काही प्रश्न...

चक्रमकैलास's picture
चक्रमकैलास in काथ्याकूट
27 Mar 2010 - 7:24 pm
गाभा: 

मला काहि मूलभूत प्रश्न पडले आहेत..ते माझ्यासारखेच आणखी कोणाला पडले असतील तर तो/ती इथे मला भेटण्याची शक्यता वाटली म्हणून हा तुमच्या डोक्याला ताप देतोय.

आपण रोज सकाळी ऊठतो,जे काही काम असेल ते म्हणजे,कॉलेज,नोकरी,धंदा ई.ई. करतो..पैसे कमावतो,मजा करतो,पण हे सगळं करताना कुठेतरी एक पोकळी जाणवत असतेच..हे काय चाललंय?,आपण हे का करतोय याचा कधी विचार केलाय का..??
कितीही सुखी असलो तरी आपण शांत का नसतो..?? कायम एक अनामिक हुरहुर असतेच आपल्या मनात...आपल्या आयुष्याचे प्रयोजन काय आहे..?नेमकं काय केल्याने मनाला शांती मिळेल..??भरपूर पैसे असणे म्हणजे सुखी असणे असे आहे का?चार मित्र सोबत असले की तो थोडा वेळ बरा जातो,पण नंतर परत आहेच कंटाळा..संदिप खरे ची कविता आहे ना,'कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो' ते अगदी योग्य आहे..
मला आता कळतय काही लोक साधु,सन्यासी का होतात ते..पण ते होऊन तरी मन शांत होईल याची काय खात्री..??कोणी सांगेल का मला..?? का मी खरंच चक्रम झालोय..??

प्रतिक्रिया

बोका's picture

27 Mar 2010 - 9:16 pm | बोका

अरुण साधूंचे 'शोधयात्रा' वाचा.

अश्फाक's picture

27 Mar 2010 - 9:26 pm | अश्फाक

मित्रा एक गोश्ट लक्शात ठेव , मेल्यावर देव हिशोब विचारेल , जगात तुला मानव बनवून पाठवले होते काय करुन आलास ?

तर आप्ल्या कदे दोन उत्तर असतील

१) गाडी , बन्गला , बेन्क बेलेन्स , बच्चे .....

२) मी एक मानुस घडवला , दोन अनाथान्ची जेवायची व्यवश्था केलि , रुग्नान्ची सेवा केलि , ......

तर तुम्हाला कोन्ते उत्तर द्यायला आवदेल ?

शुचि's picture

27 Mar 2010 - 10:08 pm | शुचि

सुंदर : )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Love is older than you but the light shining through makes me see your love is all new.

चिन्मना's picture

28 Mar 2010 - 8:23 am | चिन्मना

मेल्यानंतर देवाला हा हिशोब देण्याआधी जिवंतपणी स्वतःलाच देणे उत्तम!

सध्या सुधा मूर्ती यांच्या वाइज अँड आदरवाइज या पुस्तकाचा लीना सोहोनी केलेला मराठी अनुवाद वाचत आहे. त्यात समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे सुधा मूर्ती यांना आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. यातील काही व्यक्ती अशा आहेत की स्वतःकडे भौतिक सुखे असोत किंवा नसोत, त्यांनी सतत आजुबाजूच्या लोकांचा, समाजाचा विचार केला व त्यांच्यासाठी कार्यरत राहिले. मला असे जाणवले आहे की मानसिक पोकळी ही जर आपण आपल्यापुरतेच जगत असू तर निर्माण होते. प्रत्येकाने स्वतःचे लिमिट ओळखून, त्याप्रमाणे समाजाचे ऋण फेडायचे प्रयत्न केले तर ही पोकळी बर्‍याच प्रमाणात भरून निघेल.

शानबा५१२'s picture

2 Apr 2010 - 6:34 pm | शानबा५१२

लीना...........................मस्त नाव असत..........जाउ दे लिहणार होतो पण थांबतो

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

शुचि's picture

27 Mar 2010 - 9:41 pm | शुचि

कायम प्रेमात पडा. रामबाण उपाय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Love is older than you but the light shining through makes me see your love is all new.

शानबा५१२'s picture

2 Apr 2010 - 6:35 pm | शानबा५१२

म्हणजे सारख प्रेमात पडायच?......अहो त्याला बेवफाई म्हणतात!!.नाही नाही.हे नको

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

जयंतजी आपली परवानगी न घेता हा उपद्व्याप करतो आहे. क्षमस्व

खय्याम म्हणतो आपल्या जन्म आणि मृत्यूमधील अंतरात तू काय करणार आहेस ते ठरव !

हे अंतर कापताना काय तोटे होणार आहेत आणि काय फायदे होणार आहेत याचा हिशेब कर. कदाचित तू जाण्यानेही फायदा होणार असेल तर त्याचा स्विकार करायला घाबरु नकोस.
लोक आणि तथाकथित गुरु/महाराज/नाथ सांगतात म्हणून आपण फार मोठे काहीतरी करतोय या भ्रमात राहून उगचच विरक्तीला कवटाळू नकोस. (काहीच जमत नाही म्हणून संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता – असे नको) :-) त्यात खरे समाधान नाही.) जे करायचे ते तुमच्या ह्रदयातून आले पाहिजे. ते केले तरच समाधान मिळणार आहे.

खय्याम म्हणतो,

फायदा येण्यातला आणि जाण्यातला मोज !

वस्त्राची उभी आडवी वीण कुठे आहे ?

अनेक प्रेते जाळली जातात रोज

त्यांचा धूर कुठे आहे ?

त्यात तुला तुझ्या आयुष्याच्या वस्त्राचा, जे परमेश्वराने विणले आहे त्याचाही अभ्यास करावाच लागेल.

ह्या रुबायाचा या ओळीचा अर्थ ““एक धागा सुखाचा”“ हे आख्खे गाणे सांगू शकेल.

हे सगळे करताना आकाशाला भिडणारा धूर विसरु नकोस. तो त्या जळणार्‍या प्रेतांचा आहे. म्हणजे मृत्यू अटळ आहे हे कायम लक्षात ठेव
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अश्फाक's picture

27 Mar 2010 - 9:43 pm | अश्फाक

आनि हो आपन नम्बर २ चे उत्तर देनार असाल तर ,
आपल्या पाशी कन्टाळा , स्वतचे सुख दुख सठी मुळीच वेळ नाही

काय कळलं ?
लागा कामाला........

तिमा's picture

28 Mar 2010 - 10:30 am | तिमा

काहींच्या बाबतीत, त्यांनी काहीच न करता घरी बसणे हीच मोठी समाजसेवा होते.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

इन्द्र्राज पवार's picture

28 Mar 2010 - 10:45 am | इन्द्र्राज पवार

बा.सी.मर्ढेकरांची एक प्रसिध्द कविता आहे ~~ "कुणि मारावे, कुणि मरावे, कुणि जगावे खाउनि दगड; वितळऊन कुणि आयुष्यांना, ओतावे अन सोन्याचे घड."
एकदा का जीवित प्राणी म्हणून या दुनियेत आपण प्रवेश केला की मला वाटते पुढचे सगळे जीणे ही एक निसर्गाची प्रकीर्या होऊं बसते. मग काहिना तो देवाचा आशीर्वाद वाटतो तर काहींच्या मते शाप ही असू शकतो. पण कोणतीही स्तिथि ही अटळ असते, किंबहुना त्यामुळेच माणूस समोर येणाऱ्या प्रत्येक घटनेला कशा पद्धतीने तोंड देता येईल याचाच विचार करत असतो. सुख आणि शांती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे जरी थोडा वेळ मानले तरी सुख हे केवळ पैशामुळेच येते असेही नाही. या जगात कोट्यावधीची माया असणारे शांतीपासून खूपच दूर आहेत, आणि एक वेळची भाजीभाकरी खाणारा चांदण्यारात्री आकाशाकडे पाहत उज्ज्वल उद्याची स्वप्ने बघत शांतपणे झोपी जातो. तरीदेखील आपल्या लिखाणातील "मित्र" महत्व सडेतोड आहे. विशेषता या धकाधकीच्या जीवनात पैसा जरी कळीचा मुद्धा होत असला तरीही ज्याच्याजवळ मित्र नावाचे अजब रसायन नाही तो खऱ्या अर्थाने कधीही शांत राहू शकणार नाही.

चित्रगुप्त's picture

28 Mar 2010 - 10:54 am | चित्रगुप्त

या बाबतीत तुमची नाडी काय म्हणते

स्व's picture

28 Mar 2010 - 11:47 am | स्व

We all are waiting for Mr Godot.....

मुक्तसुनीत's picture

28 Mar 2010 - 6:51 pm | मुक्तसुनीत

खलास प्रतिक्रिया.

चक्रमकैलास's picture

28 Mar 2010 - 1:06 pm | चक्रमकैलास

मी काय म्हणतोय ते बहुतेक झेपले नाहिये..समाजसेवा केल्याने मनाला शांती मिळेल पण ते दुसर्यासाठी काहीतरी केल्याचे समाधान आहे...त्यातून अहंकाराशिवाय काहिच मिळत नाही..मी बर्याच छोट्या-मोठ्या संस्थांबरोबर कामे केली आहेत..त्यामुळे समाजसेवा हा इथे मुद्दा नाहिये..
माझा प्रश्न हा आहे,की मी समजा ऊद्या मेलो तर जगात असा कितीसा फरक पडणार आहे..?किंवा माझ्या आत्ता असण्याने किती फरक पडतोय..?? आपल्या अस्तित्वाची दखल किती जण घेतात..??आपल्या हातातून काहीतरी भव्य-दिव्य का होत नाही..की ज्याच्यामुळे ४ लोकांना नाही तर बर्याच लोकांना काहीतरी फरक पडेल..??
मला बहुतेक नीट सांगता येत नसावं मला काय म्हणायचंय ते.. #:S

नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

पाषाणभेद's picture

28 Mar 2010 - 1:25 pm | पाषाणभेद

विहीर मधला नचिकेत भेटला काय रे तुला? तसे असेल तर कोणीतरी समिर व्हारे याच्यासाठी. समिरला शेवटी जीवन जगण्याचे सुत्र सापडते ते यालाही द्या रे.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

समंजस's picture

2 Apr 2010 - 6:09 pm | समंजस

चक्रम साहेब मला असे काही प्रश्न पडले की मी ही, भा. रा. तांब्यांची कविता वाचतो आणि कामाला लागतो :)
(तुमचं वाचन खुप आहे म्हणताय, त्यामुळे वाचली असेलच. यावेळेस अर्थ समजवून घ्या :) )

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’ !
मी जाता राहिल कार्य काय ?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?

रामकृष्णही आले, गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?

चक्रमकैलास's picture

2 Apr 2010 - 6:32 pm | चक्रमकैलास

छान आहे कविता..खूप वेळा ऐकले आहे हे गाणे मी... प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद...!!
आणि तुम्हालाही असे प्रश्न पडतात हे वाचून खात्री झाली की मी एकटाच येडा नाहीये...!! 8}

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

अनुप्रिया's picture

28 Mar 2010 - 1:21 pm | अनुप्रिया

तुमचे विचार बरोबर रस्त्यावर चालले आहेत. पण थोडेसे संभ्रमीत आहात.
मी कोण ? या जगात यायचे कारण काय? मी हे जे करतो आहे ते का आणि
कशासाठी???? असे प्रश्न जेव्हा पडायला लागतात तेव्हा समजयच की मला स्व ची जाणीव होतेय. कधी कधी तुम्हाला समजतही असेल की ही गोष्ट केली मला समाधन मिळत.
पण कधी दुस-याला समाधानी, तृप्त करताना स्वत:कडे लक्ष दिलयत का?
स्वत:शी राहून बघा थोड. मार्ग सापडत जाईल. तुमचा आतला आवाज ऐकायचा प्रयत्न करा, सवयीने ते होईल. मदतीला मी आहेच.....जेव्हा तो पूर्णपंणे समजू लागेल तेव्हा हे का? कोण ? कशाला सर्व प्रश्न संपतील हा विश्वास मला आहे

अनुप्रिया's picture

28 Mar 2010 - 1:24 pm | अनुप्रिया

-mr godo ची गरज नाहीये तुम्ही स्वत:च स्वत:ला मार्ग दाखवू शकता. अशक्य वाटत असेल तर.......खात्री पटवू शकता

चक्रमकैलास's picture

28 Mar 2010 - 1:37 pm | चक्रमकैलास

स्वत:कडे लक्ष देणे म्हणजे काय..??मला अजून तरी आतला बाहेरचा कसलाच आवाज येत नाहीये..मला कळतच नाहीये की माझं काय चालू आहे..एखादी गोष्ट मी का करतोय..??स्वत:च स्वत:ला मार्ग दाखवणे म्हणजे काय..??

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

इन्द्र्राज पवार's picture

28 Mar 2010 - 2:29 pm | इन्द्र्राज पवार

थोडक्यात ही सुप्रसिद्ध पांडुरंग सांगवीकर यांची ditto अवस्था आहे. आणि त्याही पूर्वी अशीच अवस्था Don Quixote ची झाली होती, त्या वरून पाहिल्यास उदाहरणार्थ वगैरे तुम्ही थोरच आहात !!

चक्रमकैलास's picture

28 Mar 2010 - 2:57 pm | चक्रमकैलास

@ पवार
मी कोणी थोर वगैरे नाहिये..माझे वाचन खुप आहे..आणि मी जसा जसा काहीतरी अर्थपूर्ण वाचत चाललोय तसे मला हे प्रश्न अजूनच पडत आहेत..कोसला वाचण्याच्या खूप आधिपासून माझी अशीच अवस्था होती...
@अरुंधती
ताईसाहेब,मी पानं,फुलं याच्या खूप पुढे गेलो आहे..असल्या गोष्टिंपासून मला काही प्रेरणा,स्फूर्ती ई.ई.मिळत नाही..तुम्हि थोडा विचार कर मी नेमकं काय म्हणतोय ते..

नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

अरुंधती's picture

28 Mar 2010 - 2:32 pm | अरुंधती

आजूबाजूच्या निसर्गाकडे बघा एकदा.... ही पानं, फुलं, वृक्षलता का आहेत? का जगतात? त्यांचं आयुष्य तर किती क्षणभंगुर...तरीही आपला उमलायचा धर्म सोडत नाहीत ती.... नसते क्षिती त्यांना उद्या कोणी त्यांची सय ठेवेल अगर नाही ह्याची! येणारा प्रत्येक क्षण समरसून जगतात. बहरतात. इतरांना आपला आनंद लुटू देतात. आणि त्यांच्या ह्या समरसून जगण्यानेच त्यांच्या गंधखुणा ती लोप पावल्यावरही आपल्या अस्तित्त्वात रेंगाळत राहतात......

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

राजेश घासकडवी's picture

28 Mar 2010 - 3:08 pm | राजेश घासकडवी

तुम्ही वर्णन केलेली लक्षणं ही नैराश्याच्या (क्लिनिकल डिप्रेशनच्या) सुरूवातीची असू शकतील. हा वाईट रोग आहे व तो कोणालाही कधीही ग्रासू शकतो.
या दुव्यावर जुजबी माहिती मिळेल. जालावर क्लिनिकल डिप्रेशन म्हणून शोध घेतलात तर त्याविषयीच्या सेल्फ टेस्ट्स सापडतील. त्यानुसार तुम्ही मानसोपचार तज्ञांना दाखवून घ्यायचं की नाही हे ठरवू शकता.

आयुष्य तसं म्हटलं तर निरर्थकच असतं. कोणीतरी त्याचा अर्थ सांगितला आहे का, दिशा ठरवून दिलेली आहे का हे शोधत बसणं हा एक पर्याय असतो. पण अविश्वासाचे बंध ज्यांना तोडता येत नाहीत व जे हाडाचे श्रद्धाळू नाहीत अशांसाठी हा मार्ग नव्हे. दुसरा पर्याय म्हणजे काहीच अर्थ नाही, काहीच बंधनं नाहीत याकडे स्वातंत्र्य म्हणून पाहाणं. या स्वातंत्र्यातून जबाबदारी येते, पण शेवटी आय डिड इट माय वे असं ताठ मानेने म्हणता तरी येतं.

माझ्याकडे किंवा मिपावरील कोणाकडेच तुमच्यासाठीची उत्तरं नाहीत. बहुतेकांकडे स्वत:साठीची कामचलाऊ उत्तरं आहेत. फारतर सर्वांनाच हे प्रश्न पडतात यातून आपण एकटेच नाही एवढीच फिलगुड भावना झाली तरच. पण तुम्ही तज्ञाशी बोलावं असं मनापासून वाटतं.

राजेश

मदिरालय जानेको घर से चलता है पीनेवाला
किस पथ से जाऊ असमंझस मे है वह भोलाभाला
अलग अलग पथ बतलाते सब पर मै यह बतलाता हूं
राह पकड तू एक चला चल, पा जाईयेगा मधुशाला
-बच्चन

....... हे सगळं करताना कुठेतरी एक पोकळी जाणवत असतेच..

ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.....
ही पोकळी भरून काढण्याच्या प्रयत्नातूनच अजरामर संगीत, कलाकृती, साहित्यकृती निर्माण होतात.....

असा काहीतरी प्रयत्न करत राहिले पाहिजे......

फ्रॅक्चर बंड्या's picture

31 Mar 2010 - 10:37 am | फ्रॅक्चर बंड्या

पोकळी भरून काढण्याच्या प्रयत्नातूनच अजरामर संगीत, कलाकृती, साहित्यकृती निर्माण होतात....
+१

binarybandya™

उपास's picture

28 Mar 2010 - 5:22 pm | उपास

सोनाली ताईंनी सांगितलच आहे वर. 'साद देती हिमशिखरे' मधल्या माधवलाही अग॑दी अस्सेच प्रश्न पडलेत (हो, पाना फुलांच्या पलिकडले..) वाचलं नसेल तर कदाचित आवडेल.. गुरुतत्त्वावर विश्वास असेल तर मार्ग दाखविलच तो.. तूर्त, नामस्मरण, साधना, प्राणायाम यांपै़की कशानेही चांगला फरक पडेल (असा निदान माझा तरी विश्वास आहे)... शुभं भवतु!!
उपास मार आणि उपासमार

अरुंधती's picture

28 Mar 2010 - 6:34 pm | अरुंधती

<<समाजसेवा केल्याने मनाला शांती मिळेल पण ते दुसर्यासाठी काहीतरी केल्याचे समाधान आहे...त्यातून अहंकाराशिवाय काहिच मिळत नाही.>>
जेव्हा तुम्ही केलेल्या समाजसेवेविषयी मी काहीतरी वेगळं करतोय असा विचार करता तेव्हा अहंकार जागृत होतो. पण तुम्ही तेच काम जर एक सहज कर्म म्हणून, नित्य कर्माचा भाग म्हणून केलं तर त्यात कसला आला अहंकार? तुम्ही रोज आंघोळ करता, दात घासता, वर्तमानपत्र वाचता, कामाला जाता....या गोष्टींचा कोणी अहंकार बाळगतं का? मग समाजसेवेलाही तसंच गृहित धरलंत तर त्यातूनच समाधान मिळेले.

जी अपेक्षेने केली जाते ती सेवाच नव्हे. जी निरपेक्ष भावाने करता ती असते खरीखुरी सेवा. कधी कोठल्या अनाथाश्रमात जाऊन तिथल्या मुलांबरोबर चार घटका घालवल्यात? तिथल्या मुलांच्या चेहर्‍यावर हसू फुलवायचा प्रयत्न केलाय? कधी कोणत्या वृध्दाश्रमात जाऊन तेथील आजी-आजोबांचे कोणतेही छोटे-मोठे काम निरपेक्ष भावाने केलंय? त्यांना आपल्या आजी आजोबांच्या स्थानी मानून त्यांची विचारपूस केलीत? कधी कोणा अपरिचित रुग्णाचे बेडपॅन उचललं आहे? कधी त्याला आंघोळ घालायला मदत केली आहे?......... पैशाने समाजसेवा अनेकजण करतात. तुम्ही कष्टाने, निरपेक्ष भावनेने समाजसेवा केली असेल तर तुम्हाला ही पोकळी जाणवणे शक्यच नाही. कारण जेव्हा तुम्ही 'समरस' होता, 'एक' होता तेव्हा न्यून उरतेच कुठे? तुम्हाला स्वतःचा विचारही करायला फुरसत मिळू नये अशा सेवेबद्दल म्हणत आहे मी!..... तसे तुम्ही तन, मनाने एकरूप होऊन सेवा करत असतानाही जर तुम्हाला 'पोकळी' जाणवत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही अजूनही हात राखून सेवा केली आहे.

दुसरी एक बाजू....

'पोकळी', हुरहूर.... तुम्ही त्याला काहीही म्हणा.... ही अवस्थाही फार काळ टिकून राहू शकत नाही. कारण तो सृष्टीचा नियम आहे. प्रत्येक गोष्ट बदलत असते. अगदी शरीर, परिसर, माणसे, आपले मन, त्यातील भाव, विचार.... प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे हे जाणा आणि ह्या 'पोकळी'ला एन्जॉय करा! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

हा एक नैराश्यातुन आलेला मानसिक आजार आहे. योग्य ते उपचार करुन घ्या.
काही वेळा अर्थपुर्ण किंवा दुर्बोध साहित्य वाचताना मनाची अशीच अवस्था होते.सर्वसाधारण पणे काही वेळा आपली ओढ विरक्ती कडे लागल्याचे आपल्याला जाणवते.मन ह्या अवस्थेत व्दिधा बनते.माझ्या एका मित्राची अवस्था अशी झाली होती.तो आकाशाकडे पहात विचार करत बसत असे. पण वेळीच सावरल्याने आता तो व्यवस्थित आहे.
दुर्बोध साहित्य वाचण्यापेक्षा विनोदी,हलके फुलके साहित्य वाचा.मिपावर विशेष:ता श्री टारझन ह्याचे जुने लेख वाचा. ;)
वेताळ

निखिलचं शाईपेन's picture

29 Mar 2010 - 9:52 am | निखिलचं शाईपेन

हे बघ तुला काय करायचे आहे आयुश्यात, किंवा काय हवे आहे ते शोध. तुझ्याकडे ज्या ज्या गोष्टी नाहीत त्या(च) म्हणजे तुला हवे असलेले नाही . किंवा जे तू करत नाहीयेस आणि जि व्यक्ती तू नाहीयेस ते करून आणि तसे वागून तुला बरे वाटेल असेही नाही, सांगायचा मुद्दा हा की तूला काय हवयं ?
फरदर रीडींग :)
http://purwant.blogspot.com/2006/09/what-do-you-really-want.html

-निखिल

चक्रमकैलास's picture

29 Mar 2010 - 7:13 pm | चक्रमकैलास

मानसिक आजार तर नक्कीच नाहिये मला..(सगळे 'येडे'असच म्हणतात.. =)) ) पण चांगली प्रतिक्रिया आहे..विचार करण्यासारखी..!!
---आयुष्य तसं म्हटलं तर निरर्थकच असतं. कोणीतरी त्याचा अर्थ सांगितला आहे का, दिशा ठरवून दिलेली आहे का हे शोधत बसणं हा एक पर्याय असतो. पण अविश्वासाचे बंध ज्यांना तोडता येत नाहीत व जे हाडाचे श्रद्धाळू नाहीत अशांसाठी हा मार्ग नव्हे. दुसरा पर्याय म्हणजे काहीच अर्थ नाही, काहीच बंधनं नाहीत याकडे स्वातंत्र्य म्हणून पाहाणं. या स्वातंत्र्यातून जबाबदारी येते, पण शेवटी आय डिड इट माय वे असं ताठ मानेने म्हणता तरी येतं.----

छान...!!
आणि मला नैराश्य तरी नाही आलं अजून..पण वर लिहिल्याप्रमाणे प्रश्न पडलेत..बघू..!!
तुझा एकमेव प्रतिसाद थोडा अर्थपूर्ण आहे..

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

उपास's picture

29 Mar 2010 - 9:17 pm | उपास

>>तुझा एकमेव प्रतिसाद थोडा अर्थपूर्ण आहे..
हं, ह्याचा अर्थ इतर उत्तर देणारे, निदान तसा प्रयत्न करणारे (तुमच्या दृष्टीने) निरर्थक (पक्षी: येडे) आहेत का.. ह्यापुढे तरी तुमच्या धाग्याला उतर देताना हे लक्षात ठेवता येईल..

>>माझ्याकडे किंवा मिपावरील कोणाकडेच तुमच्यासाठीची उत्तरं नाहीत. बहुतेकांकडे स्वत:साठीची कामचलाऊ उत्तरं आहेत.
राजेश, एकदम बरोबर. पटलंच... :)
उपास मार आणि उपासमार

हा आजार नव्हे पण तुम्हाला मैत्र संस्थेची गरज आहे

रोज सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात 'मैत्र' ही दूरध्वनी सुसंवाद सेवा (०२२-२५३८५४४७)
२५४ ३३ २७०
२५३६६ ५७७
९८७०२ ९६६ ९४ (सकाळी ११ -संध्या ६ )
कार्यरत आहे.
पत्ता :
९ वा मजला,
श्री गणेश दर्शन ,
एल बी एस मार्ग
हरीनिवाज जवळ
नौपाडा
ठाणे पश्चीम

जब तुम जियोगे तो करोगे
आसमान से बात
खोजेंगे आदमी के
पीछे की खाइयाँ
टटोल-टटोल कर
पता लगा लोगे
बिखरी है उसकी पहचान
टूट-टूट कर कहाँ-कहाँ ...

विचारों की नाखुनदार खरौंचों से
हुआ है बदरूप किसका चेहरा
और यह भी कि सुदूर अन्धेरे में
खुला है किसका आधा किवाड़
अन्दर है मद्धम रौशनी
जहाँ से झाँकता है
अपनेपन का दिलफरेब
है वह किस का चेहरा ?

तुम्ही जरूरत है अपनोंकी
शायद मैत्र हो आपके मसाईलोंका वाहीद (Unique) ईलाज !! :-)

~ वाहीदा

चेतन's picture

31 Mar 2010 - 11:30 am | चेतन

टाबु साईटची गरज आहे बहुतेक ;)

ह.घे

राघव's picture

2 Apr 2010 - 3:57 pm | राघव

हे वाचून बघा, कदाचित काही तुमच्या कामाचे मिळू शकेल - श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

राघव

सुवर्णा's picture

2 Apr 2010 - 4:31 pm | सुवर्णा

हे असं काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं आणि होत राहतं.. पण यामुळे निराशा, उद्वेग असं काही होत नाही.. थोडा गोंधळ एवढचं..
मनाची ही अवस्था होणे (स्व ओळख) ही अध्यात्माची पहिली पायरी असते असं मला वाटतं..
वाचली नसेल आणि विश्वास असेल तर गीता वाचुन समजून घेण्याचा प्रयत्न करा..
:)
मनाची शांती ही व्यक्तीसापेक्ष असते त्याला universal उत्तर नसावं..

सुवर्णा

चक्रमकैलास's picture

2 Apr 2010 - 6:27 pm | चक्रमकैलास

----(स्व ओळख) ही अध्यात्माची पहिली पायरी असते असं मला वाटतं----नाही पटलं...!!
---मनाची शांती ही व्यक्तीसापेक्ष असते त्याला universal उत्तर नसावं..---मनापासून पटलं....!!

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

चित्रगुप्त's picture

2 Apr 2010 - 6:15 pm | चित्रगुप्त

या प्रश्नाची शारीरिक बाजू सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे......म्हणजे तिकडे काही गोची असली, तर त्याचाही मनावर परिणाम होत असतो, आणि आपण भलतीकडे उत्तर शोधत रहातो.....

म्हणजे उदाहरणार्थ:
१. तुमचे वजन किती आहे?..... कमी जास्त तर नाही?
२. तुम्ही रोज रात्री किती वाजता झोपता आणि किती वाजता उठता?
३. तुमचे पोट कसे आहे?
४. सर्व प्रकारच्या चाचण्या करवून घेउन सर्व ऑल ईज वेल आहे याची खात्री करून घेतली आहे का?
५. तुम्ही आवश्यक तो व्यायाम, आसने, प्राणायाम, ध्यान वगैरे नियमितपणे करता का?
६. शारीरिक पातळीवर तुम्हाला कितपत चपळपणा, हलकेफुलकेपणा, तरतरीतपणा जाणवतो? तीस-चाळीस पायर्‍या धावत चढू शकता का?
७. घरच्या घरी तीन मिनिटात सहज करता येण्याजोगी 'फिटनेस टेस्ट' करून बघता का? यात तुम्हाला किती गुण मिळतात?

बौद्धिक पातळीवर खूप प्रगल्भ असणार्‍या काही लोकांचा सर्व गोष्टींमधील रस लवकर आटतो, आणि जीवनात पोकळी जाणवू लागते, हे खरे, पण त्याचा विचार करण्यापूर्वी शारीरिक पातळीवर अगदी पूर्णपणे स्वस्थ असणे ही पहिली पायरी.

चक्रमकैलास's picture

2 Apr 2010 - 6:23 pm | चक्रमकैलास

यमराजाच्या कारकुना ;) ..मी मागच्याच आठवड्यात न थांबता रायगड २ वेळा चढला आहे..त्यामुळे माझे शरीर व्यवस्थित असावे अशी मला दाट शंका आहे... 8}

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

चित्रगुप्त's picture

2 Apr 2010 - 8:44 pm | चित्रगुप्त

उत्तम.........
तुम्हाला बहुधा जॉर्ज गुर्जिएफ (George Ivanovich Gurdjieff ) सारखा गुरू हवा........पण आता कुठे मिळणार?.....रजनीश पण आता नाहीत....

परंतु वरती सर्व मिपाकर मंडळींनी जे जे काही सांगितले आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये पण दम आहे बरं.....म्हणजे प्रत्यक्षात काही केले तर......

शानबा५१२'s picture

2 Apr 2010 - 6:53 pm | शानबा५१२

हे वाचल आणि वाट्ल कशाला वाचतोय मी?
मी वाचुन काय करतोय ह्याचा मी विचार केला आहे का?
मित्र वगैरे कोणीच बाजुला नसल की मला बर का वाटत?
आणि ते आले की डोक्यात का बसतात?
मी का पैसा डुबवतोय्?का मजा नाही मारत?

भाडमधे जाउ दे सर्व............मी बोलतो................Benzothiazole,Benzoimidazole,Benzoxazole ह्यांच्याबद्दल 'सर्व' भेटल का?
मला आता लोक scientist का बनतात ते कळल!!
हे रोज २० वेळा वाचा बर वाटेल......प्रश्न सुटतील.

thank u thank u बर वाटल ना आता!!

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****