गाभा:
मराठीत बर्याच म्हणी /वाक्प्रचार आहेत आहेत त्याना काही प्रसंग कारणी भूत आहेत.
उदा:होता जीवा म्हणून वाचला शिवा / गड आला पण सिंह गेला / छातीचा कोट करणे / अमक्यातमक्याचा कात्रज करणे, ध चा मा करणे, अशा बर्याच म्हणी/वाक्प्रचाराना ऐतिहासीक संदर्भ आहेत.
काथ्या कूटणे वगैरे वाक्प्रचाराना देखील ऐतीहासीक शिक्षेचा संदर्भ आहे.
,रण माजणे ,धराशायी होणे या वाक्प्रचाराला तर युद्धाचा संदर्भ आहे.आजीबाईचा बटवा याला त्यातील कोण्या एका आजीबाईने बटव्यात ठेवलेल्या औषधोपचारांची संदर्भ आहे.
मात्र काही म्हणी/वाक्प्रचारांचे संदर्भ लागत नाहीत.
उदा:आपले ठेवायचे झाकुन अन दुसर्याचे बघायचे वाकून" ही म्हण कशामुळे आलेली असावी बरे?
अशा काही म्हणी तुम्हालाही आठवत असतील तर लिहा ना.
प्रतिक्रिया
11 Nov 2011 - 7:12 pm | नरेश_
शंका - करुन गेला गाव अन...
11 Nov 2011 - 7:18 pm | तिमा
शतकोत्तर होण्यासाठी जन्मला आहे का हा धागा?
खात्री नाही, पण पूर्वी शेतांत बसायचे ना सामुदायिकपणे, तेंव्हाच निघाली असावी ही म्हण!
11 Nov 2011 - 7:19 pm | चतुरंग
ह्या म्हणीचा उगम कशात असावा? ते सांगा ना राव, मग सगळे मिळूण कुटूया काथ्या, नुसतंच आपलं आम्हाला विचारता होय?
तुमच्या ह्या अशा प्रयत्नालाच म्हणतात "आपलं ठेवायचं झाकून अन दुसर्याचं बघायचं वाकून!" ;)
(झाकपाक करणारा) रंगा
11 Nov 2011 - 7:25 pm | गणपा
फारच स्पष्ट बोलता बॉ तुम्ही रंगाशेट. ;)
11 Nov 2011 - 7:48 pm | lakhu risbud
आपलं घर नी हा*न भर.
म्हणीचा उगम देण्याची गरज आहे?
अजून एक
एखाद्याने पार लाज सोडली असेल तर ग्रामीण भागात म्हणतात
"त्यानी तर पार कमरेच काढून डोक्याला गुंडाळल "
अशीच अजून एक म्हण,
"मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली "
11 Nov 2011 - 7:53 pm | यकु
विजुभौच्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही पण आमच्या कानावर पडलेल्या काही म्हणी.
१. रामजाणे घनश्याम बापू
२. 'ऊ' ची ** फोडता येत नाही अन् चौकशा डीएसपीच्या वरच्या
३. समय पडेवे पाछे गधेडानुं काको कहेवो पडे ( अडला हरीचे गुजराती व्हर्जन )
11 Nov 2011 - 8:39 pm | प्रास
समय पडेवे पाछे गधेडानुं काको कहेवो पडे ( अडला हरीचे गुजराती व्हर्जन )
याचच -
प्रसंग आता हैं बाँका तो गधेकोभी कहना पडता हैं काका। (हिन्दी व्हर्जन)
:-)
11 Nov 2011 - 8:46 pm | अमोल मेंढे
अजुन एक म्हण आमच्या ग्रामीण भागातली...गां* खाजवाले नख नाही अन वारा जायले भोक नाही
11 Nov 2011 - 9:07 pm | पाऊसवेडा
जसं गूगल... तसं उगंल...
आलीया धक्का... असावे दादर...
11 Nov 2011 - 11:24 pm | जोशी 'ले'
खाई त्याला खव खव :-) …(खरडवहि)
11 Nov 2011 - 11:40 pm | जोशी 'ले'
एकदा बाजिराव पेशव्यांन च्या हाता वर पाणी टाकतांना त्यांच्या सेवकाचे लक्ष त्यांच्या पगडीतील मोत्यांचा तुर्या वर गेले तो थोडा लोबांयला लागला होता, हाता वर पाणी सोडतांना त्याने तसे बाजिरावांना सांगितले व पाणी दुसरी कडे सांडले…ते त्यांना आवडले नाही त्यावर ते म्हणाले " धु म्हटले कि धुवायचे लोंबतय काय ते नाहि पहायचे”
12 Nov 2011 - 2:09 pm | अविनाशकुलकर्णी
भाई लोकांच्या सडक छाप म्ह्नणी....
===============================
लेट जावे पण थेट जावे.
कुटाने केल्याशिवाय फुटाने मिळत नाही.
जजमेंट फेल तर येरवडा जेल.
एक फाईट, ससून साईट.
ज्याला व्हायचंय भाई, त्याला वर जायची घाई.
जय महाराष्ट्र, बोला स्पष्ट, करा नष्ट
नडला कि तोडला, आजपर्यंत कुणालाच नाही सोडला.
दोन पंच आणि एक लंच झाले की भरला दिवस
मजबूरी का नाम महात्मा गांधी.
फुकटच घावाल आणि बाप लेक धावलं
भिकारीकी शादी...लंडनमे खरेदी.
समझता नहीं बात को, चिल्लाता आधी रात को...!"
जे जे फुकट ते ते पौष्टिक
मारवाडी पटांव..गरिबी हटांव
शेख..तेरी तू देख...!
अचानक उठला...भिंतीला जाऊन धड़कला...!
घाल झड़प...कर गड़प...!
हाती घ्याल...ते घरी न्याल..
फुलवला पिसारा...मागुन दिसला पसारा...!
कोण नाय कोनचा डाल भात लोनचा
भेळ वर खेळ
घेतली सुपारी...भेट दुपारी...!!!
फोकट का चंदन घीस मेरे नंदन
अटक मटक चवळी चटक.. दिसला धोका सटक ...
लाख शिवाय बात नाय आन वडापाव शिवाय खात नाय
हातभर गजरा अन गावभर नजरा
सुकट घ्यायची नाही ऐपत आणि पापलेट बसलाय दाबत
संग्राहक.......अविनाश.....
12 Nov 2011 - 8:15 pm | JAGOMOHANPYARE
शेजारणीला लुगडं आणि घरातलं नागडं
13 Nov 2011 - 10:08 am | भीडस्त
गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं
13 Nov 2011 - 10:36 am | रविंद्र गायकवाड
मजबुरी का नाम महात्मा गांधी ही म्हण खुप ऐकली आहे. पण गांधींची अशी कोणती मजबुरी होती ज्याचा उल्लेख केला जातो.?
13 Nov 2011 - 1:45 pm | हारुन शेख
गांधीवाद आपल्याला साधेपणा शिकवतो, जेंव्हा कुणी एखादी चैनीची गोष्ट खरेदी करता येत नाही म्हणून केवळ असे म्हणतो की "माझा गांधीजींच्या तत्वावर विश्वास आहे म्हणून असल्या चैनीचा त्याग केला आहे" तो एकप्रकारे स्वतःची मजबूरीच गांधीजींच्या नावामागे लपवत असतो म्हणून असे म्हणत असावेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
13 Nov 2011 - 1:51 pm | रविंद्र गायकवाड
धन्यवाद..
13 Nov 2011 - 5:31 pm | अमोल मेंढे
१००% सहमत
13 Nov 2011 - 7:48 pm | सचिन
गावात विचारत नाही कुत्र
आणि फेसबुकवर हजारो मित्र !!!!!!!
14 Nov 2011 - 1:26 pm | विजुभाऊ
" धु म्हटले कि धुवायचे लोंबतय काय ते नाहि पहायचे”
ते असे आहे होय. आमाला कायतरी भलतेच वाटायचे ;)