विडा

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
23 Nov 2010 - 4:56 am

जालावर फिरता फिरता अनेक सद्गुरुस्तोत्रे वाचनात येतात. काही कळतात बरीचशी कळत नाहीत. काही संस्कृत स्तोत्रांची गोडी भाषांतरात हरवते. पण बरेचदा योग जुळून येतो आणि एखादं अप्रतिम, अनवट स्तोत्र समोर येतं जे की जे मन उजळून टाकतं, एक दिव्य आनंदानुभव देऊन जातं. असं स्तोत्र वाचून वाटतं - अरे हेच वाचण्यासाठी आपण मराठी मातीत जन्माला आलो. हेच ते सर्वोच्च, सर्वांगसुंदर स्तोत्र. आता याहून अधिक पाहणे उरले नाही. हा अनुभव मला "विसरू कसा मी गुरुपादुकाला" वाचताना आला. हाच देजा वू अनुभव "गुरु।गुणालया।परापराधिनाथ सुंदरा।" हे स्तोत्र वाचताना आला. पण दर वेळेस परत दैवी कृपा होते आणि मी परत एखाद्या दिव्य स्तोत्रापाशी येऊन अडखळते.

यावेळेसही तेच झालं. जालावर फिरता फिरता हे अनवट सद्गुरू स्तोत्र वाचनात आलं. थोडसं मानसपूजा या प्रकारात हे स्तोत्र मोडतं. गुरुस भक्तीभावे अर्पण करावयाच्या त्रयोदशगुणी विड्याचे अत्यंत रसाळ वर्णन करणारे, सात्त्विक असे हे स्तोत्र आहे. त्रयोदशगुणीविड्यामध्ये पुढील १३ जिनसा वापरल्या जातात - चुना, कात, सुपारी, वेलदोडा, लवंग, बडीशोप, खोबरे, जायपत्री, ज्येष्ठमध, कापूर, कंकोळ, केशर, खसखस. साक्षात आपल्या सद्गुरुला विडा भक्तीभावाने अर्पण करायचा तर तो कशा प्रकारच्या अष्टसात्विक गुणांनी युक्त असावा याचे अत्यंत काव्यात्मक दर्शन या स्तोत्रामधून घडते.

शिष्याचा स्वतःचा देह हेच जणू विड्याचे पान आहे. या पानामध्ये विवेकाची सुगंधी केशर-कस्तुरी, वैराग्याची कात, भक्तीरूपी चुना-सुपारी, भूतदयेची पत्री, शांतीरूपी वेलदोडा, आणि सत्क्रिया-क्षमारूपी बदाम, खोबरं, कंकोळ आदी जिनसा घालून मोठ्या प्रेमाने अर्पण करण्यात येणार आहे.राजस पदार्थ हे सात्त्विक गुणांबरोबर कल्पिल्याने अतिशय आगळंवेगळं सौंदर्य लेवून हा विडा आपल्या समोर येतो.

विडा घ्या हो स्वामी गुरुराया| तूची विश्रांतीची छाया||
अर्पितसे स्वीकार कराया|समर्थ तू योगीराया||धृ||
देह हे पिकले पान|त्यात घालोनी सामान||
त्रयोदशगुणीपूर्ण|विडा झाला प्रेमळ भजन||१||
केशर कस्तुरी विवेक|वैराग्याचा त्यात कात||
चुना भक्ती ही सुपारी|पत्री ही भूतदया||२||
शांती ही वेलदोडा|समाधान जायफळा||
बदाम खोबरे कंकोळ|क्षमा लवंग सत्क्रिया||३||
बालक दासाचा हा दास|प्रसादाची करी आस||४॥

विडासेवन झाल्यानंतर सद्गुरुंच्या विश्रांतीचा समय भक्त कल्पितो. त्यांची शेज निगुतीने, अष्टसात्विक भावाने आणि अत्यंत प्रेमाने तो तयार करतो. सर्वात प्रथम वैराग्याचा कुंचा घेऊन चौक झाडून काढतो. त्यावर सत्प्रेमाचा शिडकाव करून नवविध भक्तीच्या पायघड्या घालतो. मंद अशा ज्ञानज्योतीच्या समया लावून, शेजेवर सुमनांची (श्लेष) पखरण करतो. कुठे दुर्बुद्धीच्या गाठींचे पडदे सोडून देतो तर कुठे साक्षात दया, क्षमा, शांती सामींची सेवा करण्यास तत्पर आहेत असे कल्पीतो. अशा रीतीने उन्मनी असे त्याचे स्वामी त्याने विणलेला अलक्ष भक्तीरूपी नाजूक शेला घेऊन निजले आहेत असे तो चिंततो.

आता स्वामी सुखे निद्रा करी अवधूता|सिद्धा अवधूता||
चिन्मय सुखस्वामी जऊनी पहुडा एकांता||
वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला|
तयावरी सत्प्रेमाचा शिडकाव केला||१||
पायघड्या घातलिया सुंदर नवविधा भक्ती||
स्वामी नवविधा भक्ती||
ज्ञानाच्या समई उजळोनी लावियल्या ज्योती||२||
भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगला|हृदयाकाशी टांगला|
मनाची सुमने करूनी केले शेजेला||३||
द्वैताचे कपाट लावूनी एकीकरण केले|एकीकरण केले|
दुर्बुद्धीच्या गाठी सोदूनी पडदे सोडीले||४||
आता तृष्णा कल्पनेचा सांडूनी गलबला|स्वामी सांडूनी गलबला||
क्षमा दया शांती उभ्या सेवेला||५||
अलक्ष हा उन्मनी घेऊनी नाजूक हा शेला|स्वामी नाजूक हा शेला|
निरंजन सद्गुरू माझा स्वामी निजला शेजेला||६||

धर्मसद्भावनाशुभेच्छाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

यकु's picture

23 Nov 2010 - 5:32 am | यकु

शुचिताई,
तुम्ही असं नेहमीच दत्तात्रेयांची, देवीची स्तोत्र देता आणि मग मला नको असूनही आमचे गुंजग्रामीचे दिवस आठवू लागतात. हे गुंज म्हणजे परभणी जिल्ह्याच्या पाथरी (साईबाबांचे जन्मगाव) तालुक्यातील एक गाव प्रति गाणगापूर मानले जाते.
नृसिंह सरस्वतींचे एक नादमय स्तोत्र मला फार आवडत होते. आता विसरले. आठ-दहा वर्षांनंतर आता पंचपदीचे पुस्तक हातात घेऊन टाईप करतोय -
हे सोवळ्यात असल्याशिवाय (तुमचा गणपती आठवला!), चप्पल वगैरे घालून वाचू नये म्हणतात - आणि वाचले तर पिसे लागते म्हणतात - मी अगोदरच पिसा असल्याने टेन्शन नॉट - वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर वाचावे ;-) बहुतेक दत्तभक्तांना गुरूचरित्रातील हे अष्टक माहित असेलच

इंदु कोटितेज करूणासिंधु भक्त वत्सलम
नंदनात्रिसूनूदत्त मिन्दिराक्षश्रीगुरूम
गंधमाल्यअक्षतादिवृन्द देववन्दितम
वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम
मायापाश अन्धकार छाया दूर भास्करम
आयताक्ष, पाहि श्रियावल्लभेशनायकम
सेव्यभक्तवृन्द वरद, भूयो भूयो नमाम्यहं
वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम
चित्तजादिवर्गषट्कमत्तवारणांकुशम ।
तत्वसार शोभितात्म दत्त श्रियावल्लभम
वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम
व्योम वायुतेज आपभूमिकर्तृमीश्वरम
काम क्रोध मोहरहित सोमसूर्य लोचनम
कामितार्थ दातृभक्त कामधेनू श्रीगुरूम
वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम
पुण्डरिक आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम
चंड दुरितखंडनार्थ दंडधारिश्रीगुरूम
मण्डलीक मौलि मार्तंडभासिताननम
वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम
वेदशास्त्रस्तुत्यपाद, आदिमूर्ती श्रीगुरूम
नादबिंदुकलातीत - कल्पपादसेव्ययम
सेव्यभक्तवृंदवरद भूयो-भूयो नमाम्यहम
वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम
अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्टज्ञानवारिधिम
कृष्णावेणीतीरवासपंचनदी सेवनम
कष्टदैन्यदूरिभक्ततुष्ट काम्यदायकम
वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम
नारसिंहसरस्वती नाम अष्टमौक्तिकम
हारकृतशारदेन गंगाधर आत्मजम
धारणीकदेवदीक्ष गुरूमूर्ती तोषीतम
परमात्मानंदश्रिया पुत्रपौत्रदायकम
नारसिंह - सरस्वतीय अष्टकं च य: पठेत
घोर संसारसिंधू तारणाख्य साधनम
सारज्ञान दीर्घआयुरारोग्यादिसंपदम
चारूवर्ग काम्यलाभ वारंवारयज्जपेत
इति श्रीगुरूचरित्रांतर्गत श्रीस नरसिंहसरस्वती अष्टकसंपूर्णम

शुचि's picture

23 Nov 2010 - 6:24 am | शुचि

सुंदर हो. धन्यवाद इथे दिल्याबद्दल. मी माझ्या वहीत उतरवून घेतलं आहे पण उतरवता उतरवता एक लक्षात आलं . एक ओळ गायब आहे-

वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम
चित्तजादिवर्गषट्कमत्तवारणांकुशम ।
तत्वसार शोभितात्म दत्त श्रियावल्लभम
वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम

२ वन्दयामि या धृपदांच्या मध्ये ३ ओळी पाहीजेत. प्लीज जरा द्याल का एक ती ओळ?

बहुधा "उत्तमावतारभूतकर्तृभक्तवत्सलम्" अशी ओळ आहे पण जाणकारांकडून खात्री करुन घ्यावी! वडिलांकडून अनेक वर्षे रोज ऐकल्यामुळे ओळ लक्षात आली पण हा संपूर्ण शब्द आहे की कुठे संधीविग्रह आहे याची कल्पना नाही!

चुकले असल्यास क्षमस्व!

--असुर

असुर's picture

23 Nov 2010 - 6:50 am | असुर

सुंदर! आवडले हे वेगळे सांगावयास नको!

यशवंत एकनाथ यांचेही श्रीपाद श्रीवल्लभ गुरुस्त्रोत्रासाठी आभार!

--असुर

दर वेळेस परत दैवी कृपा होते आणि मी परत एखाद्या दिव्य स्तोत्रापाशी येऊन अडखळते.
या अशा पद्धतीचे लिखाण प्रस्तुत लेखिका जालावर का करतात त्याचे प्रयोजन खरोखरच कळत नाही. या लेखिकेची लेखन शैली अत्यंत वाचनीय आहे. परंतु Relevant आणि Real Life संबंधी विषयांच्यावर लेखन न करता असले अंधश्रद्धा पसरवणारे लेखन त्या लिहित असल्याने त्या अंधश्रद्धा प्रसार व प्रचार समितीच्या कार्यवाह वगैरे आहेत की काय? असे वाटू लागते.

इतक्या सुंदर स्तोत्रापाशी मी बरेचदा माझ्या प्रयत्नांनीच येऊन पोचते पण मला ती देवाची कृपा वाटते. आता यात अंधश्रद्धा कुठे आली? ही झाली श्रद्धा.

दुसरं म्हणजे - मला ज्या विषयाबद्दल आतून काही ममत्व वाटेल त्यावरच मी लिहू शकते. खोटं कशाला लिहू शास्त्रीय किंवा रियल लाइफबद्दल तुम्ही सल्ला देता त्याप्रमाणे? मला ज्याचा ध्यास आहे त्यावरच मी लिहीणार.

स्पंदना's picture

23 Nov 2010 - 8:42 am | स्पंदना

पण श्रद्धा अन अंध श्रद्धा यातला फरक माझ्या मते तरी अतिशय ढळढळीत आहे.

श्रद्धा, -देव वा अशी कोणतीही एक शक्ती जिच्यावर भक्ती असणे , जिथे मनःशांती मिळवण्या साठी आश्रय शोधणे वा एका अनामिक ओढीन व्यक्त होण.
अंधश्रद्धा- याच देव या संकल्पनेच स्तोम माजवणे, समाज मनात भिती निर्माण करणे. विविध पुजा अर्चाचे अवडंबर माजवणे.

वरील लेखात वा शुचीच्या बाकिच्या कोणत्याही लेखात तुम्ही अस करा वा करु नका असा कोणताही आग्रह कधीच नाही दिसत. बहुर्तेक वेळा तिच्या वाचनात येणार्‍या काही सुन्दर भावना ती इथे प्रकट करते. भक्ती प्रकट करण्या साठी स्वतः च शरीर एखाद्या खाद्य वस्तुसमान मानुन ते अर्पण करण अन प्रिय व्यक्तीला आवडत म्हणुन पैसे, वेळ खर्चुन एखादी भेट वस्तु देण, या दोन्ही भावनात , जर त्या निरातिशय प्रेमातुन, प्रामाणिकपणे, आल्या असतील तर, मला तर कोणताच फरक जाणवत नाही. ही एक वेगळी पातळी असते मनाची अन ती सर्वांनाच नाही उलगडत.

तुमच्या न्यायान, मग माउ लिहित असलेला विपश्यनेचा अनुभव सुद्धा अंधश्रद्धा या नावाखाली मोडीत काढता येइल.

गवि's picture

23 Nov 2010 - 3:49 pm | गवि

श्रद्धा, अंधश्रद्धा वगैरे या टर्म्सना तसा काही अर्थ नाही. श्रद्धा अंधपणे ठेवली तरच सुंदर दिसते. नव्हे..श्रद्धा ही आंधळीच असते.

श्रद्धेतून कुठे अन्याय /पिळवणूक/बळी/ दक्षिणेची लूट/ वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहणे असं दिसलं तर विरोध करायचा.

पण जिथे काहीतरी गृहितक धरुन विश्वास ठेवणार्‍याला /भक्ती करणार्‍याला समाधान, शांती मिळत असेल तिथे फार काही अपायकारक आहे असं मला वाटत नाही.

लोक मलाही कट्टर नास्तिक समजतात. पण देव आणि भक्ती या गोष्टी सिद्ध करण्या पलीकडल्या आहेत.

मी देवावर श्रद्धा किंवा अंधश्रद्धाही ठेवू शकत नाही. आणि ती मी माझ्यातली कमतरता समजतो..गुण नव्हे..

शुचि. लेख छान..

अर्धवटराव's picture

24 Nov 2010 - 1:52 am | अर्धवटराव

>>श्रद्धा, अंधश्रद्धा वगैरे या टर्म्सना तसा काही अर्थ नाही. श्रद्धा अंधपणे ठेवली तरच सुंदर दिसते. नव्हे..श्रद्धा ही आंधळीच असते.

काय बोललात राव... सह्ह्ही

(अंधश्रद्धाळू) अर्धवटराव

मिसळभोक्ता's picture

23 Nov 2010 - 9:07 am | मिसळभोक्ता

१२० नाही, ३०० नाही, किमाम नाही, गेला बाजार गाय छाप पण नाही !

च्छ्या ! हा कसला विडा ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Nov 2010 - 10:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुपारीसुद्धा नाही मिळाली का तुम्हाला मिभोकाका?

परिकथेतील राजकुमार's picture

23 Nov 2010 - 10:50 am | परिकथेतील राजकुमार

शुचि मामी, अहो आत्ता आत्ता २/३ दिवस झाले मिपाचा सर्व्हर जरा तग धरायला लागलाय. नका हो लगेच पुन्हा त्याच्यावर बळजबरी करु. चार दिवस तरी जौ द्या ! ;)

मामी? ताईवरून प्रमोशन एकदम ;-)

इंटरनेटस्नेही's picture

23 Nov 2010 - 1:31 pm | इंटरनेटस्नेही

शुचिताई छान लिहत आहात तुम्ही...'सुंदर' हा शब्द खर्‍या अर्थाने शोभावे असे लेखन असते तुमचे.. हाही लेख अतिशय वाचनीय झला आहे.

योगप्रभू's picture

23 Nov 2010 - 3:20 pm | योगप्रभू

शुचि,
वरील माहितीतील अध्यात्मिक अंगाकडे जात नाही. केवळ विडा याबाबतची काही रंजक निरीक्षणे नोंदवतो.

या स्तोत्रात गुरुंना जो त्रयोदशगुणी विडा अर्पण करायचा त्याचे पान पिकलेले आहे. पिकलेल्या पानाचा विडा शक्यतो वृद्ध व बाळंतीण महिलांसाठी सुचवला गेला आहे. हिरवे पान हे कामोद्दीपक असल्याने ते मात्र तरुण स्त्री-पुरुषांनी खाण्यास हरकत नव्हती. अभिसारिका आपल्या प्रियकराला देत असलेले पान कसे आहे, ते एका लावणीत स्पष्ट झाले आहे.

कळीदार कपुरी पान, कोवळं छान, केशरी चुना
रंगला काथकेवडा, इश्काचा विडा, घ्या हो मनरमणा

रामदासांनी तर रामाचा विडा रचताना वैभवाची बहार उडवून दिली आहे.

विडा घ्या हो रामराया, महाराज राजया
रत्नजडित पानदान, आली जानकी घेऊन
सुगंध गंगेरी पाने, मुक्त मोतियांचा चुना
सुपारी काथ गोळ्या, भक्तीभावे अर्पियेल्या

पुढे केशर, कस्तुरी आणि इतर पदार्थ आहेतच...

आता यात गंगेरी पानांचा उल्लेख आहे. म्हणजे गंगेच्या काठावर पिकणारी पाने. म्हणजे बनारस पानाची लोकप्रियता ३०० वर्षांपूर्वीही कायम होती. चुना हा केशरी म्हणजे केशराच्या पाण्यात खललेला वापरत, पण रामदासांनी तर तो मुक्त मोतियांचा म्हणजे मोती कुटून ती पूड खललेला असा राजस बनवला आहे.

अशा काव्यांमधून आपली समृद्ध खाद्यसंस्कृतीपण दिसून येते.

विषयांतराबद्दल क्षमस्व..

सुंदर! रामदास स्वामींनी केलेले वर्णन मस्त.

विड्याबद्दल झाले आता समाधीत जाण्यासाठी गांजा देखिल वापरतात त्याबद्दल लिहा.

मला यातले फारसे कळत नाही पण आजी म्हणायची ती दोन गाणी (स्तोत्रे?) आठवली.
पहिले म्हणजे कल्याण करी रामराया आणि दुसरे विडा घ्या हो नरहरी राया.

अप्पा जोगळेकर's picture

24 Nov 2010 - 8:29 am | अप्पा जोगळेकर

आम्च्या एका दोस्ताने तमाशात नाचणार्‍या बायकांच्या संदर्भात विडा भरवणे याचा अर्थ सांगितला होता. पहिल्याने वाटलं तेच आहे की काय?