गाभा:
मी बारावीत असताना "पर्पल जार' हा इंग्रजीत धडा होता. त्यातील चिमुकली आणि तिचा पर्पल जारसाठीचा हट्ट. हाती पैसा नसल्यामुळे तिच्या आईची तगमग, असा काहीसा या कथेचा विषय आहे.
नवीन अभ्यासक्रमात हा धडा राहिलेला नाही. परंतु तो मला पुन्हा वाचायचा आहे. मी खूप ठिकाणी पुस्तक शोधले; पण निराशा!
ही कथा जालावर मिळू शकेल काय? किंवा कुणाकडे त्या बारावीचे पुस्तक असल्यास ते मला विकत हवे आहे.
फारच सुरेख कथा आहे ती.
प्रतिक्रिया
20 Sep 2009 - 10:54 pm | प्रभो
तुमची १२वी ला इंग्रजी पहिली भाषा होती का तिसरी????
20 Sep 2009 - 11:06 pm | अन्वय
कदाचित दुसरी असावी.
कारण मी हिंदी घेतले नव्हते
20 Sep 2009 - 11:14 pm | मराठीप्रेमी
आपण या कथेबद्धल बोलत आहात का?
http://www.web-books.com/Classics/YoungFolks/Classic/YoungFolks_ClassicC...
http://en.wikipedia.org/wiki/The_Purple_Jar
20 Sep 2009 - 11:51 pm | अन्वय
हो हीच ती कथा.
फारच टची आहे
लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.
श्री. दिनेश यानीही या कथेची लिंक दिली आहेच.
21 Sep 2009 - 12:17 am | प्रभो
मीही वाचीन म्हणतो..एक चांगली कथा सांगितल्याबद्दल धन्यु..
20 Sep 2009 - 11:15 pm | सोनम
पहिली की तिसरी त्याचा इथे काय संबंध???????? :? :?
तुमची १२ ही कधी झाली :? :?
20 Sep 2009 - 11:22 pm | प्रभो
पहिली भाषा इंग्रजी म्हणजे इंग्रजी मिडियम तर तिसरी म्हणजे मराठी मिडियम....
(सगळ्या भाषा तिसर्या असलेला) - प्रभो
21 Sep 2009 - 10:31 am | पाषाणभेद
कथा वाचली. छान आहे. आई मुलीतील संवाद छानच आहे.
मी ही कधी कधी जुनी पाठ्यपुस्तके उघडुन बसतो.
अवांतर: त्या मुलीला तो जार पाहीजे असतो. तिला जास्त गरज बुटांची असते. तिच्या आईला व वडिलांना ते कळत नाही का? मुलीला गोड गोड बोलून बुट घेण्याचाच आग्रह नसता का करता आला? तीची आई शूज विकणार्याशी तिच्या लाकडी बुटांबाबत बोलते. म्हणजेच तीला लाकडी बुट विकत घ्यायचे असतील किंवा दुरूस्त करायचे असतील. ज्या अर्थी ती तिच्या मुलीला "कोणतीही एकच" गोष्ट घ्यायला सांगते त्या अर्थी तीची आई तिचे (आईचे) लाकडी शूज दुरूस्तच करत असणार. म्हणजेच तिच्या कडे तिचे (आईचे) शूज दुरूस्त करायला पैसे आहेत व तिच्या मुलीचे शूज रिपेर करायला पैसे नाहीत किंवा ते रिपेर करायची इच्छा नाही.
ती शूज रिपेर पण करून घेवू शकत होती नाही का?
ती मुलगी तिच्या आईला काही प्रश्न विचारते त्यावरून ती अतीशय हुषार व समजूतदार आहे असे दिसते.
त्या जारमध्ये आहे ते केमीकलच आहे व त्याचे झाकण उघडले असता ते काळे होईल असे तो केमिस्ट किंवा तिची आई त्या मुलीला आधीच का पटवून देत नाही?
तिचे वडील काचेचे घर पहायला त्यामुलीच्या भावाला घेवून जात होते असे कळले. म्हणजे ते अवांतर खर्चच करत होते ना? तेवड्या पैशात तिचे शुज आले असते ना? तिला महिनाभर लंगडत तर नसते चालावे लागले ना?
हा धडा १२ वी ला 'लावायला' नको होता. काय हवे काय नको हे बारावीच्या विद्यार्थांना एवढी अक्कल आलेली असते.
लक्षात घ्या : हि कथा मुलांसाठी प्रसिद्ध झाली. ("The Purple Jar" first appeared in The Parent's Assistant (1796) and reappeared in Rosamond (1801). The Parent's Assistant is the first collection of children's stories by Maria Edgeworth, published by Joseph Johnson in 1796. )
हा धडा ७ ते ९ वी पर्यंत असता तर समजले असते.
एकूणच १२ वी च्या विद्यार्थांची बुद्धी लक्षात घेवून त्या काळी देखील पुस्तक तयार करणारे मंडळ कसे उदासीन होते ते लक्षात येते.
माझा अवांतर प्रतिसाद पुस्तकात पाठ सिलेक्शन मंडळाला उद्देशून आहे हे लक्षात घ्या.
पाठ्यपुस्तक मंडळाला काय लावायचे काय काढायचे ते समजत नाही. आजकालचे उदाहरणे सांगता येईल.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
21 Sep 2009 - 6:21 pm | स्वाती२
माझ्या मते १२ वी च्या मुलांसाठी योग्य धडा. वरवरच्या रंगाला, मोहमयी दुनियेला भुलण्याच वय. want आणि need मधला फरक समजावून सांगूनही पटत नाही अशावेळी अनुभवाने आलेले शहाणपणच उपयोगी पडते.
१७९६ च्या इंग्लडचा विचार करता आईवडिलांचे वागणेही पटण्यासारखे. इथे प्रश्न खर्चाचा नाही तर योग्य त्या गोष्टीवर खर्च करण्याचा आहे. तसेच मुलीची आई मुलीला व्हेस नीट बघ असे सुचवतेही. पण मुलीला भुरळ पडलेय. काही वेळा मुलांना choice देऊन चुकीच्या निर्णयाचे परिणाम भोगायला लावले की जे शहाणपण येते ते खूप महत्वाचे असते. मुलीला महिनाभर लंगडत चालायला लावणे हे क्रुर वाटले तरीही.
22 Sep 2009 - 9:15 am | पाषाणभेद
आई आपल्या मुलाला केवळ शिकवण देण्यासाठी एकमहिना लंगडत ठेवत नाही. (तिच्या बापाचे तर लक्षच नव्हते. महिन्याच्या शेवटी शेवटी त्याने तिच्या पायाकडे बघीतले. बापच तो. पेताड असेल.)
"ती शूज रिपेर पण करून घेवू शकत होती नाही का? ती मुलगी तिच्या आईला काही प्रश्न विचारते त्यावरून ती अतीशय हुषार व समजूतदार आहे असे दिसते. त्या जारमध्ये आहे ते केमीकलच आहे व त्याचे झाकण उघडले असता ते काळे होईल असे तो केमिस्ट किंवा तिची आई त्या मुलीला आधीच का पटवून देत नाही?"
भारतीय लेखीका असती तर तिने "त्या मुलीच्या आईने तिचे (आईचे) शुज रिपेर न करता गुपचूप तिच्यासाठी (मुलीसाठी) शुज घरात आणून ठेवले व त्या मुलीचे पाय जास्तच दुखायला लागले त्या वेळी तिला दिले" असे कदाचीत लिहीले असते व ते जास्त चांगले वाटले असते.
एकुणच, इंग्लडमधील लोक जास्त प्रॅक्टीकल असतात.
जावुद्या, कथा तर चांगली आहेच, वादच नाही, पण कदाचीत आईवडील यात 'निगेटिव्ह', काळजी न करणारे रंगवले आहेत असा भारतीय मुलांचा समज होवू शकतो. (हा धडा भारतीत भावनीक वातावरणातील विद्यार्थांना, (व कदाचीत महाराष्ट्र) पाठ्यपुस्तक मंडळाने 'लावलेला' होता हे लक्षात घ्या. )
"माझा अवांतर प्रतिसाद पुस्तकात पाठ सिलेक्शन मंडळाला उद्देशून आहे हे लक्षात घ्या." हे मी वर आधीच लिहीलेले आहे.
माझी 'वर्णी' पाठ्यपुस्तक मंडळावर जर लागली तर या प्रकारांना आळा बसू शककतील.:-)
येथल्या काही कविता, लेख 'लागू' शकतील. (माझ्या नाही हो, इतरांच्या!)
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
21 Sep 2009 - 10:20 am | विसोबा खेचर
या निमित्ताने 'द प्राईस ऑफ फ्लॉवर्स' या सुंदर कथेची आठवण झाली..
तात्या.