हवेचा रंग कुठला?

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
1 Jan 2012 - 8:55 pm

परवा लेक घरात शिरली ती एक प्रश्न मनात घेऊनच.

“आई, हवा कुठल्या रंगाची असते?” इति लेक.

“अगं हवेला रंग नसतो.” तिच्या बाला सुलभ प्रश्नाच बायकोने निरसन केल.

“हरलीस?”

“?”

“अग हवेचा रंग गुलाबी असतो.” लेकीने तारा तोडला.
आताशी बायकोच्या भूवयांच धनुष्य झाल होतं.

“ते गाणं नाहीये कां ‘ही गुलाबी हवाऽऽऽऽऽऽ वेड लावी जीवाऽऽऽऽऽऽ’ येव्हाना लेकीने तालही धरला होता.
मग एकदम खिदळली आणि म्हणाली “अग आई, पीजे होता”.
“पण आई खरंच गुलाबी हवा म्हणजे काय?”

बायकोचा छोटा पॉज.

“कसला विंचार करतेयस आई.”

“मोठ्या माणसांना वेगळ्या शब्दांत सांगाव लागत. लहान मुलांना साध्या सोप्प्या शब्दांत समजेल अस सांगाव लागत. म्हणून वेळ घेतेय.”

“ओक्के. मी वाट पहातेय.”

“प्रेम म्हटल की त्याचा रंग गुलाबी असतो असं म्हणतात. या गाण्यात कवि प्रेमात पडला आहे, आणि म्हणून तो हवेला गुलाबी म्हणतोय. कळलं कां?“ बायको जमेल तितक सोप्प करण्याचा प्रयत्न केला.

“हो” लेकीचा एक-दोन सेकंदाचा छोटा पॉज
“आता हेच तु मोठ्या माणसांना कस समजावशील?”

मौजमजाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

1 Jan 2012 - 9:27 pm | माझीही शॅम्पेन

गुलाबी हवा :) हा हा हा. प्रेमात पडल्याचे ते साइड इफेक्ट आहेत ते !!! :)

(गुलाबी हवेतील) माझीही शॅम्पेन

पक पक पक's picture

1 Jan 2012 - 10:04 pm | पक पक पक

हो! माझ्या समोर सुद्धा हे असले प्रश्न माझ्या मुलीकडून उपस्थित केले जातात.काय उत्तर द्यावे तेच समजत नाही.

मन१'s picture

1 Jan 2012 - 10:04 pm | मन१

खुसखुशीत.

"आता हेच तु मोठ्या माणसांना कस समजावशील?”
मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देणे...
कठिण आहे बुवा !!

किचेन's picture

1 Jan 2012 - 11:06 pm | किचेन

तुमच्या बायकोचा चेहरा समोर दिसतोय. ;)
(परा काकांचा (माफी.. सन्माननीय पराशेठ चा ) तो लोटपोट हसणारा स्मायली इथे उधार घेउन इथे टाकलाय अस समजा.)

आजकाल घराघरात हेच चालत.
एक नाही अनेक प्रश्न आहेत.आमचा शेजारचा पिंट्या अन त्याचा भाऊ असेच भयंकर प्रश्न घेऊन येतात.तेव्हा मी खूप बिझी आहे अस दाखवते.
आवरलेल घर पुन्हा आवरते.

५० फक्त's picture

2 Jan 2012 - 11:51 am | ५० फक्त

अवांतर - आवरलेलं घर पुन्हा आवरणं ही शेजा-यांची पोरं घरात आल्याचं लक्षण आहे..

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2012 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

@-आता हेच तु मोठ्या माणसांना कस समजावशील?>>> मोठ्या माणसांना हे कुठे समजवावं लागतं ;-)

पैसा's picture

1 Jan 2012 - 11:39 pm | पैसा

तुझ्याकडे तरी काही उत्तर आहे का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Jan 2012 - 3:19 am | विश्वनाथ मेहेंदळे

सरळ गीतेतला एखादा श्लोक म्हणून दाखवायचा. त्याचा अर्थ ती विचारणार नाही, कारण त्याचा अर्थ म्हणजे "ही गुलाबी हवा..." असे तिला वाटणार.

तसेही गीतेतल्या बऱ्याच श्लोकांचे अर्थ कसेही लावता येतात. कशी आहे आयडिया ??

पाषाणभेद's picture

2 Jan 2012 - 12:10 am | पाषाणभेद

अगं पण तू मोठी कुठं झालीय अजून उत्तर ऐकायला!

भन्नाट. लहान मुलं कधी काय विचारतील सांगता येत नाही.

धन्या's picture

2 Jan 2012 - 6:15 am | धन्या

मस्त किस्सा !!!

तुमच्या कन्येचा “आता हेच तु मोठ्या माणसांना कस समजावशील?” हा प्रश्न ऐकल्यावर वहिनींनी कपाळावर हात मारुन घेतला असेल. :)

सुमो's picture

2 Jan 2012 - 11:57 am | सुमो

एकवेळ मनीष तिवारींशी वादविवादात जिंकता येईल..

पण मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देणे महाकर्मकठीण !!!

सुहास..'s picture

2 Jan 2012 - 12:03 pm | सुहास..

ही ही ही ही !

निश's picture

2 Jan 2012 - 12:58 pm | निश

आजकाल मुल आईवडिलाना काय काय विचारतिल ह्याचा नेम नसतो.

लेख तुमच्या पाककॄतिंसारखा मस्त व खुशखुशित झाला आहे.

मस्त

प्रभाकर पेठकर's picture

2 Jan 2012 - 2:27 pm | प्रभाकर पेठकर

मोठ्यांसाठी हवेचा एकच रंग नसतो. हवा 'गुलाबी' आहे असे जाणवे जाणवे पर्यंत ती (म्हणजे हवा हो..) 'लालभडक' होऊन जाळूही लागते.

ठ्ठो..

सहमत..

अशा बाबतीत सामान्य हवामानशास्त्राला टेंपोत बसवले जाते हेच खरे..

गणपा's picture

2 Jan 2012 - 2:55 pm | गणपा

=))

इरसाल's picture

2 Jan 2012 - 3:14 pm | इरसाल

म्हणजे मी एकटाच नाहीये तर !!!!!

सध्या मीही ह्याच फेज मधून जातोय. मी सध्या टीवी मध्ये असणाऱ्या प्रत्येक कार्टून चे आई, वडी,भाऊ-बहिण किंवा मित्र-मैत्रीण कोण? कुठे चालले? का चालले? कधी परत येतील, मग जेवणार कधी आणि जेवतील तर काय खातील, वगैरे अश्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात असतो.

असंच:- खिडकीच्या बाजूने खारुताई जर चूक चूक करून गेली तर माझी लेक म्हणते "वो मुझे बुला रही गोलूबाई गोलूबाई आ जाओ खेलने" (हे बाई प्रकरण कामवाली बाई वरून शिकली बहुतेक.......बाकी काय नाय हा !!!!)

आता समजतंय कि गणितातली प्रमेये, रसायन शास्त्रातली सूत्रे आणि रासायनिक प्रक्रिया, जीव शास्त्रातल्या आकृत्या किती सोपे काम होते.

इरसाल,

आपण सगळे एका नावेतले एकत्र येउन याबद्दल लिहित जावु, कधी कुठं अन काय विचारतील अन बोलतील ही पोरं याचा नक्की अंदाज आला ना तर शपथ्थ, परवा एका लग्नाला गेलो होतो, नवरा नवरीला स्टेजवर भेटलो, पाकिट दिलं, त्या नव-यानं ते पाकिट मागं बसलेल्या पोरीकडं दिलं, माझा पोरगा तिला जाउन सांगतोय,' वन हंड्रेड रुपिज आहे त्यात, नीट ठेव पर्समध्ये. '

दादा कोंडके's picture

2 Jan 2012 - 11:21 pm | दादा कोंडके

खत्रा प्रसंग आहे हो ५०राव! :)

कुठंसा वाचलेला विनोद आठवला.
म्हैला मंडळाच्या मीटींग मध्ये एक बाई म्हणाली, "हल्ली लहान मुलांचं खोटं बोलण म्हणजे एक समस्याचा होउन बसलीये". त्यावर दुसरी एक अनुभवी बै म्हणाली, "त्याही पेक्षा गंभीर समस्या म्हणजे ती भलत्या वेळेला खरं बोलतात!" :D

स्वाती२'s picture

2 Jan 2012 - 5:19 pm | स्वाती२

:)

विनायक प्रभू's picture

2 Jan 2012 - 5:22 pm | विनायक प्रभू

रें गणपा, समजा हाच प्रश्न मी तुला विचारला तर काय म्हणशील?

रें गणपा, समजा हाच प्रश्न मी तुला विचारला तर काय म्हणशील?

पर्‍याची मंदाकिनी वाचा.
अपने आप समझ जाओगे मास्तर. ;)

विनायक प्रभू's picture

2 Jan 2012 - 5:27 pm | विनायक प्रभू

लगेच साल काढलीस वाट्टॅ?

रेवती's picture

3 Jan 2012 - 12:10 am | रेवती

हा हा हा.
अडचणीत टाकणारा प्रश्न.;)
भारतात असताना सुदैवाने मुलाला दोन, तीन खेळगडी मिळाले होते आणि रोज क्रिकेट खेळत असत.
बराच वेळ मानस नावाच्या मुलाला हाका मारूनही तो आला नाही म्हणून मी मुलाला नंतर विचारले की मानस का आला नाही रे? त्यावर तो म्हणाला की नक्की माहीत नाही पण दुसर्‍या मुलाने सांगितले की मानसला डिस्टर्ब करू नका तो सध्या प्रेमात पडलाय.