पाव (हमखास - भारतातल्यासारखा + फोटो)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in पाककृती
17 Feb 2010 - 12:21 pm

मिसळपाव वर मिसळीच्या अनेक कृती दिसल्या पण पाव कसा करायचा याची एखाद-दुसरीच दिसली. अर्थात तुम्ही भारतात राहात असाल तर भाग्यवान आहात - या कृतीकडे सरळ डोळेझाक करा व बेश जवळच्या उत्तम बेकरीतून ताजा पाव आणा. पण अमेरिकेत राहाणार्‍या आम्हा दुर्भाग्यांना तसा उत्तम पाव मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. आंतर्जालावर मिळणार्‍या कृतींमध्ये खूपच कमतरता असतात हे मी अनुभवाने जाणले. गेल्या दोन महिन्यात वीस ते पंचवीस वेळा पाव करण्याचा प्रयत्न करून (त्यात काही विटाही झाल्या !) शेवटी ही नक्की केली. इंजिनीअरींगच्या प्रोसेस ऑप्टिमायजेशनच्या ज्ञानाचा इथे फार उपयोग झाला. (कोण म्हणतो शिक्षणाचा काही उपयोग नाही म्हणून?)

ही प्रक्रिया थोडी किचकट वाटेल, पण तुम्हाला सांगतो, हा पाव करायला लागल्यापासून मला ग्रोसरी स्टोअर मध्ये मिळणारा पाव अगदी खाववत नाही. तो फार फुसफुशीत लागतो. गेल्या दोन महिन्यात मी पाव विकत आणलेला नाही.

संपूर्ण कृती वाचून मग करायला घ्या म्हणजे सोपे जाईल. संपूर्ण वेळ सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत - सुमारे ६ तास. पण प्रत्यक्ष काम फक्त साधारण ३० मिनिटांचे आहे.

ही कती दोन माणसांना भरपूर होईल इतक्या पावाची आहे. ४ इंच बाय ३ इंच बाय २.५ इंच असे सहा पाव.

साधनसामुग्री.
१. २ कप ( ४८० मिलीलीटर) ब्रेड फ्लाअर (हे मैद्यापेक्षा वेगळे असते. विटा करायच्या नसतील तर हे वापरावे)
२. १/२ टेबलस्पून (७ मिलीलीटर) प्रत्येकी यीस्ट, मीठ व साखर (यीस्ट हे तयार पाकीटांपेक्षा बाटलीत मिळणारे ड्राय यीस्ट वापरावे)
३. १/२ कप (१२० मिलीलीटर) पाणी.
४. १/४ कप ( ६० मिलीलीटर) दूध.
५. २ +१/२ टेबलस्पून (४७ मिलीलीटर) तेल
६. साधारण १२ इंच बाय ६ इंच भाजण्यासाठी पॅन. हा पायरेक्सचा असू शकतो, किंवा धातूचा अगर नॉन-स्टिक. आकार थोडासा वेगळा असल्याने फरक पडत नाही.
७. एक मध्यम आकाराचे काचेचे वा स्टीलचे भांडे
८. तेल, भांड्यांना हात लावण्यापुरते.

सुरूवात
१. पाणी, दूध व साखर एकत्र करून साखर विरघळवावी.
२. मायक्रोवेव्ह मध्ये हे मिश्रण ३० सेकंद गरम करून घ्यावे. तापमान बोटाने पाहावे. ते पोहोण्यासाठी फार गरम असलेले व आंघोळीसाठी पुरेसे गरम नसलेले असे असावे. चटका लागू नये.
३. अशा अर्ध-कोमट मिश्रणात यीस्ट घालावे, थोडेसे ढवळावे व ते सुमारे दहा मिनिटे ठेवावे. दहा मिनिटांनी त्याचा फेस वर येईल याचा अर्थ ते यीस्ट कार्य करत आहे.
४. त्या दरम्यान फूड प्रोसेसर मध्ये ब्रेड फ्लाअर, मीठ, व तेल घालावे.
५. यीस्टचा फेस साधारण पाव इंच आलेला दिसला की ते दूध, पाणी, साखर व यीस्टचे मिश्रण फूड प्रोसेसर मध्ये आधीच असलेल्या मिश्रणात घालावे.
६. फूड प्रोसेसर मध्ये ते कमीत कमी सेटिंगला ठेवून सुमारे दीड मिनिट फिरवावे. प्रथम मिश्रण एकजीव होऊन त्याचा कणकेसारखा गोळा होतो. हा गोळा फिरत राहातो. हा साधारण तीस- चाळीस वेळा फिरल्यानंतर जास्त पातळ झाल्याप्रमाणे होतो. म्हणजे पोळ्यांच्या कणके पासून घट्ट चक्क्यासारखा (त्याहून थोडा घट्ट) होतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुरेसा मळला नाही, तर तुमचा पाव नक्की जड होईल.
७. पण दोन मिनिटांपेक्षा जास्तही ठेवू नका, कारण अति मळण्याने सुद्धा पावाचा पोत बिघडतो. बाहेर काढल्यावर गोळा अतिशय मऊ (लोण्यापेक्षा थोडा कडक) व प्रवाही लागला पाहिजे. अलगद ओढल्यावर तुटण्याऐवजी च्युईंगगम प्रमाणे ताणला गेला पाहिजे.
८. तयार झालेला गोळा, तेल लावलेल्या भांड्यात, ओल्या कापडाने झाकून ठेवावा. पुढचा साधारण तास ते दीड तास हा गोळा फुगेल. तुम्ही जर उबदार तापमानाच्या ठिकाणी नसाल तर यात खूप फरक पडतो. तेव्हा ओव्हन ३५० वर २० सेकंद प्रीहीट करावा व बंद करावा. आता आतमध्ये उबदार होईल. या ठिकाणी तुमचा गोळा दीड तास ठेवावा. ओव्हनमध्ये ठेवण्यामुळे नियंत्रित तापमान मिळतं. व दरवेळी एकसारखा होण्यास मदत होते.
पीठ मळल्यावर

९. गोळा चांगलाच फुगलेला असला पाहिजे. आकारमान दोन मुठीऐवजी साधारण पाच ते सहा मुठीइतकं असेल. मूळ आकारमानाच्या सुमारे अडीचपट.
पीठ फुगल्यावर

१०. गोळा अलगद उचलून बाहेर काढा. आता तो अधिक विशविशीत लागेल व जास्त ताणला जाईल. तो थोडासा मळून मूळ आकाराला येऊ द्या. यालाच पंच डाऊन म्हणतात.
११. पुन्हा तो त्या भांड्यात ठेवून (आधीच्याच पद्धतीप्रमाणे) उबदार केलेल्या ओव्हनमध्ये साधारण दीड तास ठेवा.
१२. गोळा अलगद उचलून बाहेर काढा. पुन्हा पंच डाऊन करा. व आता त्याचे सहा गोळे करून तेलाचा हात लावलेल्या भाजण्याच्या पॅनमध्ये ठेवा. गोळ्यांमध्ये साधारण इंचभराचं अंतर ठेवा.
१३. पुन्हा (आधीच्याच पद्धतीप्रमाणे) उबदार केलेल्या ओव्हनमध्ये साधारण एक तास ठेवा. बाहेर काढल्यावर गोळ्यांवर पाण्याचा स्प्रे मारावा, किंवा हात फिरवावा. ओलसरपणामुळे फुगण्याआधीच वरचा पष्ठभाग कडक होत नाही.
१४. आता पावाची गोळे असलेले पात्र बाहेर काढून ओव्हन ३५० वर तापवा. तापल्यावर ओव्हनच्या तळात सुमारे अर्धा कप पाणी ओतावे. याने वाफ तयार होते व पाव फुगायला मदत होते.
१५. ओव्हनमध्ये सुमारे ३५ ते ४० मिनि़टे भाजावा. ओव्हनमध्ये तो आणखी थोडा फुगेल. रंग आपल्याला हवा त्याच्यापेक्षा एक शेड लालसर होऊ द्यावा.
१६. तयार झाल्या झाल्या त्यावर लोणी लावावे. याने पावाची त्वचा ब्रून सारखी कडक न होता आपल्या पावासारखी leathery, मऊ होते.
१७. साधारण २० मिनिटे गार झाल्यावर हा खायला तयार होतो.


यातही तुम्हाला थोडे प्रयोग करून बघावे लागतील. पण एकदा का पाव जमला की सुंदर पावासारखं सुख नाही....

पाव थोडा पिठूळ, चिकट, ओलसर व जड लागत असेल तर याचा अर्थ - पुरेसा मळला गेला नाही, यीस्ट कमी वा पुरेसा फुगू दिला नाही.
पाव जर आंबूस, कडवट लागत असेल तर याचा अर्थ तो जास्त फुगला - जास्त वेळ अगर जास्त तापमानाला ठेवला गेला, वा यीस्ट जास्त झाले.

कोणाला जर रस असेल तर मी जास्त तांत्रिक माहिती देईन. (यीस्टची प्रक्रिया, ग्लुटेन, पावाच्या चवीवर परिणाम करणारे घटक इत्यादी)

संपूर्ण पाककृतीत (वरून लावलेला लोण्याचा हात, भांड्यांना तेलाचा हात वगैरे धरून धरून) सुमारे १३५० कॅलरी असतात. त्याचे आठ भाग केले तर तर एक सर्व्हिंग या हिशोबाने खाली प्रत्येक सर्व्हिंगसाठी पौष्टिक मूल्य सांगितले आहे. प्रत्येक सर्व्हिंग हे साधारण एका जाडजूड स्लाईसइतके किंवा पावभाजीच्या छोट्या पावाइतके होते. (चित्रात चार सर्व्हिंग - दोन मोठे पाव दाखवले आहेत) तीन ते चार सर्व्हिंग बहुतेकांना एका पावभाजीसाठी भरपूर होतात. (साधारणपणे चार ते सहा पोळ्या खाण्याप्रमाणे) दोन कप कणकेच्या तुमच्या किती पोळ्या होतात त्यावरून अधिक चांगला अंदाज बांधता येईल.

१ सर्व्हिंग:
उष्मांक (कॅलरी) - १६०
कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स) - २४ ग्रॅम
मेद (फॅट) - ५ ग्रॅम
प्रथिनं (प्रोटीन्स) - ४ ग्रॅम
तंतू (फायबर) - १ ग्रॅम

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

17 Feb 2010 - 12:23 pm | विसोबा खेचर

छान पाकृ.. धन्यवाद!

सोबत फोटोही दिला असतात तर अधिक बरं झालं असतं साहेब..

तात्या.

राजेश घासकडवी's picture

17 Feb 2010 - 3:03 pm | राजेश घासकडवी

मूळ प्रकाशनात मापे चुकीची लिहिली होती... ही सुधारित आवृत्ती आहे

गैरसोयीबद्दल क्षमस्व.

राजेश घासकडवी's picture

17 Feb 2010 - 3:04 pm | राजेश घासकडवी

मूळ प्रकाशनात मापे चुकीची लिहिली होती... ही सुधारित आवृत्ती आहे

गैरसोयीबद्दल क्षमस्व.

पाषाणभेद's picture

17 Feb 2010 - 1:32 pm | पाषाणभेद

आमी पावाबद्दल जे काही ऐकतो ते खरे आहे काय? नाय म्हणजे वरल्या कृतीत 'तसल्याच' प्रकारे पावाची कणीक मळायची काय? मागे एकदा इंडीया टि व्ही वर दाखवले होते पाव कसा बनवतात ते.

(आज इंडीया टि व्ही वर ''पेलिकन को गुस्सा क्यूं आया" अन "राहूल के दुल्हनों को मिर्ची क्यूं लगी" हे दळण दळत होते. ते निवेदक वेडे का होत नाही. अन रात्री त्यांना झोप लागते का?)

बाकी मस्त सांगितले बर का तुम्ही. घरच्याच पावाचा फोटो टाका.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

राजेश घासकडवी's picture

17 Feb 2010 - 2:46 pm | राजेश घासकडवी

तसल्याच म्हणजे नक्की कळले नाही. आम्ही अनेक वात्रट अर्थ लावून पाहिले... पण शेवटी तुम्ही पायाने मळावी का असं विचारत असाल असं वाटलं. नाही, ती हातानेच मळायची.

फूड प्रोसेसर नसला तर पाव मळणे हा चांगलाच व्यायाम आहे.

कणीक आपण साधारण मिनिटभर मळतो, तर पावासाठी कणीक हाताने किमान पंधरा मिनिटे तरी चांगली जोर लावून मळावी लागते. गोळा न तुटता चांगला भरपूर ताणला गेला की मळला गेला असे समजावे.

फोटो लवकरच टाकेन.

वेताळ's picture

17 Feb 2010 - 3:10 pm | वेताळ

कणीक तिंबणारा कामगार व वाईन करण्यासाठी द्राक्षे तुडवणार्‍या पोरी ह्याच्या कामात बरेच साम्य असते का हो?

वेताळ

मदनबाण's picture

17 Feb 2010 - 5:20 pm | मदनबाण

वेताळा अरे अगदी हाच इचार माझ्या मना मंदी आला व्हता... ;)

(वाईन म्हणजे जीवन राजा... ;) )
मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

विसोबा खेचर's picture

19 Mar 2010 - 10:52 pm | विसोबा खेचर

दोन्ही मुली पाहून मोहीत झालो! :)

तात्या.

टारझन's picture

6 Apr 2010 - 2:44 pm | टारझन

आपल्या प्रतिसादात बापाची माया दिसली :D

- (बाउ) जावाईबाप्पु

विशाल कुलकर्णी's picture

9 Apr 2010 - 3:45 pm | विशाल कुलकर्णी

हाण तिच्या मारी ! असं एखाद्याच्या श्रीखंडात लिंबू पिळू नये रे टार्‍या ! >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

रेवती's picture

17 Feb 2010 - 6:56 pm | रेवती

पायरीपायरीने दिलेली छान पाकृ!
दोन महिन्यांमध्ये भरपूर अनुभव घेतल्याचे समजते आहे.
फोटो टाकल्यास दाद देऊ.
कृती मस्त!

रेवती

चित्रा's picture

17 Feb 2010 - 6:57 pm | चित्रा

अशा पद्धतीने करून बघीन.

गणपा's picture

17 Feb 2010 - 7:12 pm | गणपा

खुप चिकाटीच काम दिसतय (वर वेळ काढु) पण जर भारतातल्या सारखा पाव मिळणार असेल तर वर्थ आहे.
फोटो टाकल्यास कल्पना येईल.

अनामिक's picture

17 Feb 2010 - 9:57 pm | अनामिक

घाईघाईत "खुप चिकाटीच काम दिसतय (वर वेळ काढु) पण जर भारतातल्या सारखा पाव मिळणार असेल तर व्यर्थ आहे" असं वाचलं.

या पा़कृसाठी एवढे कष्ट घेतलेले बघून आपके पाव छुने का मन कर रहा है!

-अनामिक

राजेश घासकडवी's picture

18 Feb 2010 - 7:10 am | राजेश घासकडवी

अशा प्रतिक्रिया बघितल्या की वाटतं देवच पावला...

नाही राहावलं... पीजे दिसला की प्रतिक्षिप्त क्रिया होते.

धनंजय's picture

17 Feb 2010 - 9:16 pm | धनंजय

(पण कधी जमेल कोणास ठाऊक.)

क्रमाने समजावून सांगणारी पाककृती छानच.

अक्षय पुर्णपात्रे's picture

17 Feb 2010 - 9:55 pm | अक्षय पुर्णपात्रे

पाककृती छानच. जेव्हा जमेल तेव्हा करण्याकरता वाचनखुण साठवली आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Feb 2010 - 9:16 am | प्रकाश घाटपांडे

शहरात यायला आवडायच कारण च्यात बुडवुन पाव खायला भेटायचा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

खडूस's picture

18 Feb 2010 - 10:24 am | खडूस

मिसळपाव वर मिसळीच्या अनेक कृती दिसल्या पण पाव कसा करायचा याबद्दल काही दिसले नाही.

मागे दिपालीताईंनी पावाची मस्त पाककृती दिली होती. तुमची पण चांगली दिसते.
आता करून बघायला हवी.

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

दिपाली पाटिल's picture

18 Feb 2010 - 10:40 am | दिपाली पाटिल

तुम्ही यात साखर अगदी अर्धाच चमचा वापरली आहे, जनरली म्हणतात की साखर यीस्टचं अन्न आहे म्हणून अगदीच खुप नाही तरी एखाद टेबलस्पून साखर तरी असावीच...तरीही एखादा फोटो चिकटवा म्हणजे थोडी-फार आयडीया येइल..तशी पाकृ छान आहे, नक्की ट्राय करून बघेन...
येथे मी केलेल्या पावाची पाकृ आहे...

दिपाली :)

राजेश घासकडवी's picture

18 Feb 2010 - 12:11 pm | राजेश घासकडवी

मी आपली कृती आत्ताच बघितली. माफ करा - मला मिपावर खूप शोधून पावाची कृती सापडली नव्हती. पण मी सर्च वगैरे करण्याऐवजी प्रत्येक पान उघडून बघितलं त्यात चुकली असेल.
मी जास्त साखर घालून अजून पाव करून बघितला नाही. यीस्टला खरं तर कुठचंही कार्बोहायड्रेट चालतं. पीठ व साखर यात तत्वत: काही फारसा फरक नाही. साखर यीस्टला लवकर 'पचेल' पण शेवटी पिठातूनच मुख्य किण्वन (fermentation) होतं.
फोटो चिकटवण्याविषयी खूप लोकांनी सांगितले आहे. दुर्दैवाने माझ्याकडे फक्त स्लाइस्ड ब्रेडचे आहेत. पाव लवकरच करेन आणि यावेळी टाकेन.

दुर्दैवाने माझ्याकडे फक्त स्लाइस्ड ब्रेडचे (फोटो) आहेत. पाव लवकरच करेन आणि यावेळी टाकेन.

कशाला काळजी करता हे घ्या होम मेड पावाचे फोटो :-)

पिठ मळल्यावर

अन नंतर

~ वाहीदा

चिंतातुर जंतू's picture

19 Feb 2010 - 2:53 pm | चिंतातुर जंतू

मी जास्त साखर घालून अजून पाव करून बघितला नाही. यीस्टला खरं तर कुठचंही कार्बोहायड्रेट चालतं. पीठ व साखर यात तत्वत: काही फारसा फरक नाही. साखर यीस्टला लवकर 'पचेल' पण शेवटी पिठातूनच मुख्य किण्वन (fermentation) होतं.

अगदी बरोबर आहे. मी यीस्ट आणि पाण्याच्या मिश्रणात साखर अजिबात वापरत नाही; ते मिश्रण बाजूला न ठेवता लगेचच पीठ मळायला घेतो. पिठाचा गोळा आंबण्यात यत्किंचितही बाधा येत नाही.
- चिंतातुर जंतू

पीठ/साखरे/मधाच्या पाण्यात फसफसेपर्यंत ठेवून यीस्ट जिवंत असल्याचे सिद्ध करायची पद्धत (प्रूफिंग) काटकसरीसाठी असावी.

यीस्ट जिवंत नसेल (आणि माझ्याकडील यीस्ट जुने होऊन बेकार झालेले असल्याचा अनुभव आहे :-( ), तर सगळी कणीकही वाया जाईल. असा नास होऊ नये, म्हणून यीस्ट "सिद्ध" करण्याची पद्धत असावी, असे मला वाटते.

राजेश घासकडवी's picture

19 Feb 2010 - 11:20 pm | राजेश घासकडवी

यीस्ट जिवंत असण्याची सिद्धता करण्यामागे कणीक वाया जाऊ नये हे आहेच. पण मुळात गरज निर्माण झाली ती फ्रिज नसल्या काळी यीस्ट पटकन खराब व्हायचं. त्यामुळे पाव चांगला होण्यासाठी यीस्ट प्रूफ करून बघणं खूपच महत्त्वाचं ठरायचं. आजकाल ती गरज तितकी नसली, तरी माझे सुद्धा पाव वाया गेले आहेत.

यीस्टचं 'विरजण' लावण्याचीही पद्दत आहे. तसं केलं की नवीन यीस्टशिवाय पाव करता येतो. त्यात आणखीन फायदा असा असतो की तुम्हाला चांगलं कल्चर ( संस्कृती ?? ;-)) मिळालं - सान फ्रान्सिस्को साअरडो ब्रेड वगैरे - तर ते तुम्ही जपून ठेवू शकता, व त्याने चव जास्त चांगली येते. विरजणाचे माझे अजून प्रयोगच चालू आहेत.

चतुरंग's picture

19 Feb 2010 - 11:23 pm | चतुरंग

ते सगळीकडे 'विरजण' लावत फिरत असतात! ;)

(चक्का)चतुरंग

राजेश घासकडवी's picture

20 Feb 2010 - 12:37 am | राजेश घासकडवी

हे विरजण खूप काळ जपून ठेवायचं असतं....नुसतं एकदा लावलं की झालं असं नाही... :-)

शाहरुख's picture

20 Feb 2010 - 2:38 am | शाहरुख

>>हे विरजण खूप काळ जपून ठेवायचं असतं

त्यातही ते मदत करु शकतील :-D

मी घरी पाव करणार नसलो तरी उत्सुकतेपोटी कृती वाचून काढली :-)

(आगाऊ) शाहरुख

चिंतातुर जंतू's picture

18 Feb 2010 - 12:28 pm | चिंतातुर जंतू

मी कित्येक वर्षे पाव विकत न आणता घरीच बनवतो. खालील गोष्टींची आपल्यास कदाचित मदत होईलः

  • पावाचे पीठ भिजवताना अंमळ चिकट ठेवले की पाव चांगला मऊ होतो. त्यासाठी पोळीच्या कणकेपेक्षा जास्त पाणी घालावे लागते. हाताने मळताना यामुळे थोडा त्रास होतो, पण फळे गोमटी मिळतात.
  • थोडी दुधाची पावडर पाण्यात मिसळून घातल्यास आणि/किंवा एखादे अंडे किंचित फेटून घातल्यास पाव मऊ होतो; शिवाय पृष्ठभागास रंगही चांगला येतो.
  • पीठ मळून झाल्यावर फुगण्यास किती वेळ ठेवावे, हे तापमान, आर्द्रता वगैरेंवर अवलंबून असते. त्यामुळे कोणत्याही पाककृतीत सांगितलेल्या वेळापेक्षा पिठाचा गोळा किती फुगला आहे, यावरून ठरवणे सोपे जाते. मूळ आकारमानाच्या किमान दुप्पट व्हायला हवा.
  • पावाचा पृष्ठभाग कडक होण्याचे कारण त्यातील आर्द्रता तातडीने नाहीशी होते, हे आहे. ते टाळण्यासाठी मी हा उपाय करतो: ओव्हनमधून बाहेर काढल्यावर पृष्ठभाग कोमट होऊ द्यावा (फार तर पाच मिनिटे). नंतर पाव फॉइलने हवाबंद करावा.

- चिंतातुर जंतू :S

राजेश घासकडवी's picture

18 Feb 2010 - 1:42 pm | राजेश घासकडवी

•पीठ मळून झाल्यावर फुगण्यास किती वेळ ठेवावे, हे तापमान, आर्द्रता वगैरेंवर अवलंबून असते. त्यामुळे कोणत्याही पाककृतीत सांगितलेल्या वेळापेक्षा पिठाचा गोळा किती फुगला आहे, यावरून ठरवणे सोपे जाते. मूळ आकारमानाच्या किमान दुप्पट व्हायला हवा.

हे अगदी बरोबर आहे. हवा थंड असली, तर खूप फरक पडतो. त्यामुळे फुगण्याच्या प्रमाणानुसार वेळ ठरवावी लागते.

•पावाचा पृष्ठभाग कडक होण्याचे कारण त्यातील आर्द्रता तातडीने नाहीशी होते, हे आहे. ते टाळण्यासाठी मी हा उपाय करतो: ओव्हनमधून बाहेर काढल्यावर पृष्ठभाग कोमट होऊ द्यावा (फार तर पाच मिनिटे). नंतर पाव फॉइलने हवाबंद करावा

हे मी करून पाहिलेले नाही. जरूर करून बघेन
धन्यवाद

रेवती's picture

19 Feb 2010 - 7:22 pm | रेवती

राजेशसाहेब,
खरच चांगला झालाय पाव!
फोटू छानच आलाय!
अश्या ताज्या लुसलुशीत पावाबरोबर (पावभाजीमधली) भाजी चविष्ट लागेल.

रेवती

विकास's picture

19 Feb 2010 - 7:38 pm | विकास

पाव एकदम जबरा दिसतोय!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुनील's picture

20 Feb 2010 - 10:45 am | सुनील

पाकृ आणि फोटो जबरा!

पाव माझा वीक पॉइंट. बेकरीतून आणलेला ताजा गरमागरम पाव नुसता (काहीही न लावता) देखिल चविष्ट लागतो!

स्वाती दिनेश's picture

20 Feb 2010 - 5:47 pm | स्वाती दिनेश

फोटो आणि पाकृ पाहिले, लवकरच ह्या पध्दतीनेही करून पाहिन.
स्वाती

स्वाती२'s picture

20 Feb 2010 - 8:10 pm | स्वाती२

छानच दिसतोय पाव!

फोलपट's picture

19 Mar 2010 - 10:50 pm | फोलपट

मी एकदा केला होता प्रयत्न, चान्ग्लाच फसला... नवरोजी म्हणाले बेक्ड पोटॅटो वाटते! हाय रे!!! पुन्हा एकदा करून बघावेसे वाटु लागलेय ही पाकक्रुती वाचुन. धन्यवाद!!

चतुर नार's picture

20 Mar 2010 - 12:13 am | चतुर नार

छान दिसतोय. मी ब्रेड कधीच घरी बनवला नाही. आता या रेसिपीने पहिल्यांदा करुन पहाणार.

शेखर's picture

20 Mar 2010 - 12:14 am | शेखर

करुन झाला की मला पण बोलवा खायला :)

गोगोल's picture

20 Mar 2010 - 5:49 am | गोगोल

खुलासेवार आणि स्टेप बाय स्टेप सांगितल्याबद्दल धन्यवाद. कधीतरी करून बघतो.
काही आरोग्यविषयक प्रश्न .. ह्या पावाचे पौष्टिक मूल्य वगैरे काय असते?
अशाच प्रकारे ते व्हीट किंवा मिक्स्ड ग्रेन इत्यादी पाव बनवता येतील का?

राजेश घासकडवी's picture

21 Mar 2010 - 7:32 am | राजेश घासकडवी

गोगोलनी सुचवल्याप्रमाणे पौष्टिक मूल्य लिहिलेलं आहे.

अशाच प्रकारे ते व्हीट किंवा मिक्स्ड ग्रेन इत्यादी पाव बनवता येतील का?

संपूर्ण कणकेचा पाव चांगला होत नाही. त्यात ग्लुटेन कमी असल्यामुळे घट्ट गोळा होतो व फुगत नाही. माझ्या माहितीप्रमाणे व्हीट, किंवा मिक्स्ड ग्रेन पाव मिळतात त्यात साधारण २/३ ब्रेड फ्लाअर व १/३ इतर पीठ असतं. या प्रमाणात पिठं घेऊन याच कृतीने पाव करून बघायला हरकत नाही. पण पहिल्या वेळी करताना फक्त ब्रेड फ्लाअर वापरून करून पहा. मग वेगवेगळे प्रयोग तुम्हाला करता येतील.

आत्तापर्यंत खूप लोकांनी पाककृती वाचून कौतुक केल्याबद्दल सगळ्यांचे आभार. जर कोणी खरोखरच ही पाककृती करून बघितली असेल तर त्यांचे अनुभव जाणून घ्यायला आवडेल. कितीही डिटेलवार कृती असली तरी पाव पहिल्यांदाच करून तो उत्तम होईलच असं नाही. जर बिघडला असेल तर त्यात पुढच्यावेळी काय सुधारणा करता येईल हे आपल्याला बघता येईल.

पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

राजेश

धनंजय's picture

22 Mar 2010 - 7:10 pm | धनंजय

गेले चार-पाच आठवडे करत आहे.

त्यात ग्लूटेन अधिक असते.

त्याला पाणी अधिक लागते, आणि फुगवून-दाबून-फुगवून-दाबून १०-२० तास उबवावे लागते.

जमल्यास पाककृती आणि फोटो टाकतो.

राजेश घासकडवी's picture

23 Mar 2010 - 12:21 am | राजेश घासकडवी

तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन बघितलं त्यात मला खालील माहिती दिसली.
हाय ग्लुटेन व ब्रेड फ्लाअर : सर्वाधिक ग्लुटेन, पाव करण्यास उत्तम
ऑल परपज फ्लाअर : मध्यम ग्लुटेन, पावही करता येतो, केकमध्येही वापरता येतं
पेस्ट्री फ्लाअर : कमीत कमी ग्लुटेन, केकसाठी उत्तम.
रेड व्हीट मध्ये व्हाईट व्हीट पेक्षा प्रमाण अधिक.

पण कुठेही मला व्होल व्हीट फ्लाअर मध्ये ब्रेड फ्लाअरपेक्षा अधिक ग्लुटेन असल्याचं दिसलं नाही. व्होल व्हीट फ्लाअर मध्ये फक्त कोंडा व व्हीट जर्म अधिक असतं. एकाच गव्हाचा केल्यास त्यात ग्लुटेन जास्त कसं येईल कळत नाही.

पाव फुगण्यासाठी केवळ ग्लुटेनच्या प्रमाणाने किती फरक पडतो याबद्दल मला शंका यायला लागली आहे. असो. मला खात्रीलायक पाकृ हवी आहे, तुमची जरूर टाका.

राजेश

धनंजय's picture

23 Mar 2010 - 1:36 am | धनंजय

कोंड्यातले प्रथिनही ग्लूटेनच आहे, असे मला वाटत होते. पण शोधून बघितले तर तसे काही दिसत नाही.

sur_nair's picture

21 Mar 2010 - 7:54 am | sur_nair

हं. कृती छान वाटतेय आणि दिसतोय हि चांगला. करून बघायला हरकत नाही. खरं तर मी ज्याचे काम त्याने करावे ह्या विचाराचा आहे. पाव असो, पाणी पुरी असो, भेळ असो वा पान असो ही एक कला आहे आणि त्यात मुरलेला कलाकाराच ते काम चांगले करू शकतो. पण म्हणतात न कधी कधी 'bathroom singing ' करायला हरकत नाही तसा हा पाव सुद्धा करून बघायला हरकत नाही. धन्यवाद.

प्रफुल्ल's picture

6 Apr 2010 - 8:12 am | प्रफुल्ल

वर तुम्ही दिल्याप्रमाणे पाव बनवून पाहिले. छान व खाण्यायोग्य पाव बनलेत. गेल्या वेळेला देखिल दिपाली ताई च्या पद्धतीने बन्विले होते, पहिल्या वेळेला छान झाले होते.

ह्या वेळेस धावपळ झाली, स्मोक अलार्म मुळे.

धन्यवाद. मला सेम पिझ्झा बेस साठी वापरता येईल का?

प्रफुल्ल

अजबराव's picture

29 Jun 2010 - 4:39 am | अजबराव

मस्त पाव बनाले या receipe मूळ....में या रेसिपे मद्ये १/२ wheat फ्लौर वापरले अणि १/२ bread फ्लौर ....awesome पाव बनले त्याचे...
अणि हो में पीठ मलून ते १ तास ठेवले....(ओवेन वार्म वर ठेवून मग आत मध्ये पीठ ठेवले १ तास साथी ).....मग त्याला पउन्च डाउन केला अणि मग परत ओवेन मध्ये १ तास ठेवले अणि मग बेक केले...
काय सांगू हो किती मस्त पाव झाले होते...माज़ा नवरा एकदम खुश जाला.....

वाहीदा's picture

29 Jun 2010 - 12:51 pm | वाहीदा

काय सांगू हो किती मस्त पाव झाले होते...माज़ा नवरा एकदम खुश जाला.....
अजबराव ,
तुम्ही रावसाहेब आहात मग तुम्हाला नवरा कसा ?? :O
हे तर खरच खुप अजब आहे :T
~ वाहीदा

टारझन's picture

29 Jun 2010 - 1:58 pm | टारझन

काही अजब नाही हो ... हल्ली लिगल आणि कॉमन आहे ;)

सुप्रिया's picture

29 Jun 2010 - 11:16 am | सुप्रिया

पाव मस्त दिसतोय. पण भारतात राहात असल्यामुळे ताजा विकतचा पाव आणण्याचं सुख आहे.

स्मिता चावरे's picture

29 Jun 2010 - 11:25 am | स्मिता चावरे

+१

भडकमकर मास्तर's picture

29 Jun 2010 - 3:07 pm | भडकमकर मास्तर

अभ्यासपूर्ण पावकृती आवडली...
आणि फोटो एकदम मस्त आलाय