आमचे पण कोकण दर्शन!

amit_m's picture
amit_m in काथ्याकूट
24 Apr 2012 - 10:42 pm
गाभा: 

मंडळी, आम्ही मे महिन्यामध्ये गुहागर, हरिहरेश्वर, चिपळूण इत्यादी ठिकाणे बघण्याची योजिले आहे. इंटरनेट आणि मिपावर शोधूनही ह्याविषयी जास्त माहिती मिळाली नाही.
राहण्याची व्यवस्था आणि उपलब्धतेविषयी, ही ठिकाणे पाहिलेल्या मिपाकरांनी माहिती दिल्यास मदत होईल. प्रवासाचा तपशील खालीलप्रमाणे,
एकूण व्यक्ती: ०४ (सहल कौटुंबिक आहे)
प्रवासाला निघण्याचे व परतण्याचे ठिकाण: कोल्हापूर
प्रवासाचे साधन: चारचाकी गाडी
उपलब्ध दिवस: ४ ते ५

वर उल्लेख केलेल्या जागांव्यतिरीक्त आणखी काही बघण्यासारखे आहे काय?

प्रतिक्रिया

आबा's picture

25 Apr 2012 - 12:07 am | आबा

हैद्रबाद, गोवा, कोकण ..

observations can be deceiving.
:)

जरा खोदकाम करावे लागेल पण नोव्हें., डिसें. मधले धागे चाळलेत तर कोकणात जाऊन आल्यासारखे वाटेल इतके आहेत. http://www.misalpav.com/node/19703

सुनिल पाटकर's picture

25 Apr 2012 - 10:49 pm | सुनिल पाटकर

गुहागर,, चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यात आहे तर हरिहरेश्वर रायगड जिल्ह्यात .कोल्हापूर्चा विचार करता हरिहरेश्वर दूर आहे .प्रथम चिपळूण येथे यावे . परशुराम मंदिर ,डेरवणची शिवसृष्टी ,गोवळ्कोट .गुहागरमध्ये व्याडेश्वर मंदिर ,उफराटा गणेश ,जवळच हेदवी येथे दशभुजा गणेश मंदिर ,बामणघळ ,वेळणेश्वर.चिपळूण वगळता अन्य ठिकाणी सुंदर समुद्र किनारे आहेत.गुहागर,, चिपळूण तालुक्याचे ठिकाण असल्याने राहण्याची व्यवस्था आरामात होते.गुहागरात कर्मयोग विश्रामगृह आहे.कोकणात प्रवास निर्धास्त करावा.हरिहरेश्वर दूर आहे.त्याऐवजी रत्नागिरी ,पावस,गणपतीपुळे करावे.

पैसा's picture

26 Apr 2012 - 12:13 am | पैसा

http://www.misalpav.com/node/11184
http://www.misalpav.com/node/20343
http://www.misalpav.com/node/17533

हे तीन दुवे बघा. वेळ मिळेल तेव्हा आणखी माहिती देईन.