नकोसे वाटते

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
14 Nov 2009 - 1:27 pm

पौर्णिमेला चांदणे देणे नकोसे वाटते
कोकिळालाही नवे गाणे नकोसे वाटते

देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले
आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते?

कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे"
मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते?

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या
त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते

झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी?
संकटांना एकटे येणे नकोसे वाटते!

गझल

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

14 Nov 2009 - 1:29 pm | मदनबाण

देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले
आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते?

मस्तच...
सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

व्वा... :)

मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

jaypal's picture

14 Nov 2009 - 1:37 pm | jaypal

"सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"
एकंदरीत जब-या.
(कसं सुचतंब्वा तुम्हांला )
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

नेहमी आनंदी's picture

14 Nov 2009 - 1:44 pm | नेहमी आनंदी

झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी?
संकटांना एकटे येणे नकोसे वाटते!

फारच छान.... =D> =D>

पर्नल नेने मराठे's picture

14 Nov 2009 - 1:54 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म्म
चुचु

ऋषिकेश's picture

14 Nov 2009 - 2:37 pm | ऋषिकेश

कोणता शेर आवडला असे विचारले तर अख्खी गझलच द्यावी लागेल. मस्तच गझल.. खूप आवडली

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

सुबक ठेंगणी's picture

18 Nov 2009 - 8:38 am | सुबक ठेंगणी

खरंच कशा सुचतात तुला इतक्या छान ओळी??
सावलीची कल्पना तर =D>

परिकथेतील राजकुमार's picture

14 Nov 2009 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

क्या बात है ! अप्रतिम !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सुधीर काळे's picture

14 Nov 2009 - 3:08 pm | सुधीर काळे

गद्य लिहिणे एक गोष्ट, पण इतकी सुंदर कविता? तीही इतकी वृत्तबद्ध? राम, राम! किंवा लाहोल बिलाकुवत (क्रांतीताईंना ही अभिव्यक्ती कदाचित जास्त आवडेल!)
आपुनको आताइच नहीं|
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

अवलिया's picture

14 Nov 2009 - 3:15 pm | अवलिया

जबरदस्त ! अप्रतिम !!

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

गणपा's picture

14 Nov 2009 - 3:29 pm | गणपा

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

मस्तचं..

अनिल हटेला's picture

14 Nov 2009 - 7:10 pm | अनिल हटेला

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!

नेहेमीप्रमाणेच सुरेख !!:-)

बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

प्राजु's picture

14 Nov 2009 - 8:23 pm | प्राजु

क्रांती तुझ्या कविता नेहमीच मनाचा ठाव घेतात.

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

हे उच्च!!

- प्राजक्ता
http://www.praaju.com/

वेताळ's picture

14 Nov 2009 - 8:30 pm | वेताळ

झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी?
संकटांना एकटे येणे नकोसे वाटते!

हे मात्र एकदम पटले.......

वेताळ

भाग्यश्री कुलकर्णी's picture

15 Nov 2009 - 7:57 am | भाग्यश्री कुलकर्णी

छानच आहे.

लवंगी's picture

15 Nov 2009 - 11:40 pm | लवंगी

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

हे विशेष आवडले.. :)

श्रावण मोडक's picture

15 Nov 2009 - 10:24 am | श्रावण मोडक

सावलीची कल्पना सरस! कविता नेहमीसारखीच...

मनीषा's picture

15 Nov 2009 - 12:33 pm | मनीषा

सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या
त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते
हे खूप आवडले

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Nov 2009 - 10:10 am | llपुण्याचे पेशवेll

नेहेमीप्रमाणेच छान कविता. पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

फ्रॅक्चर बंड्या's picture

17 Nov 2009 - 1:42 pm | फ्रॅक्चर बंड्या

फारच छान आहे गझल

पॅपिलॉन's picture

17 Nov 2009 - 2:59 pm | पॅपिलॉन

सुंदर कल्पना आणि कल्पनाविस्तार.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

चतुरंग's picture

17 Nov 2009 - 11:04 pm | चतुरंग

बरेच दिवसांनी तुमची सुरेख गजल!

देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले
आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते?

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

तसे सर्वच आवडले पण त्यातही हे दोन शेर विशेष वाटले! :)

चतुरंग