्वी उभारले आहे. स्वातंत्र्यवीरांच्या नावाने गांधींविरुद्ध शिमगा करणार्‍या सर्वपक्षांना मी तेथे निमंत्रित देखील केले होते. पण चीनवर जीव जडलाय त्यांचा, सावरकरांचे प्रताधिकारमुक्त साहित्य चढवण्यासाठी कम्युनिष्टांकडून पैसा मिळत नाही, तोवर कसे लिहिणार ते ? गांधींविरुद्ध शिमगा करणे हेच त्यांचे कर्तव्य आहे.

आपल्याला, आणि इतर कुणाही मिसळप्रेमींना तात्यारावांविषयी आपुलकी असेल, तर "समग्र सावरकर" हे स्थळ आपल्यासाठी खुले आहे.

आहे हिम्मत ?

- सर्किट

विकास's picture

13 Nov 2007 - 5:46 pm | विकास

सर्कीट साहेब,

आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. मी या स्थळावर आधी एकदा लिहीले होते पण कालांतराने विसरलो. मी लक्षात ठेवून लिहीन. फक्त मी कुणाच्याच नावाने (कम्युनिस्ट सोडल्यास) शिमगा करत नाही, हे आपण जाणून असलात तरी "फॉर द रेकॉर्ड" सांगतो.

विकास

किमयागार's picture

14 Nov 2007 - 6:45 am | किमयागार (not verified)

माफ करा निव्वळ चार गाणी टाकुन 'समग्र सावरकर' साइट बनत नसते. सावरकर हे प्रकरण पचायला तितके सोपे नाही. इथल्या तथाकथीत विद्वान मंडळींचे काँट्रिब्य्शन हवे असल्यास 'समग्र मोदी' असे संकेतस्थळ काढा. पानंच्या पानं भरून नाही आलं लिहुन तर बघा
-किमयागार

सर्किट's picture

14 Nov 2007 - 8:16 am | सर्किट (not verified)

समग्र सावरकर साईट कशी असावी, ह्याबद्दल आपले विचार आम्ही जरूर पचवू. आधी काही विचार तर लिहा. नुस्ती टीका करून काय साध्य होणार ? आपण ज्या संकेतस्थळावर लिहिताहात, त्या संकेतस्थळाची जन्मकुंडली एकदा तपासा. ते कसे निर्माण झाले, ह्याचा विचार करा. नुस्ते इतर संकेतस्थळाच्या धोरणाबद्द्दल टीका करून भागत नसते, स्वतः त्या पाण्यात पाय भिजवायला लागतात मिष्टर. आपल्या सूचनांची वाट पहात आहे.

- सर्किट

किमयागार's picture

14 Nov 2007 - 9:22 am | किमयागार (not verified)

महोदय,
असे क्रोधीत आणि व्यथित होऊ नका. सावरकर हा विषय समजण्यासाठी फार प्रगल्भता हवी. आमचे स्पष्ट मत म्हणजे जर 'टीका' वाटले तर तुम्हाला सावरकर कसे कळणार सांगा बरं?
नुस्ते इतर संकेतस्थळाच्या धोरणाबद्द्दल टीका करून भागत नसते, स्वतः त्या पाण्यात पाय भिजवायला लागतात मिष्टर.
स्वयपाकाला नावं ठेवली की आमचा जानबा स्वयपाक्या अगदी असंच म्हणायचा त्याची आठवण झाली. आपली आणि जानबाची शैली अगदी मिळती जुळती आहे.
-किमयागार

विकास's picture

11 Nov 2007 - 9:29 am | विकास

काय म्हणावे याला, साहेबाला साधे लोकसत्ता वाचता येत नाही. कुमार केतकरांचे अप्रतिम अग्रलेख वाचण्यामासून मुकल्यामुळे, साक्षात प्रिन्स चार्लस आणि त्याची पत्नी कॅमेला स्वामी नारायण मंदीरात जाऊन दिवाळी साजरी करू लागले आहेत.बर जातात ते जातात वर हिंदू समाज हा शांतता प्रिय आहे असे म्हणतात. हा नवहिंदूत्ववाद फारच बोकाळत चालला आहे.

Charles & Camilla's Diwali at Swaminarayan temple

काही भाग (इंग्रजीतच)

Prince Charles and his wife Camilla, Duchess of Cornwall, added colour to the Diwali celebrations in Britain by visiting the Shri Swaminarayan temple in London and participating in a symbolic 'Laxmi Puja' ceremony....

...The Prince and the Duchess each lighted a 'diya' in Haveli to commemorate their presence on the auspicious day of Diwali. After receiving garlands, they participated in a symbolic 'Chopda Pujan' (Laxmi Puja) ceremony while the children chanted Verdic hymns. ...

...Prince Charles, in his address, spoke of his 'great privilege' of visiting the temple on this "auspicious occasion of Diwali, the most wonderful festival of light."...

...He repeatedly complimented the "peace-loving and value-based Hindu community" in the UK and thanked them for their "huge contribution to the fabric... of our society." Prince Charles also shared his personal belief that the local Hindu community is "one of the most positive forces which help to bind the country together." (ठळक मी केले आहे)...

...Several prominent leaders including Councillor Harshad Patel, Mayor of Brent, Councillor Paul Lorber, Leader of Brent council, Dawn Butler, MP, Barry Gardiner, MP were introduced to the Royal couple....

कोलबेर's picture

11 Nov 2007 - 9:49 am | कोलबेर

काही मुद्यांवरील असहमती आणि थोड्या चुका सोडल्यास अग्रलेख आवडला.

देवदत्त's picture

11 Nov 2007 - 10:57 pm | देवदत्त

ह्या लेखात अप्रतिम असे काहीच नाही वाटले. कडवा "मोदी विरोध" ह्यातून दिसतो.
कॉंग्रेस चे एवढे "आरक्षण" करूनही त्यांची मतगणती कमी होत आहे वाटते, त्यावरून लोकांना आता नवहिंदुत्ववाद सांगून काहीतरी लिहायचे आहे म्हणून लिहिले आहे असे वाटते.

राहुल गांधीला "अभिमन्यू" सांगून चक्रव्युहात ढकलतात असे सांगितलेय. त्यांना म्हणावे हे चक्रव्युह वगैरे काही नाही. सगळे राजकारणी एकसारखेच आहेत.

हिंदु नवमध्यमवर्गाला भारतीय तत्वज्ञान,कला,साहित्य यात फारसा रस नाही
मला नाही वाटत. उलट आजकालचा मध्यमवर्ग सर्व क्षेत्रांत रस ठेवतो असे दिसतेय. सर्वेक्षण नव्हे तर गणना (म्हणजे एकूण एक मत) करावी.

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

मार्क्सभक्त परायण (माभप) विकी नेहेमी प्रमाणे मार्क्सवादावर प्रश्न विचारला की जालावरून अंतर्धान पावतात.

गंमत बघा या विकींची आणि सुमार केतकरांची (मला तर वाटते की विकी कदाचीत लोकसत्तेत काम करत असतील अथवा तेच सुमार केतकरही असतीलः)) :

(मोदींच्या वागण्याचे हे समर्थन नाही, पण) : दंगली विरुद्ध अजून बोलून मोदी म्हणजे मुसलमानांविरुद्धचा राक्षस केला गेला आहे. पण नंदीग्राम मधे - जेथे मुसलमानांची संख्या अधीक आहे आणि त्यांच्या जमिनी जात आहेत त्याबाबतीत मात्र मार्क्सवादी जे काय करतात त्यावर आवाज नाही. (लोकसत्तेत अग्रलेख आहे, पण त्यात मुस्लीमांबद्दल उल्लेख नाही आणि तेच बहुतांशी माध्यमांचे). विचार करा हेच जर मोदींनी केले असते तर?

किमयागार's picture

16 Nov 2007 - 9:13 am | किमयागार (not verified)

मोदींसारख्या देव माणसाला राक्षस? कुठे फेडतील ही पापे? तरी त्या आय.पी ऍड्रेसवाल्या माधव गुरूजींना आम्ही 'समग्र मोदी' संकेतस्थळ काढाच असा आग्रह धरलाच आहे. तुम्ही देखिल आम्हाला अनुमोदन द्या पाहू!
-किमयागर