सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
13 Aug 2012 - 2:55 pm | जाई.
सुरेख!!
13 Aug 2012 - 2:55 pm | स्वानन्द
रेखीव आणि सुंदर!
13 Aug 2012 - 3:14 pm | जयंत कुलकर्णी
वर्षा, मस्त....काढले आहे....
13 Aug 2012 - 6:01 pm | प्रभाकर पेठकर
सुरेख आहेत दोन्ही चित्रं.
कॉमन किंगफिशरच्या डोळ्याने त्या संपूर्ण चित्राला एक प्रकारचा जिवंतपणा आला आहे. अभिनंदन.
13 Aug 2012 - 7:55 pm | अत्रुप्त आत्मा
जेबराट हाय....! :)
13 Aug 2012 - 8:02 pm | कवितानागेश
inspiring. :)
13 Aug 2012 - 9:39 pm | खेडूत
सुंदर!!
दोन्हीही छान आलेत!
13 Aug 2012 - 10:12 pm | मैत्र
अवघड माध्यम आहे ... आणि फार सुंदर आली आहेत चित्रं.
अजून येऊ द्या मिपावर ...
13 Aug 2012 - 10:22 pm | पैसा
पेन्सिलनी इतकं बारीक रंगकाम फार छान आलंय! अप्रतिम!
14 Aug 2012 - 8:59 am | वर्षा
धन्यवाद सर्वांना :)
14 Aug 2012 - 9:26 am | मुक्त विहारि
छान छान
14 Aug 2012 - 10:58 am | सविता००१
सुरेख आहेत चित्रे. अजून खूप येउ द्यात. मस्त.
14 Aug 2012 - 11:06 am | सौरभ उप्स
छान मस्त केलंय detailing
14 Aug 2012 - 11:54 am | वैशाली१
फारच छान . रंगसंगती फारच मोहक दिसत आहे .
14 Aug 2012 - 12:02 pm | मदनबाण
मस्त... :)
14 Aug 2012 - 12:35 pm | प्रचेतस
सुरेख.
14 Aug 2012 - 1:44 pm | गणेशा
छानच
15 Aug 2012 - 12:00 am | शुचि
अप्रतिम!!!! धीवर पक्षी आणि केळफुलावरची रानचिमणी दोन्ही मस्त!
15 Aug 2012 - 12:44 am | मोदक
सुरेख.
15 Aug 2012 - 10:43 pm | निवेदिता-ताई
सुंदर
15 Aug 2012 - 11:04 pm | अर्धवटराव
काय सुंदर काढलीत चित्रं...
अर्धवटराव
16 Aug 2012 - 7:50 am | स्पंदना
सुरेख!!
16 Aug 2012 - 11:00 am | वर्षा
धन्यवाद सर्वांना.
@मैत्र, अवघड आहेच आणि वेळखाऊही आहे पण सुटसुटीत आहे. फार पसारा होत नाही. :) आणि सर्वात मुख्य म्हणजे फार छान वाटतं यात काम करताना. डिटेलिंग करायला उत्तम आहे. अमेरीका, युकेमध्ये या माध्यमात काम करणार्या कलाकारांच्या सोसायट्या आहेत. अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत कलर पेन्सिल आर्ट्वरती. आणि उत्कृष्ट चित्रं तर कैक आहेत!
@शुचि, धीवर शब्द खूप दिवसांनी ऐकला. मस्त वाटलं. धन्यवाद. :)
16 Aug 2012 - 12:51 pm | शुचि
वर्षा ही बालभारतीच्या पुस्तकातील कविता ऐकाच तर मग.
तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये ऊभे झाड,
झाडामध्ये धीवराची, दिसे चोच लाल जाड
शुभ्र छाती पिंगे पोट, जसा चाफा यावा फुली,
पंख जणू थंडीमध्ये, बंडी घाले आमसुली.
गड्या पाखरा तू असा, सारा देखणा रे कसा,
पाण्यावर उडताना, नको मात्र मारु मासा.
18 Aug 2012 - 1:24 am | एस
शुचिजी, एकदम ते पान डोळ्यांसमोर आले व त्या कवितेच्या बाजूचे खंड्याचे चित्रही... मी त्या चित्रावरून एक चित्र काढले होते. ते नुसते पुस्तकाचे एक पान नव्हते तर माझ्या स्मृतिपटलावरचा एक सोनेरी क्षण होता. अनेक धन्यवाद...!
*टीप - मला वाटते, त्या ओळी अशा होत्या:
तळ्याकाठी गाती लाटा
लाटांमध्ये उभे झाड
झाडामध्ये धीवराची
हाले चोच लाल जाड
18 Aug 2012 - 1:25 am | एस
वर्षाजी,
काय पोत साधला आहे. मस्त.
स्वॅप्स
19 Aug 2012 - 11:11 am | वर्षा
@शुचि, आठवतेय ही कविता. :) खूप सुंदर. धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल.
स्वॅप्स, धन्यवाद. :)