Skip to main content

रंगावली प्रदर्शन २०११ (गिरगांव रंगावली ग्रुप) भाग २

लेखक मदनबाण यांनी बुधवार, 09/11/2011 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मनोगतः --- रांगोळी ही कला मला फार भावते.इतकं सुंदर चित्रण साकारताना किती मेहनतं लागत असेल, हे एखादी पूर्ण झालेली रांगोळी पाहुन लगेचच कळते नाही ? अर्थातच हो... कलाकारांच्या बोटातली जादु तुम्हाला काही क्षणातच एका वेगळ्या भाव विश्वात घेउन जाते... तुम्हाला वेगळा विचार करायला भाग पाडते, एखाद्या घटनेची तुम्हाला आठवण करुन देते.माझ्या शाळेत मी रांगोळी प्रदर्शन पहायला गेलेल्याचे मला आठवते,तसेच संस्कार भारतीच्याही मी रांगोळ्या पाहिल्या आहेत.या कलेत इतकी विविधता साकारताना वापरली जाणारी माध्यमं म्हणजे रांगोळी आणि रंग ! जमिनीवर काही वेळातच साकारले जाणारे एक कलाचित्र. :) स्थळ :--- भारतीय विद्या भवन,डॉ.क.म. मुन्शी मार्ग,चौपाटी,मुंबई ४०० ००७ गिरगांव रंगावली ग्रुप. (हौशी फोटुग्राफर) :) मदनबाण..... भाग १

वाचने 25501
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

खुपच सुन्दर आहेत रांगोळ्या. पण ही कला प्रतेकाला अवगत नसते बरका?

शंकर अन घुबडाची रांगोळी आडौल्या गेली आहे.... मदनबाणा, खुप छान रे बाबा !!

गांधीजी, शंकर आणी स्टीव्ह जॉब्स यांच्या प्रतिमा विशेष आवडल्या!

जबर्‍यादस्त रे बाणा. ह्या कलाकारांना आणि त्यांची कला आमच्या पर्यंत पोहोचवणार्‍या तुला देखील सलाम.

या भागातल्या रांगोळ्याही अतिशय सुरेख आहेत. कला आणि मेहनत दोघांचाही संगम आहे. गांधीजी, उमा-शंकर आणी स्टिव्ह जॉब्स सगळ्यात आवडले.

सगळ्याच रांगोळ्या सुंदर, त्यातल्या त्यात स्टीव जॉब्सची ब्येष्टच. शेवटच्या भागाची वाट पाहतोय, लवकर टाक.

जबरदस्त.. सर्व रांगोळी कलाकारांचे अभिनंदन. बाकी धन्स बाणा, एवढे उत्तम छायाचित्रे काढल्याबद्दल. - पिंगू

कमाल आहे ह्या कलाकारांची. टोपी काढली आहे! जगजीत सिंग, गांधी, घुबड, स्टीव जॉब्ज हे विशेष उल्लेखनीय. जॉब्जचा आजाराने आक्रसलेला तरीही त्याच्या बुद्धीचं तेज दाखवणारा चेहेरा, हातातला आयफोन आणि त्याची पंजावरची सावली खतरनाक डीटेलिंग केलंय किशोर लोके यांनी. (बाणा, चित्रे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद. ह्या कलाकारांचे फोटू देता आले तर बघ ना. कोण आहेत ही अफलातून माणसं ते तरी बघूदेत.) -रंगा

In reply to by चतुरंग

(बाणा, चित्रे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद. ह्या कलाकारांचे फोटू देता आले तर बघ ना. कोण आहेत ही अफलातून माणसं ते तरी बघूदेत.) ही मंडळी कोण ती मला माहित नाहीत... दिवाळीत गिरगावात गेल्यावर रांगोळी प्रदर्शन पहायला मिळेल असे वाटले होते... ती इच्छा पूर्ण झाली.पण कलाकार मंडळींचे दर्शन काही घडले नाही.