अरे, झाला पराभव शिवसेनेचा त्यात काय?
निवडणुकीच्या आखाड्यात कमी जागा मिळुन सत्तेची संधी हुकली असेल. याचा अर्थ सेना संपली म्हणून अर्ध्या हळकूंडाने पिवळे होऊन अगदी राजकीय निरिक्षकांपासून, पत्रकारांपर्यंत अनेक पत्रपंडीतांचा सद्या बाजारात सुळसुळाट झाला आहे. असो.
रा॑जकारणच ते... निवडणूक म्हटल्यावर हार-जीत आहेच. आणि पराभव शिवसेनेला काही नविन नाही. असे अनेक पराभव आणी संकट झेलून, तावून सुलाखूनच शिवसैनिकांनी सेना वाढवली आहे.
पुर्वी अस म्हणत की मराठे युध्दात जिंकतात आणी तहात हरतात.. तशीच काहीशी स्थिती आहे शिवसैनिकांची ... रणांगणात जिंकतात पण निवडणूकीत हरतात... शिवकालापासून मराठ्यांचा पराभव हा मराठ्यांनीच केला, परकियांनी नाही हा इतिहास आहे आणि त्याचीच पुनुराव्रुत्ती महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात झाली.. वेगळे ते काय? शिवसेनेच्या पराभवाच्या शल्यापेक्षा आपल्याच माणसांनी सेना संपवण्याचा जो विडा उचलला आहे याचे दु:ख शिवसैनिकाला जास्त झाले आहे. पण शिवसेना संपवण्याचे दिवास्वप्न या दिवाभीतांनी पाहू नये... शिवसेनाप्रमुखांच्या इशार्याने शिवसैनिक पुन्हा एकदा नव्याने सज्ज होऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेईल.
काही अंदाज चुकल्यांमुळे, आपल्याच माणसांनी घात केल्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात पराभव झाला आहे हे मान्य, पण शिवसेना संपली म्हणुन कोल्हेकूई सध्या सुरू आहे त्याबद्दल कीव वाटते म्हणुन हा पत्रप्रपंच. (हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा.. वाघ एकला राजा .. बाकी खेळ माकडांचा)
आघाडी सरकारास / मनसैनिक नवनिर्वाचीत आमदारांस विधानसभेत /व राजसाहेबांना रस्त्यावरील कामगीरीकरीता (विधानसभेत आमदार आणी रस्त्यावर मी अशा प्रतिक्रियेनंतर) मनपुर्वःक शुभेच्छा...
प्रतिक्रिया
27 Oct 2009 - 11:41 am | विसोबा खेचर
अगदी! परंतु उद्धवने तो परभव मोकळेपणाने मान्य केला असता तर बरे झाले असते!
नक्कीच! परंतु ते सेनाप्रमुखांचेच काम आहे. कार्यकारी अध्यक्षांच्या हाकेत ते बळ नाही आणि नव्हते इतुकेच आमचे म्हणणे!
आमच्याही शुभेच्छा!
जय मनसे!
तात्या.
28 Oct 2009 - 1:39 am | अडाणि
सहमत आहे.
तरीसुध्धा शिवसेनेचा पराभव वैगेरे जरा जास्त होते. ज्यांच्या ४४ जागा निवडून आल्या त्यांचा पराभव कसा काय? लेखातील मुळ मुद्दा (निवडणूक म्हटल्यावर हार-जीत आहेच) पटला.
-
अफाट जगातील एक अडाणि.
28 Oct 2009 - 2:04 am | अक्षय पुर्णपात्रे
तात्यांशी सहमत.
27 Oct 2009 - 11:46 am | लबाड लांडगा
मनमोहन्सिंगासारखे शांत चित्ताने काम करा.मग घसा फोडून भाषणे न देताच सत्तेवर याल.
लबाड
27 Oct 2009 - 7:41 pm | सुधीर काळे
छे, छे, असे गपचुप बसूनही सत्तेवर यायला योग्य कुळी जन्मलेला/ली किंवा योग्य कुळी लग्न झालेला/ली एक पपेटियर 'वर' असावा/वी लागतो/ते. तो/ती असला/ली कीं बाकीच्यांनी गप्पच बसायचे असते कारण जो बोलेल त्याची दोरी (किंवा पत्ता) कापली/ला जाते/तो.
तरी मनमोहनसिंगाचे उदाहरण नजरेसमोर ठेऊन कुणीही चालू नये!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
27 Oct 2009 - 10:29 pm | अडाणि
हे काय तुम्हाला मनोहर जोशींनी सांगीतले काय खाजगीत ?
घरावर दगडफेक झाल्यावर टिव्ही वर कश्यानुश्या तोंडाने ' आमचे कार्याध्याक्ष निर्णय घेतील ' असे सांगताना पाहिल्याचे आठवतय. बघण्यासारखा झाला होता चेहरा.
-
अफाट जगातील एक अडाणि.
27 Oct 2009 - 10:47 pm | लबाड लांडगा
हा माणूस मुख्यमंत्री झाला होता तेव्हा ह्याला साहेबांच्या गरजेनुसार ऐकू यायचे.पाणी प्यायचे झाले तरी 'साहेब पाणी पिऊ का?" असे विचारायचा म्हणे.सेनेचे ईतर मंत्रीपण काँग्रेस्वावाले पण लाजतील अशी चाटुगिरी मातोश्रीवर करायचे.
लबाड
27 Oct 2009 - 10:48 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री लांडगा, चाटूगिरीतर फक्त १० जनपथवर चालते असे श्री नंदन यांना वाटते. मातोश्रीविषयी काही बोलू नका नाहीतर अनामिकातै आणि श्री अधिर लोखंडे मागे लागतील.
27 Oct 2009 - 7:42 pm | सुधीर काळे
छे, छे, असे गपचुप बसूनही सत्तेवर यायला योग्य कुळी जन्मलेला/ली किंवा योग्य कुळी लग्न झालेला/ली एक पपेटियर 'वर' असावा/वी लागतो/ते. तो/ती असला/ली कीं बाकीच्यांनी गप्पच बसायचे असते कारण जो बोलेल त्याची दोरी (किंवा पत्ता) कापली/ला जाते/तो.
तरी मनमोहनसिंगाचे उदाहरण नजरेसमोर ठेऊन कुणीही चालू नये!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
27 Oct 2009 - 8:11 pm | लबाड लांडगा
काळे साहेब,सिंग पाच वर्षाहून अधिक वर्षे पंतप्रधान आहेत.तुम्हाला मोठा टिळा लावणारे,हातात चार चार आंगठ्या घालणारे,तोंडात शिव्या असणारे,गावाकडे करोडोची जमीन विकत घेतलेले लोकप्रतिनिधीच आवडतात असे दिसते.असो ,आपली आवड.
लबाड
27 Oct 2009 - 11:08 pm | सुधीर काळे
तसे नाही हो! मनमोहन सिंग हे रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते ते ठीक. नंतर अर्थमंत्री झाले. पण परप्रकाशित. त्यावेळीही स्वयंप्रकाशित होते नरसिंह राव. आता तर प्रधानमंत्री म्हणून पाच वर्षें होते, पण परप्रकाशितच!
जिथे दिव्यत्वाची प्रचीती येईल तिथे हात जरूर जोडावे. पण मनमोहनसिंगांबद्दल मला असे कधीच वाटले नाहीं. ते अर्थतज्ञ आहेत. बस्स. तिथेच मी रेघ ओढतो.
बाकीचे सर्व त्यांना जे मिळाले ते आज्ञाधारकपणामुळे. मला तर ते एकाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे वटतात. आता "योग्य वेळ" येताच प्रकृती-अस्वास्थ्याचे कारण देऊन बाजूला होतील.
मागे नटवरसिंग म्हणाले होते ते अगदी खरे आहे. आतापर्यंत मनमोहनसिंगांनी साधी म्युनिसिपालिटीची निवडणूकही जिंकून दाखविलेली नाहीं. नेहमी ते आसाममधून (हो, आसाममधून) राज्यसभेवर निवडून येतात (सॉरी, आणले जातात).
भला माणूस, पण त्यांच्यात "उदो-उदो करण्यासारखे" राजकीय नेतृत्व कुठे आहे?
ही माझी वैयक्तिक मते आहेत. अनेकांना पटणार नाहींत याची जाणीव आहे.
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
28 Oct 2009 - 1:27 am | अडाणि
काळे साहेब, तुम्हाला भट्ट्यांतील आग बघून बाकी लोकांचा प्रकाश दिसत नसावा !!!
मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना - शेअर घोटाळ्याची नैतीक जबाबदारी घेवून - त्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा अश्या व्यक्तीला बाहूली म्हणणे हे डोळ्याला झापडे बांधल्याचे लक्षण आहे.
मनमोहन सिंग यांनी त्यांचे राजकीय नेतॄत्व मागील वर्षभरात वादातीत सिध्ध केलेले आहे ( अणु-करार, नवीन मंत्रिमंडळ खातेवाटप ह्याचा थोडा अभ्यास करावा...)
-
अफाट जगातील एक अडाणि.
28 Oct 2009 - 1:35 am | निमीत्त मात्र
काळे काकांचे उर्दू शेरोशायरी तसेच लोह भट्ट्या ह्यावरचे लेखन मस्त असले तरी इतर विभागातले त्यांचे ज्ञान कच्चे आए असे मला वाटते.
28 Oct 2009 - 8:15 am | सुधीर काळे
ते चांगले ज्ञानी अर्थतज्ञ आहेत. सज्जनही आहेत म्हणून त्यांनी राजीनामा दिलाही असेल. (मला ही घटना आठवत नाहीं, पण माणूस सज्जन आहे तेंव्हा दिलाही असेल.) आज्ञाधारक आहेत. जास्त महत्वाकांक्षी नाहींत कारण महत्वाकांक्षी माणसाला पपेटियरने असे "नेमलेच" नसते. ते 'निवडून आलेले' प्रधानमंत्री नसून 'नेमलेले' प्रधानमंत्री आहेत. आजवर त्यांनी कुठली निवडणूक जिंकली आहे कीं प्रधानमंत्रीपदी 'निवडून' येतील. पहिल्यापासून "एक चांगला अर्थतज्ञ आपल्या पक्षात असावा" म्हणून त्यांना राज्यसभेवर निवडून आणले जाते. आणि ते चांगले अर्थतज्ञ आहेत याबद्दल कुणाचेच दुमत असणार नाहीं!
"या आता!" असं पपेटियरने म्हटल्याबरोबर ते बाजूला होतील. आणि त्यांच्याबद्दलची अशी खात्री ही त्यांच्या नेमणुकीमागचे मोठे कारण आहे.
जेराल्ड फोर्ड ज्या निकषावर राष्ट्रपती म्हणून निवडले गेले त्यातले बरेच गुण सिंगांच्यात आहेत. तेही यशस्वी झालेच व जिमी कार्टरना जवळ-जवळ हरवलेच होते त्यांनी!
पण राजकीय नेतृत्व कुठे आहे? त्यांचे गेल्या वर्षातले 'यश' हे खरे तर त्यांचे यश नसून भाजपचे अपयश आहे.
हे माझे प्रमाणिक मत आहे आणि कुणी कांहीं वेडंवाकडं लिहिल्याने ते कसे बदलेल? भट्टी काय आणि उर्दू शायरी काय किंवा माझ्या वाचनाची प्रगल्भता काय? मुद्दे संपले की असे होते.
असो. मी आधीच म्हटले होते की माझे मत बर्याच लोकांना पटणार नाहीं. मग आश्चर्य कसले?
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
28 Oct 2009 - 10:01 pm | अडाणि
हा निर्ष्कश आपण कसा काढलात ते जरा बैजवार सांगीतले तर बरे होइल..
राज्यसभेवरून जरी आले तरी ते निवडूनच आलेले असतात, ज्या अर्थे आपल्या घटनेत पहिल्यापासून अशी तरतूद आहे (ज्याने राज्यसभेवरील संसद सदस्य पंतप्रधान बनू शकतात) त्यामुळे त्यात वावगे ते काय ? (अरूण जेटली जे ईतके दिवस बाशिंग बांधून बसले आहेत त्यांच्या बद्दल तुमचे काय मत आहे ?)
जर प्रचंड बहुमताने लोकसभेला विजयी होणार्यासच पंतप्रधान करायचे असेल तर शरद पवारांना पाठींबा देवून टाका बघू <:P
पक्षीय राजकारणाचा पगडा बाजूला केला तर दिसेल. अणु करारा साठी स प ला तयार करणे, नवीन मंत्रीमंडळात त्यांना हवे तसे कितीतरी बदल त्यांनी करून घेतलेले आहेत.
बाकी, माझ्या वरील वाक्याने आपणास जो त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहे. (थोडे विनोदी वाक्य सुचले म्हणून लिहीले ). आपल्या बद्दल आणि आपल्या मता बद्दल आदर आहेच, तरीही आपल्या "वाचनाची प्रगल्भता" याबद्दल ईथे कुठे उल्लेख झालेला दिसला नाही.
-
अफाट जगातील एक अडाणि.
28 Oct 2009 - 10:50 pm | सुधीर काळे
सर्वात प्रथम हे सांगतो कीं पक्षीय राजकारणाचा व माझ्या म.मो.सिं. याच्याबद्दलच्या मतांचा काहींहीं संबंध नाहीं. शिवसेनेला मी महाराष्ट्रापुरती मर्यादित शक्ती मानतो त्यामुळे MMS यांच्याशी तूलनाही करत नाहीं.
१. MMS हे एक शीख आहेत. त्यांच्या तोंडून "राष्ट्रीय संपत्तीवर अल्पसंख्यांकांना अग्रक्रम (priority) दिला पाहिजे" असे वाक्य येऊच शकत नाहींत. ते त्यांना कुणीतरी म्हणायची आज्ञा दिली होती असे माझे स्पष्ट मत आहे. म्हणून मी त्यांना आज्ञाधारक म्हणतो. हे त्यांचं वागणं "जो हुकम" छाप वाटतं. हा एक पुरावा मला समजला तसा दिला. पटला तर घ्या नाही तर सोडून द्या. कारण या विधानावर वाद घालता येईल. अशी इतरही उदाहरणे आहेत, पण सध्या हे उदाहरण पुरे. लागली तर सांगेन.
२. जो एक साधी निवडणूक लढविण्याची हिम्मत करू शकत नाहीं तो कसला नेता? मला आपली राज्यघटना काय म्हणते ते माहीत आहे. पुढच्या दरवाजाने न येता ते एका मागील दरवाजाने आले हेही मला माहीत आहे. यायची मुभा आहे हेही मला माहीत आहे. पण देशाच्या पंतप्रधानाने असे चोरून येऊ नये असे मला वाटते. बरं, आले तर आले, पण पंजाब किंवा दिल्लीहून नाहीं तर आसाममधून. मध्यंतरी याबद्दल कांही वैधानिक प्रश्न उपस्थित झाले होते, पण बाहेरदेशी असल्यामुळे माझा हा धागा कुठेतरी तुटला.
आपल्या देशाच्या पंतप्रधानाने निवडणूक जिंकून देशाचे नेतृत्व करणे ही नैतिक गरज आहे असे मला वाटते. संविधानाची गोष्ट मला माहीत आहे. असे राज्यसभेतून हळूच आत येणे पंतप्रधानाच्या पदाला शोभत नाहीं.
३. अरूण जेटलींबद्दल एक विद्वान व जाणकार माणूस असेच मत आहे. भाजप नेतृत्वाच्या नव्या पिढीत मोदी व सुषमा स्वराज यांच्यासह मी त्यांना मोजतो. पण पंतप्रधान व्हायचे असेल तर त्यांनीही लोकसभेची निवडणूक जिंकूनच त्या पदावर दावा सांगावा असे वेळ येईल तेंव्हा मी म्हणेनच.
४. अणूकराराबद्दल म्हणाल तर त्याचा श्रीगणेशा भाजपच्या कारकीर्दीतच झाला होता, पण २००४ साली ते हरले व मग तो MMS यांनी घेतला. तो झाला कारण अमेरिकेला तो हवा होता म्हणून. चीनबरोबर परस्पर लढायला आपल्याला वापरायचा अमेरिका नक्की प्रयत्न करीत आहे. कम्युनिस्टांनी या कारणासाठीच ("बोलविता धनी" चीनच्या सांगण्यावरून) तो करार जवळ-जवळ एक वर्षाने रखडवला त्यात MMS यांचे "नेतृत्व" खूप प्रकर्षाने पाहिले. कां त्यांनी असे होऊ दिले? जी भूमिका एक वर्षानंतर घेतली ती लगेच कां घेतली नाहीं? भाजपनेही लुटपुटीचा विरोध केला कारण त्यांना त्यांचा करार दुसर्याने घेतला असे वाटले असावे. पण तो लटका असल्याने त्यानी ताणून धरले नाहीं. कम्युनिस्टांचा हा देशद्रोही पवित्रा हे त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे एक कारण आहे.
५. अप्रगल्भ वाचनाबद्दलचा माझा शेरा आणखी एका विद्वान गृहस्थांनी मला "भट्टी व शायरीपलीकडचं कांहीं कळत नाहीं" अशा अर्थाचं एक विधान केलं होतं त्याला उद्देशून होता. ते विधान तुम्ही केले होते की कुणी दुसर्याने ते पहावे लागेल. पण ज्याने केले त्याला उद्देशून तो शेरा होता.
६. माझ्या मतांना खोडून काढताना त्यांना cynic म्हणायचा मोह होईल तो टाळावा ही विनंती. कारण माझ्या मतांत cynicism नाहीये! जरा डोके शांत ठेवून विचार केल्यास आपल्यालाही माझे म्हणणे पटेल असे वाटते. MMS यांनी आणलेला अणूकराराचा 'मंगलकलश' व यशवंतरावांनी आणलेला संयुक्त महाराष्ट्राचा 'मंगलकलश' यात फारसा फरक नाहीं. एकीकडे खरे author BJP चे नेते होते तर दुसरीकडे आचार्य अत्रे यांच्यासारखे भाग्यविधाते होते. उगीच शेवटचा lap कोण पळाला यावर कुणी चुकीच्या माणसाला क्रेडिट देऊ नये. बघा किती पटते व किती पटत नाहीं.
यापेक्षा जास्त पटवून देऊ इच्छित नाहीं.
सुधीर काळे
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
28 Oct 2009 - 1:38 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री काळे फारच चांगल्या माणसाचा दाखला दिला तुम्ही. बाकी श्री अडाणि यांच्याशी सहमत आहे.
28 Oct 2009 - 8:19 am | सुधीर काळे
मी त्यांचा दाखला दिला नाहीं, दाखला देण्याच्या लायकीचे ते नाहींतच. मी त्यांचे फक्त एक वक्तव्य लिहिले जे खरे आहे!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
28 Oct 2009 - 8:24 am | सुधीर काळे
मी त्यांचा दाखला दिला नाहीं, दाखला देण्याच्या लायकीचे ते नाहींतच. मी त्यांचे फक्त एक वक्तव्य लिहिले जे खरे आहे!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
27 Oct 2009 - 11:47 am | लबाड लांडगा
मनमोहन्सिंगासारखे शांत चित्ताने काम करा.मग घसा फोडून भाषणे न देताच सत्तेवर याल.
लबाड
28 Oct 2009 - 12:44 pm | वेताळ
मनमोहनांना पंतप्रधान करायला सोनिया व राहुल ने काय काय घसा फोड केली विसरला काय?
बाजारात बोलण्यार्याचाच माल विकला जातो. न बोलणार्याच्या तुरी पण कोणी घेत नाही.
वेताळ
27 Oct 2009 - 11:51 am | sneharani
अरे, झाला पराभव शिवसेनेचा त्यात काय?
त्यात काय म्हण्जे ..... परत पाच वर्ष विरोधी नेतेपद घ्यायच.
पाच वर्ष .... थोडा कालावधी नाहीये.
त्यात निवडुन येण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात.
अन् प्रत्येक उमेदवार आपल्यापरीने शक्य होइल तेवढे प्रयत्न करतो.
/ मनसैनिक नवनिर्वाचीत आमदारांस विधानसभेत /व राजसाहेबांना रस्त्यावरील कामगीरीकरीता (विधानसभेत आमदार आणी रस्त्यावर मी अशा प्रतिक्रियेनंतर) मनपुर्वःक शुभेच्छा...
हो आमच्याही शुभेच्छा
27 Oct 2009 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>रा॑जकारणच ते... निवडणूक म्हटल्यावर हार-जीत आहेच. आणि पराभव शिवसेनेला काही नविन नाही.
सहमत आहे. कालची पत्रकार परिषद जर आपण पाहिली असेल तर, जो काही एका पक्षाचा नेता म्हणून विचारांचा प्रौढपणा लागतो, तो दिसलाच नाही. ''शिवसेनेची हार झालेले नाही;फक्त आम्हाला अपेक्षीत यश मिळाले नाही'' च्या ऐवजी आम्ही निवडणूकी हरलो, असे स्पष्ट म्हटले तर उरले सुरले शिवसैनिक काही मनसेत जाणार नाही.
दुसरी गोष्ट चार दिवस मौन सोडायला लागले. त्याचे कारण म्हणाले की, 'एकदा सर्वांना बोलू द्यावे आणि आपण नंतर बोलावे' छ्या, अहो, तुमच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. हे आता लोकांना कळते हो. उगाच सोंग करण्यात काय अर्थ आहे.
अरे हो, राज ठाकरेंना मुलाखतीत एक प्रश्न विचारला की, विधानसभेत मराठी माणसाच्या हिताचा एखादा प्रश्न शिवसेनेने लावून धरला तर पाठींबा देणार काय ? याला 'हो' असे उत्तर राज ठाकरेंनी दिले. त्याच उत्तरासाठी उद्धव साहेबांनी बराच वेळ घेतला.
असो, शिवसेनेला भरारी घेण्यासाठी शुभेच्छा...!!!
अवांतर : कंटाळा आला राव राज ठाकरे विरुद्ध उद्धव सेना लढतीच्या बातम्या वाचून-वाचून. अजून अनामिका तै यायच्या या चर्चेत सहभागी व्हायला. तिकडे उद्धव लढतो आणि इकडे अनामिका तै :) [ह.घे]
-दिलीप बिरुटे
(राष्ट्रवादीकडून मनसेकडे चाललेला)
27 Oct 2009 - 12:06 pm | शेखर
>> (राष्ट्रवादीकडून मनसेकडे चाललेला)
सर तुम्ही चाललाच आहात तर राष्ट्रवादी का़कांच्या पुतण्याला पण घेऊन जा.. त्याचे पण पंख कापले आहेत ले़की साठी.... तो पण ऊत्सुक असेल ( पुतणे पुनर्वसन सेना काढतील दोघे मिळुन)
शेखर....
27 Oct 2009 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>सर तुम्ही चाललाच आहात
आम्ही नौकरी करतो त्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनात रॉकाशी संबंधीत काही विद्यमान आमदार असल्यामुळे आम्ही मनसेत जाण्याबाबत विचार करु शकत नाही. मनसेच्या काही भुमिका वयक्तीक आम्हाला पटतात, इतकाच तो संबंध. [छ्या, आपली नौकरी घालवतील मिपावरील मित्रमंडळी ] :)
>>राष्ट्रवादी का़कांच्या पुतण्याला पण घेऊन जा.. त्याचे पण पंख कापले आहेत ले़की साठी
मराठा जातीचं राजकारण असा संदेश गेला असता पुतण्याला उपमुख्यमंत्री केले असते तर, त्या पेक्षा बहुजनसमाजाचा नेता ही प्रतिमा अधिक चांगली, नाही का ? पुतण्याची नाराजी लवकरच दूर केल्या जाईल असे वाटते.
-दिलीप बिरुटे
27 Oct 2009 - 8:14 pm | सुधीर काळे
पुतणे पुनर्वसन सेना? हाहाहा! वंडरगुड!! (प्रथम 'पुतणे'ऐवजी 'पूतना'च वाचला तो शब्द मी. वयाचा दोष, दुसरे काय?)
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
27 Oct 2009 - 12:13 pm | विसोबा खेचर
सर, लौकर या. आमच्या मनसेत स्वागत आहे! :)
जय मनसे!
आपला,
(आंतरजालावर बंडखोरी करून मिपा ही 'आंतरजालीय नवनिर्माण सेना' - 'आन'से! स्थापन केलेला) तात्या.
27 Oct 2009 - 12:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(आंतरजालावर बंडखोरी करून मिपाची 'आंतरजालीय नवनिर्माण सेना' - 'आन'से! स्थापन केलेला)
:)
-दिलीप बिरुटे
['आन'सेचा कट्टर कार्यकर्ता]
27 Oct 2009 - 5:11 pm | विशाल कुलकर्णी
आम्ही आपले तात्यांच्या 'आन से' मध्येच राहु म्हणतो.. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
27 Oct 2009 - 12:29 pm | नम्रता राणे
तात्यानू
तुमच्या राजसाहेबांनी गणेश नाईक, नारायण राणे यांच्या विरोधात उमेदवार उभे का केले नाहीत.
नाईक बंधूनी 'सुपारी' फोडल्याबद्दल आभार मानायला 'भेट'ही घेतली.
अनामिकाताई अजून गप्प का? सुधिर काळे काका रव्हले खय?
27 Oct 2009 - 12:46 pm | अमोल केळकर
गणेश नाईकांविरुध्द मनसेचे पप्पू महाले हे बेलापूर मतदार संघात उभे होते आणी त्यांना ३ नंबरची मते मिळाली आहेत ( आणि ज्यामुळे भाजपच्या हावरेंचा पराभव झाला आहे . ;) ) असो
( बेलापूरचा मतदार ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
27 Oct 2009 - 1:00 pm | टारझन
हेच गणेश नाईक .. आमच्या फ्लॅट वर काही पंजाबी लोकं घेउन "काँग्रेस को ही वोट दो" असं ओरडत आले होते... त्यांना म्हंटलं .. आम्ही मराठी माणसाला मत देणार .. तेंव्हा तडक ते मागुन कुठून तरी पळत आले .. आणि म्हणाले .. मी पण मराठी .. मी पण मराठी ... त्यावर आम्ही हॅहॅहॅ करून उत्तर दिले की आम्ही पुण्याला रहातो .. इथे फक्त नोकरी निमीत्त रहातो :)
चेहरा पहाण्यासारखा झाला होता .. त्या पंजाब्यांना काही कळ्ळंच नव्हतं !!
-- टाराज ठाकरे
(अध्यक्ष, मिसळपाव नवनिर्माण सेणा )
27 Oct 2009 - 1:23 pm | प्रभो
=))
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
27 Oct 2009 - 1:25 pm | पर्नल नेने मराठे
=))
चुचु
(धडाडीची कार्यकर्ती , मिसळपाव नवनिर्माण सेणा )
27 Oct 2009 - 3:31 pm | llपुण्याचे पेशवेll
=)) =)) हाण्ण च्या मारी. :) झक्कास.
नाराज ठाकरे
(मिसळपाव णवणिर्माण सेणा)
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
27 Oct 2009 - 12:54 pm | ज्ञानेश...
पुर्वी अस म्हणत की मराठे युध्दात जिंकतात आणी तहात हरतात.. तशीच काहीशी स्थिती आहे शिवसैनिकांची ... रणांगणात जिंकतात पण निवडणूकीत हरतात..
रणांगणात जिंकतात, म्हणजे नक्की कुठे जिंकतात? प्रचारात?
"Great Power Comes With Great Responsibilities"
27 Oct 2009 - 2:04 pm | भडकमकर मास्तर
मराठी माणसांनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असे वाक्य अग्रलेखात वाचून मजा आली....
... म्हणजे ४४ आमदार काय अमराठी लोकांनी निवडून दिले काय?.....
_____________________________
28 Oct 2009 - 1:27 pm | नम्रता राणे
हि मराठी माणसे म्हणजे.. भुजबळ, राणे, सरवणकर, परब, दरेकर आणी स्वतः राज ठाकरे... मराठी मतदार नव्हे.
27 Oct 2009 - 3:25 pm | अमोल केळकर
' .. वाघ एकला राजा .. बाकी खेळ माकडांचा '
सद्य स्थितीत हे वाक्य एकदम चपखल बसते आहे.
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
27 Oct 2009 - 3:49 pm | लबाड लांडगा
सेनावाल्यांनी काही पथ्ये पाळणे आम्हाला जरुरीचे वाटते.
क्)अल्पसंख्यांकांच्या नावाने शिमगा करणे आता सोडा.महा.चे मूळ प्रश्न गरीबी,रोजगार,बेसुमार लोकसंख्या आहे हे लक्षात ठेवा.
ख्)हिटलरवर प्रेम करत असाल तर ते घरातच ठेवा. जगाला बोंबलुन सांगायची गरज नाही.
ग)गांधींबद्दल जरा आदराने बोलायला शिका.ओबामाकडून काही शिका.
घ्)सामाजिक क्षेत्रात काम करणार्या स्त्रियांबद्दल आदराने लिहा. टेस्टा सेटलवाड्,मेधा पाटकर्,रॉय ह्यांना सटवी/महामाया वगैरे शेलकी विशेषणे लावून स्वतःची मते कमी करु नका.(होय की नाही अनामिकाताई?)
च)उठ्सुठ देशभक्ती सिद्ध करण्यासाठी दुसर्यांचा तोंडाला काळे फासण्याचा वे***पणा करु नका.
काँग्रेस्वाल्यांनी तुम्हाला बरेच मोकळे रान दिले होते. मनसेमुळे आता चेक बसला ते बरे झाले.
आपलाच,
लबाड
27 Oct 2009 - 11:48 pm | हुप्प्या
>>क्)अल्पसंख्यांकांच्या नावाने शिमगा करणे आता सोडा.महा.चे मूळ प्रश्न गरीबी,रोजगार,बेसुमार लोकसंख्या आहे हे लक्षात ठेवा.
<<
पाकड्यांनी स्थानिक धर्मपिसाटांना हाताशी धरून २६/११ सारखे हल्ले, १९९२ सारखे बॉंब फोडले, संसदेवर हल्ले केले तरी इस्लाम म्हणजे शांती अशी जपमाळ ओढा. संताप व्यक्त करू नका. आपले सरकार कडक निषेध खलिते पाठवते आहेच. काळजी नसावी. खट्याळ पाकी बंधू ह्या निषेधाला घाबरून चळाचळा कापत आहेत अशी खात्री बाळगावी.
मनःशांतीकरता सूतकताई करा. ईश्वर अल्ला तेरो नाम वगैरे सर्वधर्मसमभावाची गाणी म्हणा.
>>ग)गांधींबद्दल जरा आदराने बोलायला शिका.ओबामाकडून काही शिका.
म्हणा दुरून डोंगर साजरे. हिमालयाइतक्या चुका करणार्या इसमाचे कौतुक करायचे म्हणजे तो हजारो दूर मैल दूर असलेलाच बरा! ज्याचे जळते त्यालाच कळते ही अजून एक म्हण इथे लागू पडते.
>>
घ्)सामाजिक क्षेत्रात काम करणार्या स्त्रियांबद्दल आदराने लिहा. टेस्टा सेटलवाड्,मेधा पाटकर्,रॉय ह्यांना सटवी/महामाया वगैरे शेलकी विशेषणे लावून स्वतःची मते कमी करु नका.(होय की नाही अनामिकाताई?)
<<
थोडक्यात अजातशत्रू बना. स्वतःची मते मांडू नका. सगळ्यांना छान छान म्हणा. तुमच्यात आणि काँग्रेसच्या पिलावळीत कुणाला काही फरक दिसता कामा नये.
अगदी योग्य सल्ले आहेत.
28 Oct 2009 - 1:34 am | अडाणि
तुमच्या लिखाणावरून तरी 'अजातशत्रू' म्हणजे काय हे तुम्हाला कळलेले दिसत नहीये..
विरोध करायला कुणाचाच विरोध नाहीये. विरोध जरूर करावा पण तो विचारांचा , व्यक्तीचा नव्हे. आणि त्या साठी शिवीगाळ करायची गरज नसते !!! (पण हे बहूतेक आपल्याला माहित नसावे...)
-
अफाट जगातील एक अडाणि.
27 Oct 2009 - 11:51 pm | निमीत्त मात्र
लांडगोबांशी सहमत आहे. मस्त प्रतिसाद.
27 Oct 2009 - 4:19 pm | विकास
निवडणुकीच्या आखाड्यात कमी जागा मिळुन सत्तेची संधी हुकली असेल. याचा अर्थ सेना संपली म्हणून अर्ध्या हळकूंडाने पिवळे होऊन अगदी राजकीय निरिक्षकांपासून, पत्रकारांपर्यंत अनेक पत्रपंडीतांचा सद्या बाजारात सुळसुळाट झाला आहे. असो.
अगदी खरे आहे. हेच पत्रकार इतर कोणी कशाला अगदी काँग्रेसच्या बाबतीतही ह्याच पद्धतीने २००४ पर्यंत म्हणत होते. शेवटी "यशाचे पितृत्व घेयला अनेक असतात, अपयश हे पोरकेच असते". मात्र अशा वेळेस जो अपयशाला तोंड देतो आणि त्यातून सिंहावलोकन करत नवीन धोरणे (स्ट्रॅटेजीज) आखत पुढे जातो तो जिंकतो - मग तो धंदा असुंदेत अथवा राजकारण. पण अजूनतरी "चमत्कार" होण्या ऐवजी "चमत्कारीक" झाल्याने धक्क्यात असलेले शिवसेनेचे नेतृत्व हे आक्रस्ताळेपणा करत आहे तर भाजपाचे "रडीचा डाव" करत ("इव्हीएम मुळे" वगैरे म्हणत) वागत आहे.
जाता जाता आईन्स्टाईन ते क्लिंटनच्या नावावर खपवलेले एक वाक्य आठवते, जे केवळ या संदर्भात पराभुतांनीच नाही तर (पर्याय नसल्याने) जिंकलेल्यांनी पण स्वतःच्या भवितव्यासाठी लक्षात ठेवावे असे आहे:
Insanity (or Stupidity) is doing the same thing over and over again and expecting different results.
27 Oct 2009 - 5:20 pm | विशाल कुलकर्णी
काही म्हणा पण दुर्दैवाने वाघ म्हातारा झालाय आणि छावे आपसातच भांडताहेत हे सत्य आहे. :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
27 Oct 2009 - 8:38 pm | सुधीर काळे
बाळासाहेबांच्याबद्दल आदर आहेच, पण कधी-कधी तो बाजूला ठेवावा लागतो. तसे करून एवढेच सांगतो कीं आता राजाभाऊंना परत शिवसेनेत बोलावले काय किंवा नाहीं बोलावले काय "बूँदसे" गेलेली इज्जत "हौदसे" नाहीं येणार.
रामायणात एक प्रसंग आहे ज्यात भगवान परशुरामांना जाणवतं कीं रामाच्या जन्मानंतर त्यांचे अवतारकार्य संपलं आहे व ते त्यानुसार स्वतःला बाजूला करतात.
मला वाटते कीं बाळासाहेबांनी नुसतं राजाभाऊंना परत बोलावूनच नव्हे तर शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकून स्वतः वानप्रस्थाश्रम स्वीकारावा! बाळासाहेबांनी आपल्या अवतारात अनेक चांगली कामें केली, पण उत्तराधिकारी निवडताना ते सपशेल कमी पडले.
एकच मार्ग! केलेली चूक अनमान न करता दुरुस्त करणे, म्हणजेच राजाभाऊंना शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी देणे, उद्धव यांनी त्यांना मनापासून मदत तरी करावी किंवा त्यांच्या मार्गातून दूर व्हावे कधीही परत न येण्यासाठी. राजाभाऊंच्या पायात पाय मात्र घालू नये!
असे केल्यास बाळासाहेबांची इज्जत त्यांच्या उरलेल्या आयुष्यात व त्यांच्या पश्चातही चिरंतन राहील. एवढेच नव्हे तर या तर्हेच्या खेळी (कट) करणार्या अमराठी किंवा स्यूडो-मराठी लोकांना जो ४०० किलोव्होल्टसचा शॉक बसेल तो सर्वांना वठणीवर आणावयास पुरेसा आहे. मराठी लोक एक होऊ शकतात या पेक्षा मोठा धक्का तो कसला?
बाळासाहेबांचे अवतारकार्य संपले असून त्यांनी ती मशाल राजाभऊंच्या हाती द्यावी असे मला मनापासून वाटते.
यातच बाळासाहेबांना स्वतःला फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा जिवंत करता येईल. शिवसेनेला जीवन आता राजाभाऊच देतील.
असं केलं नाहीं तर कांहीं खरं नाहीं.
सुधीर काळे
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
27 Oct 2009 - 11:03 pm | संजय अभ्यंकर
शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरेंकडे, पर्यायने मनसे व शिवसेनेचे विलिनीकरण कठीण!
इतकी राजकीय प्रगल्भता भारतात? हा केवळ चमत्कार ठरेल.
दुसर्या महायुद्धात ब्रिटनचे नेतृत्व चेंबरलेन कडून चर्चील कडे आले तरी चेंबरलेन चर्चिलच्या सल्लागारांपैकी होते.
अलीकडचे उदाहरणः नेल्सन मंडेलांनी एफ. डब्लू. डी क्लर्कना आपल्या मंत्रिमडळात उपाध्यक्ष बनवले होते. हे क्लर्क साहेब द. अफ्रीकेचे शेवटचे गोरे अध्यक्ष होते.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
27 Oct 2009 - 11:29 pm | विकास
अलीकडचे उदाहरणः नेल्सन मंडेलांनी एफ. डब्लू. डी क्लर्कना आपल्या मंत्रिमडळात उपाध्यक्ष बनवले होते. हे क्लर्क साहेब द. अफ्रीकेचे शेवटचे गोरे अध्यक्ष होते.
हिलरी क्लिंटन ओबामाच्या मंत्रीमंडळात आहेत....
शरद पवार सोनीयांच्या नेतृत्वाखालील पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळात आहेत हे देखील उदाहरण त्यात बसू शकेल कदाचीत. ;)
28 Oct 2009 - 12:40 pm | अनामिका
सुधीरजींशी १०००% सहमत.........
पण असे घडेल अशी आशा करणेच व्यर्थ आहे..........कारण या दोन भावंडांमधिल लढाई हि वर्चस्वाची आहे.......आणि जिथे अहं माणसाला चिकटतो तिथे अश्या प्रकारचे वस्तुस्थितीला अनुसरुन निर्णय घेणे हे अशक्यप्राय होतेच .......बाळासाहेब या घडीला अश्या प्रकारचा कठोर पण अत्यावश्यक निर्णय घेऊ शकले तरच काही तरी घडु शकेल्......बघु काय होतय ते पुढे!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
28 Oct 2009 - 4:47 pm | सुधीर काळे
अनामिका,
तू असंच लिहिशील अशी मला खात्री होती! शिवसेनेबद्दल खरं प्रेम असल्याचंच हे द्योतक आहे.
असं होईल अशीच प्रार्थना प्रत्येक मराठी माणूस करेल.
You made my day!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
28 Oct 2009 - 10:40 pm | शेखर
५० वा प्रतिसाद