जुन्या वस्तू

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
18 Sep 2011 - 12:11 pm
गाभा: 

बर्याच लोकाना वापरलेल्या जुन्या वस्तू विकत घेण्यास आवडतात..
तर काही लोकांना ते फारसे पटत नाही..जुन्या वस्तूत मूळ मालकाच्या वासना अडकलेल्या असतात अशी एक समजूत आहे.
त्याचा फटका सेकंड ओनरला बसू शकतो, विशेषतः वाहन आणि वास्तू या दोन गोष्टी जुन्या / वापरलेल्या असू नयेत असा सर्वसामान्य संकेत असतो.
अमुक एखादी वस्तू नाखुशीने, तळतळाटाने वगैरे विकलेली असल्यास ती 'लाभत' नाही असे मानतात
वापलेले बेड ..कपाटे..मायक्रोव्हेव ...दूर दर्शन संच..मोबाईल..फ्रीज..वाहने चांगल्या अवस्थेत असतात व बाजार भावा पेक्षा खुप कमी किमतीत मिळतात..व तश्या जाहिराति पण पेप्रात झळकत असतात..
जुन्या वापरालेल्या वस्तू विकण्याची बरीच कारणे असतात..त्या पैकी ..बदली..नवीन मोडेल बाजार आले..पैशाची गरज इ ...
आता तर अश्या वस्तुंच्या खरेदी विक्री साठी अनेक साईट्स पण नेट वर आहेत..
कारखाना होता त्या वेळी जुनी मशीन्स मी विकत घेतली होती..चांगला अनुभव आला होता..
काही लोकांचा फंडा असतो..जुन्या वापरलेल्या वस्तू घ्यायच्या नाहीत..
आपण कधि जुनी वस्तु विकत घेतली आहे का?
आपले अनुभव काय आहेत???/

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2011 - 1:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमेरिकेत अशा वस्तुंचा बाजार भरतो असे काही तरी वाचले होते. बाकी, आमच्या औरंगाबादेत असा एक बाजार रविवारी भरतो. खूप कामाच्या वस्तू मिळतात. मी तरी घेतो बॉ...तर-

>>>> आपण कधि जुनी वस्तु विकत घेतली आहे का ?

हो. एक मोठा वॉल्व असलेला रेडियो घेतला होता. माझी सध्याची पल्सर बाईक (कोणाची तरी बँकेने ओढून नेलेली होती) मी वापरतो आहे. अजूनही कोणाकडे अशी स्टाइलीश बाईक आहे, आणि ती जर कोणाला विकायची असेल तर मी ग्राहक आहे. :)

>>>> आपले अनुभव काय आहेत???
काही वस्तुंसाठी दुरुस्तीचा खर्च वरच्यावर करावा लागतो त्यामुळे नवीनच वस्तू बरी असा विचार मनात जुनी वस्तू विकत घेतल्यावर येत असतो, हाच वाईट अनुभव असतो.

-दिलीप बिरुटे

मराठी_माणूस's picture

19 Sep 2011 - 9:29 am | मराठी_माणूस

अमेरिकेत अशा वस्तुंचा बाजार भरतो असे काही तरी वाचले होते.

बरोबर . त्याला 'गराज सेल' म्हणतात. आपल्या नेटीव्हांच्या त्याच्यावर बर्‍याच उड्या पडतात आणि मग कोणत्या वस्तु कीती स्वस्तात आणल्या ह्याच्या चर्चा रंगतात . "लाभत नाही" वगैरे बुरसटलेले विचार तिथे (सोयिस्कररित्या) कोणी करत नाही.

नवजात अर्भकाला जुने वापरलेले सुती कपडे घालत
हे कपडे जवळच्या, प्रेमाच्या लोकांनी मुद्दाम सांभाळून ठेवलेले असत.
असे कपडे मऊ तर असतातच, शिवाय नवीन कपड्यात असणारी खळ व रंगातील रसायने नसतात.

नरेश_'s picture

18 Sep 2011 - 1:59 pm | नरेश_

शक्यतो टाळतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2011 - 2:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>शक्यतो टाळतो.

अमुक एखादी वस्तू नाखुशीने, तळतळाटाने वगैरे विकलेली असल्यास ती 'लाभत' नाही असे मानतात
म्हणून का ?

-दिलीप बिरुटे

नरेश_'s picture

18 Sep 2011 - 2:11 pm | नरेश_

राजीखुशीनं एखाद्यानं वस्तू विकली असेल तर ठीक, मात्र नाइलाजानं विकावं असल्यास न घेणं (स्वतःपुरता विचार करता) इष्ट!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2011 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो डॉक्टरसाहेब, पण आपल्याला काय माहिती की समोरचा व्यक्ती आपली वस्तू राजीखुशीनं विकतोय की अन्य कोणत्या कारणाने ? आपण त्याला उलट म्हणतो तसे दाम दिले तर उलट तो खुशच होईल ना ?
काय म्हणता ?

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

18 Sep 2011 - 2:15 pm | पैसा

आम्ही आतापर्यंत २ गाड्या (१ फियाट आणि १ मारुती ८००) सेकण्ड हॅण्ड घेऊन, काही वर्षं वापरून, परत तिसर्‍या माणसाला विकल्या. आम्हाला किंवा त्या घेणार्‍याला काही त्रास झालेला नाही. मारुती ८०० तर इतकी चांगली होती, की ३ वर्षांत एका पंक्चरशिवाय काही दुरुस्ती करावी लागली नाही.

जेव्हा तुम्हाला जास्त लोन घ्यायचं नसेल, तेव्हा घरं/गाड्या सेकण्ड हॅण्ड घ्यायला काहीच हरकत नाही, कारण ती विकणारा माणूस अधिक चांगलं घर्/गाडी घेण्यासाठीच आधीची विकत असतो. त्यामुळे त्याच्या इच्छा अडकून रहात असतील वगैरे गोष्टीत काही तत्थ्य असावं असं नाही वाटत.

इंटरनेटस्नेही's picture

18 Sep 2011 - 3:07 pm | इंटरनेटस्नेही

जेव्हा तुम्हाला जास्त लोन घ्यायचं नसेल, तेव्हा घरं*/गाड्या सेकण्ड हॅण्ड घ्यायला काहीच हरकत नाही, कारण ती विकणारा माणूस अधिक चांगलं घर्/गाडी घेण्यासाठीच आधीची विकत असतो. त्यामुळे त्याच्या इच्छा अडकून रहात असतील वगैरे गोष्टीत काही तत्थ्य असावं असं नाही वाटत.

*घरं वगळता संपुर्ण सहमत.

घरासहित सहमत.....
ऐपत नसेल घर घेण्याची तर काय करणार.....

"और वोही चिज, वोही क्वालिटी, कम दामोमे मिले तो कोइ ये क्यु ले वो न ले"
"मानगये पैसाजी, आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनोंको"

आपण कधि जुनी वस्तु विकत घेतली आहे का?
आपले अनुभव काय आहेत???

भावना (पक्षी "गर्भीत अर्थ") पोहोचल्या;) ;-) :wink:

नगरीनिरंजन's picture

18 Sep 2011 - 2:34 pm | नगरीनिरंजन

त्यालाही आजकाल हरकत नसावी.

टवाळ कार्टा's picture

18 Sep 2011 - 5:03 pm | टवाळ कार्टा

काय राव....खुपच शौकीन दिसता ;)

नरेश_'s picture

18 Sep 2011 - 2:37 pm | नरेश_

हायजॅक होतोय!!!!

शाहिर's picture

18 Sep 2011 - 4:59 pm | शाहिर

नवीन कोरी व्हिंटेज कार हवी आहे

शाहिर's picture

18 Sep 2011 - 5:51 pm | शाहिर

अंधश्रद्धा आहे ही ..असे काही नसते ..

आता म्हणाल मेलेल्या माणसांच्या वासना / तळतळाट चे काय ??

त्याही वस्तुंमध्ये अडकल्या असतिलच कि ....

सी.एम / पी एम च्या खुर्ची मध्ये किति जणांच्या वासना / तळतळाट आसतील ...

बकी तुम्हला अनुभव काय ?

अवांतर : मि पा वर जुन्या धाग्यामध्ये काहि जणांच्या वासना अडकल्या असतात ..

नितिन थत्ते's picture

18 Sep 2011 - 8:09 pm | नितिन थत्ते

आमच्या आसपास सेकंडहॅण्ड* गाड्यांची दोन तीन नवी दुकाने निघाली आहेत आणि ती जोरात धंदा करतात. त्या अर्थी लोकांचा त्यावर फारसा विश्वास नसावा.

माझ्या वडिलांनी लँब्रेटा स्कूटर सेकंड हॅण्ड घेतली होती. मूळ मालकाला त्या स्कूटरवर अपघात झाल्यामुळे त्यांनी ती विकली. आम्हाला त्या (अपघाती) स्कूटरने काही त्रास दिला नाही.

तसेच जुने कपडे, पुस्तके धाकट्या भावंडांनी वापरण्याची सर्रास पद्धत होती.

*हल्ली सेकंड हॅण्ड न म्हणता प्री-ओन्ड म्हणण्याची पद्धत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2011 - 8:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> *हल्ली सेकंड हॅण्ड न म्हणता प्री-ओन्ड म्हणण्याची पद्धत आहे.

माहितीबद्दल धन्यवाद.

बाकी, सेकंडहँड वस्तू आहे म्हटल्यावर ऐकणार्‍याच्या मनात. आणि वस्तू पाहणार्‍याच्या मनात आनंदाचे भाव क्वचितच उमटतात काय कारण असेल कोणास ठाऊक...? इथे फक्त वस्तू घेणाराच आनंदात दिसतो.

'' नाही पण वस्तू नवीनच घेतली असती तर बरं झालं असतं'' या पाठीमागे नवीन वस्तू घेऊन समोरचा खड्ड्यात (आर्थिक नुकसान) गेला पाहिजे अशीच भावना असेल काय ? की नवीन वस्तूच चांगल्या असतात अशी प्रामाणिक भावना असते काही कळत नाही. तुमचा काय अंदाज ?

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

18 Sep 2011 - 8:47 pm | रमताराम

हल्ली सेकंड हॅण्ड न म्हणता प्री-ओन्ड म्हणण्याची पद्धत आहे.
ऑस्सम. थत्तेसाब एकदम 'ट्रेन्डी' आहेत हं. सेकंड्-हॅन्ड म्हणणं म्हणजे अगदीच 'डाउन मार्केट' (कोण 'ओल्ड फॅशन्ड' म्हणतोय तो) वाटतं नै? आम्हाला तर थत्तेंचं म्हणणं एकदम पटलं ब्वॉ (टक् टक्) 'टचवुड'!

माझ्या मुलाला लहान असताना सॅन्डबॉक्स हवे होते. मला तो प्रकार नको होता. पण दोन तीन महिने त्याचा हट्ट पाहून क्रेग्जलीस्ट्वर विकायला आलेली बॉक्स मी पसंत केली आणि ४० मैल ती आणायला गेले तर ते भारतीय कुटुंब होते (त्यांनीच गप्पा वाढवल्या म्हणून समजले) त्यावेळी आर्थिक संकटात सापडल्याने बर्‍याच वस्तू विकायला काढल्या होत्या. आम्ही बॉक्स गाडीत ठेवताना त्यांचा लहान मुलगा इतका आशाळभूतपणे पहात होता की मला गलबलून आले. घरी आणल्यानंतर माझ्या मुलाने एकदाही त्या वाळूपेटीला हात लावला नाही. "आता म्ह्टल्याप्रमाणे आणलीये तर खेळ तरी!" असे रागावल्याने दोनदा खेळला आणि नंतर हातही लावला नाही. अजूनही त्या कुटुंबाची झालेली अवस्था आठवते. मुलांची रोजच्या खेळण्यातली खेळणी विकायला काढण्यात त्या आईवडीलांनाही काही मौज वाटली नसेल. याव्यतिरिक्त वापरून व्यवस्थित असलेल्या वस्तू विकायला काढल्या तर त्यात वाईट वाटायची शक्यता कमी असते. त्या घेताना काही वाटू नये. मी कधी घेतल्या नाहीयेत पण!

खेडूत's picture

18 Sep 2011 - 11:13 pm | खेडूत

अवांतर आहे पण याच्या वरून आठवलं, इथे फ्रीसायकल चळवळ जोरात असते. त्याच्या जगभर शाखा आहेत पण भारतात कधी असे ऐकले नव्हते. बागेतल्या मातीपासून किमती वस्तूंपर्यंत नको असलेल्या वस्तू मोफत देऊन टाकतात.

चित्रगुप्त's picture

19 Sep 2011 - 3:54 am | चित्रगुप्त

रेवतीताईंनी दिलेले उदाहरण मला फार र्‍हदयस्पर्शी वाटले. मला कल्पनेतच त्या मुलाचा केविलवाणा चेहरा दिसत आहे.
यावरून हे लक्षात येते की वस्तु विकताना त्या वापरणार्‍याच्या भावनांची कदर करायला हवी. विशेषतः लहान मुले व वृद्ध यांच्याबद्दल जास्तच.
त्या मुलाची झालेली निराशा आणि तुमच्या मुलाने त्या वस्तूला हात न लावणे यातही मला काही तर्कापलिकडील विश्वातील संबंध असावा, असे वाटते. त्या मुलाच्या त्या वस्तूत गुंतलेल्या भावना अगम्य रीतीने तुमच्या मुलाला जाणवल्या असण्याची शक्यता वाटते.

घराची वास्तुशांत करणे, घेतलेली गाडी आधी मंदिरात नेणे वा पूजा करणे, यातून मनाला एक प्रकारचे समाधान मिळते, वा धास्ती कमी होते, असे दिसते.

इंटरनेटस्नेही's picture

19 Sep 2011 - 12:30 am | इंटरनेटस्नेही

आमच्या कुलकर्णी काकांचे टॉपिक्च असे हटके असतात. _/\_

कोदरकर's picture

19 Sep 2011 - 12:46 am | कोदरकर

नव्या वस्तु देखिल ५०% पेक्षा जास्त जुने साहित्य वापरुनच बनविल्या असतात.. उदा. सोफा..
आशाळभुत भावना समोर दिसत असेल तर आपण साहजिकच त्या वस्तु टाळतो.. पण व्यवहारी विचार करता.. वापरा आणि सोडुन द्या हा नियमच "आहे रे" आणि "नाही रे" मधील दुरी कमी करेल....

मी घर घेतले ते पण रिसेल मध्ये घेतले गाडी मारुती ८०० पण जुनीच घेतले आहे. पण मला अद्याप काही वाईट अनुभव आला नाही.
कदाचित देवावर माझी जास्त श्रद्धा आहे म्हणून कि काय?

अन्या दातार's picture

20 Sep 2011 - 3:46 pm | अन्या दातार

>>कदाचित देवावर माझी जास्त श्रद्धा आहे म्हणून कि काय?

श्रद्धा कशी मोजावी यावर आपले मौलिक विचार ऐकण्यास उत्सुक. श्रद्धा मॉड्युलेशन (कमी-जास्त) कशी करावी हेही कळले तर नंतर सेकंड-हँड/ प्री-ओन्ड वस्तु घेण्यातली रिस्क कमी होईल अशी अपेक्षा करतो.

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2011 - 1:36 pm | प्रभाकर पेठकर

सेकंड हँड किंवा प्री-ओन्ड वस्तूंमध्ये आधीच्या मालकाच्या भावना गुंतलेल्या असतात त्या मुळे त्या लाभत नाहीत ही केवळ अंधश्रद्धा आहे.

मी एक मनगटी घड्याळ, एक मोटरसायकल, तीन कार्स, तीन एसीज्, दोन टिव्हीज्, एक व्हिसीआर्, एक सोफा, एक कपड्याचे कपाट, एक मिक्सर, एक डीप फ्रायर आणि शाळा कॉलेजात अगणित पुस्तके सेकंड हँड सेल मध्ये घेतली आहेत. वाईट अनुभव सोडा, त्या सर्व वस्तूंनी 'दृष्ट लागावी अशी' सेवा मला दिली आहे.

नव्या कोर्‍या वस्तूसुद्धा कित्येकदा आणल्यापासून अनेकदा बिघडतात, कधी कधी अक्षरशः पैसा फुकट जातो. अंधश्रद्धेतून विचार केल्यास त्या वस्तू सुद्धा शो-रुम मध्ये असताना कोणाला तरी आवडल्या असतील पण पैशाअभावी घेता आल्या नसतील तर त्यात ही 'त्या' 'त्या' अनेक गिर्‍हाईकांच्या भावना त्यात गुंतलेल्या असतीलच. असा विचार केल्यास नव्या किंवा जुन्या कुठल्याच वस्तू खरेदी करता येणार नाहीत.

रमताराम's picture

20 Sep 2011 - 1:10 am | रमताराम

अगदी सहमत आहे. (फक्त 'एक मनगटी घड्याळ...' पासून 'डीप फ्रायर' पर्यंतचा मजकूर वगळून. :) )

कुंदन's picture

19 Sep 2011 - 9:45 pm | कुंदन

नवी कोरी पुस्तके घेउन पण एटीकेटी ने आमची पाठ कधी सोडली नाही . ;-)

हुप्प्या's picture

20 Sep 2011 - 7:30 am | हुप्प्या

एक पर्यावरण प्रेमी म्हणून दुसर्‍याने वापरलेल्या वस्तू विकत घेणे व वापरणे आपल्या हिताचे आहे असे मला वाटते.
समजा मला एक सायकल हवी आहे. मी वापरलेली सायकल (अगदी आपल्याला हव्या त्या पद्धतीने पारखून) घेतली तर किंमत कमी पडतेच शिवाय ती एक सायकल पडून रहाणे वा कचर्‍यात फेकली जाण्यापासून वाचते.

सायकल बनवणे, ती दुकानापर्यंत पोचवणे, गिर्‍हाईकापर्यंत पोचवणे ह्यात ऊर्जा व कच्चा माल वापरला जातो. वस्तू जास्त वापरली गेली तर ह्या सगळ्या ऊर्जेचा जास्त वापर होतो आणि पर्यावरणाची हानी कमी होते.

असेच कार, टीव्ही, कंप्यूटर वा फोनलाही लागू पडेल.

सेकंड हँड गोष्ट वापरल्यामुळे आपण पर्यावरणाला मदत करत आहोत हा मुद्दा बरेच लोक लक्षात घेत नाहीत.

अनेक व्यायामाची नवी उपकरणे ही अवाच्या सवा भावात असतात. बहुतेक लोक आता मी नियमित व्यायाम करणार असा विचार करून, मोहाला बळी पडून असेच कुठलेसे उपकरण घेतात आणि काही दिवसात त्यावर धूळ बसू लागते. असे उपकरण जवळपास नवेकोरे, अगदी किरकोळ किंमतीत विकत घेता येते आणि साफसूफ करून वापरता येते असा अनुभव आहे.

नितिन थत्ते's picture

20 Sep 2011 - 10:13 am | नितिन थत्ते

हा हा हा.

व्यायामाची उपकरणे बहुतेक फिफ्थ किंवा सिक्स्थ हॅण्डही नवी कोरीच मिळतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2011 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यायामाची उपकरणे बहुतेक फिफ्थ किंवा सिक्स्थ हॅण्डही नवी कोरीच मिळतील.

हाहाहा सहमत आहे.

-दिलीप बिरुटे

वपाडाव's picture

20 Sep 2011 - 6:16 pm | वपाडाव

व्यायाम करणे हे आवडत नसल्याने बाकी बाबींशी सहमत........

निनाद's picture

20 Sep 2011 - 10:30 am | निनाद

मला तरी वैयक्तिकरित्या त्यात काही वावगे वाटत नाही. पण रेवतीताईंचा अनुभव आहे तसा काही आला तर मी कदाचित वापरणार नाही.

तरीही अनेकदा लोकं आपल्या वस्तु फुकट देऊन टाकत असतात. मी ही अनेक वस्तू नवीन आलेल्या लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. त्यातून काही वेळा गैरसमज झाल्याने आताशा तसे करताना काळजी घेतो! :( आता मी देण्यासाठी गमट्री वापरण्याच्या विचारात आहे.
गम ट्रीवर कोणत्याही वस्तूची जाहिरात फुकट करता येते त्यात फ्रीबी नावाचा विभागच आहे. तेथे फुकट देउन टाकण्याच्या जाहिराती असतात. यात कपडे, कुत्रे, वॉशिंग मशिन्स वासून वाटेल ते असते. एका बहाद्दराने तर मागे फुकट प्रॉपर्टी हवी आहे अशी जाहिरात दिली होती. :)
http://sydney.gumtree.com.au/f-Classifieds-W0QQAdTypeZ2QQPriceAlternativeZ3

परिकथेतील राजकुमार's picture

20 Sep 2011 - 3:29 pm | परिकथेतील राजकुमार

काही स्त्रीया सेकंडहॅंड नवरे करतात, तर काही पुरुष सेकंडहॅंड बायका...

त्यांचे पण अनुभव असतील कोणाला तर येउ द्यात.

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2011 - 9:42 am | टवाळ कार्टा

श्टेपनी पन विचारात घ्या ;)

शाहिर's picture

20 Sep 2011 - 5:15 pm | शाहिर

लग्न या एकाच प्रकारा मधे फ्रेशेर्स ला डीमांड असते...अनुभवी लोकांना कमी असते...

मी-सौरभ's picture

20 Sep 2011 - 5:32 pm | मी-सौरभ

>>लग्न या एकाच प्रकारा मधे

आय ओब्जेक्ट...
आणूभवींनी समजून घ्या
बाकीच्यांनी मोठे व्हा...

परिकथेतील राजकुमार's picture

20 Sep 2011 - 5:58 pm | परिकथेतील राजकुमार

आय ओब्जेक्ट...
आणूभवींनी समजून घ्या
बाकीच्यांनी मोठे व्हा...

एक नंबर !
सहमत सहमत सहमत !

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2011 - 9:45 am | टवाळ कार्टा

मग काय कितीतरी हिरोइंन्स दुसर्या बायकांचे नवरे करतात... त्यांना कुठे प्रॉब्लेम आला आहे

वापरलेले सेकंडहँड बीचक्राफ्ट बी२४आर सिएरा विकणे आहे. किंमत सव्वीस लाख पन्नास हजार मात्र.

१९८१ मॉडेल. चार सीटर. एअरवर्दी आणि उत्तम स्थितीत.

कोणाच्या इच्छा गुंतल्या आहेत का कल्पना नाही.

नितिन थत्ते's picture

22 Sep 2011 - 12:44 pm | नितिन थत्ते

सव्वीस लाख पण्णास हजार पैशांना घ्यायला मी तयार आहे. पाठवून द्या. क्याश ऑन डिलिव्हरी.