घडलेल.....

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
4 May 2010 - 9:16 pm

मुंबईत राहायचो आम्ही. महाराष्ट्रीयन. अस्सल कोल्हापुरी!
तरुण होतो. अंगात खोन्डाची रग. हो बायकांना सुद्धा रग असते.
धनी MNC मध्ये होते. ऑफिस मधली आमच्या सारखी सारी खोंड मिळून एक सुंदर ग्रुप तयार झाला होता.सगळे असायचे. गुजराती , बिहारी, पंजाबी , सर्डू (सरदारजी).
मी कोल्हापुरी म्हणून माझी जाम खेचली जायची, पण मस्तीत !! मी ही मस्तीत काय तोंडाला येईल ते फेकायची. माग घ्यायची (बाहेर) सवयच नव्हती .
तेंव्हा मुंबई जवळची जवळ जवळ सारी ठिकाण आम्ही ट्रेक करून पालथी घालायचो.
पेठ किल्ला जसा मी बघितलाय तसा आणि कुणी पहिला असेल की नाही माहिती नाही.तसाच नाणे घाट! दिवस भर चालून चालून संध्याकाळी सूर्यास्ताला नाणेघाट गाठला होता आम्ही. रात्र भर तिथे राहिलो. जेवलो. आणि दुसरया दिवशी परत मुंबई.
विषय ट्रेक्स चा नाही आहे. आज जरा पित्त खवळलय .
तर आम्ही असे दर आठवड्याला बाहेर फिरणारे. MNC मध्ये मग कुणीही बाहेर देशातून आल की त्यातले काही उस्ताही आमच्या मध्ये सामील होत. तस्सच एक ब्रिटीश आपली बायको घेऊन इंडिया त
आला. ती पठ्ठी एकटी हॉटेल वर रहायला तयार नसे. मग नवरा तिला घेऊन ऑफिस मध्ये यायचा.मग इकड तिकड ओळखी करून घेत ती शेवटी आमच्या मस्तवाल ग्रुप मध्ये येऊन थडकली.
तेंव्हा मी रोज अगदी इमाने इतबारे ऑफिसला जाणारया माझ्या नवऱ्याला डबा द्यायचे. मजा अशी होती की ऑफिस मध्ये रोज लंच असायचा. आणि माझा डबा प्रत्येक जण प्रसाद खाल्ल्या प्रमाणे
रांग लाऊन, खाऊन, मग पुढे लंचला जायचा. अर्थात हे मला माहित नव्हत.
तर घरच इंडियन फूड म्हणून ही ब्रिटीश ही रांगेत उभी राहू लागली. कमी तेलातल , घरगुती जेवण खाऊन तिला आपण पक्क इंडियन खाल्ल्याचा एक किस्सा मिरवायला मिळत होता.
शेवटी आमच घोड दळ परत एकदा 'ट्रेक' वर पोहोचलं. तयारी सुरु झाली. या बाईसाहेब ही नवऱ्याला कामाला ठेवून आमच्यात सामील झाल्या. धमाल केली आम्ही त्याही ट्रेक ला. कोणी नवीन आल म्हणून फारसा फरक नाही पडायचा कुणालाच. उलट इथे आले की आपल्यात मिसळतात , पण आपण जेंव्हा प्रोजेक्ट वर तिकडे जातो , तेंव्हा विचारत पण नाहीत हा ऱाग बऱ्याच जणांना होता.
ट्रेक मध्ये ही बाई फार छान राहिली, परत आल्यावर ही मग एक दोन पार्टीत, मुंबई दर्शन आमच्या style वगैरे झाल. बाई आणि तिचा नवरा परत ब्रिटन ला परतले.
तिथ पोहोचल्यावर; तिला काय उद्योग नव्हता म्हणा; पण तिने आम्हा साऱ्यांना एक धन्यवाद देणारे पत्र पाठवलं. हे पत्र फक्त आम्हा इंडियन ना च नव्हत , तर एका दमात तिने आपण काय काय केल हे दाखवायच्या उद्देशाने काही brits na ही धाडलं होत. सार मौज मजेचं वर्णन संपल्यावर बाई मुन्नाभाई style गरीबी प्रदर्शना कडे वळली. सगळ ठीक पण विमान तळ सोडला की दिसणार झोपड पट्टीच वर्णन अगदी मन लाऊन केल होत. लंडन मध्ये काय गरीब राहत नाहीत? अमेरिकेची हालत आपण कतरिना च्या वेळी पहिली नाही? तर ते पत्र वाचून सार ऑफिस गप्प. माझे पती देव ही गप चूप घरी येवून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा पिताना मग हा मला बोलला. साऱ्या चहाची चव गेली. त्या रागात मी त्याला सुनावलं "अरे चोर तो चोर वर शीर जोर" कुणी लुटला भारत? स्वत:च्या देशात काही नव्हत म्हणून जग भर लुट मार करत फिरणारे चोर साले आम्हाला लुटून आता आमच्या कड नाही म्हणून हसतात ! खा खा खाल्ल आणि उलटली !! गंगेचे सोनेरी घाट फक्त हातातल्या बांगड्या घासून झाले होते. ही कीर्ती ऐकून आले. यांच्या लोभापायी निळी ची शेती करून जमीन सुद्धा नापीक झाली. सारा इतिहास वाचला घडा घडा मी नवरयासमोर.
तो ऑफिस ला गेला. मी आपली दिवस भर उकळत राहिले. यान एकच केल मी बोललेला शब्द न शब्द तस्साच्या तसा लिहिला. अगदी खा खा खाल्लं आणि उलटल्या सकट!. शेवटी हे ही लिहील बाई तुझी चूक नाही आहे दीडशे वर्ष मार खाऊन ही आम्हालाच अक्कल नाही आली. तू काय जाती वर गेलीस!.
हे मेल तिन ज्या कुणाला मिरवायला लिहील होत त्यांच्या सकट रीप्लाई all केल गेल.
तीच उत्तराच मेल म्हणजे अक्षरश:लोटांगण होत. माफ करा ! माफ करा ! होय तुम्ही मला चांगल वागवल पण मी वाईट वागले. माफ करा. पुढे काहीही ऱाग असेल तो फक्त मला एकटीला मेल करा.

मतितार्थ एव्हढाच आहे कुणीही तुम्हाला तुम्ही एक देश म्हणून वां जात म्हणून वां प्रांत म्हणून हिणवायला लागला तर तिथच उत्तर द्या. ३५० माणसां मध्ये ऱाग येणारी मी एकटीच होते. मला उचलून धरणारे माझे पती मला समजू शकले हे माझ भाग्य!
आज जरी भारत सुटला तरी मातीवरच प्रेम नाही संपल !! मग का सोडला? का नाही? ती लोक येऊन आम्हाला लुटतात आम्ही थोडा वापर केला तर काय झाल? कुठे ही गेल तरी माझ इंडिअन पण सुटणार नाही. मग एव्हढ लाचार होऊन का राहायचं? जाईन तिथे, तिथले स्थानिक माझे मित्र होतात. अन मग मी त्यांना जे बोललं जात TV वर दाखवलं जात ते कस वेचक आहे ते सांगते.
आज एव्हढच.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

4 May 2010 - 9:29 pm | धमाल मुलगा

क्या बात है!
चांगलं फटकारलं, बरं झालं! ह्यांना इथलं चांगलं काही दिसत नाही. शिव्या द्यायला सगळ्यात पुढे..बरं त्यांना तरी का दोष द्यायचा? स्वातंत्र्य मिळुन आपल्याला इतकी वर्षं झाली, पण अजुन गोरी कातडी पाहिली की आपलीच देशी मंडळी मरेस्तोवर मुजरे करत मागंमागं हिंडतात. त्यांच्याच बाजुनं आपल्याशी भांडतात.
काय बोलायचं? देश स्वतंत्र झालाय, पण मानसिक गुलामगिरी अजुन सुटली नाहीये...ताडकन ऐकवणारा एखादाच तुमच्या पतीराजांसारखा.

बरं वाटलं. आवडलं तुमचं प्रकटन.

पिंगू's picture

4 May 2010 - 9:35 pm | पिंगू

वाह अर्पणाताय, मानलं तुला.. नाहीतर आमच्या हापिसात गोरा आला की त्याच्याप्रीत्यार्थ पार्टी आणि आमच्या सुमार बॉस मंडळींचं लोटांगण.. फक्त काय appraisal मिळव म्हणून.. हि असली थेर

मेघवेडा's picture

4 May 2010 - 9:35 pm | मेघवेडा

अप्रतिम प्रकटन! मनापासून आवडले! फक्त सुरूवातीचा 'महाराष्ट्रीयन' शब्द खटकला.. तेवढा 'न' काढून टाका की जरा!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

स्पंदना's picture

4 May 2010 - 9:42 pm | स्पंदना

बरोबर पकडलात बघा तुम्ही! ते इथ सारख सारख इन्डियन वापरुन चूक झाली बघा!! जरा साम्भाळुन घ्या चुक आमची.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मेघवेडा's picture

4 May 2010 - 9:45 pm | मेघवेडा

संपादित करा आणि 'न' काढून टाका की.. हाय काय नी नाय काय!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मनिष's picture

4 May 2010 - 10:04 pm | मनिष

अपर्णातै!!! भन्नाट आव्डले....ह्या लोकांना असेच खमके उत्तर दिलेच पहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2010 - 10:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच केलंत तुम्ही अपर्णाताई!

अवांतरः फक्त आपल्या राजकारण्यांनी आपल्याला हेच उत्तर देऊन आपल्या तोंडाला पानं पुसली नाही म्हणजे मिळवलं!

अदिती

इंटरनेटस्नेही's picture

5 May 2010 - 1:29 am | इंटरनेटस्नेही

आदिती यांच्याशी सहमत!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

इन्द्र्राज पवार's picture

4 May 2010 - 10:26 pm | इन्द्र्राज पवार

----हा खरा "कोल्हापुरी" हिसका !! आमच्या पंचगंगेचे आणि रंकाळ्याचे पाणी असेच तेज तिखट आहे.... कोल्हापुरी झणझणीत रश्शा सारखे. कोल्हापुरी "पायताण" जर अपर्णा यांच्याकडे असते तर त्या ब्रिटिशनीच्या टाळक्यात त्यांनी ती समोर असती तर तिथल्या तिथे हाणले असते, असा विश्वास या लेखावरून वाटतोय. "तेथे पाहिजे जातीचे" याचीच प्रचीती आली हा लेख वाचून. ३५० पैकी एकटी मुलगी अशा अपमानावर ताडदिशी उसळते आणि आपल्या देशाची अस्मिता जपते.... ती पण अशी की इंग्लंडच्या त्या "महाराणी विक्टोरिया" चे तळवे चाटणा-या युवतीचा लागलीच जाहीर माफीनामा येतो ही कमी महत्वाची बाब नाही.

"कोल्हापुरी नाद खुळा...." लै भारी !
---------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

योगी९००'s picture

4 May 2010 - 10:28 pm | योगी९००

भन्नाट..

जमले तर त्या email ची प्रत आम्हालाही द्या...वाचायला आवडेल..

खादाडमाऊ
(मी सुद्धा कोल्हापुरी..)

मीनल's picture

5 May 2010 - 1:03 am | मीनल

अरे व्वा. चांगली सुनावलेली दिसते आहे तीला.
मी लंडनच्या विमानतळावर पाऊल ठेवल होतं तेव्हा कससच झालं होतं. नव-याला म्हटलं "परत जाऊ. मी पाणीही पिणार नाही इथलं" असं बोलले तेव्हा तो खूप चिडला. "आधी हे ठरवायला हवे होते .आलोच नसतो इथे तूझी नाटकं पहायला" असं म्हटल्यावर मी पडत घेतलं. मग संपूर्ण लंडन पाहिलं. जे चांगले आहे त्याचे कौतुक ही केले.
तसेच चीनबद्दल ही चांगले लिहण्यासारखे होते त्यावर लेख लिहिले. ब-याच जणांना वाटले की ही कौतुक करते आहे परदेशाचे.
खरेच होते. म्हणजे मी भारताला नावे ठेवत होत का? तर नाही. मी जिथे राहत होते, तिथले जे वाखाणण्याजोगे आहे ते लिहिले होते. वाईट खूप होतं लिहिण्यासारखे. पण तृटी कशाला पहा? जे चांगले आहे ते शेअर करावे असे मला वाटले.
आता ही अमेरिकेत जे चांगले आहे ते आहे. जे वाईट आहे ते आहे. जे भारताला ही लागू आहे.
जिथे राहत तिथल्या चांगल्याचे कौतुक करा की. काय बिघडले?
मग स्वदेश काय आणि परदेश काय?

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

5 May 2010 - 1:13 am | बिपिन कार्यकर्ते

प्रकटन आवडले.

बिपिन कार्यकर्ते

इंटरनेटस्नेही's picture

5 May 2010 - 1:32 am | इंटरनेटस्नेही

भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है !
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

पक्या's picture

5 May 2010 - 1:57 am | पक्या

ह्म्म छान , प्रकटन आवडले.
स्लमडॉग मिलेनिअर मध्ये तरी काय दाखवले आहे? भारत म्हणजे गरिबी आणि झोपडपट्टी अशीच प्रतिमा अनेक अभारतीयांच्या मनात तयार केली गेली. ऑस्कर देणार्‍यानेही ते बघूनच दिले असावे की काय?
-जय महाराष्ट्र , जय मराठी !

एक's picture

5 May 2010 - 1:49 am | एक

या ४ दिवस रहा, मजा करा. पण जाताना असं लिहून गालबोट कशाला लावता?
असल्या लोकांची भयानक चिड येते.

(अवांतरः३५० जणांत असं उत्तर देण्याची ईच्छा आणि कृती एकीनेच केली. स्लमडॉग मिलेनियर भारतात हिट होण्याचं हेच कारण असेल का हो?
आणि "दुसर्‍यांनी आपली चूक दाखवली तर आपण त्यांचा तिरस्कार का करायचा" असं म्हणणारे परधार्जिणे, बोटचेपे प्रतिसाद कुठे गेले? जनरली अश्या धाग्यांवर येतात असे प्रतिसाद.)

-(स्लमडॉग मिलेनियर वर राग असणारा) एक.

प्राजु's picture

5 May 2010 - 5:42 am | प्राजु

मस्तच!!!
प्रत्येक भारतीयाला हे जमलं तर त्यापेक्षा चांगलं काय असू शकेल?
असं झालं सगळीकडे तर स्मलडॉग बघून .. कोणी काही बोलायची टाप राहिली नसती.

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

सातबारा's picture

5 May 2010 - 7:00 am | सातबारा

इन्द्र्राज पवार म्हणतात तसे हा खरा "कोल्हापुरी" हिसका !!

मनापासून सहमत.

---------------------
हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.

प्रभो's picture

5 May 2010 - 7:02 am | प्रभो

लै भारी!!

छोटा डॉन's picture

5 May 2010 - 7:26 am | छोटा डॉन

छान अनुभव लिहला आहे, आपल्या भुमिकेचे मला कौतुक वाटले.
सुरेख प्रकटन ...

ह्या निमित्ताने माझाही एक असाच अनुभव सांगतो.
"जेव्हा २६/११ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा मी जर्मनीत होतो. तिकडच्या मिडियानेही ह्याची व्य्वस्थित दखल घेतली होती, वर्तमानपत्रे आणि टीव्हीवर वारंवार ताज्या परिस्थीतीची माहिती मिळत होती. तो भयंकर दहशतवादीवादी हल्ला पाहुन माझे जर्मन कलिग्सही हबकुन गेले व त्यांना त्यांच्या भारतात असलेल्या सहकार्‍यांची काळजी वाटु लागली. कॉफी, लंच अशा वेळी आमच्या भरपुर चर्चा व्हायच्या की सध्या काय परिस्थेती आहे वगैरे वगैरे ...

माझी जर्मनीहुन इकडे भारतात यायची तारिख होती ६ डिसेंबर, म्हणजे बरोब्बर हल्ल्यानंतर १० दिवसांनी.
निघायच्या ४-५ दिवस आधी मला आमच्या तिथल्या डिपार्टमेंट हेडने भेटीला बोलावले, मला एकदम आश्चर्य वाटले की हा माणुस कसा काय आपल्याला बोलावतो कारण 'ऑनसाईट' वगैरे क्षुल्लक गोष्टीत लक्ष घालण्याची त्याला गरज नाही, त्याची पोस्ट खुप मोठ्ठी होती.
भेटीदरम्यान त्याने "भारतातील परिस्थीती सध्या धोकादायक असेल आणि तिकडे जाण्याने जर तुझ्या जिवाला धोका असेल तर आपण तुझा इथला मुक्काम अजुन वाढवु शकतो. हवे तर मी तुझ्या भारतातील अधिकार्‍यांशी बोलेन" असे सुचवले.
मला एकदम हसावे की रडावे तेच कळेना, अरे आमच्याच देशात परत जायला आम्हाला धोका ?
बहुतेक भारतात दहशतवादी असेच मोकाट गन्स घेऊन फिरत असतात व सरकार सामान्यांच्या सुरक्षेसाठी काहीच करत नाही अशी बहुतेक जर्मन बॉसची खात्री झाली असावी. मग मी त्याला समजावले की "परिस्थीती एवढी हाताबाहेर गेलेली नाही, आमचे सैन्य आणि पोलिस अशा हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम आहेत. शिवाय अशा परिस्थितीत मला आपल्या देशात जाऊन रहाणे योग्य वाटते ... वगैरे वगैरे ".
शेवटी त्याने एकदम आश्चर्यचकित चेहरा वगैरे करत मला जाण्याची परवानगी दिली व "गुड लक" दिले.
त्या गुड लकचा अर्थ मी आजही शोधतो आहे ....

असो.
शेवटी आपण आपल्या देशाची इमेज कशी जगासमोर प्रेझेंट करतो ते महत्वाचे, समजा एखादा चुकीचा संदेश जात असेल तर त्यावर आपण कशी प्रतिक्रिया अगर स्पष्टीकरण देतो ह्यावर बरेच काही अवलंबुन असते असे वाटते.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

इन्द्र्राज पवार's picture

5 May 2010 - 9:27 am | इन्द्र्राज पवार

".....भेटीदरम्यान त्याने "भारतातील परिस्थीती सध्या धोकादायक असेल आणि तिकडे जाण्याने जर तुझ्या जिवाला धोका असेल तर आपण तुझा इथला मुक्काम अजुन वाढवु शकतो. हवे तर मी तुझ्या भारतातील अधिकार्‍यांशी बोलेन" असे सुचवले.

असे असलं तरी यातुन तुमच्या त्या विभाग प्रमुखाच्या मनात तुमच्याविषयी असणारी आपुलकी तरी प्रतित होते, आणि ती निश्चितच प्रशन्सनिय मानावी लागेल. ("सरकार सामान्यांच्या सुरक्षेसाठी काहीच करत नाही अशी बहुतेक जर्मन बॉसची खात्री झाली असावी...." >> नाही, मला नाही वाट्त की त्या भल्या माणसाने "या" भूमिकेतून तुमच्याविषयी काळजी व्यक्त केली असेल.... आपल्या विभागात काम करीत असलेल्या एका सहकारी "मित्रा"साठी असणारी आत्मियता मला भावली.)

ब्रिटनमध्ये "पाटी टाक...पैसे घे, बाहेर हो.." अशीच (भारतीयांबद्दल) भावना असते आणि ती निश्चितच तिरस्करनीय होय !

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

छोटा डॉन's picture

5 May 2010 - 9:50 am | छोटा डॉन

>>तुमच्या त्या विभाग प्रमुखाच्या मनात तुमच्याविषयी असणारी आपुलकी तरी प्रतित होते, आणि ती निश्चितच प्रशन्सनिय मानावी लागेल.
+१, हे सगळे मी मान्य करतो.
त्यांची भुमिका आणि आत्मियता निश्चित प्रशंसनीय होती, नंतर मी इकडे आल्यावरही त्यांनी ई-मेलमधुन चौकशी केली होती.
नो डाऊट की त्यांचे वर्तन त्यांच्या पदाला साजेसे आणि अभिनंदनीय होते.

पण त्यांना 'मी भारतात ( पक्षी : माझ्या मायदेशात ) गेल्याने माझ्या जीवाला धोका होऊ शकतो व सरकार माझे संरक्षण करण्यास सक्षम नाही ( अर्थात सत्य जरी काही अंशी हेच असले तरी ) मला ते देशाच्या इमेजच्या दॄष्टीने लज्जास्पद वाटले'.
असो, इतकेच !

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 May 2010 - 10:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही फक्त आपुलकीपोटी वाटणारी काळजी असते.

मुंबईत लोकल्समधे बाँबस्फोट झाले तेव्हा माझे बरेचसे कुटुंबीय मुंबईतच होते (मी साहेबाच्या देशात!) आणि तेव्हा माझ्या सगळ्या कलीग्जनी "घरी सगळं ठीक आहे ना" अशी चौकशी केली होती. २६ डिसेंबर २००४च्या त्सुनामीच्या वेळेसही ही चौकशी केली गेली. २६ नोव्हेंबरच्या वेळेसही (तेव्हा मी भारतातच होते) बर्‍याच मित्रांचे इमेल्स आले होते. लंडनला ट्यूबमधे स्फोट झाले तेव्हा मी सुद्धा तिथे रहाणार्‍या सगळ्या ओळखीच्यांना इमेल्स केले होते.
कोणत्याही देशाची संरक्षणव्यवस्था उत्तम असली तरीही एखाद दुसरा बळी जाऊ शकतो. तो बळी आपल्या आप्ताचा, मित्राचा असू नये असं वाटत रहातं एवढंच त्या चौकशीचं कारण!

बाहेरच्या लोकांनी आपल्या देशाबद्दल गैरसमज ठेवू नयेत हे अगदी मान्य! पण 'स्लमडॉग'सारखी परिस्थिती आपल्या देशात नाहीच असं स्वप्नरंजन आपणही करू नये.

अदिती

अवांतरः माझा एक ब्रिटीश मित्र भारतात प्रथमच आला होता तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याचं वाक्य, "मला वाटलं होतं भारतातली मोठी शहरं लंडन, बर्लिनसारखी असतील पण प्रगती, पैसा अजून खेड्यापाड्यांमधे पोहोचली नसेल. प्रगती एका दिवसात तर होत नाहीच."

स्पंदना's picture

5 May 2010 - 8:39 am | स्पंदना

"स्लमडॉग मिलेनिअर मध्ये तरी काय दाखवले आहे? भारत म्हणजे गरिबी आणि झोपडपट्टी अशीच प्रतिमा अनेक अभारतीयांच्या मनात तयार केली गेली. ऑस्कर देणार्‍यानेही ते बघूनच दिले असावे की काय?"

त्या पिक्चरे च तर नाव सुद्धा नका काढु!! मला आश्चर्य या गोष्टी च वाटत की लिहिणारा लेखक हा इन्डियन डीप्लोमॅट आहे. सरकार याला भारताला रीप्रेझेन्ट करायला पाठवते. काय मीळवल त्यान हे लिहुन?
एक ऑस्कर? हे म्हणजे आईला विकुन चहा पिण्यासारख झाल. काय मोठ्ठे पणा तर ऑस्कर! अरे पण तुला भारतिय म्हणुन पहातात ना?

"शेवटी आपण आपल्या देशाची इमेज कशी जगासमोर प्रेझेंट करतो ते महत्वाचे, समजा एखादा चुकीचा संदेश जात असेल तर त्यावर आपण कशी प्रतिक्रिया अगर स्पष्टीकरण देतो ह्यावर बरेच काही अवलंबुन असते असे वाटते."
अगदी बरोबर बोललात डॉन भाय. मी तेच करते.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

इंटरनेटस्नेही's picture

5 May 2010 - 12:53 pm | इंटरनेटस्नेही

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

समंजस's picture

5 May 2010 - 10:06 am | समंजस

छान....आवडले प्रकटन!!

भानस's picture

5 May 2010 - 11:41 am | भानस

ये हुई नं बात! एकदम मनापासून हाणलेस... आवडले.

भोचक's picture

5 May 2010 - 12:00 pm | भोचक

मस्त. खणखणीत लेख.

(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव

Pain's picture

5 May 2010 - 12:16 pm | Pain

शाबास आहे तुमची =D>

Dhananjay Borgaonkar's picture

5 May 2010 - 2:51 pm | Dhananjay Borgaonkar

सुंदर प्रकटन..
तुम्ही तिला खास कोल्हापुरी तांबडा रस्सा दिलान..
मड्ड्मला दोन दिवस झोप नसेल आली.

खट्याक.. सणसणीत चपराक..

खट्याक.. सणसणीत चपराक..