सध्या ११ वी प्रवेशाची सर्वत्र गडबड चालू आहे.
त्यावर हे एक विडंबन
चालः जगदिश खेबुडकरांचे , बापुजींनी संगीतबध्द केलेले आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातील प्रसिध्द गाणे - 'देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा'
-------------------------------------------------------------------------
मार्कांची पुण्याई, वशिल्याचा ठेवा !
ऍडमिशन मिळे आता, डोनेशन घेता !!
उभे सर्व रांगेमधुनी अर्ज भरण्यासाठी
मनी पालकांच्या का रे भीती भविष्याची
९० टक्के मार्क असुनही घाम का फुटावा ! ऍडमिशन मिळे आता, डोनेशन घेता !!
कॉलेजला जाण्यासाठी अट्टहास केला
गुरुजींच्या जोखडातुन वेडा मुक्त झाला
पदोपदी कॉलेजांचा सुळसुळाट झाला !! ऍडमिशन मिळे आता, डोनेशन घेता !!
निकालात होते स्वप्न. आशेचा तो मार्ग
ज्याला त्याला एकच आहे सायन्सचा ध्यास
कला आणी कॉमर्सची ही अशीच थरा ! ऍडमिशन मिळे आता, डोनेशन घेता !!
उद्या तरी पांडुरंगा कटऑफ लिस्ट लागावी
मुक्तपणे मला जागा इथेतरी मिळावी
मार्ग माझ्या तारुण्याचा, मोकळा करावा !!ऍडमिशन मिळे आता, डोनेशन घेता !!
प्रतिक्रिया
11 Jul 2008 - 8:53 pm | अनंतसागर
=D> अतिशय उत्कृष्ट विडंबन
अप्रतिम
11 Jul 2008 - 11:53 pm | अभिज्ञ
छान जमलय.
अभिज्ञ.
11 Jul 2008 - 11:53 pm | अभिज्ञ
छान जमलय.
अभिज्ञ.
12 Jul 2008 - 1:07 am | विसोबा खेचर
सगळंच विडंबन सुंदर...! :)
अभिनंदन केळकरराव!
आपला,
तात्या वर्दे.
12 Jul 2008 - 3:10 am | प्राजु
मस्त जमलंय..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Jul 2008 - 3:25 am | शितल
मस्त झाले आहे विडबन
12 Jul 2008 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विडंबन झकास जमलंय !!!
अजून येऊ द्या !!!
12 Jul 2008 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विडंबन झकास जमलंय !!!
अजून येऊ द्या !!!