रंगावली प्रदर्शन २०११ (गिरगांव रंगावली ग्रुप) भाग २

मदनबाण's picture
मदनबाण in विशेष
9 Nov 2011 - 10:24 pm
दिवाळी २०११

माझे मनोगतः ---

रांगोळी ही कला मला फार भावते.इतकं सुंदर चित्रण साकारताना किती मेहनतं लागत असेल, हे एखादी पूर्ण झालेली रांगोळी पाहुन लगेचच कळते नाही ? अर्थातच हो... कलाकारांच्या बोटातली जादु तुम्हाला काही क्षणातच एका वेगळ्या भाव विश्वात घेउन जाते... तुम्हाला वेगळा विचार करायला भाग पाडते, एखाद्या घटनेची तुम्हाला आठवण करुन देते.माझ्या शाळेत मी रांगोळी प्रदर्शन पहायला गेलेल्याचे मला आठवते,तसेच संस्कार भारतीच्याही मी रांगोळ्या पाहिल्या आहेत.या कलेत इतकी विविधता साकारताना वापरली जाणारी माध्यमं म्हणजे रांगोळी आणि रंग ! जमिनीवर काही वेळातच साकारले जाणारे एक कलाचित्र. :)
स्थळ :--- भारतीय विद्या भवन,डॉ.क.म. मुन्शी मार्ग,चौपाटी,मुंबई ४०० ००७
गिरगांव रंगावली ग्रुप.

(हौशी फोटुग्राफर) :)
मदनबाण.....

भाग १

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

10 Nov 2011 - 2:20 am | सुहास झेले

निव्वळ अप्रतिम...स्टीव जॉब्स विशेष आवडला :) :)

गणेशा's picture

10 Nov 2011 - 7:24 pm | गणेशा

अप्रतिम ..
बाकी मत वरील प्रमाणेच

दीप्स's picture

10 Nov 2011 - 2:28 am | दीप्स

खुपच सुन्दर आहेत रांगोळ्या. पण ही कला प्रतेकाला अवगत नसते बरका?

मस्तच!
दुसरा भागही चांगला झाला आहे.

पाषाणभेद's picture

10 Nov 2011 - 3:39 am | पाषाणभेद

सुंदर रांगोळीचित्रे आहेत ही. पाहून समाधान झाले.

प्राजु's picture

10 Nov 2011 - 3:59 am | प्राजु

खूपच सुंदर!
धन्यवाद बाणा!

स्टीव जॉब्स एक्दम झकास..बाकी सुद्धा मस्त आहेत.

अप्रतिम...पहील्या रांगोळीतील छाया प्रकाश आणि गांधींच्या रांगोळीतील कलशा वरील मेटालीक ईफेक्ट सहीच

जाई.'s picture

10 Nov 2011 - 11:05 am | जाई.

सुंदर आहेत रांगोळ्या

वपाडाव's picture

10 Nov 2011 - 11:59 am | वपाडाव

शंकर अन घुबडाची रांगोळी आडौल्या गेली आहे....
मदनबाणा, खुप छान रे बाबा !!

सगळ्याच सुंदर आहेत. पहिल्या दोन तर गोडच.

स्वैर परी's picture

10 Nov 2011 - 2:29 pm | स्वैर परी

गांधीजी, शंकर आणी स्टीव्ह जॉब्स यांच्या प्रतिमा विशेष आवडल्या!

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2011 - 7:45 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍यादस्त रे बाणा.

ह्या कलाकारांना आणि त्यांची कला आमच्या पर्यंत पोहोचवणार्‍या तुला देखील सलाम.

प्रकाश१११'s picture

10 Nov 2011 - 8:22 pm | प्रकाश१११

रांगोळी चित्रे नि फोटोग्राफी
सुंदर .अप्रतिम. .!!

स्मिता.'s picture

10 Nov 2011 - 8:56 pm | स्मिता.

या भागातल्या रांगोळ्याही अतिशय सुरेख आहेत. कला आणि मेहनत दोघांचाही संगम आहे.
गांधीजी, उमा-शंकर आणी स्टिव्ह जॉब्स सगळ्यात आवडले.

५० फक्त's picture

10 Nov 2011 - 10:28 pm | ५० फक्त

घुबड जबरदस्तच, धन्स मबा.

मदनबाण's picture

11 Nov 2011 - 9:23 am | मदनबाण

धन्स मंडळी... :)
पुढचा भाग रंगावली मालिकेचा शेवटचा भाग असेल.

किसन शिंदे's picture

11 Nov 2011 - 9:52 am | किसन शिंदे

सगळ्याच रांगोळ्या सुंदर, त्यातल्या त्यात स्टीव जॉब्सची ब्येष्टच.

शेवटच्या भागाची वाट पाहतोय, लवकर टाक.

फारच जबरी रांगोळ्या. स्टीव जॉब्स तर कमाल. येउद्या अजून.

सूड's picture

12 Nov 2011 - 12:42 pm | सूड

आवडल्या गेली आहे.

पिंगू's picture

13 Nov 2011 - 6:03 am | पिंगू

जबरदस्त.. सर्व रांगोळी कलाकारांचे अभिनंदन. बाकी धन्स बाणा, एवढे उत्तम छायाचित्रे काढल्याबद्दल.

- पिंगू

चतुरंग's picture

13 Nov 2011 - 9:04 am | चतुरंग

कमाल आहे ह्या कलाकारांची. टोपी काढली आहे!

जगजीत सिंग, गांधी, घुबड, स्टीव जॉब्ज हे विशेष उल्लेखनीय.
जॉब्जचा आजाराने आक्रसलेला तरीही त्याच्या बुद्धीचं तेज दाखवणारा चेहेरा, हातातला आयफोन आणि त्याची पंजावरची सावली खतरनाक डीटेलिंग केलंय किशोर लोके यांनी.

(बाणा, चित्रे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद. ह्या कलाकारांचे फोटू देता आले तर बघ ना. कोण आहेत ही अफलातून माणसं ते तरी बघूदेत.)

-रंगा

(बाणा, चित्रे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद. ह्या कलाकारांचे फोटू देता आले तर बघ ना. कोण आहेत ही अफलातून माणसं ते तरी बघूदेत.)

ही मंडळी कोण ती मला माहित नाहीत... दिवाळीत गिरगावात गेल्यावर रांगोळी प्रदर्शन पहायला मिळेल असे वाटले होते... ती इच्छा पूर्ण झाली.पण कलाकार मंडळींचे दर्शन काही घडले नाही.

संजयशिवाजीरावगडगे's picture

28 Nov 2011 - 12:12 pm | संजयशिवाजीरावगडगे

उमा शंकर अद्भुत !! मनमोहक आहेत!!

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2011 - 12:36 am | अत्रुप्त आत्मा

या भागातल्या सगळ्या एक सो एक आहेत....एकदम मस्त :-) वाचनखुण साठवली.