घडलेल.....
मुंबईत राहायचो आम्ही. महाराष्ट्रीयन. अस्सल कोल्हापुरी!
तरुण होतो. अंगात खोन्डाची रग. हो बायकांना सुद्धा रग असते.
धनी MNC मध्ये होते. ऑफिस मधली आमच्या सारखी सारी खोंड मिळून एक सुंदर ग्रुप तयार झाला होता.सगळे असायचे. गुजराती , बिहारी, पंजाबी , सर्डू (सरदारजी).
मी कोल्हापुरी म्हणून माझी जाम खेचली जायची, पण मस्तीत !! मी ही मस्तीत काय तोंडाला येईल ते फेकायची. माग घ्यायची (बाहेर) सवयच नव्हती .
तेंव्हा मुंबई जवळची जवळ जवळ सारी ठिकाण आम्ही ट्रेक करून पालथी घालायचो.
पेठ किल्ला जसा मी बघितलाय तसा आणि कुणी पहिला असेल की नाही माहिती नाही.तसाच नाणे घाट! दिवस भर चालून चालून संध्याकाळी सूर्यास्ताला नाणेघाट गाठला होता आम्ही. रात्र भर तिथे राहिलो. जेवलो. आणि दुसरया दिवशी परत मुंबई.
विषय ट्रेक्स चा नाही आहे. आज जरा पित्त खवळलय .
तर आम्ही असे दर आठवड्याला बाहेर फिरणारे. MNC मध्ये मग कुणीही बाहेर देशातून आल की त्यातले काही उस्ताही आमच्या मध्ये सामील होत. तस्सच एक ब्रिटीश आपली बायको घेऊन इंडिया त
आला. ती पठ्ठी एकटी हॉटेल वर रहायला तयार नसे. मग नवरा तिला घेऊन ऑफिस मध्ये यायचा.मग इकड तिकड ओळखी करून घेत ती शेवटी आमच्या मस्तवाल ग्रुप मध्ये येऊन थडकली.
तेंव्हा मी रोज अगदी इमाने इतबारे ऑफिसला जाणारया माझ्या नवऱ्याला डबा द्यायचे. मजा अशी होती की ऑफिस मध्ये रोज लंच असायचा. आणि माझा डबा प्रत्येक जण प्रसाद खाल्ल्या प्रमाणे
रांग लाऊन, खाऊन, मग पुढे लंचला जायचा. अर्थात हे मला माहित नव्हत.
तर घरच इंडियन फूड म्हणून ही ब्रिटीश ही रांगेत उभी राहू लागली. कमी तेलातल , घरगुती जेवण खाऊन तिला आपण पक्क इंडियन खाल्ल्याचा एक किस्सा मिरवायला मिळत होता.
शेवटी आमच घोड दळ परत एकदा 'ट्रेक' वर पोहोचलं. तयारी सुरु झाली. या बाईसाहेब ही नवऱ्याला कामाला ठेवून आमच्यात सामील झाल्या. धमाल केली आम्ही त्याही ट्रेक ला. कोणी नवीन आल म्हणून फारसा फरक नाही पडायचा कुणालाच. उलट इथे आले की आपल्यात मिसळतात , पण आपण जेंव्हा प्रोजेक्ट वर तिकडे जातो , तेंव्हा विचारत पण नाहीत हा ऱाग बऱ्याच जणांना होता.
ट्रेक मध्ये ही बाई फार छान राहिली, परत आल्यावर ही मग एक दोन पार्टीत, मुंबई दर्शन आमच्या style वगैरे झाल. बाई आणि तिचा नवरा परत ब्रिटन ला परतले.
तिथ पोहोचल्यावर; तिला काय उद्योग नव्हता म्हणा; पण तिने आम्हा साऱ्यांना एक धन्यवाद देणारे पत्र पाठवलं. हे पत्र फक्त आम्हा इंडियन ना च नव्हत , तर एका दमात तिने आपण काय काय केल हे दाखवायच्या उद्देशाने काही brits na ही धाडलं होत. सार मौज मजेचं वर्णन संपल्यावर बाई मुन्नाभाई style गरीबी प्रदर्शना कडे वळली. सगळ ठीक पण विमान तळ सोडला की दिसणार झोपड पट्टीच वर्णन अगदी मन लाऊन केल होत. लंडन मध्ये काय गरीब राहत नाहीत? अमेरिकेची हालत आपण कतरिना च्या वेळी पहिली नाही? तर ते पत्र वाचून सार ऑफिस गप्प. माझे पती देव ही गप चूप घरी येवून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा पिताना मग हा मला बोलला. साऱ्या चहाची चव गेली. त्या रागात मी त्याला सुनावलं "अरे चोर तो चोर वर शीर जोर" कुणी लुटला भारत? स्वत:च्या देशात काही नव्हत म्हणून जग भर लुट मार करत फिरणारे चोर साले आम्हाला लुटून आता आमच्या कड नाही म्हणून हसतात ! खा खा खाल्ल आणि उलटली !! गंगेचे सोनेरी घाट फक्त हातातल्या बांगड्या घासून झाले होते. ही कीर्ती ऐकून आले. यांच्या लोभापायी निळी ची शेती करून जमीन सुद्धा नापीक झाली. सारा इतिहास वाचला घडा घडा मी नवरयासमोर.
तो ऑफिस ला गेला. मी आपली दिवस भर उकळत राहिले. यान एकच केल मी बोललेला शब्द न शब्द तस्साच्या तसा लिहिला. अगदी खा खा खाल्लं आणि उलटल्या सकट!. शेवटी हे ही लिहील बाई तुझी चूक नाही आहे दीडशे वर्ष मार खाऊन ही आम्हालाच अक्कल नाही आली. तू काय जाती वर गेलीस!.
हे मेल तिन ज्या कुणाला मिरवायला लिहील होत त्यांच्या सकट रीप्लाई all केल गेल.
तीच उत्तराच मेल म्हणजे अक्षरश:लोटांगण होत. माफ करा ! माफ करा ! होय तुम्ही मला चांगल वागवल पण मी वाईट वागले. माफ करा. पुढे काहीही ऱाग असेल तो फक्त मला एकटीला मेल करा.
मतितार्थ एव्हढाच आहे कुणीही तुम्हाला तुम्ही एक देश म्हणून वां जात म्हणून वां प्रांत म्हणून हिणवायला लागला तर तिथच उत्तर द्या. ३५० माणसां मध्ये ऱाग येणारी मी एकटीच होते. मला उचलून धरणारे माझे पती मला समजू शकले हे माझ भाग्य!
आज जरी भारत सुटला तरी मातीवरच प्रेम नाही संपल !! मग का सोडला? का नाही? ती लोक येऊन आम्हाला लुटतात आम्ही थोडा वापर केला तर काय झाल? कुठे ही गेल तरी माझ इंडिअन पण सुटणार नाही. मग एव्हढ लाचार होऊन का राहायचं? जाईन तिथे, तिथले स्थानिक माझे मित्र होतात. अन मग मी त्यांना जे बोललं जात TV वर दाखवलं जात ते कस वेचक आहे ते सांगते.
आज एव्हढच.
वर्गीकरण
व्वा!!
+१
अप्रतिम
आईग्ग!
In reply to आईग्ग! by स्पंदना
संपादित
जियो!!!
मस्तच
In reply to मस्तच by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
"कोल्हापुरी नाद खुळा...."
भन्नाट..
अरे व्वा
प्रकटन आवडले.
भारत माँ
ह्म्म छान ,
सही हाणलं आहे..
मस्तच!!! प्र
चांगलं वाजवलत !
लै भारी!!
भारी प्रकटन
In reply to भारी प्रकटन by छोटा डॉन
भारतातील परिस्थीती.....
In reply to भारतातील परिस्थीती..... by इन्द्र्राज पवार
ते बरोबर आहे हो ...
In reply to ते बरोबर आहे हो ... by छोटा डॉन
किंचित असहमत
"स्लमडॉग
In reply to "स्लमडॉग by स्पंदना
+१
वा!!!
पर्फेक्ट!
मस्त.
शाबास आहे
सुंदर
खट्याक.. सणसणीत चपराक..
खट्याक.. सणसणीत चपराक..