दीपावली साठी घरी बनवलेल्या पणत्या :)

पूनम ब's picture
पूनम ब in विशेष
1 Nov 2011 - 12:52 am
दिवाळी २०११

सर्व मिसळ पाव कराना दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..या दिवाळी ला मी स्वताच घरी पणत्या बनवल्या..खूप छान अनुभव होता..रंगीत माती आणि गव्हाची कणिक याचा वापर करून सुंदर पणत्या तयार करता येतात. मी बनवलेल्या काही पणत्यांचे नमुने मी इथे सादर करत आहे.

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

1 Nov 2011 - 1:00 am | दादा कोंडके

सुंदर आहेत पणत्या.

पूनम ब's picture

1 Nov 2011 - 1:20 am | पूनम ब

धन्यवाद!

इंटरनेटस्नेही's picture

1 Nov 2011 - 2:43 am | इंटरनेटस्नेही

अ प्र ति म! मिसळपाववर स्वागत!

धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल !!

पूनम, अतिशय सुरेख नक्षिकाम आहे.
तू कलाकार दिसते आहेस.:)
या पणत्या वापरता येतात की फक्त सजावटीच्या आहेत?
याची कृती थोडक्यात सांगता येईल का?

फोटो बघितल्या बघितल्या फक्त एकच शब्द निघाला, "जबरदस्त !!!" ..

--टुकुल

पूनम ब's picture

1 Nov 2011 - 7:23 am | पूनम ब

खूप खूप धन्यवाद ताई..मी काही कलाकार वगैरे नाही. असाच छंद आहे मला काही न काही बनवायचा..पहिल्या फोटो मधील पणत्या वापरल्या मी दिवाळी ला..त्या गव्हाच्या कणके पासून बनवल्या आहेत. दुसऱ्या फोटो मधील मात्र फक्त सजावटीसाठी आहेत..त्या रंगीत माती पासून बनवल्या आहेत. गव्हाच्या कणके पासून पणत्या बनवण्यासाठी मी वापरलेले प्रमाण इथे देते आहे.
१ कप गव्हाचे पीठ
१ कप मीठ
१/२ कप पाणी
कणिक घट्ट मळून घ्यायची. त्यापासून हव्या तशा आकाराच्या पणत्या बनवायच्या आणि ओव्हन मध्ये १५० - २०० डिग्री फ़रेन्हेइत तापमानावर छान भाजून घायच्या. भाजून कठीण वायला बराच वेळ लागतो. साधारण २ ते २.३० तास लागतात. थंड झाल्यावर त्यावर अक्रालिक रंगाने रंग देऊन हवे तसे कुंदन आणि मनी लाऊन सजवावे. :) गव्हाच्या कणिके पासून मी तुलसी व्रीन्दावन हि बनवले होते..त्याचा फोटो इथे लावत आहे. :)

वपाडाव's picture

1 Nov 2011 - 10:33 am | वपाडाव

वाह !!!
छानच की.... कणकेपासुन पणत्या....

प्रचेतस's picture

1 Nov 2011 - 8:20 am | प्रचेतस

पणत्या खूपच सुंदर आहेत.

पूनम ब's picture

1 Nov 2011 - 8:40 am | पूनम ब

धन्यवाद!! :)

छान छंद आहे.. पणत्या मस्त जमून आल्या आहेत. कशा बनवल्या त्याबद्दल अधिक माहिती दिल्यास छान होईल..

- पिंगू

आपला पत्ता दिल्यास मागल्या वर्षीच्या पणत्या कुरियर करणेत येतील....
हलकेच घ्या....

पूनम ब's picture

1 Nov 2011 - 7:39 pm | पूनम ब

धन्यवाद.. :) पणत्या साठीची कणिक बनवण्यासाठी लागणारे प्रमाण वरील एका प्रतिक्रियेत दिले आहे..बाकी रंगीत माती, अक्रालिक रंग आणि सजावटीचे सामान स्टोअर मध्ये सहज मिळून जाते. मातीचे २ प्रकार मिळतात. एक एयर ड्राय क्ले आणि दुसरी साधी रंगीत माती..एयर ड्राय क्ले हाताला चिटकत नाही आणि खूपच हलकी असते. मी गणपती बाप्पा बनवण्यासाठी हि माती वापरली..पण पणत्या बनवण्यासाठी मात्र साधी रंगीत माती वापरली..त्या कठीण होण्यासाठी ३-४ दिवस लागतात.

छान सुंदर कला आहे. मस्त आहेत पणत्या!!

बहुगुणी's picture

2 Nov 2011 - 1:55 am | बहुगुणी

गव्हाचं पीठ वापरता येतं ही नवीनच माहिती कळली. फार सुंदर दिसताहेत पणत्या (आणि वृंदावनही).

एक प्रश्न आणि एक शंका:

मीठ का वापरायचं?
आणि पीठाची पणती तेल 'पीत' नाही का? (ओव्हनमध्ये खरपूस भाजल्यामुळे तसं होत नसेल कदाचित.)

पूनम ब's picture

2 Nov 2011 - 8:18 am | पूनम ब

मीठ घातल्यामुळे पणत्या भाजल्या नंतर त्याला चिरा पडत नाहीत आणि पणत्या स्मूथ बनतात. पणत्या थोडे तेल पितात. :)

जाई.'s picture

2 Nov 2011 - 9:28 am | जाई.

सुंदर

पियुशा's picture

2 Nov 2011 - 4:21 pm | पियुशा

वॉव :)

स्वाती२'s picture

2 Nov 2011 - 7:13 pm | स्वाती२

सही आहेत. पणत्यांची कृती दिल्याबद्दल धन्यवाद.

दत्ता काळे's picture

2 Nov 2011 - 7:21 pm | दत्ता काळे

पणत्यांच्या ताजातवान्या रंगाच्या नक्षीकामावरची पांढर्‍या रंगाची फुलं / नक्षी खूपच उठावदार आहे.

कच्ची कैरी's picture

3 Nov 2011 - 1:07 pm | कच्ची कैरी

पणत्या खरच खूप छान आहेत आणि अगदीच नविन प्रकार कळला हा पणत्यांचा .

प्रभाकर पेठकर's picture

15 Nov 2011 - 1:27 am | प्रभाकर पेठकर

फार सुंदर आहेत पणत्या.

उशीराने दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व.