सैतानाचे स्वर्गीय अन्न

स्वाती२'s picture
स्वाती२ in जनातलं, मनातलं
25 Dec 2009 - 8:17 pm

काल बर्‍याच महिन्यांनी नवर्‍याला ख्रिसमस इव मुळे सुट्टी होती. मधलाच वार असल्याने नेहमीची विकांताची कामेही नव्हती. त्या आधीच्या आठवड्यातली अ‍ॅनिव्हरसरी नेहमीच्या रुटीनमधे हरवली होती. 'हॅपी अ‍ॅनिव्हरसरी! जेवायला थांबू नकोस' सांगत त्याने सकाळी ६ लाच घर सोडलं होतं. त्यामुळे काल 'तू अजिबात खाली येऊ नकोस. आज तुला रूम सर्व्हीस!' असं सांगून नवरा सकाळी खाली गेला. हॉट चॉकलेट, बनाना ब्रेडचा ब्रेकफास्ट, जेवायला पाव-भाजी! यम्म! दुपारी ३ वाजता परत स्वारी वरती आली.
'मी तुझ्यासाठी केक करतो, ' कालच्या ज्युलिया अँड ज्युलियाचा परीणाम.
अशा वेळी काही न बोलणे शहाणपणाचे. १० मिनिटं पॅन्ट्रीत खुडबुड करुन, हताश होऊन तो वरती आला.
'आपल्याकडे केक मिक्स नाहिये.' मला माहित असलेली गोष्ट त्याच्यासाठी ब्रेकिंग न्युज होती.
'केक मिक्स' कानावर पडताच तरातरा लेक खोलीत आला. हा घरातला ' ब्रँड न्यू फूडी'. नवखा असल्याने साहजिकच कर्मठ.
'तू मॉम साठी केक मिक्स चा केक करणार?'
'केक मिक्स नाहिये.' नवर्‍याने परत टेप वाजवली.
लेकाच्या चेहर्‍यावर मोठ्ठा अनर्थ टळल्यालाचा भाव!
" I have this awesome book. I will guide you. You are going to make a 'real cake'." लेकाने वरदहस्त ठेवला.
दोघे उत्साहात खाली गेले. १५ मिनिटांनी जोडगोळी बटरचा ठोकळा घेऊन वरती. real cake साठी soften butter लागणार होतं. काउंटर टॉप वर तो ठोकळा मऊ व्हायला १२ तास लागतील कळल्यावर दोघांचेही चेहरे पडले. लोणी मऊ करायची युक्ती सांगून त्यांच्या चेहर्‍यावर परत उभारी आणली. अर्धा तास धडपड केल्यावर एकदाचे लोणी मऊ झाले. तो पर्यंत लेकाचा उत्साह संपला होता.
'आता ही रेसीपी फॉलो कर म्हणजे असा फोटोतल्या सारखा केक होईल' लेकाने guidance दिला.
'पण तू मदत करणार होतास ना'
"I said, 'I will guide you'. " लेकाने आठवण करून दिली.
"आणि हा एकदम सोप्पा आहे. मी नव्हता का केला दोन महिन्यापूर्वी." लेकाने छुपं आव्हान दिलं होतं.
पुस्तक घेऊन नवरा परत guidance साठी माझ्याकडे.
"चल मी येते खाली. तू रेसीपी वाचून कर. मी काय चुकत असेन तर सांगेन. त्या food snob ला दाखवच करुन 'real cake' " आता मलाही चेव आला होता.
पुन्हा उत्साहाने नवरा कामाला लागला. ओवन प्री हीट, व्हीप, मिक्स, फोल्ड....एकेक पायरी पार करत केक आकाराला आला. टायमर वाजला आणि हातात मिटन अडकवून बसलेल्या नवर्‍याने 'सैतानाचे अन्न' ओवन मधुन बाहेर काढले. चॉकलेट-वॅनिलाचा तो स्वर्गीय दरवळ.........केवळ अवर्णनिय!
नवर्‍याचा उत्साह दुणावला होता. आता त्याला आयसिंग करायच होतं. अर्धा तास आयसिंग, कोको, वॅक्स पेपर, आयसिंग गनशी झगडल्यावर त्याला काय कसं करायचे ते एकदाचे उमजले. तर मंडळी पेश आहे माझ्या नवर्‍याचा पहिलाच प्रयत्न डेव्हिल्स फूड केक.....

जीवनमान

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Dec 2009 - 8:22 pm | बिपिन कार्यकर्ते

आम्ही काही खाल्ला नाही केक पण सॉल्लीड मस्त झाला असणार हे मात्र नक्की... काय? ;)

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

25 Dec 2009 - 8:38 pm | प्राजु

सॉल्लिड!
मजा आहे बाई तुझी स्वातीताई. नवरा असले काय काय प्रकार करतो तुझ्यासाठी!!
सह्हीये! नवर्‍याचे अभिनंदन! आणि अ‍ॅनिवर्सरीसाठी दोघांचे अभिष्टचिंतन! :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

पर्नल नेने मराठे's picture

26 Dec 2009 - 10:49 am | पर्नल नेने मराठे

+१
मजा आहे बाई तुझी स्वातीताई. नवरा असले काय काय प्रकार करतो तुझ्यासाठी!!

अ‍ॅनिवर्सरीसाठी दोघांचे अभिष्टचिंतन!

चुचु

चित्रा's picture

25 Dec 2009 - 8:40 pm | चित्रा

अभिनंदन नवर्‍याचे! अ‍ॅनिव्हर्सरीच्या उशीराने शुभेच्छा!
भारी आहे केक, आयसिंगही छान जमले आहे. त्या गनने डेकोरेशन करणे वरची चित्रे पाहून अगदी सोपे वाटते, पण नसते :( पण हे तर छानच झाले आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Dec 2009 - 8:46 pm | प्रकाश घाटपांडे

वा वा ! केक खायला भेटतो म्हनुन शर्‍हात यायला आवडायच. अजुन बी केक आवडतोच.चॉकलेट केक लई आवडतो!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

टारझन's picture

25 Dec 2009 - 10:39 pm | टारझन

ह्हा ह्हा ह्हा .. अंमळ चिकणा आणि स्वादिश्ट दिसतोय केक्वा :)
अभिनंदन ..

आणि हो .. घाटपांडे काका .. तुम्ही विल्याष्टीक वाले केक खाता का वो ? :)

- साव्काश पाटमांडे

प्रकाश घाटपांडे's picture

26 Dec 2009 - 9:45 am | प्रकाश घाटपांडे

पहिल्या छुट जव्हा स्पाँजी केके खाल्ले तव्हा म्हन्ल ह्या? हे काय नीस्त कापसावानी ? पन मंग चव समजाया लाग्ली. नीस्त तोंडात टाक्ला की इरघाळलाच . मंग खायला बी मोकळ ढाकळ वाटाय लाग्ल. मंग समाज्लो कि टाईट्ट केका पेक्षा हेच बर!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

25 Dec 2009 - 8:55 pm | विकास

एकदम मस्तच आणि tempting दिसतोय केक! :-)

(बाकी एक विनंती: असे काही नवर्‍याने केले तर येथे असे जाहीर सांगत जाऊ नका. उगाच भलत्या अपेक्षा इतरांच्या डोक्यात आल्या तर? उगाच आम्हाला ऐकावे लागेल, "बघा..." );)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

धमाल मुलगा's picture

25 Dec 2009 - 9:16 pm | धमाल मुलगा

स्वाक्षरी सोडुन विकासरावांच्या संपुर्ण प्रतिसादाशी सहमत ;)

शाहरुख's picture

25 Dec 2009 - 9:18 pm | शाहरुख

स्वाक्षरी आणि कंसातले वाक्य सोडुन विकासरावांच्या संपुर्ण प्रतिसादाशी सहमत :-)

निमीत्त मात्र's picture

26 Dec 2009 - 1:40 am | निमीत्त मात्र

स्वाक्षरी, कंसातले वाक्य आणि इंग्रजी शब्दाचा वापर सोडुन विकासरावांच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. :)

संदीप चित्रे's picture

28 Dec 2009 - 8:19 am | संदीप चित्रे

धम्यासारखेच म्हणतो :)

चतुरंग's picture

25 Dec 2009 - 11:27 pm | चतुरंग

स्वातीताई तुमच्या "ह्यांचे" केकबद्दल आणि तुम्हा दोघांचे अ‍ॅनिवर्सरी बद्दल जोरदार अभिनंदन! =D>
केक मस्तच झाला असणार एकदम स्पाँजी दिसतोय!! :)
(त्या स्लाईसकडे बघून पोटात 'केकावली' सुरु झाली! ;) )

चतुरंग

दशानन's picture

26 Dec 2009 - 8:39 am | दशानन

चतुरंगाशी १००% सहमत.

असा प्रतिसाद मला लिहावयास कधी जमणार आहे काय माहीत ;)

असो,
केक छान दिसत आहे.

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

स्वाती राजेश's picture

26 Dec 2009 - 3:11 am | स्वाती राजेश

केक मस्त झालेला आहे.... दिसायला तरी...जस्ट जोकींग...
सिंपल पण छान आयसिंग केले आहे...

सुबक ठेंगणी's picture

26 Dec 2009 - 6:59 am | सुबक ठेंगणी

मस्तच झालाय केक! आता रेसिपीपण दे नां!
>:)

विनायक प्रभू's picture

26 Dec 2009 - 8:06 am | विनायक प्रभू

सैतानाचे.

sneharani's picture

26 Dec 2009 - 11:23 am | sneharani

मस्त झालाय केक..!

सौरभ.बोंगाळे's picture

26 Dec 2009 - 11:58 am | सौरभ.बोंगाळे

वाह वाह... झक्कास... रेसिपी पण सांगा

प्रभो's picture

26 Dec 2009 - 12:07 pm | प्रभो

स्वातीतै लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!!!

केक दिसतोय मस्त...खायला कधी बोलावताय???

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

परिकथेतील राजकुमार's picture

26 Dec 2009 - 3:28 pm | परिकथेतील राजकुमार

अ प्र ती म !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

केक मस्तच दिसतोय !!! :)
हौसेला मोल नाही...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

माधुरी दिक्षित's picture

26 Dec 2009 - 5:48 pm | माधुरी दिक्षित

स्वाती२'s picture

27 Dec 2009 - 1:24 am | स्वाती२

शुभेच्छा आणि प्रतिसादांबद्दल धन्यवाद!